रे माझ्या गळणार्या केसा...
आम्ही विशी गाठेस्तोवरच केस गळतीनं आम्हाला गाठलं. नक्की काय करायला हवं ते ठरवे पर्यंत काही महिनेच गेले अस्तील पण आम्ही पार चाळीशीला भिडलेलं, बर्यापैकी टक्कल पडायला सुरुवात झालेलं शीर टोपीखाली ठेउन मिरवायला लागलो.
(होमिपथी,आयुर्वेदिक )उपचार ,उपास तापास्,भूत बाधा ,मानसोपचार केश-रंगकाम, जिरेटोप चढवणं(weaving/bonding) असे सर्व उपचार करुन, जाणार्या हरेक केसासोबत आम्ही त्याच्या दहापट पैसे घालवुन बस्लो.
तर अशी ही आमच्या विविध मार्गनं केलेल्या प्रयत्नांची दिशा आणी दशा:-
१.महाविद्यालयाच्या तिसर्या वर्षाच्या मध्याला कुणा हितचिंतकानं हळु हळु केस गळती लागल्याचं निदर्शनास आणलं.
२.काही दिवसातच डॉ सतिश वैष्णव ह्यांची केश समस्येवर "शर्तिया इलाज" सारखी वाटाणारी,होमिपथी वाली पेप्रातील जाहिरात बघुन तिक्डं डेरेदाखल.
३. तिथला फायदा दिसायला वेळ लागतोय म्हणल्यावर त्याच्यासोबतच सर्व धार्मिक्,दैविक,मांत्रिक असले paranatural उपाय सुरु.
४.दोन्-अडीच वर्षानंतरही सर्व पथ्ये पाळत असून सुद्धा उपयोग होत नाही म्हटाल्यावर,उपचार करणार दैवत आम्ही बदललं. पुण्यामध्ये "डॉ बात्रा" (हे ही होमिपथिकच)ह्यांचं शिष्यत्व पत्करलं.
६.सुमारे तीन वर्षे सलग उपचार घेउन काय उप्योग होत नाय म्हटल्यावर शहाणा माणूस थांबला अस्ता.
आता आम्ही अतिशहाणे असल्यानं आयुर्वेदिक च्या मागं पडलो.
वर्षभर झाले,उपयोग फारसा नाही. आता अनुपम खेर, अमरिश पुरी,राकेश रोशन ह्यांच्या लायनीत लागलोय.(पैशाच्या हिशोबानं असतो तर बरं झालं असतं तिच्य्आय्ला.)
७.शेवटी weaving करुन घेतलं.कुणा दुसर्याचेच केस दत्तक घेउन ते आपलेच आहेत असं मानलं.
पण हे सोंग काही दिवसाच्या वर वठवता आलं नाही.
८.आता hair transplant करण्याचा विचार आहे.(तेव्हढा एकच प्रकार राहिलाय, म्हटलं cosmetic surgeon ला तरी कौपशी ठेवावं, सगळ्यांना वाटात सुटालो आहोत तर.)
मिळालेला बोधः-
केस गळणं हे क्रियापद "गाळणीतुन चहा गळणं" ह्यासारखं घ्यावं.गाळणीत चहा घेउन कुणाला फिरता येतं का? नाय ना, बस्स मग.
लागलेली गळती (typical mail baldness pattern)सहसा थांबत नाही.
"खल्वाटो निर्धनम् क्वचित्" ह्या उक्तिच्या आशेवर जिवंत रहावं> आज नाय तर उद्या अंबानीच्या पप्पापेक्षाही अधिक पैका आपल्याला मिळेल्,ह्यावर विश्वास ठेवावा. नसेल तर.
डोक्याच्या शेतात केस गळु लागले,की चिंतांचं पीक येतं. निदान ते कमी ठेवावं.
काही जणांना नको तिथं केस असतात, काढायचे श्रम पैसे फार जातात्,त्यापेक्षा आपल्याला केस नाहित ह्यातच समाधान मानावं.
शेवटी काहीही झालं तरी केस जाणं ही एक सिरिअस केस आहे.
टाळक्यावरुन गेलेले केस बघताना अगदी आपल्या हातची केस दुसर्याच वकीलाकडे गेल्याच्या दु:खापेक्षा हे दु:ख नक्केच मोठं आहे.
मेसचं खाउन केस जातात हे ऐकुन आता तोंडाला फेस आलाय.
"गळणारे केस"ह्या समस्येला कसे करावे face ह्या चिंतेत आम्ही अजुनही आहोत.
ह्या चितेनं अजुन केस जातहेत.
एकदा टक्कल पडलं की मग त्यावर काही उगवण्यापेक्षा घरच्या सपाट फरशीवर भरघोस धान्य उगणं सोप्प आहे.
केसाला लागलेली गळती, खिशापर्यंत पोहोचु नये म्हणुन (दिवसेंदिवस उजाड दिसत जाणारं)थोडं डोकं वापरावं.
अधिक सविस्तर (जमलं तर उपचार, उपचार प्रकार, लागणारा खर्च आणी त्याचा उपयोग ह्याबद्दल)लिहिनच wig वगैरे फिट करुन आल्यावर.
प्रतिक्रिया
विजुभाउ आठवले
विजुभाउ
सर्कार्,पणः-
हॅ हॅ हॅ
हे हे हे! मजेशीर आहे हा
hair transplant
अगदी माझाच अनुभव जशाच्या तसा
स्वानुभव फारच हसत खेळत मांडला
भरदार केशकलप म्हणजे
सहमत !
अनुभव
हे हे हे! मस्तच अनुभव.
आभार ( आणी अक्कल )प्रदर्शन......
स्व वरती माझ्या प्रतिसादातच लिंक दिली होती
???
तुझी गोष्टच वेगळी आहे रे डॉन्या!
ते ठिक आहे हो ...
डान्राव यांसः-
>> एखादा फर्मास लेख होउन जाउ
"घने बालो का राझ" जाणून
हवा असेल तर आम्ही १ शेप्रेट
हेहेहेहे... खुशखुशीत
तुम्ही सगळे स्मायली वापरताय
केसांची केस चांगलीच हाताळलीय!
स्व भावना खेळकरपणे
मस्तच लिहीलंत हो!
पेठेतल्या सारखं उत्तर...
कापणे वि. कापवणे
हा हा हा..
अजुन प्रतिसाद येण्यसाठी काय कराव बुवा?
छ्या..
घ्या, अजून एक