कालच www.misalpav.com या संकेतस्थळावर लिहिलेला एक लेख वाचला. लेखकाचे शीर्षक होते स्वयंपाक आणि IT wife. (लेखाचा धागा : http://misalpav.com/node/13469 ) शिर्षकावरूनच यामध्ये काहीतरी विनोदी असणार हे मला लक्षात आले. आणि माझे गृहीतक योग्यच ठरले. सद्य परिस्थितीकडे एका विनोदी दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखात सदैव जाणवत होता. पण जेंव्हा मी या लेखांवरील प्रतिक्रिया पाहू लागलो तेंव्हा मात्र आश्चर्यचकित झालो. प्रतिक्रियांच्या माध्यमातून तिथे जणू काही द्वंद्वयुद्धच चालू होते. काहीजण त्या लेखाच्या बाजूने तर काहीजण त्याच्याविरुद्ध.
लेखाचा सर्वसाधारण आशय खालीलप्रमाणे:
‘सध्याच्या काळात लग्न करताना मुलगा आणि मुलगी (दोघेही) नोकरी, सुंदरता, या गोष्टीला महत्व देतात, पण स्वयंपाक हा विषय दुर्लक्षिला जातो. अर्थात पूर्वी मुलीला हमखास विचारला जाणारा हा प्रश्न असायचा पण सद्यस्थितीमध्ये तो काहीसा मागे पडला आहे. किंबहुना विचारला गेलाच तर या प्रश्नाचे उत्तर “थोडाबहुत येतो” हे लग्नामध्ये पुढे जाण्यास योग्य मानले जाते. यामुळे पुढे उद्भवणाऱ्या गोष्टींचे एक विनोद्पूर्ण वर्णन लेखकाने केले आहे. अर्थात हे त्याने स्वतःचे लग्न झाले आहे आणि बायको IT क्षेत्रातील आहे आणि तिला स्वयंपाक येत नाही अशी कल्पना करून लिहिले आहे. आणि आजच्या वेळेला मुलांनाही स्वयंपाक आला पाहिजे हे मत स्पष्ट करून लेखाची सांगता केली आहे.’
प्रथम माझी या लेखावर प्रतिक्रिया विचारता एक विनोदी लेख म्हणून एक चांगले लिखाण आहे. कारण मीमांसकामधील : उपक्रमोपसंहारौ अभ्यासोऽपूर्वता फलम् | अर्थवादोपपत्ती च लिङ्गं तात्पर्यनिर्णये ॥ या सूत्रानुसार खालील लेख गुणवत्तेबाबतीचच्या कसोटीवर खरा उतरतो.
ज्या विरोधी प्रतिक्रिया आहेत त्यामधून काढायचे दोन सरळ निष्कर्ष म्हणजे स्वयंपाक हे काम हल्लीच्या कुटुंबाच्या दृष्टीने दुय्यम आहे आणि त्यांचा स्त्री पुरुष समानतेबद्दल झालेला मानसिक गोंधळ. सर्वप्रथम पहिला मुद्दा विचारात घेतला स्वयंपाक हे दुय्यम दर्जाचे मानणेच पूर्णपणे चुकीचे आहे. कारण अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मुलभूत गरजांपैकी अन्न ही गरज पूर्ण करणारे काम दुय्यम असूच शकत नाही किंबहुना ते सर्वात महत्वाचे काम आहे. अशारीतीने जर ते महत्वाचे आणि गरजेचे काम आहे हे लक्षात घेतले तर स्वयंपाक न करण्याचा कंटाळा मुली (काही बाबतीत मुले) करणार नाहीत. कारण सद्यस्थितीत प्रत्येक जण आपण किती महत्वाचे आहोत किंवा किती महत्वाची कामे आपण करतो हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो.
दुसरा आणि फारच वादग्रस्त मुद्दा म्हणजे स्त्री पुरुष समानता. या बाबतीत हल्ली सगळेच गल्लत करताना दिसतात. इथे आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक केलेल्या कामाची विभागणी लक्षात घेत नाहीत. स्त्री पुरुष समानता फार पूर्वी अस्तित्वात होती (मधील काही काळात स्त्रियांवर अत्याचार झाले हे मान्य आहे). पण समानता म्हणजे प्रत्येकाने सर्व कामे केली पाहिजेत असे नाही. पुरुष जे जे करतो ते सगळे स्त्रीला जमले पाहिजे किंवा स्त्री जे जे करते ते पुरुषाला आलेच पाहिजे हे शुद्ध वेडेपणाचे आहे. हे म्हणजे क्रिकेटमध्ये सगळ्या फलंदाजांना गोलंदाजी किंवा सगळ्या गोलंदाजाना फलंदाजी आलीच पाहिजे म्हटल्यासारखे आहे. जे निव्वळ अशक्य आहे. कुणी एका गोष्टीत वाकबगार असतो तर कुणी दुसऱ्या.
आता थोडा श्रेष्ठ कनिष्ठ याचा विचार करू. कुठलीही संस्था चालण्यासाठी विविध प्रकारची कार्य कृतीत आणणे गरजेचे असते आणि त्यासाठी कामाची वर्गवारी करणे आवश्यक असते. जर प्रत्येक जण मीच व्यवस्थापन करतो म्हणू लागला तर प्रत्यक्ष कृती कुणी करावयाची. किंवा सगळेच दिग्दर्शक बनले तर अभिनय कुणी करायचा. आता अभिनेता श्रेष्ठ कि दिग्दर्शक? व्यवस्थापक श्रेष्ठ कि कामगार? माझ्या मते तरी यापैकी कोणीही कमकुवत पडले तर ते संस्थेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे प्रत्येकाने नेमून दिलेले काम करणे हेच श्रेयस्कर. आता स्वयंपाक मुलीने करायचा कि मुलाने. तर परमेश्वराने (जे देव मनात नाहीत असे म्हणतात त्यांच्यासाठी निसर्गाने) स्त्री आणि पुरुष हा भेदभाव केला आहे. (आता याबाबत निसर्गावर कुणी दावा लावत नाही म्हणू बरे आहे). निसर्गतःच स्त्री आणि पुरुषाची जडणघडण वेगवेगळी आहे. आणि समाजव्यवस्थेमध्ये जसजशी कामे येऊ लागली तसतशी त्याला लागणाऱ्या कुवतीप्रमाणे या कामांची विभागणी होत गेली. पूर्वीच्या काळी शेती हा मुख्य व्यवसाय बनला आणि त्याला लागणाऱ्या कष्टप्रद कामामुळे ते काम साहजिकच पुरुषाकडे आले. तर स्त्रीचा प्रेमळ स्वभाव थोडा स्वार्थीपणा (इथे स्वार्थीपणा चांगल्या अर्थाने घ्यावा) यामुळे घर सांभाळणे स्त्रीकडे आले. कालपरत्वे वेगवेगळी कामे येत गेली आणि त्यांची विभागणी सुद्धा होत गेली. काही गोष्टी जिथे दोघांना शक्य आहेत त्या दोघेही करू लागले. आणि ही अतिरिक्त कामे वाढल्यामुळे जुनी जी विभागणी होती ती कामे कुणी करावयाची हा प्रश्न साहजिकच उद्भवू लागला. सध्यातरी कुठलीही (काही अपवाद असतीलच : अपवादानेच नियम सिद्ध होतो) मुलगी माझा नवरा घरी बसुदे आणि मी १२ तास घराबाहेर राहून काम करते म्हणणे मला तरी अशक्यच वाटते. याला कारण स्त्रीस्वभाव आणि स्त्रीची शारीरिक तसेच मानसिक क्षमता. पण हल्ली माणसाला निसर्गाच्या विरुद्ध जाण्याचा नवा छंद जडला आहे. त्याची फळेही आपण भोगत आहोतच. या बाबतीमध्ये सुद्धा निसर्गाच्या विरुद्ध जाऊन तू का मी हा वाद करत बसलो तर उद्याची पिढी कुपोषित होण्याचीच शक्यता जास्त आहे. बाकी प्रत्येकजण आपल्या बुद्धीनुसार निर्णय घेतोच. यालाच हल्ली आपण स्वातंत्र्य म्हणतो. तेंव्हा सर्वांना त्यांच्या स्वातंत्र्याच्या शुभेच्या देऊन हे खरडणे बंद करतो.
(टिप्पणी: माझ्या लेखाचे वरील मीमांसक सूत्राप्रमाणे व्यवछेदन करू नये ही विनंती)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
13640
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
हीच प्रतिक्रिया आपण त्या
जयभीम प्रभो दादा
In reply to हीच प्रतिक्रिया आपण त्या by प्रभो
स्वागत
धन्यवाद
हवेत तीर?
In reply to धन्यवाद by सारंग कुलकर्णी
ऋष्या पडत्या फळाची आज्ञा का रे .
In reply to हवेत तीर? by ऋषिकेश
रोज + पुन्हा + हाच + खेळ
मिपावर स्वागत
???
In reply to अदिती काकू ,तुम्ही इथेही by सुजय कुलकर्णी
हे हे हे..
In reply to अदिती काकू ,तुम्ही इथेही by सुजय कुलकर्णी
बायकांनी काय करावं हे त्यांना
In reply to हे हे हे.. by उपास
देवाची शप्पथ , तुमच्या
In reply to अदिती काकू ,तुम्ही इथेही by सुजय कुलकर्णी
माझे मत...
In reply to मिपावर स्वागत by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>>मुलींनी स्वयंपाक करण्यालाच
In reply to माझे मत... by मधुशाला
मुलींनी स्वयंपाक करूच नये असा
In reply to >>>मुलींनी स्वयंपाक करण्यालाच by अनामिक
क ह र
In reply to >>>मुलींनी स्वयंपाक करण्यालाच by अनामिक
स्वातंत्र्य..
In reply to माझे मत... by मधुशाला
पहिली गोष्ट थोपवणं हा शब्द
In reply to स्वातंत्र्य.. by उपास
तेच ते तेच ते... किती टक्के
In reply to पहिली गोष्ट थोपवणं हा शब्द by मधुशाला
धन्यवाद..
In reply to पहिली गोष्ट थोपवणं हा शब्द by मधुशाला
समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.
In reply to धन्यवाद.. by उपास
तहान लागली की खणूच की
In reply to समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. by मधुशाला
मनापासून सांगतो..
In reply to समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. by मधुशाला
आदर भावना
In reply to मनापासून सांगतो.. by उपास
जेवा आधि
In reply to स्वातंत्र्य.. by उपास
>>याचा अर्थ असा घ्यायचा का की
In reply to माझे मत... by मधुशाला
हा प्रश्न या धाग्याच्या
In reply to >>याचा अर्थ असा घ्यायचा का की by ३_१४ विक्षिप्त अदिती
मूलभूत प्रश्न
In reply to हा प्रश्न या धाग्याच्या by मधुशाला
मलाही
In reply to मूलभूत प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
असं.. मग केव्हाच द्यायला हवा
In reply to मलाही by मधुशाला
जातीं विषयी आपली काय मतं
हा एक वेगळाच पण चांगला मुद्दा
In reply to जातीं विषयी आपली काय मतं by पुष्करिणी
आधी झाडे लावा
In reply to जातीं विषयी आपली काय मतं by पुष्करिणी
>>अवांतर : तरी बर ही अदिती
In reply to आधी झाडे लावा by आंबोळी
ए गप रे! एकतर सारखे सगळेजण
In reply to >>अवांतर : तरी बर ही अदिती by गणपा
पहिल्या वहिल्या लेखा बद्दल
>>अशारीतीने जर ते महत्वाचे
पक्या भाव मराठी काही म्हणी
In reply to >>अशारीतीने जर ते महत्वाचे by पक्या
बरोबर आहे, गणपा . त्यामुळेच
In reply to पक्या भाव मराठी काही म्हणी by गणपा
नुसतेच...
In reply to पक्या भाव मराठी काही म्हणी by गणपा
वाह वा!!! इतके दर्जेदार आणि
In reply to पक्या भाव मराठी काही म्हणी by गणपा
ऑनसाईट
सध्या ऐटीतील बायको सीझन चालु
(विषय दिलेला नाही)
सारंग कुलकर्णी, आपले लेखन
बायकोबी पायजे सुंदरबी
पुरुष जे जे करतो ते सगळे
आत्ताच जेवण करुन आलो, पुन्हा
मुद्दा
आयला आणि या विषयाची फॅशनच
आपला पास.. अदिती.. शिल्पाला
श्री. अर्धवट, आपला तर बुवा
In reply to आपला पास.. अदिती.. शिल्पाला by अर्धवट
माझे आता असे मत झाले आहे कि
ए sssssssssssssssssssssssss हाSSSSSSSSSSSSSड.......
अदिती, कामं नाहीत वाटतं? बाकी
गप रे, मी गेले दोन तास या
In reply to अदिती, कामं नाहीत वाटतं? बाकी by मेघवेडा
दोनच तास ???
In reply to गप रे, मी गेले दोन तास या by ३_१४ विक्षिप्त अदिती
अदिती, हा काय आरोप
In reply to दोनच तास ??? by अमरेन्द्र कुलकर्नी
झाल यांच परत सुरु. अरे त्या
In reply to दोनच तास ??? by अमरेन्द्र कुलकर्नी
(विषय दिलेला नाही)
अरे लबाड! तरीच म्हणलं अदितीला
In reply to (विषय दिलेला नाही) by दिपक
प्रति, नवनिर्माण
+१
In reply to प्रति, नवनिर्माण by मेघवेडा
माताय, संपादकांच्या नजरेतुन
नाही!
In reply to माताय, संपादकांच्या नजरेतुन by गणपा
लोकहो... अवं आवरा की आता...