Skip to main content

वर्गणी

लेखक कळस..
Published on बुधवार, 04/08/2010
वर्गणी घरी आलो तोच शेजारच्या घरात गोंगाट. वर्गणी मागणारी सोसायटी मधील पोर बडबड करीत होती. कमीत कमी ५०१ रुपये नाही तर वर्गणी नको. १०१ वर तडजोड करण्यास तयार नव्हती. आमच्या शेजारी गुप्ते काकी राहतात. २ वर्षांपूर्वीच गुप्ते काका वारले. ते lic मध्ये कामाला होते. त्यांचा नंतर काकी कामाला जाऊ लागल्या त्यांचा पाठी एक मुलगी आणि लहान मुलगा आहे. सध्या घर काकिंवरच आहे. मोठी मुलगी science दुसरे वर्ष चालू आहे. मुलगा १० वी त आहे. काकुंने त्यांना १०१ देऊ केले ते घेण्यास तयार नव्हते. शेवटी रागाने ती पोर तशीच निघून गेली. गणपतीची वर्गणी जो देईल यथाशक्ती यथामती त्यावर देवाच्या नावावर जबरदस्ती करणे योग्य आहे का?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 3874
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

अहो पण "हे ठिकाण" मधे का आलाय हा लेख? गुप्ते काका असोत वा नसोत जबरदस्ती ही वाईटच. ...... अशा मुलांना रस्ताच दाखवला पाहीजे .... एक दमडी देता कामा नये, पैसे झाडाला लागत नाहीत

In reply to by शाहरुख

त्याने वर्गणी मागणार्‍यांशी मारामारी किंवा बाचाबाची करायला हवी होती असे वाटते का तुम्हाला? तो (किंबहुना आपणापैकी बरेच लोक) हे सर्व करु शकत नाहीत म्हणुन तर चिडचिड होउन हा लेख टाकला असेल ना त्याने?

१००% सहमत जबरदस्ती चूक आहे.

शिर्षक चुकीच टाकलत. खंडणी करा. गणपती येण्याआधीची ही डोकेदुखी असते. स्वतःहुन दिलेली रक्कम मान्य नसेल तर अश्यांना दारात उभे करु नये.

अशा अतिउत्साही वर्गणीखोरांची शिकवणी घेऊन त्यांना वर्गणी आणि खंडणी यातला फरक समजावून देण्याची गरज आहे. कळस म्हणजे आजही बर्‍याच मंडळांचे ऊत्सव हे विनापरवाना, विनानोंदणी चालू आहेत. कोणाच्यातरी वीजजोडणीतूनच रोषणाई करतात व त्या प्रखर दिव्याखाली रमीचे डाव मांडून आपल्या धार्मिकतेचे दिवे पाजळतात. शेजारशेजारची मंडळे तर 'एरिया' वाटून वगैरे घेतात. आपण देऊ शकणारी वर्गणी जर त्यांना मान्य नसेल तर, सांगावं की काय असेल ते दानपेटीत टाकू म्हणून. पण असल्या अरेरावीचा अतिरेकच वाढत चाललाय सगळीकडे आजकाल... भारी समर्थ

In reply to by भारी समर्थ

नाळ नाही रे बा समर्था, नाल ठोकतात घोड्याला अन नाळ म्हणजे बाळाची अन आईची जुळणी करणारा अवयव किंवा नलिका म्हण हवं तर.

मानुस वाय फल खर्च कर्ताना १०० रुपये बघ्त नाहि मग देवाला देमुग्र्च?

१०१ काय ११ काय आम्ही देऊ ते घेणार असाल तर ठीक नाहीतर दमडी सुद्धा मिळणार नाही असं सांगायचं... मी असं केलेलं आहे... वर्गणी आहे खंडणी नाही असं सुनवायच सरळ.

आम्ही गणपती बसवायचो त्याची आठवण झाली. आमच्या गल्लीत चिकटे मास्तर म्हणुन होते, आडनावापेक्षा पन्नास पट चिकट. आम्ही वर्गणी मागायला गेलो की तासभर लेक्चर देत, हे करा ते करु नका वगैरे वगैरे. अन मग रुपया दोन रुपये टेकवत हातावर. (वर्गणी मागायला गेलो नाही तर येता जाता विचारीत अरे येउन वर्गणी घेउन जा म्हणुन). लेक्चर संपल्यावर रोज प्रसाद देउन जात जा हे मात्र न विसरता सांगत. आम्ही मग नंतर भर दुपारी ढोल ताशे बडवत असु त्यांच्या घरासमोर, मिरवणुकीची तालिम म्हणुन. मजा होती राव. असो.

इथे मतप्रदर्शन केलेल्या लोकांपैकी किती जणांचा गणपती मंडळांशी कार्यकर्ता म्हणुन संबंध आलेला आहे? डिस्क्लेमरः- १) हा प्रतिसाद अवांतर/ चिथावणीखोर वाटल्यास काढुन टाकण्याचे पुर्ण स्वातंत्र्य मालक, चालक, संपादकांना आहे. २) हा प्रतिसाद खंडणीखोर गणपती मंडळांना अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनमानीला पाठिंबा देण्यासाठी दिलेला नाही.

In reply to by प्रसन्न केसकर

>>इथे मतप्रदर्शन केलेल्या लोकांपैकी किती जणांचा गणपती मंडळांशी कार्यकर्ता म्हणुन संबंध आलेला आहे? आला आहे..का?

वर्गणी देणे हा त्रास आहे जर आपण स्वेच्छेने देत असलेली रक्कम मंडळाच्या कार्यकर्त्यांना मान्य नसेल तर. अशा परिस्थीत आपण आपल्या भुमिकेवर ठाम राहावे. परंतु जर मंडळाचे कार्यकर्ते समजुतदार असतील आणि विशिष्ट रकमेचा हटट करत नसतील तर मलाच ठरवल्या पेक्षा थोडी जास्त रक्कम द्यायला आवडतं :) [अवांतरः काही ठिकाणी गैरप्रकार होत असतील, काही ठिकाणी वर्गणीच्या पैंशाचा गैरवापर होत असेल पण म्हणुन या मुळे सरसकट सगळ्यानांच वाईट समजू नये. मला स्वतः ला तरी हा सार्वजनीक उत्सव खुप आवडतो आणि हा उत्सव चालू राहो या करीता शक्य होईल तेव्हढी मदत करायला माझी तयारी असते]

आमच्या घरी सुद्धा आले होते वडलांचा आदर (दरारा) असल्यामुळे दिले ते त्यांनी खुशीने स्वीकारले.