✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पश्चिम महाराष्ट्राचे प्रेमगीत

अ — अडगळ, Wed, 08/18/2010 - 06:44
उसाच्या कांड्यांनी रट्टे खाताना, भुईमुगानं हात द्यावा , तशी आलीस आयुष्यात तू , आंतरपीक होवून . मोर्चात माझ्या शर्टाला बिल्ला लावताना, जेव्हा म्हणालीस की अगदी शेट्टी सायबासारखं बोलता की ओ , तेव्हाच ओळखलं मी . म्हटलं , मळ्याला मालकीण गावली . एकदाची . पण आता बांधावर उभारून किती दिवस बघायची वाट ? झुगारून दे ही जुलमाची झोनबंदी , माव्या सारखा पसरलाय विरह. शिवारभर . तुझ्या ओठातून पिवू दे मला एन्डोसल्फान , तुझ्या श्वासाची भुकटी भुरभूरु दे माझ्या गात्रा गात्रावर फॉलीडॉल होवून. होवून जावू दे उभ्या देहाची साखर.

प्रतिक्रिया द्या
2188 वाचन

💬 प्रतिसाद (12)

हॅ हॅ हॅ हॅ एकदम पहिल्या

विजुभाऊ
Wed, 08/18/2010 - 14:23 नवीन
हॅ हॅ हॅ हॅ एकदम पहिल्या धारेच्या मॉलॅसीस ची आठवण झाली
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ.. मस्तं

llपुण्याचे पेशवेll
Wed, 08/18/2010 - 14:25 नवीन
हॅ हॅ हॅ.. मस्तं कविता.. (उसा-शिवारातला)पेशवे
  • Log in or register to post comments

मस्तच ... एकदम वेगळीच कविता!

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/18/2010 - 17:41 नवीन
मस्तच ... एकदम वेगळीच कविता!
  • Log in or register to post comments

जबरा रे ....

फ्रॅक्चर बंड्या
Wed, 08/18/2010 - 18:18 नवीन
जबरा रे ....
  • Log in or register to post comments

अगायायायायाया......

धमाल मुलगा
Wed, 08/18/2010 - 18:24 नवीन
असली खणखणीत प्रेमकविता वाचुन मला बाटलीभर रोगार प्यायल्यासारखी नशा झाली बॉ! मस्त हो. :)
तुझ्या ओठातून पिवू दे मला एन्डोसल्फान ,
=)) =)) =)) मायला....ओठातुन एन्डोस्ल्फान???? =)) =)) =))
  • Log in or register to post comments

मस्तच ... एकदम वेगळीच कविता!

अविनाशकुलकर्णी
Wed, 08/18/2010 - 18:30 नवीन
मस्तच ... एकदम वेगळीच कविता!
  • Log in or register to post comments

जबरा... अजून पिकं येवूंदे

पाषाणभेद
Wed, 08/18/2010 - 19:31 नवीन
जबरा... अजून पिकं येवूंदे
  • Log in or register to post comments

उसाच्या कांड्यांनी रट्टे

सूड
Wed, 08/18/2010 - 20:32 नवीन
उसाच्या कांड्यांनी रट्टे खाताना, भुईमुगानं हात द्यावा , तशी आलीस आयुष्यात तू , आंतरपीक होवून हे एकदम झकास
  • Log in or register to post comments

खासच!

अथांग
गुरुवार, 08/19/2010 - 00:18 नवीन
होवून जावू दे उभ्या देहाची साखर. -अथांग.
  • Log in or register to post comments

नाद खुळा रे.

वात्रट
गुरुवार, 08/19/2010 - 04:17 नवीन
< >मस्तच मात्रा छंद वैगेरे ची आई बहिण केली आहे ... तरी पण आवडली.
  • Log in or register to post comments

वा

पुतळाचैतन्याचा
Tue, 08/24/2010 - 13:50 नवीन
naadala chattya.....
  • Log in or register to post comments

लै खास

नावातकायआहे
Tue, 08/24/2010 - 14:22 नवीन
आजुन एक अडगळ स्पेशल....
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा