२ स्त्रियांमधे जितकी चांगली मैत्री होऊ शकते तितकी चांगली मैत्री माझ्यात आणि विभावरीत होती असं सेफली म्हणता येईल. टचवुड! याचं मुख्य कारण बहुसंख्य बायकांत आढळ्णारा कॅटीनेस, पेटीनेस, हेवा यांचा आमच्या दोघीतील ढळढळीत अभाव.
विभा जितकी परखड आणि सरळ तोंडवर बोलणारी आहे तितकीच मी मेलो आणि पडेल आहे पण ती मनाने अतिशय चांगली आहे. तिला परखड बनायला कारणदेखील आहे. लहानपणी वडील अचानक वारल्यानंतर आईनी कष्ट करून मोठं केलय. पुढे विभानी कॉलेजपासून लहान्मोठ्या नोकर्या करून आईला हात्भार लावलाय. वडील नसल्यावर कसे लांडगे पदोपदी भेटतात ते तिलाच माहीत.
लहान वयात स्वातन्त्र्य चाखलेले लोक लगेच ओळखू येतात. विभाही त्याच कॅटॅगरीतली. स्वातंत्र्याची नशाच तशी असते. अजून हवं, अजून हवं, पुरंच पडत नाही.
विभाचं अजून लग्नं झलेलं नाही - कारण टू चूझी!! मनाजोगा वर मिळत नाही अजून. मागे लोक बोलतात "घोडनवरी झाली आहे". तिलाही एकाकीपण भेडसावतं पण वय वाढलं तसं चॉइस कमी होत गेला आणि आता कोणीच आवडत नाही.
क्वचित पिशवीशी चाळा करत मला बोलते "५ वर्षापूर्वी आलेला आपटे चांगला होता गं. फक्त टक्कल होतं जरासं. तेव्हाच हो म्हणायला पाहीजे होतं. आईनी पण नाही नेटानी सल्ला दिला".
पूर्वी पाय ओढत चालत नसे आताशा पाय ओढत चालते. माझा नवरा रमेश तिला १३ वर्षापूर्वी भेटला तेव्हा साधीसुधीच आली होती भेटायला. आता मात्र येते तेव्हा भडक लिप्स्टीक लावून येते. आज्काल कपडेही विजोड आणि भडक घालते. कधीकधी खूप दया येते.
बोलते तेव्हा वाटतं न बोलेल तर बरं स्वतःबद्दलच बोलते जास्त करून. बाहेरच्या घडामोडीशी नातं तुटल्यासारखी. आई आजारी आहे म्हणते; "हाय खालीये मुलीचं लग्न न झाल्याची. स्वतःला गुन्हेगार समजतेय. नोकरी बरी चालली आहे. " मग मी ही विभाला टाळते विशेषतः रमेश घरी असला की. तो नसताना झेलते, कणवेपोटी.
वेल, मैत्री फारशी टिकेलसं वाटत नाही. वाईट वाटतं पण चॉइस नाही.
वाचने
3768
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा लेख तीला वाचायला द्या. जो
ह्म्म. वेळेत लग्न झालं असतं
मस्त.
हे काय ?
लांडग्यांना फ्यामिली सिचुएशन
In reply to हे काय ? by मिसळभोक्ता
फार थोड्या लोकांना आपल्या
मला आजच एक व्य नि आला
बापरे.... लोक कुठे काय लिंका
In reply to मला आजच एक व्य नि आला by शुचि
नाहीतर काय....
In reply to बापरे.... लोक कुठे काय लिंका by शैलेन्द्र
...दोन स्त्रियांमधिल मैत्री...
...दोन स्त्रियांमधिल मैत्री...
टक्कल !