जरी काळरात्र होती ती
तुझ्या कुशीत होती ती
येई ना वेळ पुन्हा हाती ती
थकल्या गात्री ....उत्तर रात्री
श्वास अधीरे... गहिवरे धरित्री.
ये सकाळ अवघा प्रकाश पसरे
कारुण्य पुसे... चंदन पिसे
चंद्र अवघा फिका होई
शब्द रात्रीचा अब्द अब्द
अंधारासह मुका होई
तेजाळ कोणी धगधगीत
पोटात पेटवे भूक भगभगीत
कुणी गाणे गाती धरुनी अवजार हाती
कुणी तरवारी दुधारी परजती
जीव चिमुकला धरुनी हाती
यूद्ध जणू रोजचाच वणवा
तण माजे राखे वरती
खालती वरती विषवल्ली सभोती
गर्जे कुणी आरोळी ऐक्याची
घराण्याची इइभ्रत जपण्याची
देह देह कणकण माती
स्वप्नांच्या स्मशानी चिता
आईच्या मुखी ऋचा
काळझोप आली रात्री
देऊनी स्वप्ने विझल्या गात्री
............विजुभाऊ सातारवी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1850
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
Because I am a GIRL
गाववाले.. झकास बरका.. >>यूद्ध
छान कविता.
In reply to गाववाले.. झकास बरका.. >>यूद्ध by अर्धवट
विजुभौ एकदम खाशी कविता आहे.
विजुभाउ फार्मात
सुंदर कविता.
केवळ मुलगीआहे म्हणून अकालीच
छान
मस्त कविता!