Skip to main content

पश्चिम महाराष्ट्राचे प्रेमगीत

लेखक अडगळ यांनी बुधवार, 18/08/2010 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
उसाच्या कांड्यांनी रट्टे खाताना, भुईमुगानं हात द्यावा , तशी आलीस आयुष्यात तू , आंतरपीक होवून . मोर्चात माझ्या शर्टाला बिल्ला लावताना, जेव्हा म्हणालीस की अगदी शेट्टी सायबासारखं बोलता की ओ , तेव्हाच ओळखलं मी . म्हटलं , मळ्याला मालकीण गावली . एकदाची . पण आता बांधावर उभारून किती दिवस बघायची वाट ? झुगारून दे ही जुलमाची झोनबंदी , माव्या सारखा पसरलाय विरह. शिवारभर . तुझ्या ओठातून पिवू दे मला एन्डोसल्फान , तुझ्या श्वासाची भुकटी भुरभूरु दे माझ्या गात्रा गात्रावर फॉलीडॉल होवून. होवून जावू दे उभ्या देहाची साखर.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2203
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

हॅ हॅ हॅ.. मस्तं कविता.. (उसा-शिवारातला)पेशवे

असली खणखणीत प्रेमकविता वाचुन मला बाटलीभर रोगार प्यायल्यासारखी नशा झाली बॉ! मस्त हो. :)
तुझ्या ओठातून पिवू दे मला एन्डोसल्फान ,
=)) =)) =)) मायला....ओठातुन एन्डोस्ल्फान???? =)) =)) =))

उसाच्या कांड्यांनी रट्टे खाताना, भुईमुगानं हात द्यावा , तशी आलीस आयुष्यात तू , आंतरपीक होवून हे एकदम झकास

होवून जावू दे उभ्या देहाची साखर. -अथांग.

>मस्तच मात्रा छंद वैगेरे ची आई बहिण केली आहे ... तरी पण आवडली.

naadala chattya.....

आजुन एक अडगळ स्पेशल....