Skip to main content

Drinks ...मुली आणि मद्यपान!

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी बुधवार, 18/08/2010 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
उंचावल्या ना भुवया..! काही खास गोष्ट नाही सहजच ....मनात आलं ते छापते आहे..! काल दोनचार मित्र-मैत्रिणी रात्री जेवायला आले होते. छोले+पुरी+श्रीखंड असा साधा बेत होता. मस्त जेवण झाले.आवराआवरी झाल्यावर सहज गप्पा टप्पा सुरु झाल्या. नेहमीचे विषय चघळता चघळता काही तरी फाटा फुटला आणि गाडी 'स्त्रिया आणि drinks' स्टेशनावर येउन पोचली......Belive me....त्यावर इतकी चावा चावी झाली ना कि बस्स.... सकाळी ५.३० वाजेपर्यंत दळण चालु होते.. मुलींनी drinks घेणे योग्य कि अयोग्य्...संस्कृती,समाज्,नीतीमत्ता,संस्कार इ.इ. मग पुरुष पितात ते योग्य की अयोग्य...हे सगळं चावलं गेलं. पाश्चात्य संस्कृतीचा पगडा...बदलती स्त्री ची मानसिकता..एक ना दोन..! हे लिहिण्यामागचा उद्देश इतकाच आहे कि आपल्या मि.पा. करांची मते जाणुन घ्यायची आहेत. आपल्या विभिन्न मते,वेगवेगळ्या मानसिकता,प्रगल्भ and truely practical वाचक यांचा अक्षरशः खजिना आहे. मला खरंच जाणुन घ्यायला आवडेल कि हे योग्य कि अयोग्य. मग यामध्ये पुरुषांना मुभा आहे असे का मानले जाते? यामध्ये संस्कारांचा सहभाग कितपत आहे? आपल्या मर्यादेत राहुन drinks घेतले तर योग्य आहे कि नाही? आणि असेल तर मग ही मर्यादा काय असेल आणि ती कोण ठरवणार? केवळ change म्हणुन किंवा विरंगुळा म्हणुन drinks घ्यावी कि नाही? अजुनही अनेक पैलू असु शकतात..कि जे आत्ता सुचत नाहियेत पण चर्चेतुन समोर येत जातील! so friends.... what all you've got to say about it??

वाचने 32663
प्रतिक्रिया 165

प्रतिक्रिया

In reply to by सुहास..

आमचिपण टॅम्प्लीज.. (मनगटाला थुंकी लावलेल्या स्मायलीची हल्ली फारच गरज पडते का हो.) असो पण व्यनीतुन चर्चा करता येइल आपली इच्छा असेल तर.

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

यात व्यनी करायसारखं काय आहे ब्वॉ? मुले असो वा मुली, दारु पिण्याचा अन त्याचा काय संबंध? आमच्या बरोबरच्या मुलींना तर आम्ही आग्रहाने दारु प्या म्हणतो ;) आल अनिमल्स आर इक्वल!!

स्वयंपाकाच्या धाग्या नंतर ड्रींक्सचा धागा. ह्या नंतर बहुदा, मुलींनी ड्रींक्स घेऊन स्वयंपाक करावा की नाही असा धागा येणार. स्वयंपाक करता आला नाही तरी चालेल, पण ड्रींक्स मात्र देता घेता आलेच पाहिजे. (अशी आजकालची हवा आहे.)

In reply to by अरुण मनोहर

स्वयंपाक करता आला नाही तरी चालेल, पण ड्रींक्स मात्र देता घेता आलेच पाहिजे.
स्वयंपाक करुन झाल्यावर ड्रिक्स देता/घेता आले तर तो कॉकटेल योग . (पुर्वी याला दुग्धशर्करा योग म्हणत असत)

In reply to by प्रकाश घाटपांडे

=)) =)) महान आहात प्रकाशकाका!

In reply to by प्रकाश घाटपांडे

स्वयंपाकाच्या कृतीतच ड्रींक्स घातले तर फ्लांबे (flambe) योग. (गणपांनी alkohol घालून "पेटवण्याच्या" पाकृ द्याव्या प्लीज.)

In reply to by प्रकाश घाटपांडे

_/\_

मुलीनी मद्यपान केले पाहिजे. त्याच्यावर बंदी घालण्यासारखे काय आहे? मद्यपान करुन सलमान माणसाना चिरडु शकतो मग मुली का नाही? असा विचार करुन एका मुलीने दारु पिऊन मुंबईमध्ये माणसे चिरडुन दाखवली आहेत्.तिचा आदर्श घ्यावा. गटारी अमावश्या,गांधी जंयती इत्यादी सण पुरषाच्या बरोबरीने मुलीनी देखिल साजरे करावेत असे मनोमन वाटते.तुम्ही कधी कधी मद्यपान करता ते देखिल सविस्तर लिहा.एक वाचक म्हणुन मला वाचायला आवडेल.

एक खुलासा राहिला जाईताई ५:३० पर्यंत चर्चा करण्याचं बळ 'कशाच्या जोरावर' मिळवलं होत?

In reply to by नितिन थत्ते

विषयांतर करण्यात पटाईत आहात बाकी! ...jokes apart! पण चर्चाच चढत गेली ना कि बाकी कशाचीहि गरजच नाही पडली. :) त्या चर्चेचा hangover उतरत नाहीये म्हणुन मि.पा.करांची मदत हवीये.

कोणीही आणि कितीही दारू प्यायली तरी ते वाईटच. पण व्यक्तीस्वातंत्र्य असल्याने आपण कोणाला अडवू शकत नाही. विषय संपला. चर्चा करण्यासारखे काही नाही.

जिला घ्यायची आहे तिने घावी. किती घावी हे तिने ठरवावे. व त्या नंतर होणार्‍या परिणामांना सामोरे जावे. (उदा. दारु चढणे, हँगओव्हर इ.) बाय द वे, तुमचे मत कळाले तर बरे होईल.

In reply to by शिल्पा ब

कोणी किती घ्यावी हे तुम्ही किंवा मी पैसे देणारे नसल्या मुळे सांगु शकत नाही. त्याचबरोबर जर पहिल्यांदाच पीत असेल तर कळणार कसे की किती प्यावी म्हणजे हँग ओव्हर होणार नाही.

आधुनिक मंगळागौरीचे खेळ खेळल्यावर श्रमपरिहार म्हणुन थोडीशी घेतली जाण्याची बाब समाजमान्य असेल.

In reply to by प्रकाश घाटपांडे

good one! ;)

In reply to by धमाल मुलगा

@ ध मु भाऊ... अहो प्यार्टी ला निमित्त म्हणुन आपन काय बी करया तयार असतो बघा! ;)

ज्याची त्याची जाण समज इ.इ....... वैयक्तिक प्रश्न म्हणुन सोडुन द्यावे!

लहानपणापासुन मद्यपान हे वाईट असेच मनावर ठसत आलेय. त्यामुळे मी कधीही मद्याला हात लावला नाहिये. पण हल्ली बायका/मुली सर्रास घेताना आढळतात. ते पाहुन माझ मन म्हणत करु देत मजा यार!!! हाय काय न नाय काय.

In reply to by पर्नल नेने मराठे

लहानपणापासुन असंच ठसंत आलंय हे खरं. लहानपणापासुन ठसत आलेल्या काय आणि किती गोष्टी आपण फॉलो करत राहतो जन्मभर?

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

मी बर्याच फॉलो करते ... खोटे न बोलणे, पानात काहीही न टाकणे, देवावर विश्वास ठेवणे, कोणाला न फसविणे ह्या त्यापैकी काही !!!

In reply to by पर्नल नेने मराठे

म्हणजे चुचु मॉडर्न विचारांची आज्जीबाई म्हणायची तर! :D ज्याचे त्याचे लिव्हर व तब्येतीचे प्रॉब्लेम व ज्याचा त्याचा प्याला!

चर्चा करा किंवा नका करु पण आजकाल काही बायका/मुली घेतात. भले घेनारया मुलींचे प्रमाण अत्यल्प असेल. पण ट्रेंड सुरू झालाय. आता काय चांगले आनी काय वाईट हे ज्याचे त्याने ठरवावे. आमचे तर रोजचेच त्यामुळे ईतरांबद्दल काय बोलणार.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार २१ वर्षावरील स्त्री आठवड्यातून ३ वेळा एक ग्लास आणि पुरुषांनी दिवसातून २ वेळा आठवड्यातून ५ दिवस एक एक ग्लास लिकर (बर्‍यापैकी खात्री आहे) घेतले तर चालू शकेल...तरीही आपल्याला झेपेल ते प्रमाण ठेवावे...उगाच वाटेल तेवढे लिकर घेतले तर त्रास होणारच...आणि मी असे सुचवेन कि स्त्रियांनी आपल्याबरोबर विश्वास ठेवता येईल असे लोक असतील तरंच बाहेर लिकर घ्यावी (जर घेतलीच तर ) नाहीतर समजा जास्त झाली तर काहीही होऊ शकते...रिस्क कशाला घ्या..स्वतः कंट्रोल मध्ये राहाल इतकीच घ्यावी...स्त्री अन पुरुष दोघांनीही.

In reply to by शिल्पा ब

स्त्री आठवड्यातून ३ वेळा एक ग्लास आणि पुरुषांनी दिवसातून २ वेळा आठवड्यातून ५ दिवस एक एक ग्लास लिकर (बर्‍यापैकी खात्री आहे) घेतले तर चालू शकेल
ग्लास... बापरे! आमच्याकडे चांगले मोठे ३५० मिलीचे ग्लास आहेत. असले दहा ग्लास लिकर म्हणजे जास्तच व्हायची नाही का? :)

In reply to by राजेश घासकडवी

ग्लास म्हणजे साधारण एक बियरची बाटली, आणि हाटेलात जेवढा ग्लास भरून वाईन देतात तेवढी...तुम्ही कितीही मोठ्ठाले ग्लास भरून प्याल...चार ड्रिंक बसतील अशे एकेक ग्लास आणल्यावर काय होणार?

In reply to by शिल्पा ब

एवढे छोटेसे ४ ग्लास प्यायल्यावर डोकं आपटेल म्हणुन india gate किंवा gateway of india च्या खालुन वाकुन जातात ना काही माणसं....तसच काहिसं! ;)

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

ते फक्त बंटा, भांग मारल्याव व्हतय. यष्टी लई लांब असली तरी आतापासुन घाबरुन पळत सुटतय. येशी खाली वाकू वाकू जातोय पावसाच्या पान्याच डबक असल तरीबी नदीत शिरल्यावानी जातोय. यकदा हासाया लाग्ला कि मंग हासतच सुटतय.

In reply to by शिल्पा ब

तुमचं माहीत नाही, पण बीअरची बाटली भरून किंवा वाईनचा ग्लास भरून लिकर - असे दहा ग्लास लिकर (८० प्रूफ किंवा ४०% अल्कोहोल) म्हणजे जास्तच होणार... अवांतर - सेहवाग धागा...

In reply to by शिल्पा ब

आमच म्हन्न घ्यायची त घ्यावी पन उगा दाक्तर ला कह्याला वेठीस धरावं! वाईन मधील अल्कोहोल हे धमन्यातील काठीण्य दूर करण्यास मदत करत यात फक्त तथ्य आहे. त्यामुळे थोडीशी घ्यावी हे ठीक पण डॉक्टरच्या नावाने बेवडे लोक टपलेलेच असतात. पीने वालों को पीने का बहाना चाहिये!

In reply to by प्रकाश घाटपांडे

मी चुकुन 'धम्यातील' असं वाचलं आणि टरकलोच ना राव.

In reply to by शिल्पा ब

>>आणि पुरुषांनी दिवसातून २ वेळा आठवड्यातून ५ दिवस एक एक ग्लास लिकर (बर्‍यापैकी खात्री आहे) घेतले तर चालू शकेल. शिल्पाताई, ईतके पिणार्‍याला बेवडा म्हणतात हो ईकडे भारतात..!! डॉक्टरांचे म्हणने कुठल्या हवामानानुसार होते ते सांगा कि.. भारतातील हवामानानुसार काय म्हणने आहे तुमच्या डॉक्टरांचे?

वांझोट्या चर्चांना शुभेच्छा :) अजुन काही विषय सुचवत आहे :- १) लग्नानंतर मुलींनी ड्रेस घालावा की नको ? २) नोकरीवालीच मुलगी हवी असा मुलाकडच्यांचा हट्ट का ? ३) एकत्र कुटुंब पद्धती योग्य का अयोग्य ? ४) आज गॅस उपलब्ध आहे म्हणुन चुलीवर स्वयंपाक करणार्‍या बाईचा स्वयंपाकाच दर्जा आणि कष्ट उगाच जास्ती गणले जावेत का ? ५) बायकोच्या आई-वडिलांची जबाबदारी नवर्‍याने घ्यावी असा कायदा असावा काय ? ६) नवर्‍याचे मित्र मैत्रीणी असतात मग बायकोचा मित्र चालेल का ? आज बुधवार रात्र असल्याने उद्या गुरुवार सकाळी ह्या धाग्यावर काही खास प्रतिक्रीया वाचायला मिळतेल अशी अपेक्षा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हि चर्चा वांझोटी कशी? किती छान माहिती मिळते आहे...दारू किती प्यायची याबद्दल...कोटा ठरवायला मदत होते आहे .... अजून एक चर्चा करू शकतो...मुलीनी सिगरेटी फुन्काव्या कि नाही.. फुंकल्यास रोज साधारण किती? इ.

In reply to by धमाल मुलगा

=)) चीअर्स!! वांझोट्या आणि प्रतिसादखाऊ चर्चांना सलाम.

सगळ्यांनी पुष्कळ दारू प्यावी दररोज. :) (उमदा) पेशवे त्याने २ शक्यता उद्भवतात १. सगळेच झिंगून गाड्या चालवतील. त्यामुले रस्त्यावरचे लोक मरतील किंवा स्वतः दारू प्यालेले मरतील. २. दारू पिणारा लिव्हर खराब होऊन मरेल. (तार्किक) पेशवे २न्ही परिस्थितीत जगाची लोकसंख्या कमी होणार आहे. त्यामुळे लोकसंख्येचा स्फोटाचा जो काही धोका आहे तो काही दिवस तरी पुढे जाईल. (पर्यावरणवादी) पेशवे

In reply to by परिकथेतील राजकुमार

आयला हे काय? दारू गाळण्याचे पिंप आहे काय? मला वाटले बीअरचा मग आहे इतका मोठा. म्हणजे असा मग घ्यायचा आणि कमोडवर बसूनच प्यायची. ;)

In reply to by पर्नल नेने मराठे

मी myदेशी जाउन आले ना कि आपण Irish village लाच भेटु...तुझ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील... मलाही मिळतील कदाचित... च्वढीच्ते चराशीज चम्मतग ! ;)

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

अग मी एकदा गोळीबार झाला त्या कॅफेत गेले होते (लिओपोर्ड का काय ते) तिथे माझ्या मत्रिणीने 'लार्ज पिचर' ऑर्डर केली तेव्हा असाच मोठा सिलिण्दर आला भरुन. मग ति न माझा अजुन एक मित्र, २घे ते प्यायले.

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

अग मी एकदा गोळीबार झाला त्या कॅफेत गेले होते (लिओपोर्ड का काय ते) तिथे माझ्या मत्रिणीने 'लार्ज पिचर' ऑर्डर केली तेव्हा असाच मोठा सिलिण्दर आला भरुन. मग ति न माझा अजुन एक मित्र, २घे ते प्यायले.

आमचीबी येक पिंकः दारू मुलींनी काय मुलांनी काय कुणी ही प्यायली तरी लिव्हर/किडनी इ. ची झीज दोघांची होणारच आहे. दुसरी बाजू अशी की दोघांना नशासुध्दा येणारच आहे. स्वगतः इथे लेडी जस्टीस च्या चालीवर लेडी अल्कोहोल - हातात तराजू - एका पारड्यात मुलगी, पलिकडच्यात मुलगा, दुसर्‍या हातात तलवारीवर भोसकलेली लिव्हर असा फटु पाहिजे होता. तो जयपाल कुठे हरवलाय आजकाल कोण जाणे.

खरं सांगायचं तर झिंगून लास होणार असतील तर कोणीही प्यावी दारु नाहीतर उगीच वाया घालवू नये असे आमचे स्पष्ट मत आहे. -(पिता-मह) नगरीनिरंजन