Skip to main content

तरंग

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 06/08/2010 12:06 या दिवशी प्रकाशित केले.
नजरेत नजर मिळवुन सखी बोलायची अन् भलत्या ठिकाणी रेंगाळणारी नजर पाहुन हात मानेजवळ नेऊन काय हे म्हणायची... डोळ्यातील गढुळपण कमी होतांना ओठातल्या ओठात हसायची अन् स्मित टिपले नाही म्हणुन रुसायची आजकाल अवचित तळ्यात पडणारा दगड हलकेच तरंग उमटवतो अन शांतपणे तळाशी जातो परत सगळं शांत शांत ... जसं काही झालंच नाही.
लेखनविषय:

वाचने 3295
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

हलकेच तरंग उमटवतो अन शांतपणे तळाशी जातो परत सगळं शांत शांत ... जसं काही झालंच नाही. >>> जसं काही झालंच नाही जसं काही झालंच नाही व्वा नाना !! एकदम फॅक्टफुल रे !!

>>नजरेत नजर मिळवुन सखी बोलायची अन् भलत्या ठिकाणी रेंगाळणारी नजर पाहुन हात मानेजवळ नेऊन काय हे म्हणायची... नानाच्या न्हाइ त्या खोडी काय जात नाहीत..

वाहवा! नाही म्हणजे नानाच्या कवितांना अधुन मधुन चान चान म्हणायची पद्धत आहे म्हणून!

In reply to by श्रावण मोडक

श्रामणभौ....जे हवे हवेसे वाटत होते ते उद्योग वेळच्यावेळी करायला मिळाले नाहीत म्हणून हा माणूस एरवी नको ते उद्योग करतो. ;)

In reply to by सुहास..

नान्याला एक्विलिब्रीयम का काय ते आवडते. त्यामुळे कधी बाब्या बाब्या खेळुन कंटाळा आला की तो कार्टा कार्टा बनतो.

In reply to by सहज

हा हा हा, बहुतेक बटाट्यांचा स्टॉक संपला की नाना दगड उचलत असावा ;)

टिपिकल नाना..
डोळ्यातील गढुळपण कमी होतांना ओठातल्या ओठात हसायची अन् स्मित टिपले नाही म्हणुन रुसायची
सहीच रे

आजकाल अवचित तळ्यात पडणारा दगड हलकेच तरंग उमटवतो अन शांतपणे तळाशी जातो परत सगळं शांत शांत ... जसं काही झालंच नाही.
हं हं, नान्याला दगडं टाकुन उमटणार्‍या तरंगांत लैच इंटरेस्ट बघा. ;-) बाकी आपल्याला कवितेतलं काय कळतंय म्हणा..

In reply to by Nile

बरोबर आहे तुझे निळ्या कोल्ह्या. तुला एकतर पाणी किंवा एकतर दगड अशी सवय. दगड आणि पाणी एकदम म्हणल्यावर तु गोंधळून जाणे स्वाभावीक आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुझं बरंय लेका, चौपाटीवरचे भेळेचे कागद जपुन ठेवतोस तु! ;-)

आजकाल अवचित तळ्यात पडणारा दगड हलकेच तरंग उमटवतो अन शांतपणे तळाशी जातो परत सगळं शांत शांत ... जसं काही झालंच नाही. नॅन्स, एक नंबर हुच्च .. :) नाईल - परा जुगलबंदी.... =)) =)) =))

अवलियाशेठ, केवळ..अप्रतिम कविता.. (आस्वादक)केशवसुमार अवंतीनगरीतला ब्राम्हण तळ्या काठी जाऊन का बसला होता त्याच खर कारण आज समजल..;) (बादरायण)केशवसुमार

आजकाल अवचित तळ्यात पडणारा दगड हलकेच तरंग उमटवतो अन शांतपणे तळाशी जातो परत सगळं शांत शांत ... जसं काही झालंच नाही. मस्तच रे....

नाना अजब रसायन आहे. अप्रतिम कविता. श्रावणशी सहमत. असेच मला आमच्या अजूनही काही मित्रांबद्दल वाटत आले आहे. असो.

शेवटचे कडवे स्वतंत्र कविता म्हणून उभे राहू शकेल इतके छान.