Skip to main content

जर........तर मग खुशाल जाऊद्या एखाद्या कुटुंबाला मतदानादिवशी हवे तिथे पिकनिक साजरि करायला. काय हरकत आहे ?

जर........तर मग खुशाल जाऊद्या एखाद्या कुटुंबाला मतदानादिवशी हवे तिथे पिकनिक साजरि करायला. काय हरकत आहे ?

Published on 16/08/2010 - 08:43 प्रकाशित मुखपृष्ठ
विजू भाऊंच्या ह्या प्रतिसादावरून सुचलेले हे लेखन http://mr.upakram.org/node/2741#comment-44212 इथे विजू भाऊंनी एक विधान केलेले आहे कि, >> मतदानादिवशी पिकनिक साजरि करणारांना राजकिय नेत्यांना शिव्या देण्याचा अधिकार आहे का? ह्यांचा आक्षेप कदाचित असा असेल कि सर्वसाधारण माणूस मतदानादिवशी पिकनिक साजरि करायला जातो. जो जातो त्यास राजकीय नेत्यांना काहीही बोलण्याचा अधिकार रहात नाही. ह्याच्याशी पूर्ण पणे सहमिती दर्शविल्यानंतर मात्र खालील विचार मनात आले, मागल्या निवडणुकीत जवळपास ६० % मतदान झालेले होते. म्हणजे काय उरलेले ४० % लोक पिकनिक साजरि करायला गेलेली होती काय ? ह्याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. मग काय करणे होती कमी मतदान होण्याची ? १) माणूस कामानिमित्त आपले निवास सोडून दुसरीकडे जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. बरीचशी पुरुष मंडळी रोटी कमाविण्यासाठी आपापल्या गावातून दुसर्या गावात ( तात्पुरते परदेशी ) गेलेली असतात, तिथे/तिथून त्यांना मतदान करण्याची सोय उपलब्ध नसते. म्हणून त्यांचे मत वाया जाते. पोस्टाने वगेरे मत पाठीवीने, त्यासाठी करायला लागणारे प्रयत्न क्लिष्ट आहेत (माझ्या मते ते मुद्दामून तसेच ठेवले गेलेले आहेत.) २) बर्याचदा अशिक्षित माणसाला मतदानाची प्रक्रिया नीट न समजल्यामुळे त्याचे मत वाया जाने. ३) लोक कोणताच उमेदवार लायन न समजणे. व त्यामुळे मतदानच न करणे ४) गुंड लोकांची भीती. काही ठिकाणी गुंड लोक धाक दाखूवन लोकांना मतदानापासून परावृत्त करतात. पोलीस यंत्रणा/ तिथले स्थानिक राजकारणी हे आपापल्या फायद्याचे गणित करून गप्पा राहतात. ५) मतदान करताना "कोणालाच मत नाही" ह्याचे बटन उपलब्ध नसणे. जेणे करून गुप्त पद्धतीने तरी लोकं आपले म्हणणे त्यातून व्यक्त करू शकतील. (नाही कि कोणता फॉर्म भरायला लावला पाहिजे, ते करणे जगजाहीर होत असल्यामुळे सामान्य माणूस तसे करायला कचरतो.) ह्यासाठी एक उपाय सुचत आहे कि इंटरनेटवर(घर बसल्या) मत देण्याची सोय किव्वा भारतातून कोणत्याही मतदान केंद्रातून तुमचे मत देण्याची सोय करावी. जे बाहेर पडले आहेत त्यांनी संपूर्ण भारताचा विचार करून योग्य मत देणे हे जास्त संयुक्तिक आहे कारण तसे मत देण्यामागे कोणतेच त्यांचे स्वार्थ नसते, पण एका स्थानिक माणसाच्या बाबतीती हा फरक पडू शकतो , त्याचे एखादे काम करून देण्याच्या आमिषाने किव्वा थोडे फार पैसे देऊन टायचे मत विकत घेता/देता येऊ शकते. परदेशी स्थायिक अथवा दुसरीकडे गेलेल्या माणसाचे मत विकत घेणे किव्वा त्याला काही लालूच दाखविणे, धाक दाखविणे तुलनेने अवघड. इंटरनेटवर मत देण्याची सोय किव्वा भारतातून कोणत्याही मतदान केंद्रातून तुमचे मत देण्याची सोय झाली तर मतदान दिवशी पिकनिक साजरि करण्यास काय हरकत आहे ? पिकनिक साजरि करण्यास गेलेले कुटुंब जवळपास एखादे केंद्र व एखादे सायबर कॅफे गाठून अर्ध्या तासात आपले मेल वगेरे चेक करून मतदान पण करेल. (उलटपक्षी जर अशी सोय झाली तर कंपनी कामगारांना अर्धा दिवस सुट्टी देण्याऐवजी फार-फार तर एक तासाची सुट्टी देईल. कामाच्या जागेवरच एखादा संगणक उपलब्ध करून मतदान होऊ शकेल. software मधील मंडळी तर बसल्या बसल्या मतदान करू शकतील.) योग्य काळजी घेऊन जर हजारो करोडोचे व्यवहार इंटरनेटवर होऊ शकतात, तर इंटरनेटवर मत देण्याची सोय करणे नक्कीच अशक्य नाही. मग खुशाल जाऊद्या एखाद्या कुटुंबाला मतदानादिवशी हवे तिथे पिकनिक साजरि करायला. उलट निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर निदान चांगले विचार तरी डोक्यात येतील आणि योग्य मतदान होईल त्यातून.

याद्या 1845
प्रतिक्रिया 6

बाकी लिहिलेले तुमचे आहेत. काहीत्या उपहासतून तुम्ही मतदानाच्या अडचणी मांडत आहात असे मी समजतो. मात्र, "यापैकी नाही" हे बटण हवे यासारख्या मागण्यांच्या मी विरुद्ध आहे. ह्या प्रकारच्या निवडणूका प्रॅक्टीकली खर्चिक व तर्कदुष्ट वाटतात. असो. बाकी चालु द्या बाकी शिर्षकाची लांबी बघुन उपक्रमावरील एका सदस्याची आठवण झाली :P

मुळातच मतदान यंत्र हि निकृष्ट दर्ज्याची असुन ह्यक करु शकतात असे समजल्याने मुळे गुप्त मतदान हा फार्स आहे असे वाटते..त्या मुळे उरला सुरला मतदान करावयाचा उत्साह हि मावळला

आपण सुचविलेला उपाय खरच विचार करण्याजोगा आहे. योग्य ती काळजी घेऊन इंटरनेटवर मत देण्याची सोय करणे नक्कीच अशक्य नाही. नाहितरी सध्याच्या मतदान पध्द्तीत खुप ठिकाणी बोगस मतदान होतेच. मला वाटते की इंटरनेटद्वारे हे सर्व प्रकार रोखणे सहज शक्य आहे. कळावे आपला नम्र, अण्णु :)

पण मी काय म्हणतो.. हे सगळे करण्यापेक्षा, सरकार सरळ शॉपींग मॉल, साड्यांचे सेल, परमीट रुम, थेटर्स, समुद्र किनारे, इतर रमणीय ठिकाणे, लेडीज हॉस्टेल्स बाहेरचे पटांगण अशा ठिकाणी मतदान केंद्रे का उघडत नाही ? नक्कीच मतदानात भरीव वाढ होईल.