Skip to main content

वेध गणेश उत्सवाचे... {२}

लेखक मदनबाण यांनी गुरुवार, 26/08/2010 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
श्री गणेश स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... :) नविन मूर्ती बनवण्याची जागा दिसली, मग काय परत बाप्पाची छबी टिपण्याची इच्छा प्रबळ झाली... :) आधीचा धागा :--- वेध गणेश उत्सवाचे... (हौशी फोटुग्राफर)

वाचने 8422
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

छान फोटो पण मला अशा वेगवेगळ्या पोझांमधल्या ग्लॉसी मूर्ती विशेष आवडत नाहीत. गणपतीबाप्पाची पारंपरिक मूर्तीच आवडते. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

सहमत आहे. मांडी घालून चौरंगावर बसलेला आणि एक पाय खाली सोडलेला किंवा दोन्ही पावले जवळ घेऊन गुढगे वर काढलेले गणपती बाप्पा फार आवडतात. काही अपवादात्मक गणपती पण आवडतात जसे मंडईचा शारदा-गजानन, राजाराम मंडळ , भाऊ रंगारी, हत्तीगणपती मंडळाचा युद्धमान गणपती, डोके तालमीचा पैलवान गणपती इ. पण गणपतीला इतर कोणत्या देवाचा मेकअप केलेला नाही आवडत. Bhaau Rangari श्रीमंत भाऊ रंगारी मंडळ Mandai मंडईचा गणपती नागनाथ पार मंडळ. ऋद्धीबाई - सिद्धीबाई या आपल्या पत्न्यांसमवेत बसलेले गजाननराव. :) या वेगळ्या पण गणपतीरूपातच असलेल्या मूर्ती मला फार आवडतात.

In reply to by स्वाती दिनेश

सहमत

हा धागाही मस्त! तू खरच हौशी फोटोग्राफर आहेस रे बाणा! काही गणपतींचे बुकिंग झालेले दिसते आहे, त्या मूर्तींवर अडकवलेले ट्याग पाहून गणपतीचे दिवस अगदी जवळ आल्यासारखे वाटतात.

फोटो चांगलेच आले आहेत. पण वर स्वातीने आणि पुण्याच्या पेशव्यांनी म्हटले आहे तसेच म्हणते. गणपती बाप्पा नेहमीच्याच रंगात छान दिसतात. माझे आवडते गणपतीचे देऊळ - मुरुड जंजि़राजवळचे नांदगाव येथील. इथे काही फोटो मिळाले. http://picasaweb.google.com/gupteprasad/Utsav2010#5429875691304148098

तू वेद, दिशा, परब्रम्ह तू गुण, देह, अन् काल तूच स्थिती, उत्पत्ती , लय मंगलमय, महागणपती || सुरेख छायाचित्रे ! पुण्याच्या गणपतीं चे दर्शन घडवल्याबद्दल पेशव्यांना धन्यवाद !