पीपली लाइव गोष्ट आहे नथाची, पीपली , 'मुख्यप्रदेशात' राहणार्या एका गरीब शेतकर्याची. नथा त्याचा भाउ बुधिया, आई (अम्माजी), बायको आणि ३ मुले ह्यांच्याबरोबर एका झोपडीवजा घरात रहात आहे. चित्रपट सुरू होतो, नथा आणि बुधिया शहरात जात आहेत. बँकेचे कर्ज न फिटल्याने त्यांच्या जमिनीचा लिलाव झालेला आहे. काहीही करून वडिलोपार्जित जमीन वाचवायची अशा विचारात दोघेही असतानाच गावातील ठाकूर त्यांना सांगतो की सरकार आत्महत्या करणार्या शेतकर्याच्या कुटुंबास एक लाख रुपये नुकसान भरपाइ देते. हे एकताच नथा आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. ही ताजा खबर मीडीया ला मिळते आणि मग काय होते त्याची अफलातून गोष्ट म्हणजे हा चित्रपट.
चित्रपटाला निवडणूकीची पार्श्वभूमी आहे. मुख्यप्रदेशात निवडणूका येउ घातल्या आहेत आणि पीपली गाव मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आहे. एकीकडे मुख्यमंत्री, ठाकूर, पप्पूलाल (ठाकूरचा प्रतिस्पर्धी), कृषीमंत्री किडवई ह्यांच्यातली रस्सीखेच तर दुसरीकडे हिंदी आणि इंग्रजी न्यूज चॅनेलवाल्यांची रस्सीखेच अप्रतीम सादर केली आहे.
सर्वच कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत, विशेषतः नथा, त्याची बायको, अम्माजी, राकेश (लोकल रिपोर्टर).. होरी महातो आणि 'लालबहादूर' सुद्धा एकदम परिणामकारक. मला स्वतःला नथाची बायको आणि होरी महातो ह्यांची मरण्यापेक्षा जगण्याची जिद्द खूप खूप भावली. संगीत सुद्धा छान आहे. 'महंगाइ डायन' गाणे मस्तच आहे. अनुशा रिजवी ह्यांचे दिग्दर्शन केवळ अप्रतीम.
फेमला रात्री १० चा शो होता. शो सुरू होण्याआधी राष्ट्र्गीत एकवले गेले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्र्गीत एकल्यावर छान वाटले. चित्रपट संपल्यावर जी जाणिव झाली ती मात्र खूप वेदना देणारी होती...
वाचने
3989
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान परिचय...पहायला हवा हा
हम्म पाहायलाच हवा असे वाटते
विषय , पात्रे वाया घालवली असे वाटले.
सहमत. पण्
In reply to विषय , पात्रे वाया घालवली असे वाटले. by अडगळ
गाभ्रीचा पाऊस हा सिनेमा तर
In reply to सहमत. पण् by चिंतामणी
पुपे
In reply to गाभ्रीचा पाऊस हा सिनेमा तर by llपुण्याचे पेशवेll
प्रमोदरावांशी सहमत आहे. ह्या
In reply to पुपे by प्रमोद्_पुणे
.....
In reply to प्रमोदरावांशी सहमत आहे. ह्या by llपुण्याचे पेशवेll
अ मस्ट
थिएटर मधले अमेरिकी भारतीय
In reply to अ मस्ट by मीनल
रेडीओवर ऐकल्याप्रमाणे
In reply to थिएटर मधले अमेरिकी भारतीय by पारुबाई
रेडीओवर ऐकल्याप्रमाणे हा
In reply to रेडीओवर ऐकल्याप्रमाणे by ३_१४ विक्षिप्त अदिती
पारुबाई असु द्या हो......
पीपली लाइव्ह
ट्रेलर पहिला...black कॉमेडी
आजच पाहिला
बारोमास..
आत्महत्या करण्याचा निर्णय
कालच हा चित्रपट पाहिला. मला
काय बोलावे?
चित्रपट न बघताच चित्रपट
In reply to काय बोलावे? by गंगाधर मुटे
नी
In reply to चित्रपट न बघताच चित्रपट by नीधप
मी कुठे बघितलाय. त्यामुळे मी
In reply to नी by प्रमोद्_पुणे
स्वारी
In reply to मी कुठे बघितलाय. त्यामुळे मी by नीधप
आणि 'लालबहादूर' सुद्धा एकदम
>>>चित्रपट न बघताच चित्रपट
गाभ्रीचा पाऊस
आवडला