Skip to main content

आई - माझं जग

लेखक चिंगुसविकॄतजोशी यांनी शनिवार, 14/08/2010 02:24 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या प्रेमळ स्पर्शाने सारा आसमंत कवेत येतो. आई, तुझ्या रागावण्याने जणु देवचं माझ्यावर रुसतो. तुझ्या कौतुकाच्या शाबासकीने आनंदाला पारावर उरत नाही. आई, तू उमेद दिल्यावर अशक्य असं काहीचं राहतं नाही. आई, तुझ्या कुशीत, मला मायेची ऊब मिळते. तू खेळ्वू लागल्यावर संध्याकाळही हसून बघते. तू गोष्ट सांगताना तारेही गोष्ट ऐकायला येतात. आई, तुझ्यासोबत असताना भीतीचे 'राक्षस'ही मला घाबरतात. तुझा प्रसन्न चेहरा बघुनचं माझ्या दिवसाचा सूर्य उगवतो. आई, तू नाराज असल्यावर वाराही घोंगावण्यास घाबरतो. मला महागडी खेळणी नको, भरजरी कपडे नको. हवा फक्त तुझा सहवास, तू भरवलेला गरम भाताचा घास. माझं जगं तुझ्यापासुन सुरु होतं, अन् तुझ्यावरचं संपतं तुझ्या उपकाराची फेड करतांना सात जन्माचं जीवनही अपुरं पडतं.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1445
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

खरच डोळ्यात पाणी आले , अप्रतिम झालिय कविता. खुप सुन्दर

तुम्हि वडिलांना का विसरता ????? त्यावर एखादि कविता जरुर करा....

In reply to by अनुप बंगाली

आपल्या 'वडील' विनंतीस मान देऊन मी 'बाप' ही कविता लिहली आहे मिपावर. कशी वाटली ते कळवायला विसरू नका बर का!!!! आणि आपले सल्ले स्वागतार्ह आहे. तेव्हा निसंकोचपणे सांगा.