विश्वासराव नानाजी मुसेखोरेकर :- महाराजांच्या पदरचे एक प्रभु सरदार.यांनी वारंवार अफजलखानाच्या तळावर फकिराच्या वेशात जाउन तेथील सर्व खबर महारांजाना पोचवली.
उमाजी बिन संभाजीराजे भोसले :- महारांजाचे थोरले भाऊ संभाजीराजे यांचे पुत्र. अफजलखानाच्या पोवाड्यात खालील प्रमाणे उल्लेख आढळ्तो.
पुतण्या उमाजी राजाला !
पाचशे लोक दिले त्याला !!
आणि सराईत उमाजी !
राज्य होईल तुम्हाला !
अफजलखानाच्या वधाप्रसंगी उमाजीचे वय ५ होते. या साहसात महारांजाना काही अपाय झाला तर राज्य उमाजीने सांभाळावे असा बेत होता. या उमाजीचे पुढे काय झाले समजत नाही.
मुल्ला काझी हैदर :- हा एक अत्यन्त विद्वान फारसी चिटणीस होता. हा वकीलाचेही काम करायचा. महाराजांनंतर संभाजीराजांशी न पटल्यामुळे तो औरंगजेबाकडे गेला. बादशहाने त्याला २ हजारी मनसब देउन आपला नातु अजीमुशान याला शिकवण्याचे काम दिले.नंतर त्याची नेमणूक दिल्लीला काझी म्हणून झाली. जुन १७०६ मध्ये तो मुख्य काझी म्हणजे सरन्यायाधिश झाला.
नेताजी पालकर :- महारांजानी यांना परत हिन्दुधर्मात घेतल्यावर हे परत फारसे कुठं दिसत नाहित. पण दक्षिण दिग्विजयाच्या वेळी हे महाराजांबरोबर होते. त्यानंतर ते संभाजीराजांच्या चाकरीत सुद्धा होते.१६८१ मध्ये ते बागलाणात लढ्त असल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर ते लौकरच वयोमानाने मरण पावले.
काही नविन नोंदी :- महाराज मोहीमेवर असताना अत्यंत कमी सरंजाम बरोबर बाळ्गत. सुरत लुटीच्यावेळी प्रत्यक्षदर्शी इंग्रजांच्या वर्णनानुसार मराठयांच्या तळावर १च साधा तंबु होता.त्यात स्वतः महाराज बसत व रहात. बाकी फौज उघड्यावरच राही.
दक्षिण दिग्विजयाच्यावेळी महाराजांचा मुक्काम कर्नाटकात त्रिवादी येथे असताना,फ्रेन्च वकील जर्मेल त्यांच्या भेटीला आलेला होता. तो ३ दिवस तळावर राहीला. तो लिहितो :- "स्वतःचा १ व कारभार्याचा १ अशा २ तंबु पलीकडे कोणतेही जड सामान शिवाजीकडे नाही. फौजतले सर्व घोडे सरकारी मालकीचे असून दर २ स्वारास ३ घोडे नेमून दिलेले आहेत."
या उलट औरंगजेबाचा 'गुलाल महल' नावाचा शामियाना होता. याच्यावर अत्यन्त किमती रत्ने जडवलेली होती,व हा एखाद्या मोठ्या महालाच्याच आकाराचा होता.
महाराजांचे समुद्रप्रेम :- माहाराजांना समुद्रस्नानाची अत्यन्त आवड होती. लहान असताना ( म्हणजे नक्की किती वयाचे असताना हे कळ्त नाही) ते मुद्दाम महाडजवळच्या बाणकोट्च्या खाडीवर राहीले होते.
महाराजांचे आरमार :- महाराजांच्या आरमारातील नावा व जहाजांचे प्रकार. यांच्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही. पण त्यांची नावे खालीलप्रमाणे :-
गुराब्,तरांडी,गलबत्,दुबारे,शिबाड्,पगार्,मचवा,बाथोर्,तिरकटी,पाल.
जहाज बांधणीच्या/ दुरुस्तीच्या गोद्या खालील ठिकाणी होत्या :-
विजयदुर्ग्,सिन्धुदुर्ग,कुलाबा,रत्नागिरी,अंजनवेल.
संदर्भ :-
इंग्लिश व डच रेकार्ड्स
मराठा रियासत्-सरदेसाई
वाचने
17112
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली माहिती. धन्यवाद.
+१ असेच म्हणतो
In reply to चांगली माहिती. धन्यवाद. by अवलिया
माहीतीबद्दल धन्यवाद.. अजून
असच म्हणतो.
In reply to माहीतीबद्दल धन्यवाद.. अजून by भारतीय
तंजावर च्या भोसले घराण्या
चांगली माहिती
In reply to तंजावर च्या भोसले घराण्या by जोशी 'ले'
उत्तम माहिती
व्वा! व्वा!!
उमाजींवरुन आठवले, कोकणातील
In reply to व्वा! व्वा!! by धमाल मुलगा
बरोबर..
In reply to उमाजींवरुन आठवले, कोकणातील by llपुण्याचे पेशवेll
पालकर मोगलांना मिळाले ?
In reply to व्वा! व्वा!! by धमाल मुलगा
>>संभाजी काळात पालकर मोगलांना
In reply to पालकर मोगलांना मिळाले ? by मालोजीराव
पालकर मोगलांना मिळाले !
In reply to पालकर मोगलांना मिळाले ? by मालोजीराव
थोडे स्पष्टीकरण -
रोचक
In reply to थोडे स्पष्टीकरण - by जिप्सी
छान माहिती
काहीच उल्लेख कसा सापडत नाही?
संदर्भ?
In reply to काहीच उल्लेख कसा सापडत नाही? by जिप्सी
कोकणातील शिर्के
धन्यवाद!
In reply to कोकणातील शिर्के by जिप्सी
भवानी तलवार
अर्रर्र...
In reply to भवानी तलवार by जिप्सी
उदयराजे भोसले यांच्या ताब्यात
In reply to अर्रर्र... by धमाल मुलगा
अरेच्चा !!!
In reply to उदयराजे भोसले यांच्या ताब्यात by मालोजीराव
कौतुकास्पद ...
छान माहीती,अजुन लिहा आवडेल
हि वंदता शिर्क्यान बद्दल नसून
हेच शृंगारपुराचे सावंत का?
In reply to हि वंदता शिर्क्यान बद्दल नसून by जोशी 'ले'
माझ्या माहीतीनुसार तेरेखोलचे.
In reply to हेच शृंगारपुराचे सावंत का? by अर्धवट
तेरेखोलचे.सावंतवाडीचे. येथे थोडी माहीती मिळेल. श्रूंगारपूर माझ्याही माहीतीप्रमाणे राजेशिर्केंकडेच होते. शृंगारपूर शाक्तांसाठी प्रसिद्ध होते.येस येस...सावंतवाडी....आठवलं
In reply to माझ्या माहीतीनुसार तेरेखोलचे. by llपुण्याचे पेशवेll
खेम सावंत हे स्वराज्याचे दुश्मन होते
हेच शृंगारपुराचे सावंत का?
मस्त माहिती..
महाराजांचे आरमार :-
संदर्भ
अशाच धाटणीचे एका जोशी
In reply to संदर्भ by जिप्सी
>>अवांतर :- शिवाजीकी आग्रा
In reply to संदर्भ by जिप्सी
खुप रोचक माहिती , लेखात अन
थत्ते साहेब
बाष्कळ?
In reply to थत्ते साहेब by जिप्सी
रोचक माहिती
माहिती आवडली,पुढच्या लेखाच्या
छान
लेख आवडला. पुढील भागांच्या
छान
नविन
धन्यवाद
आनंदयात्री
शिर्के
जहाजे
मराठा आरमार
In reply to जहाजे by कवितानागेश
श्री. मेहेंदळे यांनी शिवाजीचे
In reply to जहाजे by कवितानागेश
इतिहास घडवला मावळ्यांनी । पण
शाबास
In reply to इतिहास घडवला मावळ्यांनी । पण by मितभाषी
इतिहास घडवला मावळ्यांनी बंबात
In reply to इतिहास घडवला मावळ्यांनी । पण by मितभाषी
स्वराज्याची विभागणी
सातारची आताची गादी ही शाहुमहारांजाची
वंश !
धन्यवाद जिप्सी
मस्त माहिती. अजूनही असे लेख
धन्यवाद जिप्सी
सरदार अप्पा बळवंत मेहेंदळे