(हा रात्रीच्या जागरणाचा दोष असावा)
काव्यरस
अनिरुद्धची 'हा शब्दांच्या गुणसूत्रांचा दोष असावा' ही गजल वाचतात आमच्या विडंबनाच्या गुणसूत्रांच्या दोषाने लगेच डोके वर काढले नसते तरच नवल, ईर्षाद! ;)
हा रात्रीच्या जागरणाचा दोष असावा
गुबारण्याचा अर्थ कसा कोणा समजावा
कधीतरी पोटाची भाषा मला कळावी
कुणीतरी मज 'अबोल' काका का समजावा?
तुमानीतल्या गोल मितीच्या प्रतलामध्ये
घेराचा सारांश कसा सांगा बसवावा
पीसी बदलले, वेळ बदलली तरी बापडा
एक आयडी डुप्लिकेट मग मी उघडावा
कितीक वेळा अजून जाऊ नाक्यावरती
कधीतरी छळ 'निरखण्यातला' हा थांबावा
उगाच चर्चा मी तेव्हा केली ललनांशी
'भिडला टाका' अखेर हा निष्कर्ष निघावा
पुन्हा देखता अर्धांगी मज रोखुन डोळे
काव्यामधला 'रंगा'चा दंगा थांबावा
-चतुरंग
वाचने
3235
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
व्वा...
उच्च!
हा हा हा
क ह र !!!
हाहाहाहा
वा ! मस्तच आहे (थोडे
In reply to वा ! मस्तच आहे (थोडे by लिखाळ
अरेच्या, खरंच की!
In reply to अरेच्या, खरंच की! by चतुरंग
घ्या आणखी एक उदाहरण. कसलं
In reply to घ्या आणखी एक उदाहरण. कसलं by मेघवेडा
ते इथे लागू होतं की नाही ते माहीत नाही...
मस्तच.
जबराट!!!!!
कितीक वेळा अजून जाऊ
शिर्षक वाचुन व विडंबकाचे नाव