आई - माझं जग
तुझ्या प्रेमळ स्पर्शाने
सारा आसमंत कवेत येतो.
आई, तुझ्या रागावण्याने
जणु देवचं माझ्यावर रुसतो.
तुझ्या कौतुकाच्या शाबासकीने
आनंदाला पारावर उरत नाही.
आई, तू उमेद दिल्यावर
अशक्य असं काहीचं राहतं नाही.
आई, तुझ्या कुशीत,
मला मायेची ऊब मिळते.
तू खेळ्वू लागल्यावर
संध्याकाळही हसून बघते.
तू गोष्ट सांगताना
तारेही गोष्ट ऐकायला येतात.
आई, तुझ्यासोबत असताना
भीतीचे 'राक्षस'ही मला घाबरतात.
तुझा प्रसन्न चेहरा बघुनचं
माझ्या दिवसाचा सूर्य उगवतो.
आई, तू नाराज असल्यावर
वाराही घोंगावण्यास घाबरतो.
मला महागडी खेळणी नको,
भरजरी कपडे नको.
हवा फक्त तुझा सहवास,
तू भरवलेला गरम भाताचा घास.
माझं जगं तुझ्यापासुन सुरु होतं,
अन् तुझ्यावरचं संपतं
तुझ्या उपकाराची फेड करतांना
सात जन्माचं जीवनही अपुरं पडतं.
अतिशय सुन्दर
सल्ला
विनंतीस मान देऊन.......