पूर्वी १४ विद्या व ६४ कलांमध्ये सैपाकाचा अंतर्भाव होता. त्यावर मान्यवरांनी पुस्तके लिहिली होती व ती वरीष्ठ वर्गात हे शिक्षणही दिले जात असे.
याबद्दल अधिक वाचायला आवडेल. खास करुन जर तुम्ही अशा पुस्तकांचे परिक्षण लिहलेत, त्यातील दोन चार रेसीप्यांचे फोटू टाकलेत तर उत्तम.
अशाच एका पुस्तकाबद्दल ऐकले होते, पण त्यात फक्त वेगवेगळ्या रेसीपी करतानाचे फोटुच होते फक्त, बाकी कसे करावे वगैरे काही माहिती नव्हती. तुम्ही म्हणता ते खरे असेल तर अशा गुप्त गोष्टी बाहेर यायलाच हव्यात.
अहो मी तेच म्हणले आहे, फारतर मुलींना थोडेफार शिक्षण मिळते (दिले जाते असे नाही) अदिती म्हणते त्याप्रमाणे ताई वगैरे कडुन असेल.
बाकी स्त्रीविश्वाचा फर्स्टहँड अनुभव नाहीच हो, मी पुरुष आहे. ;-)
सैपाकात रूची दाखवली म्हणजे आयडी स्त्रीचाच असेल किंवा पुरूषाचाच असेल हे असे स्टीरीओटाईप्स बदलायला हवेत. सैपाक शिकण्यात हे ही एक पथ्य शिकवलं गेलं पाहिजे.
माणसाला 'स्वयं'पाक करणे कालांतराने कंटाळवाणे होऊ लागते.. बॅचलरहूड मधे ठिक आहे. एकदा स्त्री-पुरूषांचं लग्न झालं (प्रसंगी लग्न न होताही एकत्र राहत असल्यास) एकमेकांकडून-एकमेकांसाठी सैपाक करून घ्यावासा वाटु लागतो. व त्यात गैर काहिच नाहि. एकमेकांना सैपाक करून घालणे ही भारतीयच नाहि तर अखिल मानवीय संस्कृती आहे
सैपाक करण्यास कंटाळा येणे, कमी मजा येणे, ताकद नसणे वगैरे कारणांमुळेच बाजारात सैपाकाची अनेक आधुनिक साधने मिळतातच!
:) :)
माणसाला 'स्वयं'पाक करणे कालांतराने कंटाळवाणे होऊ लागते..
खरे आहे, पण म्हणुनच काही फास्ट रेसीपीज अस्तित्त्वात आहेत. याचे धडे लहानपणी मिळाले असते तर बॅचलहुड अधिक सुखकर झाले असते. ह्या रेसीपीज अर्थात सद्ध्या अनेक लोक स्वानुभवाने शिकतातच, पण मग चुका होतात वगैरे. म्हणुन पुन्हा बॅक टु माय पाईंट.
सहमत आहे.. ख्रंतर शाळामधे हा विषय सुरू करता येईल म्हणणर होतो. पणे तिथे काहि अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय इतक्या लहान वयात सैपाकाची उपकरणे वापरण्याने सैपाक शिकवण्याचा मुळ उद्देश साध्य होत नाहि.
असे काही नाही. शाळेत सुरुवात झाली तर उत्तमच. सहज सोप्या गोष्टी तिथे शिकवता येतील. उदा, कोशींबीर बवनणे वगैरे. एकदा का सैपाकाची भिती मेली, की आयुष्यात पुढे अडचण येणार नाही.
बव्हंशी सहमत. बव्हंशी यासाठी कारण काहि उत्साही मुले व मुली पूर्वतयारी शिकवली की लगेच टिव्हीवर बघुन अथवा कुठेतरी वाचुन विशिष्ट पाककृती करू पाहतील.
अर्थात मित्रांकडून पाककृतीची चुकीची माहिती होऊन पुढे प्रॉब्लेम होण्यापेक्षा शाळेत शिकवलेली बरीच बरी.
तुम्ही शाळेचा उल्लेख केल्यामुळे एक मुद्दा मांडावासा वाटतो. शाळांमध्ये सैपाकाच्या शिक्षणाविषयी जी अनास्था दिसते ती अत्यंत लाजिरवाणी आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. या महत्त्वाच्या विषयाचं ज्ञान केवळ बाय द वर्ड ऑफ माउथ व्हावं हे लांच्छनास्पद आहे. शिक्षणाच्या आधिकारिक धोरणात या महत्त्वाच्या विषयाची किमान तोंडओळख करून देण्याची दखल घेतली जावी असं आम्हाला वाटतं.
अन्न वस्त्र निवारा वगैरे गरजातील अन्न ही मुलभुत गरज आहे. वस्त्राची तमा न बाळगणारे अनेक आहेत म्हणुनच प्राधान्यक्रमात अन्न हे प्रथम आहे. अन्न या मुलभुत गरजांकडे लक्ष देण्यासाठी सैपाकाच्या शिक्षणाविषयी जी अनास्था दिसते ती नक्कीच लांछनास्पद आहे. विचारवंतांनी याचा विचार केला पाहिजे.
आता काही लोक सैपाक हा शिक्षणाचा विषय आहे की संस्काराचा? तो शाळेत शिकवला जावा कि समाजात? असे प्रश्न उपस्थित करतील ही. पुर्वी गुरुकुल पद्धतीत निसर्गाकडुनच काही शिक्षण व्हायचे. सैपाकाचा कच्चा माल हा शेवटी निसर्गाकडूनच मिळतो . आदिमानव हा पुर्वी कच्चे मांस खात असे. अरण्यात वणवा पेटल्यावर भाजले गेलेले प्राणी हे अधिक रुचकर लागतात हे त्याला निसर्गोत्पातामुळेच समजले. मसाल्याचे पदार्थ वापरल्यामुळे अन्न अधिक काळ टिकते हे देखील त्याला निसर्गातुनच समजले. पण माणुस हा वेगळा प्राणी आहे. प्रत्येक वेळी ठेच लागल्यावरच शिकावे का? पुढच्यास ठेच मागचा शहाणा. कशाला प्रत्येकाने ठेचा खाव्यात?
शिक्षणाने माणुस बदलतो. पिढी बदलते. त्यामुळे सैपाकाचा शिक्षणात समावेश केला पाहिजे. अभ्यासक्रमात थिअरी प्रॅक्टिकल हा भाग ठरवता येईल पण तो नंतर. राजेश म्हणतो तशी विषयाची तोंड ओळख तर प्रथम झाली पाहिजे. रस नंतर निर्माण होतो.
>> शाळांमध्ये सैपाकाच्या शिक्षणाविषयी जी अनास्था दिसते ती अत्यंत लाजिरवाणी आहे असं आमचं स्पष्ट मत आहे.
आमची शाळा बरीच पुढारलेली होती म्हणायची मग.
कार्यानुभव च्या तासांमध्ये थोडफार शिक्षण मिळायच कुकिंग बद्दल.
कधी कधी तर स्पर्धा पण असायच्या.
लकी मी.
आमच्या शाळेत सिनीअर विद्यार्थ्यांनी सैपाकाबद्दल बरीच माहिती पुरवली होती पण बहुतांश माहीती ऐकिव असावी असे तेव्हा वाटत असे. एकट्यापुरता सैपाक करायचे धडे मात्र तेव्हाच मिळाले असावेत.
पहिला चहा शाळेत असतानाच केला होता हे आठवले.
सध्या सोप्या पाकृ करता येतील कि नवशिक्यांना... उदा. भात आणि सांबर अथवा रसम...माझा नवरा एकदम फस्क्लास बनवतो...
अजून साधी फोडणी देऊन कडधान्ये करता येतील... अवघड काय त्यात ? चवीचं म्हणाल तर हळूहळूच माणूस शिकतो...एकदम कसे येणार ?
अशीच आधीची एक उद्बोधक चर्चा या दुव्यावर पहायला मिळेल.
तो दुवा चाळला (पूजेची पथ्ये). त्याच स्वरुपाची द्वयर्थी चर्चा इथे अपेक्षित आहे असे श्री. घासकडवी यांच्या पुस्तीवरुन वाटते. -- अजानुकर्ण
-- अजानुकर्णाचे मत पाहून चर्चाप्रस्ताव कोणत्या विभागात आहे ते पाहीले. विनोद, विरंगुळा, क्रिडा या विभागात पाहून मजा वाटली ;)
शेवटचा दुवा उघडून वाचला नाही.
'कुकरची शिट्टी काढणे' या वाक् प्रयोगाने बरेच मनोरंजन झाले :)
कळावे... :)
या पुर्वी कुकरच्या शिट्टीवर कौल झाला होता. (कौलचा दुवा घ्यावा. )
आमच्य मते हे उर्जा नियोजनासाठी याचा उपयोग खुप होतो. कुकरला शिट्टी नसेल तर कुकरचा स्फोट होउ शकतो. कुकरच्या शिट्टीला मनोरंजन मुल्या पेक्षा सुरक्षिततेचे मूल्य अधिक आहे.
उर्जेचे योग्य नियोजन केले तर शिट्टीची वेळ येणारच नाही.
कौलात दिल्याप्रमाणेच आमचे मत पुन्हा लिहतो.
शीटी कडे लक्ष दिलेत तर उर्जाही वाचते अन डाळही शिजते. शिटी न होता शिजवणे लांबवले तर उत्तम. एकाच शिटीस डाळ शिजेल.
सोवळ्यात किंवा ओलेत्याने सैपाक केल्यास सैपाकाचा आनंद जास्त येतो व भूकही छान लागते असा अनुभव आहे.
सैपाक करताना दृष्टी, चव आणि गंधाबरोबरच स्पर्श हाही एक महत्वाचा घटक आहे. उदा. कणकेचे गोळे तिंबणे, दाणे कुटणे किंवा नुसती लिंबे हाताने मऊ करणे यात सुद्धा एकप्रकारचा आनंद आहे. काही यांत्रिक उपकणे वापरत असल्यास त्याचा आवाज हा ध्वनिच्या माध्यमातून आनंद देणारा घटक आहे. तर असा पंचज्ञानेंद्रियांना आनंद देणारा सैपाक करण्यास कोणत्याही पुरुषाने मागे राहू नये. ज्याप्रमाणे जेवण हे उदरभरण नसून यज्ञकर्म आहे त्याप्रमाणेच सैपाक हे एक काम नसून कला आहे. मला स्वतःला सैपाकात प्रचंड रुचि असून कोणत्याही स्त्रीसाठी सैपाक करण्यात मला कमीपणा वाटणार नाही.
सोवळ्यात किंवा ओलेत्याने सैपाक केल्यास सैपाकाचा आनंद जास्त येतो व भूकही छान लागते असा अनुभव आहे.
तुम्हाला प्रचंड भुक लागली आहे अशा वेळी केवळ धार्मिक परंपरा म्हणुन सोवळ्या ओवळ्यानेच वा ओलेत्यानेच सैपाक केला पाहिजे हा अट्टाहास आनंदा पेक्षा दु:ख देणारा आहे. अशा वेळी पारोश्याने जरी सैपाक केला तरी अन्न वेळेवर मिळणे हा भाग अधिक महत्वाचा असतो. पण हा स्खलनशील विचार धर्मपंडितांनी पाखंडी ठरवला आहे.
नगरीनिरंजनभाऊ,
तुम्ही एकदम चोक्कस बात केलीत. सर्वसामान्य पाककृतींच्या पुस्तकांत रुक्ष मोजमापं, पदार्थांची जंत्री व यांत्रिक कृतीचं वर्णन इतकंच असतं. पण पंचेंद्रियांना सैपाकातून आनंद मिळू शकतो हे अगदी खरं आहे.
उदरभरण हे केवळ अंतिम ध्येय असतं. खरा आनंद असतो तो तिथपर्यंत पोचण्याच्या मार्गात. एकाच वेळी भूक वाढवण्याचं आणि मग ती भागवण्याचं भाग्य मिळतं त्यात.
मला स्वतःला सैपाकात प्रचंड रुचि असून कोणत्याही स्त्रीसाठी सैपाक करण्यात मला कमीपणा वाटणार नाही.
वा वा!
पारंगत पुरुषानी IT wife असे धागे काढुन रडारड करण्यापेक्षा गरजु स्त्रीला सैपाक शिकवला तर समाजात एकही अडाणी स्त्री राहणार नाही. (व आपल्या आवडत्या स्त्रीला आपणच सैपाक शिकवु या प्रेरणेने एकही अडाणी पुरुष राहणार नाही) ह्या विचाराने केव्हढा सुखावलो. बाकी असेच आमचे मत आम्ही पुर्वीच व्यक्त केले आहे.
सैपाक हे काम नसून कला आहे, हे मान्य करणे ही एक प्रेरणा होऊ शकेल. स्वतःच्याच जिभेचे चोचले पुरवायचे असतील, तर स्वतःच स्वयंपाक करण्यासारखा परमानंद नाही, हेही खरे!
(बल्लवाचार्य)बेसनलाडू
ओलेत्याने सैपाक करण्यात कसली अरसिकता रामदासकाका? (ओलेत्याने सैपाक करणारा IT WIFE चा नवरा किंवा) नुकतेच अंघोळ करून बाहेर आलेली, कवेत घेतल्यावर काहीशी ऊन, सुगंधी लागणारी, अंग पुसावयाचा टॉवेल केसांच्या बुचड्यावरून बांधून बाथरोबवरच सैपाकघरात पळून आमटी/भाजी फोडणीला टाकणारी बायको हे 'अन्न हे पूर्णब्रह्म' बनण्यातील एक प्रमुख घटक आहे, असे आमचे ठाम मत आहे :) किंबहुना हे सैपाकाचे प्रमुख पथ्य म्हणून पाळले जावे, अशा मताचे आम्ही आहोत ;)
(मतदार)बेसनलाडू
कणकेचे गोळे तिंबणे, दाणे कुटणे किंवा नुसती लिंबे हाताने मऊ करणे यात सुद्धा एकप्रकारचा आनंद आहे. हा अश्लीलपणा नाही का?
काही यांत्रिक उपकणे वापरत असल्यास त्याचा आवाज हा ध्वनिच्या माध्यमातून आनंद देणारा घटक आहे डोक्यावरुन गेलं.
पोट भरण्यासाठी काम करावेच लागते. सैंपाक कामच असल्यामुळे सैंपाक शिकणे गरजेचे आहे. मी एकट्याने व मिळून सैंपाक केलेला आहे. पण दोनापेक्षा जास्त लोकांनी मिळून सैंपाक करण्याचा प्रयत्न केल्यास डिश बिघडण्याची शक्यता असते. (आम्ही तसा प्रयत्न अजुन केलेला नाही/ करण्याची शक्यता-संधी दिसत नाही.) पूर्वीच्या आमच्या स्वाक्षरीत अशा एका टूमेनीपणाने बिघडलेल्या पदार्थाबाबत लोकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे स्मरते.
नुकतेच अन्नपदार्थात होत असलेल्या भेसळीबाबत वाचले. अशा प्रकारच्या भेसळीमुळे सैंपाकावर तसेच पदार्थाच्या अंतिम रूपावर काय परिणाम होऊ शकतात? जाणकारांनी फोकस मारावा.
आजकालच्या डिन्क (डबल इन्कम नो किड्स)च्या आय टी / मॉडर्न जमान्यात एक दोघांच्या स्वयंपाकाचे जरा अतीच कौतुक होते आहे असे मला वाटते बॉ. आयत्यावेळी म्हणजेच पूर्वसुचना न देता येणार्या अनेक पाहुण्यांचे आपल्या पाककौशल्याने पोट भरणार्या अन्नपूर्णेच्या महान भारतीय संस्कृती मधे हे तर अजिबात पटतच नाही.
वरचेवर मोठ्या मेजवान्या आयोजीत करणार्यांची पथ्ये, अनुभव ऐकण्यास उत्सुक!
महर्षी वेदव्यास यांनी यावर काही प्रकाश टाकला आहे का? नाही म्हणले तरी द्रौपदीला पाच जणांच्या आवडीनिवडी सांभाळायला लागत असतील ना. तर द्रौपदीची पथ्ये यावर कोणी जाणकार प्रकाश टाकेल काय?
प्रतिक्रिया
पूर्वी १४ विद्या व ६४
तुमचा आमचा सेम मुद्दा.
बाकी स्त्रीविश्वाचा फर्स्टहँड
असु द्या हो, खरं तर गेले दोन
सैपाकात रूची दाखवली म्हणजे
:)
माणसाला 'स्वयं'पाक करणे
सहमत आहे.. ख्रंतर शाळामधे हा
असे काही नाही. शाळेत सुरुवात
थोडे मतभेद आहेत.
बव्हंशी सहमत. बव्हंशी यासाठी
अहो तेच म्हणणे आहे. पण
शाळा
सहमत आहे
>> शाळांमध्ये सैपाकाच्या
>>कार्यानुभव च्या तासांमध्ये
आमच्या शाळेत सिनीअर
सध्या सोप्या पाकृ करता येतील
शिल्पा काकुंना इथे त्या
+१
ठार मेलो......
ज्यांना गरज आहे त्यांनी
चर्चाप्रस्ताव वाचून करमणुक
अनुभवी
कुकरची शिट्टी
कौलात दिल्याप्रमाणेच आमचे मत
कुकरची शिट्टी म्हणजेच कुकरचा
+१
सोवळ्यात किंवा ओलेत्याने
नाही
स्पर्श, गंध
मला स्वतःला सैपाकात प्रचंड
ओलेत्याने सैपाक केल्यास
ओलेत्याने सैपाक
काम असून कला आहे
हे काम कधी करावं?
ऊन, सुगंधी लागणारी
कणकेचे गोळे तिंबणे, दाणे
आता बास हो स्वयंपाकाचे
+१
सगळे स्वयंपाक वाले धागे
ओले ओले
अररर मास्तर U २ ओलेत्याने
उपास
कधी कधी पॉटलक
गरज
भेसळीचा परिणाम
पथ्ये
अक्षयपात्र
च्यायला. सगळ्याच