कौलाचा उद्देश हा वैवाहिक संकल्पना बाबत विवाहेच्छुंच्या मानसिकतेची चाचपणी करणे. आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाह करणार नाही असा मत एखाद्याने दिले म्हणजे तो जातीय वादी आ धर्मवादी ठरतो असे मानण्यात येणार नाही.
वाढत्या कुटुंब कलहाचे प्रमाण लक्षात घेता लिव्ह इन हा लग्नाला पर्याय रहाणार आहे..असे दिसते..जर पोटगी व घटफोटाचे काय्दे कडक व अंमल बजावणी द्रुत गतिने झाली तर लोक लग्नास घाबरतिल..
लग्न झाले असल्याने मत न नोंदवता प्रतिक्रिया देत आहे.
लग्न आंतरजातिय आहे पण ठरवून झालेले आहे . (आंतरपोटजातिय पण नव्हे ..म्हणजे देब्रा - कोब्रा सारखे...आंतर जातिय च आहे)
लग्न जमवताना जातीचा विचार केलेला नव्हता. आलेल्या स्वजातीय आणि आंतरजातीय स्थळांमधून स्वभाव , शिक्षण , अनुरूपता (रूप , उंची, आवड निवड) वगैरे बाबी बघुन पसंत पडलेल्या स्थळास होकार दिला. बायकोच्या माहेरी ही जातीचे फारसे स्तोम नव्हते. कारण तिच्या आईवडिलांचाही विवाह आंतरजातिय आहे.
आणखी एक मुद्दा म्हणजे बायकोच्या आईची जात , वडिलांची जात आणि माझी स्वतःची जात तिन्ही भिन्न आहेत.
अवांतर : कॉलेजमध्ये असताना ग्रुप मधील एका मैत्रिणीस ग्रुपमधीलच एका मुलाने प्रपोज केले. मुलीने प्रपोजल स्विकारले घरच्यांनीही लग्नास मान्यता दिली कारण मुलगा स्वजातीय (कोब्रा) होता. पण हाच मुलगा इतर जातीतीलच काय पण पोटजातीतील असता तर तिने लग्नास नकार दिला असता असे तिच्याकडून समजले होते.
अजून एक निरीक्षण म्हणजे ज्या ज्या मित्रांनी प्रेम विवाह केले आहेत त्यात ब्राम्हण मुलामुलींनी मराठी भाषिक जोडीदार निवडताना स्वजात बघून विवाहाचा निर्णय घेतला पण प्रेमविवाह केलेल्या अब्राम्हण मुलां/मुलीनी मात्र सर्रास आंतरजातीय विवाह केलेले आहेत.
उत्तर देणे अडचणीचे वाटते याला मत दीले आहे.
आपल्याकडे ईतके फिल्टर लावलेले असतात की हा प्रश्न म्हणजे अगदी टोकाची भुमीका वाटते.
एक तर कुंडली बघीतली जाते मग रास, नक्षत्र, नाडी, गोत्र बरच काही..
आपली स्वतःची मत काहीही असो पण घरच्या लोकांना कोण सांगणार??
प्रकाश'जी.... आपण एक पर्याय द्यावयाचा चुकुन विसरलात का?
* प्रेमविवाह केला, तरी"स्वजाती"तच करेन
असा एक पर्याय हवा होता.....
मग स्वजातीयांमध्ये... इतर पोटजाती मानणार नाही! ;)
: जसे की कोकणस्थ ब्राह्मण, देशस्थ ब्राह्मण, कर्हाडे, कानडी, ... इत्यादिंनी एकमेकांच्यात विवाह ठरवण्यास हरकत ठेवता कामा नये! ... अगदीच "हटके" वगैरे करायचं असेल... तर "सी.के.पी" ... हा ऑप्शन पण चांगला आहे....
फक्त सीकेपींसारखं "नॉनव्हेज" करता आणि खाता (आणि राहताही) आलं पाहिजे! ;)
________
पण ओव्हरऑल विचार करता.... घरच्यांच्या सम्मतीने केलेला "स्वजातीय विवाह" केव्हाही चांगला! :)
>> घरच्यांच्या सम्मतीने केलेला "स्वजातीय विवाह" केव्हाही चांगला!
....
आता ओव्हरऑल विचार करता आम्हालाही वाटतेय ..
लोक आधी प्रेम करणार | मग आंतर-*** लग्न होणार |
नुस्ता वर्णसंकराचा हाहाकार | धर्म बुडणार निश्चित ||
आंतर-*** => आंतर-जातीय, धर्मिय, वंशिय, प्रान्तिय वगैरे काहिही !
लोक आधी प्रेम करणार | मग आंतर-*** लग्न होणार |
नुस्ता वर्णसंकराचा हाहाकार | धर्म बुडणार निश्चित ||
आंतर-*** => आंतर-जातीय, धर्मिय, वंशिय, प्रान्तिय वगैरे काहिही !
अभिरत
--------->
"भिरभिरी" वृत्ती असली की असंच होणार ना!... अभिर ! ;)
जेवढे पर्याय वाढतील तेवढा गोंधळ वाढेल. तसेच 'प्रेम' का 'ठरवुन' हा विषय गौण ठेवला आहे.
आता ज्यांनी आंतरजातीय/धर्मीय लग्न अगोदरच केलेली आहेत म्हणुन या कौलात ज्यांना सहभाग घेता आला नाही त्यांनी आपल्या मुला/मुलींची जात/धर्म हा सरकारी दरबारात काय लावली/ला आहे हा अन्य विषय होउ शकतो. तसेच ज्यावेळी त्यांनी लग्न केले त्यावेळी ते विवाहेच्छुकच होते तेव्हा त्यावेळचे त्यांचे मत काय होते हे ते आत्ता देखील सांगु शकतात. म्हणजे सरकारी भाषेत कार्योत्तर मंजुरी.
पण ओव्हरऑल विचार करता.... घरच्यांच्या सम्मतीने केलेला "स्वजातीय विवाह" केव्हाही चांगला
या वर अधिक विचार / विश्लेषण अस्थानी नक्कीच ठरल नसत.
हा शब्द आवडला.
माझ्या लग्नाच्या वेळी मी जातीचा विचार केला नव्हता. धर्माच्या बाबतीत कदाचित इतर धर्मीय विवाहयोग्य मुलाचा पर्यायच कधी समोर आला नाही त्यामुळे धर्माचा विचार असा वेगळा केला नव्हता. पण कोणी फार आवडला असता, तर घरच्यांना सांगितले असते असे वाटते. पण स्वतः धर्म बदलून लग्न केले नसते. धर्म बदलायलाही लावला नसता. हे पर्याय अधिक विस्तृत द्यायला हवे होते, म्हणजे मिळणारी माहिती अधिक विस्तृत मिळाली असती..
म्हणून कार्योत्तर मंजुरीच्या दृष्टीने क्र. ३ चा पर्याय स्विकारला आहे.
या कौलानिमित्त काही प्रश्न मनात आले - जसे : जात/धर्म न पाहता लग्न करणे म्हणजे काय? जात आपल्याला माहितीच नसली तर खर्या अर्थाने जात न पाहता लग्न होऊ शकते. नाहीतर कुठेतरी मनात जातीचे बीज राहतेच. मग ते कुठे जेवणाखाण्याच्या रीतींवरून (पूर्ण शाकाहारी असणारे/मुख्यत्वे मांसाहारी जेवण आवडणारे) केलेल्या टोकदार बोलण्यातून दिसते, किंवा कधी स्वतःच्या जातीचे खाण्यापिण्यावरून, दिसण्यावागण्यावरून कौतुक करीत बोलण्याची फॅशन येते त्यातून दिसते. कधीकधी स्वतःच्या मुळांपर्यंत जाण्याची हौस असते. त्यातून मिळणारी माहितीवजा शरीरवैशिष्ट्ये, स्वभावाची वैशिष्ट्ये लोक आपली ओळख म्हणून दागिन्यांप्रमाणे/कपड्यांप्रमाणे धारण करतात, किंवा दुसर्यांनाही घालतात. मग ती खरी खुरी हाडामासाची माणसे तशी खरेच असोत वा नसोत.
तरी मुळात सर्व माणसे हे फरक विसरू शकतात असे वाटते. मात्र हे फरक विसरण्यासाठी तेवढेच सबळ कारण हवे! ओळख, सहवास या गोष्टी मदतीस येऊ शकतात.
(स्वतंत्र प्रतिसाद देण्याची सुविधा दिसत नसल्याने इथे मत देत आहे.)
अजुनतरी लग्न का करावे/करतात? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात आहे, ते मिळाल्यानंतर हा प्रश्न उपस्थित होईल. ;)
त्याआधी लग्न का करावे/केले/करणार? असाही एक कौल घ्यावा म्हणजे प्रस्तुत कौलास मत देण्यास मदत होईल. :)
शेवटच्या पर्यायाला मत दिले आहे.
असा कौल घेणे तितकेसे बरोबर नाही असे वाटते.
काही पर्याय उदा. "जाणूनबुजून आंतरजातीयच करीन" हा तर हास्यास्पदच आहे.
"आंतरजातीय वा धर्मीय च करण्याचा अट्टाहास नाही परंतु 'योग्य' व्यक्ती असल्यास जात /धर्म पहाणार नाही" या पर्यायाला सर्वात जास्त मते मिळतील हे अपेक्षित.
मला "बोल, होतोस का नाही भारतीय? असे दरडावून विचारले तर मीही नाही होत जा असे उत्तर देईन" या पुलंच्या वाक्याची आठवण झाली.
मी स्वतः विवाहेच्छु (आणि तरुणही ;) ) नाही. त्यामुळे अर्थातच मत दिलेले नाही.
माझ्या लग्नाच्या वेळी ज्यांच्या भेटी घेतल्या त्यात बहुतांशी जातीतल्याच होत्या. परजातींपैकी देशस्थ ब्राह्मण अनेक आणि एक भंडारी आणि एक अजून एका जातीतली होती. या परजातीय मुलींपैकी कोणाशी माझे लग्न झाले नाही हे खरे. पण याचा अर्थ मी जाणीवपूर्वक जातीतच लग्न केले असा काढावा का?
लग्न कोणाशी जुळेल हा अगदीच चान्स इवेण्ट आहे.
काही पर्याय उदा. "जाणूनबुजून आंतरजातीयच करीन" हा तर हास्यास्पदच आहे.
कदाचित काही व्यक्ती अशा असु शकतात कि समाजाला आंतरजातीय विवाहाचे महत्व वा आदर्श अधोरेखित करण्यासाठी स्वजातीतील योग्य वधु/वर मिळाले तरी अट्टाहासाने तसेच योग्य इतर जातीत शोधुन मगच विवाह करण्याचा पर्याय स्वीकारतात. किरण मोघे नी जाणीव पुर्वक अमावस्येला निवडणुकीचा फॊर्म भरला होता असे ऐकून आहे
>>किरण मोघे नी जाणीव पुर्वक अमावस्येला निवडणुकीचा फॊर्म भरला होता असे ऐकून आहे
ती वेगळी गोष्ट आहे. मी अनेक वस्तू जाणीवपूर्वक पितृपक्षात वगैरे विकत घेतल्या आहेत. पण जाणीवपूर्वक आंतरजातीय विवाह करणे म्हणजे जात पाहून विवाह करण्यासारखेच आहे.
पण जाणीवपूर्वक आंतरजातीय विवाह करणे म्हणजे जात पाहून विवाह करण्यासारखेच आहे.
असेच म्हणतो.
ह्या धाग्यातील मूळ प्रश्नासंदर्भात काय करणार याचे मी उत्तर देऊ शकत नाही. :( मात्र लग्नाच्या वेळेस जात (अथवा पत्रिका) पाहून लग्न केलेले नाही. अगदी स्वैपांक येतो का म्हणून पण तपासले नव्हते. ;)
बाकी अस्मादीकांचा जन्मच टेक्निकली अमावस्येचा आहे. :-)
>>बाकी अस्मादीकांचा जन्मच टेक्निकली अमावस्येचा आहे.
टेक्निकली अमावस्येचा म्हणजे काय हो?
आमचा पितृपक्षात आणि तो सुद्धा फ्रायडे द थर्टीन्थ ला. :D त्यामुळेच मी असा आहे असे अनेकांचे मत आहे.
हिंदू कालनिर्णयाप्रमाणे अमावास्या.... ;)
आमचा पितृपक्षात आणि तो सुद्धा फ्रायडे द थर्टीन्थ ला....त्यामुळेच मी असा आहे असे अनेकांचे मत आहे.
असा म्हणजे, "आधिच - त्यात" वगैरे की काय? ;) बाकी पाश्चात्य संस्कृतीत चेटकीणी खराटा वापरतात, येथे साक्षात खराट्याचा जन्मदीनच त्यांच्या (पाश्चात्यांच्या) भयकल्पनेशी मिळता जुळता आहे. ;)
परजातींपैकी देशस्थ ब्राह्मण
>>>>>>>>>>>??????
देशस्थ ब्राम्हणाना 'परजात' समजतात हे मला आजच कळले, लग्नानंतर साडेपाच वर्षानी!
तरीच मला सासरी 'एलियन' असल्यासारखे वाटते!
हुर्रे! मी आंतरजातीय विवाह केला आहे! कित्ती नै मी..., ......!!!!
मूळ विषयाबद्दल,..
खरे तर काय फरक पडतो...
माझ्या आंतररप्रान्तीय, आणी एक्काच्च जातीत लग्न केलेल्या मैत्रिणींच्या आणी माझ्या, आपापल्या नवर्याच्या तक्रारी अगदी एकसारख्याच असतात!
म्हणूनच देव, देश आणि धर्म यातच पसंती द्यावी असा विचार करतोय! ;-)
(काय आहे, उद्या मलाच सासरी जावं लागलं रहायला तर काय घ्या? म्हणून सुज्ञपणा करावा अशी योजना आहे! )
--असुर
पण विवाह करावाच का ?
>>>
त्याच्याने हँगओव्हर होत नाही म्हणतात दुसर्या दिवशी ..पिलेल्या रात्रीच ऊतरते !!
आम्ही आधीच अश्या प्रकारचा विवाह आधीचे केल्याने तुर्तास मत देण्यास असमर्थ आहोत ..पण पुन्हा संधी मिळाल्यास ..आम्ही लग्न करु असेच म्हणतो ..कोणाशी ? एखाद्या स्त्री शीच करू ...अर्थात त्यात जात धर्म रंग पेक्षा स्वभावाला महत्व देऊ....परप्रांतीयाशी करणार नाही ...एकवेळ परप्रांतात वाढलेली चालेल..
जर विवाह केला तर कोणत्याही परिस्थितीत आंतरजातीय, आंतरराज्यीय विवाह करणार नाही. :)
कदाचित चांगली मुलगी वाटली तर आंतरधर्मीय विवाह करेन म्हणजे स्वधर्मीयांची संख्या १ ने वाढेल. ;)
काय करणार बॉ. लोकशाहीत संख्येला फार महत्व आहे. पर्याय ५ ला मत दिले आहे.
याबाबत तर मी आताच आंतरजातीय विवाह केला आहे. (आणि त्यानंतरच्या प्रोब्लेम्स ला पन तोंड दिले आहे).त्यामुळे 'योग्य' व्यक्ती असल्यास जात /धर्म पहाणार नाही याला मत दिले आहे.
('योग्य' व्यक्ति मुळे फार खुष आहे हे सांगने न लगे)......
शेतकरी आजही समाजात पाठीमागे पडला आहे. कदाचित काही नकारात्मक (आत्महत्या, कर्ज ....अशा अनेक ) गोष्टीमुळे समाजाचा द्रुष्टीकोन खूप बदलला आहे. सधन आहेत त्यान्नापण मुली मिळणार का? असा गहन प्रश्नच आहे
व्यक्ती योग्य वाटल्याने जात पाहिली नाही.
(अतिअतिअवांतरः मैत्री किडे टाळण्यासाठी मुलीचे आयडी घेतलेले आणि लग्न झालेले सगळेच या धाग्याचा फायदा घेऊ शकतात!)
व्यक्ती योग्य वाटल्याने जात पाहिली नाही.
चालायचंच! कलियुग हो.... दुसरं काय?
___________
आम्ही आपले "देशस्थ-कोकणस्थ" इतकंच काय ते साटंलोटं करतो!
मजकूर संपादित केला आहे. हिणकस बोलून वैयक्तिक रोखाचे प्रतिसाद कृपया टाळावेत - संपादक मंडळ
आम्ही आपले "देशस्थ-कोकणस्थ" इतकंच काय ते साटंलोटं करतो!
एके काळी देशस्थ - कोकणस्थ विवाह देखील आंतरजातीय विवाहासारखाच मानला जाई. जाऊ द्या शेवटी ब्राह्मण आहे ना? यावर तडजोड होई.
अवांतर- माझी बायको कोकणस्थ आहे. तिला आमचे कुलदैवत खंडोबा आहे याचे आश्चर्य वाटे. ब्राह्मणांच्यात असल कुलदैवत असत हे तिला माहित नव्हत.काही देशस्थांवर ते ब्राह्मण असल्याचा आळ आलेला असतो असे काहींचे म्हणणे असते.
देशस्थ - कोकणस्थ विवाह देखील आंतरजातीय विवाहासारखाच मानला जाई.
म्हणजे काय? तो आहेच आंतरजातीय विवाह !!!!
नितिन थत्ते
------------------------------>
हा हा हा!.. वेरी फनी!
नितीन'जी, एक थोडीशी सुधारणा: "आन्तरपोटजातीय विवाह"
प्रकाश'जी जर आपणाला "असे" देशस्थ-कोकणस्थ आन्तरजातीय विवाह अपेक्षित असतील...
;) तर अशा विवाहांना माझा पूर्ण पाठिम्बा आहे! :)
टीप : देशस्थांकडे मुखवट्याच्या गौरी असतात आणि कोकणस्थ-कर्हाड्यांकडे खड्याच्या गौरी असतात...
आणि आन्तरपोटजातीय विवाहांमध्ये आपापल्या "गौरीं" चे देशस्थ, कोकणस्थ, कर्हाडे, कानडी यांना भारी कौतुक असते...
त्यामुळे खड्यांच्या "गौरी" पेक्षा मुखवट्या'च्या गौरी किती तेजस्वी दिसतात!.... किन्वा नुसत्या घावनघाटल्या'पेक्षा १६ भाज्या, १६ कोशिम्बीरी, १६ पक्वान्ने असा बेत किती परिपूर्ण वाटतो!....इ. इ. अनेक मुक्ताफळे ऐकायला मिळतात!
अर्थात... सर्वजण "एका"च जातीच्या पोटजातींमधले असल्यामुळे रीतिरिवाज भिन्न असले, तरी सर्वांची "भावना" मात्र एकच असते! :) त्यामुळे या आंतरपोटजातीय विवाहांमध्ये पोटजातींवरून भांडणे अगदी अल्प प्रमाणात होतात!
त्यामुळे मुलगी व्हावे देशस्थांकडे आणि सून व्हावे कोकणस्थांकडे!....
कारण देशस्थांच्या वृत्तीनुसार... माहेरवाशिणीचे आणि जावयाचे भरपूर कोडकौतुक पुरवले जाते....
आणि कोकणस्थांकडे देणे-घेणे हे अत्यंत कमी स्वरूपाचे असल्यामुळे लग्नाचा बराचसा खर्च वाचतो! ;) ;)
अर्थात!... यास बरेच अपवादही असू शकतात!...
परन्तु ९० % कोकणस्थ हे त्यांच्या पूर्वापार चालत आलेल्या मूळ स्वभावाला अनुसरूनच असतात!
आणि ९९ % देशस्थ हे "आओ जाओ- घर तुम्हारा" याच टाईपचे असतात!
या आन्तरपोटजातीय विवाहांमुळे देशस्थ लोक - कोक्यांसारखे "नाकात" बोलायला शिकतात....
आणि कोकणस्थ लोक स्वतःहून नातेवाईकांना फोन करून(फोनच्या बिलाची पर्वा न करता) किमान १० मिनिटे तरी फोनवर बोलायचे धाडस करतात! ;)
कर्हाडे ब्राह्मण हे बहुतांश कोक्यांसारखेच असतात!... फक्त त्यांचे मूळ गाव- सांगली. कोल्हापूर.. पैकी कोणतेतरी असते!
आणि कानडी- ब्राह्मणांकडे कर्मकान्ड खूप असतात! आणि त्यान्चा भाषेचा एक प्रॉब्लेम असतो.....
त्यामुळे नवीन सूनेला... आपली कानडी सासू आपल्याशी बोलतेय की भांडून शिव्यापण घालतेय... हेच नीट कळत नाही! ;)
आणि कानड्यांचा अजून एक प्रॉब्लेम असतो!... हे लोक कट्टर वैष्णव असल्यामुळे फक्त कृष्ण / विष्णु यांना आणि यांच्या परिवारालाच मानतात! आणि विष्णु आणि शंकर यांच्यामध्ये भांडण असल्याची अफवा... ही या कानडींनीच पसरवलेली आहे! त्यामुळे ते "शिवा" ला मानत नाही!... इतकेच नव्हे.. तर महाशिवरात्रीला कानडी-वैष्णव ब्राह्मण मुद्दाम "पुरणपोळी " करून खातात! आणि हरतालिके'ला कानडी लोकांच्या मराठी सुनेला खरोखरचाच "उपवास" घडतो!
कारण कानडी या दिवशी उपवासाचे पदार्थ खात नाहीत! ;)
अर्थात परिस्थितीनुरूप आणि काळानुरूप या वृत्तीतही थोडाफार फरक पडला असेल... पण माझी एक आत्या सासरची "कानडी वैष्णव ब्राह्मण" आहे.... तिच्याकडे ही अशी वरचीच परिस्थिती आहे!
पण बहुतांश कानडी वैष्णवांचे कुलदैवत हे "तिरुपती - बालाजी" असल्यामुळे अखंड-विष्णुसहस्त्र-नामाचा पाठ मात्र त्यांच्याकडे नित्यनेमाने चालतो!.. आणि 'राजलक्ष्मी'चे एक वेगळेच तेज त्यांच्या चेहर्यांवरती विलसत असते!
:)
त्यामुळे मुलगी व्हावे देशस्थांकडे आणि सून व्हावे कोकणस्थांकडे!...
मग कर्हाड्यांचे काय ? ;)
कर्हाडे ब्राह्मण हे बहुतांश कोक्यांसारखेच असतात!...
पूर्णपणे असहमत...
काय हो पकाका या धाग्यातुन काही विशेष विदा मिळणार आहे का ? ;) मिळणार असल्यास तुम्ही त्याचा काय आणि कुठे वापर करणार आहात ?
बाकी एखादा वटवॄक्ष शोधत आहे बसण्यासाठी...नाही तिथुनच हा धागा पहावा म्हणतो !!! ;)
बाकी चालु द्या... ;)
विशेष :--- मॄगा तुझे काही प्रतिसाद लयं आवडले...मनसोक्त हसलो !!! आता का ते सांगायला हवे ?;)
(विवाहेच्छुक कर्हाडे पोट्टा.)... ;)
विशेष :--- मॄगा तुझे काही प्रतिसाद लयं आवडले...मनसोक्त हसलो !!! आता का ते सांगायला हवे ?
-०----->
:)
धन्स! :)
(विवाहेच्छुक कर्हाडे पोट्टा.)...
:-?
घाटपान्डे काका खरंच उत्तम मार्गदर्शन करू शकतील! :)
____
अवांतरः आमच्याकडे "कर्हाडे" लोक अम्मळ कमी आहेत... आणि जे आहेत... त्यांच्यामध्ये बहुतांश "कोक्यां"चेच गुण आहेत....
त्यामुळे मदनबाण्'जी... आपणास अधिक माहिती असल्यास जरूर सान्गावी.......
आम्हाला उपयोगच होईल! ;) :)
-
मृगनयनी. :)
मत नोंदविले आहेच, पण श्री.घाटपांडेसरांना एक प्रश्न (वा सुचना) ही विचारावासा वाटतो.
क्रमांक १ चा पर्याय असे सांगतो ~~ "एक वेळ आंतरजातीय करेन पण आंतरधर्मीय नाही". इथे जेएनयु, नवी दिल्लीत माझ्या भारतीय मित्राच्या बाबतीत उदभवलेली अडचण.
याच विद्यापीठात शिकणार्या, आमच्या ग्रुपच्या, एकाच स्ट्रीममधील दोन मुलींशी या "अ" चे अगदी जवळकीचे नाते आहे. एक मुस्लिम (दिल्लीतीलच पण आधुनिक विचारसरणीची. पै.छ्गला यांच्या घराण्याशी/नात्याशी संबंधित, जातपात न मानणारी, याच्याशी लग्नाला एका पायावर तयार आहे) तर दुसरी ख्रिश्चन, अमेरिकेची. यातील कोणत्याही मुलीशी याने लग्न करायचे म्हटले तर ते "आंतरधर्मीय"च होणार हे नक्की. पण याचे म्हणणे असे की, जर आंतरधर्मीयच करायचा निर्णय घेण्याची वेळ आली तर मी "खिश्चन" मुलीशीच करेन.
इथे "आंतरजातीय" चा मुद्दा नसला, तरी "आंतरधर्मीय" च्या फ्लॅगला ऑप्शन आहे, असा अर्थ होतो ना?
म्हणजेच तुमच्या (१) साठी उपपर्याय "आंतरजातीय वा आंतरधर्मीय लग्न करणार असाल, तर त्यातही जात आणि धर्म यांची निवड करणार काय?" असा येऊ शकतो?
म्हणजेच तुमच्या (१) साठी उपपर्याय "आंतरजातीय वा आंतरधर्मीय लग्न करणार असाल, तर त्यातही जात आणि धर्म यांची निवड करणार काय?" असा येऊ शकतो?
पर्याय क्रमांक १ मधे आंतरधर्मीय हा बादच ठरवला आहे. पुढे जात वा पोटजात यातील पर्यांयावर कसा भर देणार ही अडचण वा उपप्रश्न असु शकतो. त्यात ही वराची जात उच्च व वधुची जात कमी उच्च असा ही प्रश्न होउ शकतो. जातीच्या उतरंडी मधे शोषित वर्गही पारंपारिक उच्चनीचता मानत असतो.
अशोक पवारांचे बिराड, दरकोस दर मुक्काम या पुस्तकांच्यात हे उल्लेख सापडतात. तसेच त्यांच्या भाषणातही हे उल्लेख आवर्जुन असतात
बाबासाहेबांनी धर्मांतर केले त्यावेळी त्यांनाही इतर धर्माचा ऑप्शन खुला होता. मग त्यातल्या त्यात जवळचा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. विद्रोह म्हणुन मुस्लिम किंवा ख्रिश्चन का स्वीकारला नाही?
>>जातीच्या उतरंडी मधे शोषित वर्गही पारंपारिक उच्चनीचता मानत असतो
अनेकदा व्यवस्था टिकण्यात आपण कोणाच्यापेक्षा तरी वर असल्याचे समाधान मोठी भूमिका निभावते. ज्याला कोणाच्याचपेक्षा वर समजले जात नाही अशांची संख्या कमीच राहणार.
"जातीच्या उतरंडी मधे शोषित वर्गही पारंपारिक उच्चनीचता मानत असतो."
..... वरील वाक्यात ".... उच्चनीचता फार मानत असतो" हा बदल मी करतो. शोषित वर्गातील भेदाची ही तीव्रता विशेषतः लग्नाच्यावेळी प्रकर्षाने पुढे येते. श्री.घाटपांडे हे शासकीय अधिकारी आहेत (किंवा आता होते असे म्हणू या...) त्यामुळे त्याना शासनाने सरकारी सेवेत "शेड्युल्ड कास्ट" साठी १३% जागा राखून ठेवल्या आहेत ही बाब नक्कीच माहित असणार. या १३% टक्क्यात महार, मांग, चांभार, भंगी, खाटीक, व्हल्लार आदी डझनावरी सबकॅटेगरीज येतात. सर्वसाधारणतः आपण असे समजतो ही हा सर्व गट एकाच पंख्याखाली येतो. वस्तुस्थिती तशी नाही.
महार मुलगा मांग मुलीशी लग्न करण्याचा विचारही करू शकत नाही, तर मांग व्हल्लारांना जवळ करत नाहीत. चांभार, भंगी आणि खाटिक तर विशिष्ट कार्याशी निगडीत असल्याने त्यांची कहाणी अलगच आहे. "एस.सी." साठी १३% रिझर्व्हेशन आहेच पण यातील जवळजवळ १२% जागा एकट्या "महार" जातीला मिळतात, त्याला कारण अर्थातच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी यांना पटवून दिलेले शिक्षणाचे महत्व. बाकीच्या छाट्यांना आत्ता कुठे महाविद्यालयीन शिक्षणाची महती समजून येत असल्याने आता महार सोडून बाकीचे गट एकत्र येऊन "एस.सी.मध्ये आमच्यासाठी स्वतंत्र राखीव जागा ठेवा" असा नारा सुरू केला आहे.
शेड्युल्ड कास्ट" साठी १३% जागा राखून ठेवल्या आहेत ही बाब नक्कीच माहित असणार. या १३% टक्क्यात महार, मांग, चांभार, भंगी, खाटीक, व्हल्लार आदी डझनावरी सबकॅटेगरीज येतात. सर्वसाधारणतः आपण असे समजतो ही हा सर्व गट एकाच पंख्याखाली येतो. वस्तुस्थिती तशी नाही.
ब्राह्मण ही जात असून त्यात अनेक पोटजाती आहेत. ब्राह्मण म्हणजे कोब्रा, देब्रा आणि कब्रा असे अज्ञान बाळगणार्यांना पोटजातींमध्ये अभावाने का होईना पण लग्ने होतात हे माहित असते पण इतर ब्राह्मण पोटजातीत आंतरपोटजातविवाह होत नव्हते आणि आताही त्यामानाने होत नाहीत. शेड्युल कास्ट किंवा बॅकवर्ड क्लास नावाची कोणतीही जात मला माहित नाही. ते सर्व एकाच पंख्याखाली येतात असे समजणारे घोर अज्ञानी असावेत. निदान माझा समज तरी असा नाही. महार किंवा चांभार जातीत पोटजाती आहेत का आणि त्यांची अभावाने का होईना पण लग्ने होतात का ते माहित नाही पण एक सर्वसाधारण माहिती म्हणून जाणून घेण्यास आवडेल.
बाकी,
अनेकदा व्यवस्था टिकण्यात आपण कोणाच्यापेक्षा तरी वर असल्याचे समाधान मोठी भूमिका निभावते. ज्याला कोणाच्याचपेक्षा वर समजले जात नाही अशांची संख्या कमीच राहणार.
"पण एक सर्वसाधारण माहिती म्हणून जाणून घेण्यास आवडेल."
जरूर. समाजाच्या जडणघडणीचा एक अभ्यास म्हणूनदेखील ही माहिती जाणुन घेणे उपयुक्त ठरते. माझे मामा राज्य शासनाच्या सेवेत वर्ग-१ च्या पदावर असल्याने (तसेच ते कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी असल्यानेही) त्यांच्याकडून अशा संदर्भातील माहितीची कागदपत्रे पाहण्यास मिळतात आणि तसेच त्यांच्यात होत असलेल्या चर्चा यांचा मला माझ्या ज्ञानवृध्दीसाठी छान उपयोग होतो. (अर्थात माझी माहिती ही महाराष्ट्र शासनाच्या राखीव जागा धोरणासंदर्भात आहे).
त्यानुसार नोकरीतील्/शिक्षणक्षेत्रातील एकूण ५२% राखीव जागापैकी १३% जागा ह्या अनुसूचित जाती (म्हणजेच शेड्युल्ड कास्ट) साठी आरक्षित आहेत. शासन पत्रकानुसार राज्यात ५९ मागास जातींना 'शेड्युल्ड कास्ट' चा दर्जा आहे आणि या सर्व उपजातींचा येथे जागाभयास्तव उल्लेख करता येणे शक्य नसले तरी त्यातही "महार, मांग, भंगी, व्हल्लार, चांभार, खाटीक यांच्यासोबत बुरुड, जंगम, बेडाजंगम, ढोर, कक्कय्या, डोंबारी, गारूडी, घिसाडी, कैकाडी, तराळ, धेड, मातंग यासारख्या काही प्रमुख - पण फारशा माहिती नसलेल्या - जाती येतात. वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे या ५९ उपजातीपैकी फक्त "महार" ही एकमेव उपजात शिक्षणाने बरीच पुढे गेली आहे. विद्यापीठे आणि स्थानिक महाविद्यालयांतील जागा भरतीचा विदा एकत्रीत केला असता असे दिसून आले आहे की, या ठिकाणी ९५ टक्के प्रोफेसरपदांच्या ("१३% आरक्षित") जागा केवळ महार जातीने आपल्या शिक्षणाच्या प्रगतीवर मिळविल्या आहेत. उरलेल्या ५% जागेत फक्त चुकुनमाकुन जंगम आणि ढोर जातीचे उमेदवार या पदासाठी मिळालेची फुटकळ उदाहरणे आहेत. यावरून सुमारे ५५ उपजातींना आजही "साफसफाई"ची पूर्वापार कामे करावी लागत आहेत. कक्कय्या, डोंबारी, गारूडी, घिसाडी हा गट तर आज २०१० मध्येसुद्धा "अक्षरशत्रू" आहे.
शिक्षण आणि आर्थिक उन्नती या दोन बाबीमुळे "महार" वर्गाकडे (नॅचरली) समस्त एस.सीं.चे पुढारीपण चालून आले असल्याने शासनाच्या यासंदर्भातील विविध धोरणाची फळे फक्त यानाच मिळत गेली असल्याचे प्रखरतेने जाणिवते. पण त्यात तक्रार करण्याचे कारण नाही, याच्यासाठी की, उच्च स्तरावरील पदे ही प्रथमतः शिक्षणाशीच निगडीत असल्याने तसेच महारांनी तशी शैक्षणिक अर्हता मिळविली असल्याने व ते सोडून अन्य पोटभेद आजही शिक्षणाशी फटकून असल्याने महार आणि अन्य ५८ उपजाती यांच्यातील भेदाची दरी रूंदावत चालली आहे. हा भेद नजरेत भरण्यासारखा असल्याने महार जातीतील विवाहसंबंध हे जातीबाहेर अजिबात जात नाहीत. मोठ्या शहरात (नोकरीमुळे) जे काही आंतरजातीय प्रेमविवाह झाले आहेत तीत महार वर आणि उच्चवर्णीय वधू असेच चित्र दिसते.
आर्थिक प्रगती (या गटातील इतर उपजातीच्या तुलनेत) बर्यापैकी झालेल्यामध्ये चांभार आणि खाटीक यांचा समावेश होतो. आता "चांभार" या प्रकारात एकदोन नाही तर तब्बल २६ उपप्रकार आहेत. त्यात "असोदी, चाम्गर, खल्पा, माचिगर, मदार, मोची, रानिगर, रोहिदास, सामगर" हे काही प्रकार राज्याच्या विविध जिल्ह्यात आढळतात. यातही "चांभार" हेच त्यातल्यात्यात पुढारलेले आहेत (शिक्षण आणि व्यवसाय या दोन्ही बाजुंनी) त्यामुळे रोटीबेटी व्यवहार करताना ते आपल्या तंबूत फक्त "रोहिदास" आणि "मोची" यांना स्थान देतात, तेही आपली मुलगी त्यांच्यात देण्यासाठी. त्यांची मुलगी आपल्या घरात आणित नाहीत.
(ही झाली केवळ "शेड्युल्ड कास्ट" बाबतची त्रोटक स्थिती. शेड्युल्ड ट्राईब्ज, नोमॅडिक ट्राईब्ज, डीनोटीफाईड, ओबीसी या गटावर स्वतंत्र लिहावे लागेल.)
इन्द्रा
खर तर आजचा सुधारक च्या जात आरक्षण विशेषांका साठी इंद्रासारखा अभ्यासु प्रतिक्रियात्मक वा लेखाची गरज होती. विशेषांकाबाबत इथे पहा.
एकदा देवदासी ,मुरळी व वेश्या एका अभ्यास चर्चेला बोलावल्या होत्या. मी उपस्थित होतो. शोषणाच्या समान प्रश्नांवर चर्चा होत होती तो पर्यंत काही वांधा नव्हता पण जेव्हा अभवितपणे उच्च नीचतेचा मुद्दा आला तेव्हा गदारोळ झाला. देवदासी व मुरळी एका बाजुला व वेश्या एका बाजुला. पुढे देवदासी व मुरळी यांच्यात देखील वाद मुरळी स्वत:ला श्रेष्ठ म्हणु लागली. संयोजकांची तारांबळ झाली.
चांभार व ढोर यांच्या उच्चनीचते बाबत देखील मुद्दा असा कि चांभार म्हणायचा की कमावुन आणलेल्या कातड्यालाच मी हात लावणार मेलेल्या जनावराचे कातड काढुन आणणे हे काम ढोराचे आमचे नाही. आमची मुलगी ढोराला देणार नाही. ( संदर्भ पुण्यातील एका दलित साहित्यिकाचे भाषण)
एका मराठा सहकार्याच्या कुटुंबात सोयरिक जुळवायचे चालले होते. सजातीयच विवाह होणार होता. पण एकाला शोध लागला कि 'पाहुणे' एका अंगाने जुळत नाही. प्रश्न तसा ९६ कुळाचाही नव्हता. नंतर सहकार्याने सांगितले कि आडनाव जरी ९६ कुळी वाटल तरी ते 'लेकुरवाळे' हायेत. उगा नंतर समजल्यावर भांडण नकोत.
आता लेकुरवाळे म्हणजे काय? तर त्यानी ष्टोरी सांगितल्याचा अन्वयार्थ राज घराण्याच्या अनौरस घसरगुंडी बाबत होता. त्याला म्हणल कि हे तुम्हाला कस काय समजणार? तो म्हणला हेच तर पाहुण्यांवरुन समजत.
आजही वर्तमानपत्रात विवाह विषयक कॉलम पहा. जाती बाबत काय अपेक्षा असतात ते?
"पुढे देवदासी व मुरळी यांच्यात देखील वाद मुरळी स्वत:ला श्रेष्ठ म्हणु लागली"
--- हे साहजिकच आहे; कारण स्थूल अर्थाने जरी देवदासी आणि मुरळी या दोघी "देवां" ची (रूढार्थाने) सेवामय पूजा करण्यासाठी नेमस्त असल्या तरी यांच्या जीवनमानीत फरक आहेच आहे. सर्वात मोठा (आणि जाणवण्याजोगा) म्हणजे "मुरळी" ला झालेले अपत्य "अमुक एक माणूस माझा बाप" हे सांगते, पण "देवदासी" च्या अपत्याला फक्त "आई" माहित असते. दोन घटकातील श्रेष्ठत्वाचा नेमका हाच कळीचा मुद्दा बनतो.
"लेकुरवाळे" हा विषय तर बहुपेडी (आणि झोंबण्यासारखा) विषय आहे. पण आता इथे नको.
ह्याच बरोबर
"जोडीदाराच्या सांगण्यावरून धर्मांतर करण्यास हरकत नसेल" असाही अजून एक ऑप्शन हवा होता.(त्याला 'हो' असे उत्तर देणार्यांना 'तुमचा (सध्याचा) धर्म कुठला' हा प्रश्न विचारलात तर काही उद्बोधक माहिती हातात यावी).
तिसऱ्या पर्यायाला मत दिले आहे. कारण मला काहीच फरक पडत नाही, पण कुटुंबात येणारी व्यक्ती जर साधारण त्याच संस्कारात वाढलेली नसेल तर घरातील बऱ्याच गोष्टींशी जुळवून घेणे कठीण जाऊ शकते. यातून होणारे निष्कारण वाद-विवाद टळावेत यासाठी देव, देश आणि धर्म यातच पसंती द्यावी असा विचार करतोय!
बाकी आपण सध्या फक्त 'झाड' शोधतोय. झाड कुठलेही असायला हरकत नाही, चांगले असणे गरजेचे आहे!
-- (पर्यावरणप्रेमी) असुर
+१
सहमत!
>>>(बाकी पकाकाकांनी आंतरदेशीय हा पर्याय न दिल्याने निषेध ;-) )
(लगेच पोरींच्या पत्रिका व्यनीने धाडु नयेत ही विनंती(फोटु चालतील) ;-) )
मी पण हेच म्हंतो.
(याला रिकर्सीव सहमती म्हणावे काय?) ;-)
-- (सहमत) असुर
'आंतरजातीय वा धर्मीय च करण्याचा अट्टाहास नाही परंतु 'योग्य' व्यक्ती असल्यास जात /धर्म पहाणार नाही' ला मत दिले आहे.
(सध्याचे विवाहीत जेव्हा विवाहेच्चुक होते तेव्हा त्यांचे काय मत होते अशा अर्थाने ते भाग घेउ शकतात ह्या प्रकाशकाकांच्या खुलाश्यानंतर हे मत नोंदवले आहे. )
?
In reply to ? by ब्रिटिश टिंग्या
कौलाचा उद्देश
In reply to कौलाचा उद्देश by प्रकाश घाटपांडे
केला आहे... त्यामुळे मत न देता प्रतिक्रिया
In reply to केला आहे... त्यामुळे मत न देता प्रतिक्रिया by मैत्र
मी नानाच्या मताशी सहमत आहे.
In reply to मी नानाच्या मताशी सहमत आहे. by वेताळ
अवघड आहे
In reply to अवघड आहे by अनुराग
पर जातितिल मुली बरोबर लिव्ह
In reply to पर जातितिल मुली बरोबर लिव्ह by अविनाशकुलकर्णी
म्हणजे?
In reply to म्हणजे? by प्रकाश घाटपांडे
वाढत्या कुटुंब कलहाचे प्रमाण
In reply to वाढत्या कुटुंब कलहाचे प्रमाण by अविनाशकुलकर्णी
लग्न झाले असल्याने मत न
In reply to कौलाचा उद्देश by प्रकाश घाटपांडे
उत्तर देणे अडचणीचे वाटते....
In reply to कौलाचा उद्देश by प्रकाश घाटपांडे
मत व्यक्त करणे अडचणीचे वाटते
In reply to मत व्यक्त करणे अडचणीचे वाटते by माया
घाटपांडे काका, विवाहमंडळ
In reply to कौलाचा उद्देश by प्रकाश घाटपांडे
प्रकाश'जी.... आपण एक पर्याय
In reply to प्रकाश'जी.... आपण एक पर्याय by मृगनयनी
ह्म्म्म .
In reply to ह्म्म्म . by अभिरत भिरभि-या
हा हा हा ...
In reply to ह्म्म्म . by अभिरत भिरभि-या
लोक आधी प्रेम करणार | मग
In reply to प्रकाश'जी.... आपण एक पर्याय by मृगनयनी
पर्याप्त
In reply to पर्याप्त by प्रकाश घाटपांडे
कार्योत्तर मंजुरी
In reply to ? by ब्रिटिश टिंग्या
(स्वतंत्र प्रतिसाद देण्याची
In reply to ? by ब्रिटिश टिंग्या
+१
असा कौल घेणे तितकेसे बरोबर
In reply to असा कौल घेणे तितकेसे बरोबर by नितिन थत्ते
शक्यता
In reply to शक्यता by प्रकाश घाटपांडे
>>किरण मोघे नी जाणीव पुर्वक
In reply to >>किरण मोघे नी जाणीव पुर्वक by नितिन थत्ते
+१
In reply to +१ by विकास
>>बाकी अस्मादीकांचा जन्मच
In reply to >>बाकी अस्मादीकांचा जन्मच by नितिन थत्ते
म्हणजे
In reply to असा कौल घेणे तितकेसे बरोबर by नितिन थत्ते
काय फरक पडतो?
In reply to काय फरक पडतो? by कवितानागेश
तरीच मला सासरी 'एलियन'
In reply to तरीच मला सासरी 'एलियन' by सुहास..
म्हणूनच..
पण विवाह करावाच का ?
In reply to पण विवाह करावाच का ? by परिकथेतील राजकुमार
हॅहॅहॅ
In reply to पण विवाह करावाच का ? by परिकथेतील राजकुमार
पण विवाह करावाच का
In reply to पण विवाह करावाच का by सुहास..
आम्ही आधीच अश्या प्रकारचा
चांगला कौल
जर विवाह केला तर कोणत्याही
आमी तर बुवा
In reply to आमी तर बुवा by मन१
आंतरजालीय विवाह !!!
याबाबत तर मी आताच आंतरजातीय
अवघड आहे
लग्न झालं आहे त्यामुळे मत दिलेले नाही.
In reply to लग्न झालं आहे त्यामुळे मत दिलेले नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
अलरेडी केलेले आहे
In reply to लग्न झालं आहे त्यामुळे मत दिलेले नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती
व्यक्ती योग्य वाटल्याने जात
In reply to व्यक्ती योग्य वाटल्याने जात by मृगनयनी
हॅहॅ
In reply to हॅहॅ by प्रकाश घाटपांडे
मानला जाई?
In reply to मानला जाई? by नितिन थत्ते
देशस्थ - कोकणस्थ विवाह देखील
In reply to देशस्थ - कोकणस्थ विवाह देखील by मृगनयनी
नॉट फनी
In reply to देशस्थ - कोकणस्थ विवाह देखील by मृगनयनी
त्यामुळे मुलगी व्हावे
In reply to त्यामुळे मुलगी व्हावे by मदनबाण
विशेष :--- मॄगा तुझे काही
धर्माचे ऑप्शन
In reply to धर्माचे ऑप्शन by इन्द्र्राज पवार
धर्माचा पर्याय
In reply to धर्माचा पर्याय by प्रकाश घाटपांडे
उतरंड
In reply to उतरंड by नितिन थत्ते
उतरंड आणि त्यातील उच्चनीचता
In reply to उतरंड आणि त्यातील उच्चनीचता by इन्द्र्राज पवार
कळले नाही
In reply to कळले नाही by प्रियाली
एक अभ्यास
In reply to एक अभ्यास by इन्द्र्राज पवार
धन्यवाद
In reply to धन्यवाद by प्रियाली
वेलकम
In reply to एक अभ्यास by इन्द्र्राज पवार
उत्तम विश्लेषण
In reply to उत्तम विश्लेषण by प्रकाश घाटपांडे
श्रेष्ठत्वाचा मुद्दा
धर्मांतर
धर्मांतर
तिसऱ्या पर्यायाला मत
In reply to तिसऱ्या पर्यायाला मत by असुर
हेच म्हंतो. (बाकी पकाकाकांनी
In reply to हेच म्हंतो. (बाकी पकाकाकांनी by Nile
सहमत!
अरेरे!!! किंचित उशिर केलात
In reply to अरेरे!!! किंचित उशिर केलात by बिपिन कार्यकर्ते
अजून आहेच का खुमखुमी! ;)
ह्या अंतरजातिय प्रकर्णामुळे
पर्याय क्रमांक सहाला मत दिले
एक प्रश्न
पर्याय क्रमांक ३
In reply to पर्याय क्रमांक ३ by सहज
विवाहेच्चुक म्हणजे विवाह करुन
In reply to विवाहेच्चुक म्हणजे विवाह करुन by नगरीनिरंजन
:-)