<<<पण कुकर सुद्धा लावता येत नाही आणि कधी लावणार सुद्धा नाही या मानसिकतेचं समर्थन कसं करणार???"
हा जो कोणी मधुशाला नावाचा प्राणी इथे आला आहे आणि अकलेचे तारे तोडत आहे ते आता पुरे....
वरील वाक्याला काही अर्थ आहे का? अशी मानसिकता कदाचित अपवाद असलेल्या त्यांचा बायकोची असू शकते हे वाटतंय.... येत नाही आणि शिकणारपण नाही असली मानसिकता पुरुषांमध्येच पहिली आहे...स्वैपाकाच्या बाबतीत तरी...
मी आतापर्यंत गृहिणी असणारी किंवा नोकरी करणारी एकही स्त्री पहिली नाही कि जी घर चालवायला नकार देते, अपवाद असतील....हे सर्व आता अति होते आहे....घासकडवी गुर्जी या लेखाची गरज नव्हती.
चर्चाप्रस्ताव कुठल्या अर्थाने अश्लील वाटला हे जाणून घ्यायला जरूर आवडेल.
जीए कुलकर्णींच्या पत्रात त्यांनी लिहिल्याप्रमाणे मराठीमधले प्रत्येक क्रियापद (लैंगिक कोटीस्वरूप) द्वयर्थी वाटू शकते त्यातला हा प्रकार आहे काय ? असल्यास, याच लेखाबद्दल विशेषत्वाने अश्लीलतेची आठवण का यावी हे मला नीटसे उमजलेले नाही.
अशीच आधीची एक उद्बोधक चर्चा या दुव्यावर पहायला मिळेल.
तो दुवा चाळला (पूजेची पथ्ये). त्याच स्वरुपाची द्वयर्थी चर्चा इथे अपेक्षित आहे असे श्री. घासकडवी यांच्या पुस्तीवरुन वाटते.
पुजा, सैपाक अशा 'रोज मर्राच्या' गोष्टींबद्दल जेष्ठांमध्ये असलेली अनास्था पाहुन मन हळहळले.
हीच अनास्था अनेक गोंधळास कारणीभुत आहे, खाली सविस्तर उत्तर दिले आहे.
श्री. घासकडवी यांनी स्टार्टर दुवा दिला नसता, तर माझ्याकडून प्रकाशनळी पेटली नसती.
आता मी सर्वच लेख या स्टार्टरनिशी वाचणार आहे.
(थोड्या कालांतराने)
आम्लानंदाचे पारणे फिटले.
आदरणीय प्रविन्भप्करांचा चर्चा प्रस्ताव नीट वाचल्यास लक्षात येईल, की त्यांनी "स्वयंपाय" लिहिले होते.
अमेरिकन पाय ह्या आमच्या आवडत्या चित्रपटावरून स्वयंपाकाचे शिक्षण लग्न आधीच व्हायला हवे, हे स्पष्ट होते.
बाकी, चर्चेकडे लक्ष ठेवून आहे.
एक पथ्य सुचवावेसे वाटते, की जरी दोघांनीही मिळून स्वयंपाक करायचा असला, तरी मेनु एकानेच सुचवावा, आणि स्वयंपाकाचे नेपथ्य स्वतःकडे घ्यावे.
सर्वच स्लिपा फ्रॉइडियन नसतात, काही नायलॉनच्या, चुकून आपल्या बॅगेत राहिलेल्या वगैरे पण असतात.
सिनेमांचा विषय निघाला म्हणून मला एक सुंदर तैवानी सिनेमा आठवला - इट, ड्रिंक, मॅन, वुमन... नक्की पहाण्यासारखा आहे.
पथ्यं सांगताना तुम्ही एकदम नेपथ्यात शिरलात. मेनूला कदाचित रिक्वायरमेंट डॉक्यूमेंट वगैरे म्हणता येईल बहुतेक. म्हणजे ज्याला जे हवं ते करण्यात त्याने/तिने पुढाकार घ्यावा असंच म्हणायचं असावं तुम्हाला.
इट, ड्रिंक, मॅन, वुमन... वरून आम्हालाही 'ला ग्रांदे ब्युफे' हा फ्रेंच शिनेमा आठवला.
मेनूला कदाचित रिक्वायरमेंट डॉक्यूमेंट वगैरे म्हणता येईल बहुतेक.
मेनू वगैरेने उगाचच औपचारिकता येण्याची शक्यता आहे. हा औपचारिक मामला व्यावसायिकतेकडे (हाटेलात जाणे वगैरे) झुकणारा आहे. शक्य असल्यास ते टा़ळावे. तिकडच्या पदार्थांनी डॉक्टरकडे जाण्याची पाळी येऊ शकते.
तुम्ही हॉटेलांचा उल्लेख केला ते फार बरं झालं. तिथेदेखील कोणी ना कोणी सैपाक करतंच ना...आता स्वच्छता असणं अतिशय महत्त्वाचं हे ओघानेच आलं. पण कधीकधी बाहेरचे पदार्थ देखील लोक खातातच.
बाहेर जाण्याप्रमाणेच काही लोकं आपद्धर्म म्हणून का होईना शेजारी जेवायला जातात असंही ऐकलं आहे.
खवय्ये जमेल तिथे चविष्ट पदार्थ खाण्यासाठी जातात, हे मान्य आहे.
शेजार्यांकडे जाण्यासारखेच आणखी एक उदाहरण सूचले. गावाकडे समारंभात लागणारे जेवण खेड्यातील अनेक पुरूष एकत्र येऊन बनवतात/ बनवीत असत असेही ऐकले आहे. अशा टिम अॅक्टिविटीज आपल्या संस्कृतीत आहेत याचा अभिमान वाटतो.
(डिस्क्लेमरः सर्वप्रथम, हा प्रतिसाद हा (या धाग्याकरिता दिलेला प्रतिसाद असला, तरी) आजानुकर्ण यांच्या प्रतिसादास थेट उपप्रतिसाद नाही, किंवा (या धाग्याशी संबंधित असला, तरी) आजानुकर्ण यांच्या प्रतिसादाशी थेट संबंधितही नाही. केवळ आपला प्रतिसाद वर आणून लिंबुप्रकाशात - लाइमलाइटात - दाखल करण्यासाठी वापरलेली ही एक हीन आणि हिडीस ट्रिक आहे. तरीही, आजानुकर्ण यांनी माझे मत विचारलेले असल्यामुळे ते मांडण्याचा प्रतिसादाचे शेवटी जरूर प्रयत्न करेन. डिस्क्लेमर समाप्त.)
पाकसिद्धी हा अनुभवसिद्ध प्रकार असून अनुभवाने सैपाकाच्या दर्जावर फरक पडत असावा, असा एक कयास आहे. 'आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर' या बहिणाबाईंच्या (?) उक्तीप्रमाणे, बसलेले चटके जितके अधिक, तितका भाकरीचा दर्जा चांगला, असे काही गणित असावे, अशी शंका निर्माण होते. (उक्तीची 'अरे संसार, संसार' अशी सुरुवातदेखील सहेतुक असावी, असेही वाटू लागते.)
याच संदर्भात, ज्यातत्यात ओढूनताणून (आणि मोडूनतोडून) पु.लं.ची वाक्ये घुसडण्याच्या चालू प्रथेस अनुसरून, पु.लं.चे एक वाक्य उद्धरण्याचा मोह अनावर होतो. (वाक्य अर्धवट आठवत असल्यामुळे मूळ शब्दांबरहुकुम नाही, हे जनरीतीस साजेसेच झाले.)
"(आणि म्हणूनच) आजीच्या हातच्या पुरणपोळीची सर आईच्या हातास नाही, आणि पत्नीच्या तर मुळीच नाही" असे काहीसे ते वाक्य आहे. (गरजूंनी 'हसवणूक' या संग्रहातील 'माझे खाद्यजीवन' हा लेख मूळ वाक्यासाठी जरूर धुंडाळावा.)
भाईकाका आम्हाला गुरुस्थानी असल्यामुळे त्यांच्या विधानाबद्दल शंका घेण्याचा उद्देश अर्थातच नाही. पण दुर्दैवाने या बाबतीत आमच्याजवळ असलेला त्रोटक विदा हा पूर्णपणे ऐकीव, अनेक्डोटल स्वरूपाचा असून त्यात प्रचंड विरोधाभास आहे. म्हणजे, एकीकडे "तुझ्या हातचा सैपाक माझ्या आईच्या हातच्या सैपाकासारखा होत नाही" असे आपल्या नवपरिणीत पत्नीला सांगणारे नवरे भरपूर असतात, असे ऐकलेले आहे, तर याउलट, "You cook just like my mother. She is a lousy cook, too." असे आपल्या पत्नीस ऐकवणार्या पतीबद्दलचा विनोदही ऐकलेला आहे. त्यामुळे खरे काय ते कळत नाही.
तरी चर्चाप्रवर्तकाने 'आजी, आई आणि पत्नी यांच्या हातच्या सैपाकाच्या चवीची तुलना' याबद्दलची आपली अनुभवसिद्ध (असल्यास) तज्ज्ञ टिप्पणी (expert comments) मांडल्यास ती सर्वांनाच उद्बोधक ठरावी, असे वाटते. इतर इच्छुक सदस्यांनीही बहीण, मुलगी, वडील, भाऊ, मुलगा अशा किंवा इतरही परिवारसदस्यांच्या, नातेवाइकांच्या अथवा मित्रमैत्रिणींच्या हातचा सैपाक चाखण्याचा अनुभव गाठीशी असल्यास, तुलनात्मक चवीबद्दलची मते विदागारात दाखल केल्यास ते विदासंचयवृद्धीसाठी फायद्याचे ठरावे, व या धाग्याचे फलितही साध्य व्हावे.
पंगा यांचे मत वाचायला आवडेल.
हा चर्चाप्रस्ताव अश्लीलतेकडे झुकतो किंवा कसे, हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. आपण खाली अन्य एका प्रतिसादात निर्दिष्ट केलेल्या प्रस्तुत चर्चाप्रस्तावकाच्या दुसर्या एका चर्चेवरून आपल्याला तशी शंका आली असल्यास आपल्याला मी दोष देऊ शकत नाही, परंतु केवळ शंकेपोटी आपल्याशी ठाम आणि जाहीर सहमती दर्शवणे मला थोडे कठीण वाटते.
मात्र, प्रस्तुत चर्चा ज्या प्रकाशात वाचली जाणे अपेक्षित आहे, त्याच प्रकाशात माझा प्रस्तुत प्रतिसादही वाचता (आणि वाचण्यात) यावा, एवढेच नमूद करून आपले स्वल्प मतप्रदर्शन मी आवरते घेतो.
"If you can't beat them, join them."
ही अश्लीलतेविषयीची चर्चा मला या लेखावर अनाठायी वाटते. श्लील काय अश्लील काय या चर्चेविषयी एक स्वतंत्र धागा काढावा असं मी सुचवेन. इथे कृपया सैपाकाविषयी बोला.
कुठला शब्द बरोबर ? सैपाक का सैंपाक ? की स्वयंपाक ? (मी स्वंयपाक किंवा स्वैंपाक असाही उच्चार बर्याचदा ऐकला आहे. सानुनासिक उच्चार आहे हे नक्की) भाषाशैलीबद्दल प्रसिद्ध असलेल्या सुनीताबाई देशपांड्यांच्या पुस्तकात "सैपाक" हा शब्द येतो. हा कदाचित कोकणी/कोकणस्थ प्रकार असावा काय ?
सैपाक (स्वैपाक / स्वयंपाक) न करता येणारी कोणी व्यक्ती तुमच्या पहाण्यात आहे का? आणि नसेल तर पहिला मुद्दा अनाठायी आहे.
या सर्व शिक्षणाबरोबरच "सुरूवातीलाच मोदक किंवा आल्याच्या वड्या बनवू नयेत, पण सुरूवात अगदी सोप्या पाकृंपासून केलीत तर उत्तम" असा काही उत्तेजनार्थ सल्ला आला असता तर नवथर सैपाक्यांना प्रेरणा मिळेल.
सैपाकातील काही गोष्टी पुरुषांस करण्यास सोप्या तर काही स्त्रीयांस करण्यास सोप्या असाव्यात असे वाटते. इथे भेद, उच्च निच्च नसुन काही स्वाभाविक गुण आहेत.
पोळ्यावगैरे करायला थोडीशी नाजुकता, पेशंस लागतो, जे बायकांच्यात असते. त्याउलट काही अत्याधुनिक उपकरणी वापरणे सहसा पुरुषांना जास्त चांगले जमत असावे(चुभुदेघे, अनुभवावरुन).
त्यामुळे, सगळेच जमले नाही तरी चालेल, जे चांगले जमते ते करावे.
सैपाक (स्वैपाक / स्वयंपाक) न करता येणारी कोणी व्यक्ती तुमच्या पहाण्यात आहे का? आणि नसेल तर पहिला मुद्दा अनाठायी आहे.
या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. आमच्या अनुभवात, प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात सैपाक येतो. प्रश्न असा आहे की तो व्यवस्थित जमावा, भरपूर चमचमीत भोजनं व्हावीत या दृष्टीने कोणती पथ्यं पाळावीत याविषयी ही चर्चा आहे.
या सर्व शिक्षणाबरोबरच "सुरूवातीलाच मोदक किंवा आल्याच्या वड्या बनवू नयेत, पण सुरूवात अगदी सोप्या पाकृंपासून केलीत तर उत्तम" असा काही उत्तेजनार्थ सल्ला आला असता तर नवथर सैपाक्यांना प्रेरणा मिळेल.
हा अतिशय उत्तम मुद्दा आहे. अशा सोप्या पाककृती कुठच्या याविषयीही चर्चा व्हावी असा उद्देश आहे. मिपावरील अनुभवी बल्लवाचार्यांनी याबाबत ऊहापोह करावा.
मला याबाबतीत पाश्चात्यांचं थोडं कौतुक वाटतं. सैपाक करायला लग्नाआधीच सुरूवात करायला त्या संस्कृतीत अधिक मोकळं वातावरण असतं.
सैपाक व्यवस्थित जमावा या मुख्य मुद्द्यावर तर आपली सहमती आहेच. पण आता मुख्य मुद्दा आहे तो डीटेल्सचा!
>> तो व्यवस्थित जमावा, भरपूर चमचमीत भोजनं व्हावीत या दृष्टीने कोणती पथ्यं पाळावीत ... <<
सैपाक व्यवस्थित जमावा हे तर ठीकच. पण भरपूर आणि/किंवा चमचमीत हे तेव्हाच्या प्रवृत्ती (मूड)वर अवलंबून असायला हवे. म्हणजे एखाद दिवशी फक्त खिचडी खाऊनच समाधान होते तर कधी पुरणपोळ्यांबरोबर टोमॅटो सार आणि भाजलेला पापडही हवासा वाटतो.
>> अशा सोप्या पाककृती कुठच्या याविषयीही चर्चा व्हावी असा उद्देश आहे. <<
अतिशय स्तुत्य असा उद्देश आहे. गुर्जी, तुमच्याशी झालेल्या चर्चेबद्दल मला आठवण आहे. ती म्हणजे फक्त सैपाकघरातल्या समजल्या जाणार्या या कामाबद्दल आता उघडउघड छापील माध्यमांतून चर्चा होत आहे, हे उत्तमच!
>> मिपावरील अनुभवी बल्लवाचार्यांनी याबाबत ऊहापोह करावा. <<
इथे मात्र पुन्हा आपली असहमती होईल. फक्त अनुभवी लोकांनीच उहापोह करावा तर अनुभव कसा मोजणार? कोणी पाकृंचे धागे काढतो, कोणी इतर सर्व क्षेत्रांमधे नाव कमावून मग अचानक पाकृंचे धागे काढतो आणि कोणी अजिबातच शब्द लिहीत नाही. त्यामुळे माझी सूचना अशी की मिपावरील प्रत्येकाने स्वतःला थोडाबहुत अनुभव असल्यास जरूर उहापोह करावा.
>> मला याबाबतीत पाश्चात्यांचं थोडं कौतुक वाटतं. सैपाक करायला लग्नाआधीच सुरूवात करायला त्या संस्कृतीत अधिक मोकळं वातावरण असतं. <<
माझा व्यक्तीगत, फर्स्ट हँड अनुभव नाही, तरीही ऐकीव माहितीप्रमाणे पुन्हा एकदा सहमती. सैपाक करण्यासाठी, वयपरत्वे होणारे जबाबदार वर्तन एवढाच एक क्रायटेरिया (बहुदा) असतो.
एखाद दिवशी फक्त खिचडी खाऊनच समाधान होते तर कधी पुरणपोळ्यांबरोबर टोमॅटो सार आणि भाजलेला पापडही हवासा वाटतो.
अगदी. साधा पापड भाजणे यातही मन ओतलं तर तो स्वर्गीय आनंद होऊ शकतो. मला काही उत्कृष्ट पापड भाजणारेही माहीत आहेत... पण त्याविषयी चर्चा अवांतर ठरेल.
उघडउघड छापील माध्यमांतली चर्चा काहीशी फसवी असू शकते... छापील माध्यमांचा वाचकवर्ग जुन्याकाळपासून साडेतीन टक्क्यांवर फिक्स्ड आहे. उरलेल्यांनी काय करावं?
मिपावर एकंदरीत सैपाकाबद्दल अनास्थाच दिसलेली आहे. अर्थात हे माझं मत झालं. पण प्रत्येकाने आपापले सैपाकाचे अनुभव सांगावेत याला खणखणीत दुजोरा...
कृपया या लेखापुरता सैपाक हा शब्द एखाद्या टेक्निकल टर्म प्रमाणे वापरावा ही विनंती. 'स्वयं' शब्दातल्या मर्यादा टाळण्यासाठी मी तो वापरतो आहे, हे मूळ चर्चाप्रस्तावात स्पष्ट केलं आहे. प्रांतीयता यात आणू नये - किमान शब्दाबाबत तरी. सैपाकाच्या प्रांतीय वैविध्यावर जरूर लिहावे.
जैववैविध्यावर सध्या पर्यावरणारवाद्यांमधे खुपच चर्चा चालू असते. त्याला जिविधा असा सोपा पर्यायी शब्द ही त्यांनी दिला. इथे भौगोलिक विषमते मुळेच वैविध्य निर्माण होते. विशिष्ट वनस्पती या विशिष्ट मातीत चांगल्या रुजतात. त्याला अनुकूल वातावरण असले की त्याची वाढ ही चांगली होती. हा अभ्यास करण्यासाठी डोंगर उतारांवर अनेक अभ्यासक जात असतात. हे वैविध्य शोधण्यासाठी त्यांना तसे करावेच लागते. ते काय आपल्या बगीचातच परसबाग फुलवून थोडेच अभ्यासता येणार आहे?
हा आपला 'प्रांत' नाही असे अभ्यासकाला म्हणता येणार नाही. तसे केले तर त्याचे अनुभव विश्व ही संकुचित राहील. शिवाय इतर लोकही त्याच्या अभ्यासाबद्दल शंका घेतील.
लवंगी मिरची कोल्हापुरची या उक्तीत मला प्रांतिय वाद दिसत नाही. कोल्हापुरच्या मातीचा गुण त्या मिरचीत उतरला आहे. तशा प्रकारचा 'गुण' अन्य प्रांताच्या मिरचीत असता तर लवंगी मिरची **** ची अशी उक्ती झाली असती. असो सांगायचा मुद्दा असा कि वैविध्याचा आनंद लुटायचा असेल तर प्रांतिय विश्लेषण हे अपरिहार्य आहे.
आपला मुद्दा पाकवैविध्याशी निगडीत आहे. पाककृतीचा आनंद व पोटपुजेचा आनंद यातील कोणता आनंद श्रेष्ठ ? हा कळीचा प्रश्न मला इथे उपस्थित करायचा नाही. विविध म्हणजे काय? असे काही जे एकसारखे नाही. सगळेच एकसारखे असते तर वैविध्य आलेच नसते. म्हणजे वैविध्यात असमानता हा अंगीभुत गुण आहे. मग असमानता म्हणजेच विषमता. विषमता म्हणजेच शोषण याही चर्चे कडे मला जायचे नाही.
माझा मुद्दा एवढाच आहे कि असमानतेतील वैविध्य जोखायला आपल्या मनाची जडणघडण तशी हवी. सैपाकातील प्रांतिय वैविध्य समजा आपण काही काळ बाजुला ठेवल तर सैपाकात प्रत्येकाच्या 'हाताला' वेगळीच 'चव' असते हा मुद्दा दुर्लक्शित करता येणार नाही. हा जिव्हाचौचल्य जपण्यासाठी /पुरवण्यासाठी काही खवैय्यानी रचलेला डाव आहे अशी टीका ही होत राहणार आहे. बल्लवाचार्यांनी याला बळी पडू नये ही हाकाटी देखील होत राहणार. श्रोते आहेत म्हणुन गायक आहेत व गायक आहेत म्हणुन श्रोते आहेत. काही गायक हे श्रोतेही असतात पण सगळेच श्रोते गायक होउ शकत नाहीत. बल्लवाचार्यांच/ अन्नपुर्णाच व खवय्यांच नात असच असत. तिथ एकमेकांना दाद देउनच ते फुलत असत.
असो ही चर्चा पुढे नेण्यास मिपाकर समर्थ आहेत.
प्रांतीय भेद असणारच. तुमच्या प्रांतातल्या विशिष्ट शैल्या सांगितल्यात तर आवडेल.
प्रांताप्रमाणे व्यावसायिक भेदही असणार. तुम्ही पोलिस खात्यात होतात असं ऐकून आहे. त्या 'खात्या'च्या चवींविषयी काही चविष्ट किस्सेही ऐकायला आवडतील.
जिव्हाचौचल्य - शब्द आवडला.
"प्रत्येकाला सैपाक यायला हवा" हा मुद्दा पटतो. गणपा सारख्यांचे धागे वाचताना "जीवन त्यांना कळले हो" असे म्हणावेसे वाटते.
अर्थात सैपाक येण्याच्या बाबतीत अस्मादिकांची अवस्था "कळतं पण वळत नाही" ही आहे हेही मान्य करतो. काही गोष्टी शिकायच्या राहून गेल्या खर्या.
स्वैपाक न करता येणारी आणि न आवडणारी एक(तरी) स्त्री माझ्या चांगली ओळखीची आहे. योगायोगाने म्हणा ती आयटी संबधित उद्योगात आहे. वर कडी म्हणजे तीचा नवरा शेफ आहे. उदरनिर्वाहासाठी लोकांना जेवू घालतो(आणि घरी येऊन बायकोला जेवू घालतो).
सगळे कावळे काळे नसतात हे सिद्ध करायला जसा एक पांढरा कावळा पुरतो त्याच न्यायाने वर कुणीतरी म्हटलंय की पहिला मुद्दा अनाठायी आहे(कारण स्वैपाक न येणारी एक तरी ...) - ते विधान लागू होत नाही. सबब पहिला मुद्दा गैरलागू/अनाठायी नाही.
आता बोला ...
स्वयं हा शब्दच सध्या थोडा डागाळलेला आहे - हा त्याच शब्दाचा स्वयंदोष असावा. आता स्वयंसंपादनच घ्याना... त्यातही या स्वार्थी छटा आहेत म्हणूनच संपादकांनी तो अधिकार काढून घेतला आहे
खर तर स्वयं शब्दाला आत्मतृप्तीचा आनंद आहे. आपला आनंद इतरांवर म्हणुन का अवलंबुन असावा. आपल्या कडे अध्यात्मात देखील स्वानंदाला किती महत्व आहे. त्याला ब्रह्मानंदाचा व्याप्ती दिलेली आहे.
अपना हात जगन्नाथ या उक्तीत देखील किती ईश्वराचे अधिष्ठान आहे ते पहा. उक्ती आणि कृती यातील अंतर सर्वसामान्याला जवळच वाटाव म्हणुनच ते अधिष्ठान आहे.
धुर्ताचार्यांच्या मते संसाराचा गाडा 'रेटणे' अथवा 'ओढणे' हे ज्यांना काही कारणामुळे शक्य होणार नाही त्यांना स्वयंसिद्ध होण्यासाठी जगन्नाथाचे अधिष्ठान हे लागते. हा 'कमकुवतपणा' वा कुठला 'दोष' नाही . वास्तव आभास यातील सीमारेषा यातील सीमारेषा जेव्हा पुसट होते तेव्हाच तुम्हाला 'मोक्षप्राप्ती' होते. मोक्षाचा आनंद हा स्वानंद आहे. अध्यात्म असो वा विज्ञान अंतिम उद्देश हा मानव सुखी करण हा आहे. मला इथे सुखाची सापेक्षता आणुन 'रसभंग' करायचा नाही. आभास व वास्तव या अवस्था यांना 'स्वप्नदोष' वा 'सत्यगुण' या विकल्पात ही आणायचे नाही. मला 'स्वयंसिद्धते'ला कमी लेखु नये एवढच सांगायच आहे.
स्वप्न, सत्य, गुण व सिद्धता यांचा ऊहापोह करून तुम्ही स्वयं शब्दाचं महत्त्व अधोरेखित केलंत त्याबद्दल धन्यवाद. आपला हातगुण शेवटी खरा असला तरी नेहेमीच अ मॅन इज नॉट अॅन आयलंड...
तरीही आपले मुद्दे वाचून स्वयं शब्दाला अधिक मान प्राप्त होईल ही आशा.
आपल्या संस्कृतीत सैपाकाचा केलेला बाउ मला अजिबातच पटत नाही. आपल्याला सैपाक शिकवण्याची काही व्यवस्था आहे का? मुळात सैपाक शिकवणे याबाबतीत अगदीच अनास्था दिसुन येते. असे असताना सर्वांना साग्रसंगीत सैपाक येण्याची अपेक्षा कशी करता!! फारतर मुलींना सैपाकाचे चार धडे आईकडुन मिळत असावेत, बहुदा, सैपाक हीच यशस्वी लग्नाची गुरुकिल्ली आहे आणि चांगला सैपाक जमणे हे स्त्रीचेच काम आहे. अन्यथा नवरा शेण खायला बाहेर जातो असे म्हणतात असे ऐकले असेलच. (हे ही स्त्रीयांमध्ये काय आहे कळत नाही, आपले ते जेवण इतरांचे ते.. असो)
अनेक मुले तर सैपाक परिस्थितीनुसार शिकतात, अनेकदा चुकतात, अनेकांना तर तेही जमत नाही. मेस मध्ये अनेक वर्षे काढणारे काही तर आत्मविश्वास गमावुन बसतात, मग नंतर पुढे यांवरच वैवाहीक आयुष्य बिघडवण्याचा ठपकाही येतो. रीतसर शिकले असते तर असे झाले असते का?
तर मुद्दा असा आहे, की मुले असोत वा मुली, यांना सैपाकाचे धडे लहानपणीच मिळाले तर ही असमानता राहणार नाही. नवरा बायको एकमेकांना सांभाळुन सैपाकाची काळजी घेतील आणि ही असमानता मुळातुनच नाहीशी होण्यास मदत होईल, असे वाटते.
हे आमचे तोकडे ज्ञान, कुणास काही चुक असल्यास दाखवुन द्यावे. धन्यवाद.
निळ्या, याच बाबतीत गुर्जींनी मला एक छोटेखानी व्याख्यान पुस्तक प्रदर्शनात दिलं होतं त्याचीच पुन्हा एकदा आठवण झाली.
मुलींना थोडेफार धडे आई, ताई, इ.इ. घरातल्या ज्येष्ठ स्त्रियांकडून मिळतात हे उत्तमच होतं आणि आहे. पण मुलांची मात्र कुचंबणा होते.
एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडल्याबद्दल बालक निळे यांचे आभार.
फारतर मुलींना सैपाकाचे चार धडे आईकडुन मिळत असावेत, बहुदा, सैपाक हीच यशस्वी लग्नाची गुरुकिल्ली आहे आणि चांगला सैपाक जमणे हे स्त्रीचेच काम आहे. अन्यथा नवरा शेण खायला बाहेर जातो
असहमत... नाईलभाऊ, तुम्ही स्त्रीविश्व फर्स्टहॅंड किती बघितलंय माहीत नाही. पण मी जो अनुभव घेतला आहे, त्यात सैपाकाचे शास्त्रशुद्ध धडे मुलींना देण्याची पद्धत नाही. पाण्यात पडल्यावर पोहोता येते, तसेच लग्न झाल्यावर सैपाक येईल असे गृहीत धरले जाते. फारतर नवऱ्याच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, इतपतच कानमंत्र वडीलधाऱ्या स्त्रियांकडून मिळतो. सैपाक हे केरवारा, धुणीभांडी इ. प्रमाणे chore वाटावे असेच वातावरण मी पाहिलेल्या भारतीय घरांत असते. उपवर मुलीला सैपाकाची शास्त्रशुद्ध माहिती (पाकसिद्धी, सादरीकरण आणि आस्वाद) देण्याची प्रथा नाही. सैपाकासकट सर्व chores सुखी संसारासाठी आवश्यक समजली गेली तरी मी पाहिलेल्या समाजात या सर्व संसारासाठी, नवऱ्यासाठी करायच्या गोष्टी हेच ठसवलं जातं. स्वतःच्या आनंदासाठी सैपाक कसा करावा याबद्दल बहुतांशी अनभिज्ञता आढळून येते.
योग्य मुद्दा!
आनंदासाठी सर्व काही, अगदी सैपाकसुद्धा याचं शिक्षण कसं द्यावं याबद्दल शहराजाद यांनी आणखी दोन शब्द लिहावेत अशी त्यांना विनंती.
सैपाक आनंदासाठीही (नव्हे आनंदासाठीच?) करायचा असतो याचं मूलभूत शिक्षण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत श्री. घासकडवी म्हणतात त्याप्रमाणे अरगॉनॉमी वगैरेंचा विचार कसा करता येणार?
मला वाटते की आपल्या पूर्वजांमध्ये या बाबतीत अधिक मोकळेपणा होता. पूर्वी १४ विद्या व ६४ कलांमध्ये सैपाकाचा अंतर्भाव होता. त्यावर मान्यवरांनी पुस्तके लिहिली होती व ती वरीष्ठ वर्गात हे शिक्षणही दिले जात असे. इतकेच काय पण सध्या स्त्रियांना खालचा दर्जा देणार्या मुस्लीम देशांतही स्त्रिया सैपाकांत चतुर होत्या. अरेबियन नाईट्समध्ये अशा आनंदाने सैपाक करणार्या अनेक स्त्रियांचा उल्लेख येतो. जिज्ञासूंनी गौरी देशपांडे यांनी केलेले अरेबियन नाइट्सचे भाषांतर वाचावे.
प्रतिक्रिया
<<<पण कुकर सुद्धा लावता येत
चमत्काराशिवाय नमस्कार नाही.
(माझा हा प्रतिसाद तुम्हांला
शक्यता
हा चर्चाप्रस्ताव अश्लील वाटतो
रोचक
श्री. घासकडवी यांची पुस्ती
हम्म
पुजा, सैपाक अशा 'रोज
नवीन पिढी मात्र सर्व माहिती
प्रकाशनळी
फ्रॉयडियन स्लिप
सर्वच स्लिपा फ्रॉइडियन नसतात,
फ्रेंच
हॉटेलं...
बाहेर जाताना वारंवार
खवय्ये
एक सुचवण
आभारी आहे
अनाठायी
अगागागागा
प्रश्न
सर्वच शब्द बरोबर असावेत
मलाही काही प्रश्न आहेत
आल्याच्या वड्या अवघड नाहीत
मला वाटते.
सहमत आहे.. मात्र कोणाला काय
सैपाक (स्वैपाक / स्वयंपाक) न
उत्तराबद्दल धन्यवाद
एखाद दिवशी फक्त खिचडी खाऊनच
सैपाक
वैविध्य
प्रांतीय भेद असणारच. तुमच्या
सैपाकाबद्दलचे मुद्दे
गणपा
कळणं, वळणं....
आय थिंक
स्वैपाक न करता येणारी आणि न
लकी बास्टर्ड
तेच ना...
स्वयंपाक न येणं ही तुम्हाला
बरेचदा प्रश्न एखादि गोष्ट
हॆहॆहॆ
वा
आपल्या संस्कृतीती सैपाकाचा
बर्याच अंशी सहमत आहे
त्यापुस्तकाचे परिक्षण लिहावे
chore
योग्य मुद्दा
मला वाटते की आपल्या