Skip to main content

Drinks ...मुली आणि मद्यपान!

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी बुधवार, 18/08/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
उंचावल्या ना भुवया..! काही खास गोष्ट नाही सहजच ....मनात आलं ते छापते आहे..! काल दोनचार मित्र-मैत्रिणी रात्री जेवायला आले होते. छोले+पुरी+श्रीखंड असा साधा बेत होता. मस्त जेवण झाले.आवराआवरी झाल्यावर सहज गप्पा टप्पा सुरु झाल्या. नेहमीचे विषय चघळता चघळता काही तरी फाटा फुटला आणि गाडी 'स्त्रिया आणि drinks' स्टेशनावर येउन पोचली......Belive me....त्यावर इतकी चावा चावी झाली ना कि बस्स.... सकाळी ५.३० वाजेपर्यंत दळण चालु होते.. मुलींनी drinks घेणे योग्य कि अयोग्य्...संस्कृती,समाज्,नीतीमत्ता,संस्कार इ.इ. मग पुरुष पितात ते योग्य की अयोग्य...हे सगळं चावलं गेलं. पाश्चात्य संस्कृतीचा पगडा...बदलती स्त्री ची मानसिकता..एक ना दोन..! हे लिहिण्यामागचा उद्देश इतकाच आहे कि आपल्या मि.पा. करांची मते जाणुन घ्यायची आहेत. आपल्या विभिन्न मते,वेगवेगळ्या मानसिकता,प्रगल्भ and truely practical वाचक यांचा अक्षरशः खजिना आहे. मला खरंच जाणुन घ्यायला आवडेल कि हे योग्य कि अयोग्य. मग यामध्ये पुरुषांना मुभा आहे असे का मानले जाते? यामध्ये संस्कारांचा सहभाग कितपत आहे? आपल्या मर्यादेत राहुन drinks घेतले तर योग्य आहे कि नाही? आणि असेल तर मग ही मर्यादा काय असेल आणि ती कोण ठरवणार? केवळ change म्हणुन किंवा विरंगुळा म्हणुन drinks घ्यावी कि नाही? अजुनही अनेक पैलू असु शकतात..कि जे आत्ता सुचत नाहियेत पण चर्चेतुन समोर येत जातील! so friends.... what all you've got to say about it??

वाचने 32663
प्रतिक्रिया 165

प्रतिक्रिया

स्त्री मुक्तीचा जमाना आहे. पण म्हणुन पुरुष करतात ते सगळे स्त्रियांनाही आलेच पाहिजे असा अट्टाहास नसावा असे मला तरी वाटते. (हे सिद्ध करण्यासठी पुर्वी विनोद खन्ना, मिथुन चक्रवर्ती इत्यादी प्रभुती शर्ट काढुन हिरोईनी ला च्यालँन्ज करायचे तु पण करुन दाखव म्हणुन. आणि मग हिरोईनी रागावुन पाय आपटत दाणदाण करत निघुन जायची किंवा हीरोच्या प्रेमात पडायची. आता तिही शक्यता उरलेली नाही. आजच्या हीरोने शर्ट काढला तर हेरोइनी काढणारच नाही असेही नाही) एरवी आम्ही कधी मदिरेच्या नादी नाही लागलो तर इतर कोणी प्यावे की नाही हे आम्ही कसे सांगणार? पण असे का कोणास ठावुक पण असे मनापासुन वाटते की दारु पिउन झिंगणार्‍या मुली बघवत नाहीत (मुलांकडे आम्ही बघतच नाही त्यामुळे ते दारु पिऊन गटारात पडले काय किंवा खांबाशेजारी पडलेले असताना कुत्र्याने त्यांचा खांब म्हणुन उपयोग केला काय, आम्हाला काहीच फरक पडत नाही). बाकी ज्याची त्याची आवड.

In reply to by मृत्युन्जय

>>खांबाशेजारी पडलेले असताना कुत्र्याने त्यांचा खांब म्हणुन उपयोग केला काय, आम्हाला काहीच फरक पडत नाही). अगदी असेच म्हणतो

ही श्रावणातली! चालू द्या. (पी कर नही तो सुंघ कर जीओ)

पण चर्चाच चढत गेली ना कि बाकी कशाचीहि गरजच नाही पडली. त्या चर्चेचा hangover उतरत नाहीये म्हणुन मि.पा.करांची मदत हवीये. अहो आपण ५.३० पर्यन्त चर्चा केलीत त्यातील काही मौलीक मुद्दे अथवा आपले उच्च विचार येथे मांडावेत म्हणजे चर्चा अजून पुढे सरकुन आजच "शतक" साजरे होईल.

अहो आपण ५.३० पर्यन्त चर्चा केलीत त्यातील काही मौलीक मुद्दे अथवा आपले उच्च विचार येथे मांडावेत
आठवले की मांडतील त्या.

प्रमाणात आहे तोवर सर्व चांगलेच असते. अति सर्वत्र वर्जयेत. मी कित्येक घरांत नातीपासून पणजीपर्यंत आणि नातवापासून आजोबांपर्यंत सर्वांना एकत्र, हसत खेळत, ड्रिंक्स घेताना बघितले आहे. आणि मी तर असे म्हणेन की ते खरे नशीबवान, कारण 'जीवन त्यांना कळले हो' असे त्यांच्या बाबतीत म्हणावेसे वाटते.

म्हणजे? हा काय प्रश्न झाला? पिऊ द्या की त्यांनाही.. दारुच काय, सिगारेटी पिऊ द्या, तंबाखू मळुन द्या, झालंच तर मारिजुआना, एल.एस.डी., एक्स्टसी, क्यालिफोर्निया ड्रॉप्स, हशीश सगळं सगळं पुरुषांच्या बरोबरीनं मिळालंच पाहिजे. चला चला, कुणीतरी इस्त्रीमुक्ती आणि समानतेचा मोर्चा काढा, चौकात होळी करा, मी आलोच अंगातला बनियन त्या होळीत टाकायला. (संदर्भः सॅटर्डे हजबंड - शं.ना. नवरे) ;)

In reply to by धमाल मुलगा

वा वा वा!!! भलताच अभ्यास दिसतोय तुमचा...अजून काय काय प्रकार असतात हो ? आणि ते कसे "घ्यावे" याबद्दल एक लेख पाडाच..

In reply to by शिल्पा ब

हा हा हा...अहो, कोणत्या वेळी काय उपयोगी पडेल कोणी सांगावं म्हणुन असंच आपलं जरा जनरल नालिज गोळा करुन आहे इतकंच. >>अजून काय काय प्रकार असतात हो ? आयोडेक्स ब्रेड? जिवंत पालीचा धूर? क्याटामाईन इंजेक्शानची पावडर? >>आणि ते कसे "घ्यावे" याबद्दल एक लेख पाडाच.. अजुन कसे घ्यावे ह्याची माहिती मिळाली नाही हो...त्यासाठी एकदा अमेरिकेची/क्युबाची वारी करावी लागेल. म्हणजे प्र्याक्टिकलही होईल...निदान वॉकथ्रू तरी मिळेल. :D

In reply to by धमाल मुलगा

>>>चला चला, कुणीतरी इस्त्रीमुक्ती आणि समानतेचा मोर्चा काढा, चौकात होळी करा, मी आलोच अंगातला बनियन त्या होळीत टाकायला. माझ्याकडे एक विलायती बनियन आहे, तो टाकेन मी. म्हणजे परस्पर विलायती कपड्यांची पण होळी होऊन जाईल. --(देशभक्त) असुर स्वदेशी

इथे आलेल्या ७० प्रतिक्रियेमध्ये जवळजवळ सगळ्यांमध्ये मुलींनी दारू प्यावी किंवा ज्याचे त्याने ठरवावे असा सूर दिसतो. पण हाच प्रश्न जरा बदल करून तुम्ही जर दारू पीत असाल तर तुमच्या बायकोने (होणार्‍या किंवा असलेल्या) दारू प्यालेली चालेल का? असा विचारला तर या प्रतिक्रिया अशाच राहतील का? - ओंकार.

In reply to by मी_ओंकार

तुम्ही जर दारू पीत असाल तर तुमच्या बायकोने (होणार्‍या किंवा असलेल्या) दारू प्यालेली चालेल का? असा विचारला तर या प्रतिक्रिया अशाच राहतील का? तुम्ही नवीन कौल काढुन प्रतिक्रिया अजमावु शकता.

In reply to by मी_ओंकार

तुम्ही जर दारू पीत असाल तर तुमच्या बायकोने (होणार्‍या किंवा असलेल्या) दारू प्यालेली चालेल का?
हो हो चालेल काय, अहो धावेल. किती बचत होईल त्यामुळे :) साला दुकानात १०० / ११० ला मिळणारी क्वार्टर बार मध्ये १६० ते १९० ला जाते. वर जाण्यायेण्यात- बसण्यात वेळ वाया जातो तो वेगळाच. त्यापेक्षा घरातच बसता आले तर किती बरे होईल. पुन्हा जोडीला बायको असल्याने चकण्याची वागिरे काळजीच नाही. एक दिवस बायकोच्या पैशाने आणि एक दिवस आपल्या ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुमचं झालं म्हणजे झालं काय. जरा बायकोचा विचार करा. तिला हवे असेल सोडा-बिडा तर? किती गेल्या शतकातले विचार आहेत तुमचे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

अहो पुण्याचे पेशवे पुण्याच्या पर्‍याला तुम्ही ओळखले नाय काय अजुन? तो पेशव्यांनी (तुम्ही नाय, खरे पेशवे) घालतेल्या पाणीपुरवठा लाईनतले पाणी घालुन जोडीने पिणार असेल तर तुमचे काय घोडे अडले? (तो इथे पैसे वाचवायचे पहातोय अन हे पेशवे सोडा आण म्हणताहेत.) पर्‍या, तुझ्या ह्या पुरोगामी विचारांना पाहुन पेशवे तलाव तुझ्या नावे केला आजपासुन, जा लेका मनसोक्त पेग भरुन पाणी घेउन जा तिथुन.

In reply to by Nile

आपण नीट वाचले नसावे (नेहेमीप्रमाणे). त्यांना (परा यांना स्वतःला) दारूत भेसळ (पाणी, सोडा 'वागिरे' ) चालत नाही. असं ते म्हणत आहेत.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आपला इतिहास (नेहमीप्रमाणेच)कच्चा दिसतो, परा लिहतो अन वागतो याचा काही संबंध आहे असे तुम्हाला वाटलेच कसे?

In reply to by Nile

परा लिहतो अन वागतो याचा काही संबंध आहे असे तुम्हाला वाटलेच कसे? इतिहासाच्या अभ्यासातून हे जाणले आहे की बोलतात तसे इथे कोणीही वागत नाही. ते असो. सदर गोष्टीशी इतिहासाचा काही संबंध नाही सरळ सरळ शब्दांनी चर्चा चालली आहे. उगा बादरायण संबंध जोडू नका (नेहेमीप्रमाणे).

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पुन्हा चुकलात, पर्‍याच्या ऐवजीत तुम्हीच भेसळीविना की काय? ;-) अहो ते बादरायण वाले दुसरे आम्ही नव्हे. असो.

In reply to by Nile

पुन्हा चुकलात, पर्‍याच्या ऐवजीत तुम्हीच भेसळीविना की काय? आम्ही सकाळी फक्त तंबाखू खातो. असो. परत तेच.... ते दुसरे असले तरी सध्या तुम्हालाच म्हणतो आहे बादरायण वाले. असो, बदला.

In reply to by मृत्युन्जय

>>महाभारत तर होइलच वर माझी द्रौपदी करतील सग़ळे मिळुन. =)) =)) =)) =)) आयला...ह्या माणसाला आमचा कोपरापासुन नमस्कार!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शाळेत मात्र एकदम निरागस बालक होतास रे तू!! अजुनही आहे. माझ्यासारखा भोळा भाबडा निरागस सज्जन माणुस आंतरजालावर गूगल सर्च मारुन पण सापडणार नाही. बाकी शाळेत असताना तु पण निरागस होतीस हं.

In reply to by मृत्युन्जय

शाळेत असताना कशाला, मी आजही निरागसच आहे. पण त्या धम्या, पेशवा, परा, नंदू वगैरेंना विचारू नकोस. ते जळतात माझ्यावर! ;-)

In reply to by Nile

शाळेत असताना कशाला, मी आजही निरागसच आहे.
आक्रस्ताळेपणाला निरागसता म्हणतात ? आणि निरागस लोकं कधीपासून रयतेच्या श्राद्धाच्या जिलब्या खायला लागली ?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी प्रविन भप्करला विचारु? आता मी नको तिथे पाय लावुन पळतो नाहीतर उद्याच्या पेपर मध्ये फोटो यायचा माझा "श्रद्धांजली"" खाली.

हो...ते विसरलच कि छापायचं मौ.मु. खालील प्रमाणे. १) कोणाचाहि दबाव आग्रह याला बळी न पडता स्वतः ची इच्छा असेल तर बिनधास्त प्यावी. २) if you are convinced about whatever you are doing...do that. (लग्न झालेले असेल किंवा प्रेमात असाल तर त्याच्या मताचा विचार नक्कीच व्हायला हवा....तो म्हणजे त्याच्या प्रेमाचा आणि तुमच्या बद्दल्च्या भावनांचा आदर म्हणुन...(स्त्री स्वातंत्र्य किंवा तत्स्म कारणासाठी नाही) ३) स्त्री म्हणुन पिताना खालिल मुद्दा ध्यानात ठेवलाच पाहिजे . अ. सोबत्.-आपल्या सोबत कोण आहे.खात्रीची आणि लायक मित्रमंडळी. ब. ठिकाण - अज्ञात्.. निर्जन्..असुरक्षित ठिकाणे. क. आपली कपॅसिटी - किती प्यायल्यानंतर आपण योग्य रितीने चालु वागु शकतो.म्हणजे घरी येण्याइतपत स्थिती ह्या सार्‍या गोष्टी स्त्री म्हणुन लक्षात अशासाठि ठेवाव्या लागतात की नंतर वरिल पैकी कोणताही मुद्दा जर गोत्यात आणणारा ठरला तर ते स्वतःच्या आणि जिवाच्या मुळावर बेतु शकते. आपल्याकडे अजन तरी पुरुषांना या गोष्टींची काळजी करायची गरज नाही आणि ती मुलींना करायची गरज नक्की आहे. ३. कोणत्याही गोष्टीला मर्यादा असावी. आणि हे स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागु पडते. ४.जर ट्राय करु म्हणुन सुरुवात केली असेल तर ट्राय करुन थांबवायला हरकत नसावी. ५. स्वतःची तब्येत हा घटक priorityवर लक्षात ठेवावी. ६.मुले असतिल तर आई आणि बाबा दोघांनीहि त्यांच्या समोर बसुन पिणे प्रकर्षाने टाळावे.कारण त्यांना बाळकडु देणे तरी नक्किच योग्य नाही. मोठी झाल्यावर पिण्याचा निर्णय घेणे न घेणे हा त्यांच्या सामंजस्याचा आणि स्वतःच्या इच्छेचा भाग राहील.

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

आपल्याकडे अजन तरी पुरुषांना या गोष्टींची काळजी करायची गरज नाही आणि ती मुलींना करायची गरज नक्की आहे. असं म्हणू नका हो ताई. स्त्री-पुरुष समानतेचं युग आहे. त्यातून "आबाळ झालेल्या मुली मुलांपेक्षा जास्त टिकून रहातात, गर्भपातानंतर मुलीचा गर्भ असेल तर ते 'बायालॉजिकल वेस्ट' ठरायला जास्त वेळ लागतो असं डॉक्टर स्वतः सांगतात." त्यामुळे मुली जास्त शक्तिशाली आणि ताकतवान असतात हे सिद्ध होतं. आणि तुम्ही हे काय बोलताय भलतंच???

In reply to by मधुशाला

मधुशाला या स्त्रिलिंगी शब्दाचा आयडी आणि त्यातून दारूच्या गुत्त्याचंच नाव अशा आयडीची सदर चर्चाविषयाबद्दल बहुमोल मतं वाचायला मिळतील असं वाटलं होतं, पण निराशा झाली!

प्रमाणाबाहेर दारु पिणं सगळ्यांसाठीच घातक ... १) कोणाचाहि दबाव आग्रह याला बळी न पडता स्वतः ची इच्छा असेल तर बिनधास्त प्यावी. आणि .. ४.जर ट्राय करु म्हणुन सुरुवात केली असेल तर ट्राय करुन थांबवायला हरकत नसावी. ही दोन वाक्य एकमेकांशी विसंगत नाही वाटत ? ३) स्त्री म्हणुन पिताना खालिल मुद्दा ध्यानात ठेवलाच पाहिजे . अ. सोबत्.-आपल्या सोबत कोण आहे.खात्रीची आणि लायक मित्रमंडळी. ब. ठिकाण - अज्ञात्.. निर्जन्..असुरक्षित ठिकाणे. क. आपली कपॅसिटी - किती प्यायल्यानंतर आपण योग्य रितीने चालु वागु शकतो.म्हणजे घरी येण्याइतपत स्थिती सहमत मला वाटतं हे सगळ्यांनीच ध्यानात ठेवणे जरुरीचे आहे . मुले असतिल तर आई आणि बाबा दोघांनीहि त्यांच्या समोर बसुन पिणे प्रकर्षाने टाळावे.कारण त्यांना बाळकडु देणे तरी नक्किच योग्य नाही. मोठी झाल्यावर पिण्याचा निर्णय घेणे न घेणे हा त्यांच्या सामंजस्याचा आणि स्वतःच्या इच्छेचा भाग राहील. सहमत आहे . पण.. हल्ली चित्रपट, सिरीयल्स, इंटरनेट, आणि मित्र-मैत्रीणी यांच्याकडून हे बाळकडू मिळतच असतं.. त्यांच्यापसून काही लपवून ठेवण्यापेक्षा त्यांना योग्य वयात, योग्य प्रकारे परिणाम आणि दुष्परिणाम यांची कल्पना दिली तर त्याचा काही उपयोग होउ शकेल.. पण एक मात्र नक्की ... अति तिथे माती !

In reply to by मनीषा

वाक्ये विसंगत : स्वतःची इच्छा असेल तर बिनधास्त प्यावी. त्यातुन कसला आनंद मिळत असेल तर प्यावी...कायम प्यावी काही जणांना..काही गोष्टी आयुष्यात एकदा तरी ट्राय कराव्या वाटतात. नक्की काय होतं ते आजमावून पहायची इच्छा असते.त्याप्रमाणे एक दोन दा घेऊन्...पाहुन्..ज्याना थांबावेसे वाटते त्यांनी थांबवायला हरकत नाही. बिनधास्त प्यायची /भित भित प्यायची की ट्राय करुन थांबायचे हे व्यक्तिपरत्वे बदलणारे statements आहेत. त्यामध्ये विसंगती आणि सुसंगती ची भानगड नाही दर्शवायची होती. बाकि अ.ते.मा. हे आयुष्यातल्या almost सार्‍या क्षणांना लागु पडणारी मात्रा आहे..:)

जाई................. हा टॉपीक तर एकदम ''नाद खुळा'' आहे,या विषयी लिहेल तितक थोड्च की मुलीनी.....( १८ + ---फक्त भारतात ) दारु पिण्यास आणि ''पाजण्यास '' काहिच हरकत नाही...... फक्त इतकच कि प्यायल्या नन्तर ''गटार , फुटपाथ'' इकडे नीद्राधीन न होता स्वत: च्या घरी जाणे योग्य ........ ता.क. :- फुकटचि दारु ही अत्यन्त पौष्टिक असते........

त्यात काय ? 'पुरुषांनी दारू प्यावी का' असा प्रश्न कधी पडतो का ? मग बायकांच्या बाबतीत का ? प्यावी की न प्यावी हा जिचा तिचा प्रश्न आहे.. आम्हा सी के प्यांत नवरात्रीत अष्टमीला एकवीरेला ब्रांडीचा नैवेद्य दाखवतात... तेव्हा प्रसाद म्हणून घेणं ओघाने आलंच.. हाहा.. गप्पा, गाणी, दारू, मित्र-मैत्रिणी (यात नवरापण येतो).. धमाल येते! आम्ही दारूची हौस करतो... व्यसन नाही.... - हौशी कलाकार

In reply to by असुर

हाहाहाहाहा... लय भारी. त्यांची शंका आणि तुम्हाला झालेले त्याचे ज्ञान. आवडेश...

In reply to by असुर

>>धमालराव, उजेड पाडा आता काहीतरी.... आता कसला उजेड पाडा? जाऊ द्या...लोक नाही नाही त्या शंका घेऊन र्‍हायली...अंधारच बरा. :P

हौस...व्यसन नाही... मस्त!

व्यक्तिशः मला स्त्रियांना दारूची "तोंडओळ्ख" तरी असावी असे वाटते. किमान कोल्ड्रींक काय आणि दारू-बियर काय हा फरक ओळखता येण्याइतपत तरी. वेगवेगळ्या क्षेत्रात,वेगवेगळ्या वेळा सांभाळुन काम करणार्या स्तियांना याबाबतीत थोडेफार सोशल होणे गरजेचे आहे. पण त्यांची बेव-डी होता कामा नये.

आमच्या मते नवख्या स्त्रीने दारु पहिल्यांदा कशी प्यावी याचे मार्गदर्शन यातुन होणे अपेक्षित असावे. पहिल्या छुट वाईन प्या. ती बी उलिशिकच.

प्रतिसादांचं शतक पार केलं या धाग्यानं! आम्हाला आलेल्या सगळ्या प्रतिसादांची बेरीज १०० होणार नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

किंवा आणखी ज्वलंत विषय हवा असेल तर 'स्त्रियांना विनोदबुध्दी असते का? - एक तुलनात्मक चर्चा' मग बघ राव...... है दे दणाद्दण......