मिपावरच्या सदस्य आणि वाचकांपैकी अनेकजण कुठल्या कुठल्या कंपन्यात काम करत असतील, कोण कॉलेजात शिकत असेल, इतर कोणी कुठल्या सामाजिक संस्थांमध्ये काम करत असेल.
मला मग एक सांगा की हे 'कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्या ' हे प्रकरण तुम्हाला नविन आहे का हो ?
जरा खालच्या लिंकवरची बातमी वाचा ...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6246549.cms
त्याचा थोडक्यात गोषवारा असा की ...
फ्रेण्डशीप डे ' च्या निमित्ताने थेऊर येथील एका बंगल्यात आयोजिण्यात आलेल्या विनापरवाना दारू पार्टीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी अचानक धाड टाकून सुमारे ३५० ते ४०० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. हे विद्यार्थी दारूच्या नशेत बेधुंद होऊन धिंगाणा घालत होते. परंतु पोलिसांनी त्यांची नशा उतरवली. पार्टीत सहभागी असलेले विद्यार्थी खडकी येथील सिंबॉयसिस मॅनेजमेंट ऑफ स्टडीज या एमबीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत. ' फ्रेण्डशीप डे ' च्या निमित्ताने सिनिअर्सनी ज्युनिअर्सना दिलेल्या या पार्टीमध्ये परप्रांतीय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये तरूण विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याही दारूच्या नशेत झिंगत असल्याचे पोलिसांना आढळले. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूचा साठाही आढळला. परंतु ड्रग्ज वा अन्य अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे आढळले नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.गंमत वाटली बातमी वाचुन. १. आजकाल शहरातील गजबटापासुन जरा लांब व शांत म्हणुन कंपन्या किंवा कॉलेजेस मुद्दामुन अशा लांबच्या खेडेगावातील ठिकाणाची निवड करतात. पण आजकाल त्या 'सिंहगडाखाली पकडलेल्या रेव्ह पार्टी' नंतर अनेक गावातील अनेक ग्रामस्थांना उगाच स्वतःच पोलिसगिरी करायची सवय वाढत आहे. २. अशा पार्ट्या म्हणजे दारु वगैरे आलीच. अर्थात कोण ह्यात टुल्ल होऊन झिंगत असेल असे वाटत नाही, बरोबर कलिग्स असतात, कॉलेजचे मित्र आणि प्राध्यापक असतात, कॉपोरेट असेल तर वरिष्ठ अधिकारी असतात मग असे 'झिंगेल' कोण ? ३. मुळात अशा पार्ट्या ठेवणे हाच गुन्हा आहे का ? तसे असेल तर सर्व गावकरी मिळुन आपल्या गावातील जागा न देण्याचा ठराव का करत नाहीत ? ४. अशातल्या बहुतेक तक्रारी ह्या एक तर राजकिय / सामाजिक / आर्थिक स्वार्थामधुन होतात किंवा जळजळीमधुन होतात असे आम्हाला ठामपणे वाटते. इनफॅक्ट मी तर असे म्हणतो की कित्येकवेळा अशा पार्टीसाठी आलेल्या निमंत्रितांना ह्या गावातल्यातल्याच 'टवाळ' टोळक्याकडुन त्रास होतो पण उगाच बोभाटा नको म्हणुन शक्यतो हे आलेले आमंत्रित असा त्रास सहन करत असतात. ५. ह्या पार्टीत आलेल्यांनी झिंगुन रात्री आख्खे गाव तर डोक्यावर घेतले नाही ना ? का चौकात जमुन उगाच उतमात घातला ? इथे मला पार्टीचे १००% समर्थन करायचे नाही पण उगाच उठसुठ तक्रारी करुन दुसर्याच्या सेलेब्रेशनमध्ये धोंडा फेकण्यार्या प्रवृत्तीचा निषेध करायचा आहे. ह्या लोकांनी पार्ट्या करुच नये का ? जर एखाद्या गावाला तसे नको असेल तर त्यांनी तसा नियम बनवावा, पण शक्यतो अशा बंगल्याचे मालक हे बिगशॉट किंवा राजकिय वरदहस्त असणारे असल्याने व त्यांच्याविरुद्ध हे गावकरी बोलु शकत नसल्याने त्यांच्या 'सुडचक्रा'चा त्रास निष्कारण ह्या पार्टीवाल्यांना होगावा लागत आहे असे आम्हाला स्पष्ट शब्दात सांगु वाटते. आता पोलिस तक्रारी झाल्या, पुढे काय निकाल लागु तो लागु पण तोवर ह्या पार्टीतल्या निमंत्रितांना जी नामुष्की भोगावी लागेल व आयोजकांच्या पुढच्या कारकिर्दीवर ह्याचा काय परिणाम होईल ह्याचा विचार कोण करणार आहे की नाही ? जाता जाता : मुद्दामुन 'परप्रातिंय' आणि 'मोठ्ठ्या संख्येने मुली' असा उल्लेख करणे प्रसारमाध्यमांना शोभत नाही. ह्या पार्ट्या जर कॉर्पोरेट किंवा कॉलेजेसच्या असतील तर त्यात 'प्रांतिक' मतभेद कधीच नसतो, आतल्या आत जे काही प्रांतिय राजकारण चालत असेल तो भाग वेगळा पण हे असे उल्लेख हे तद्दन मसालेदार धंदेवाईक वृत्ती आहे असे आम्हाला वाटते.
वाचने
24100
प्रतिक्रिया
101
मिसळपाव
प्रतिक्रिया
३ ईडियट्स आणि सेन्सॉर
चंद्रकिरणांनो
In reply to ३ ईडियट्स आणि सेन्सॉर by इन्द्र्राज पवार
स्वभाव
In reply to चंद्रकिरणांनो by मिसळभोक्ता
इतकं त्रोटक? तुमच्याकडून हि
In reply to स्वभाव by इन्द्र्राज पवार
विषय मर्यादा
In reply to इतकं त्रोटक? तुमच्याकडून हि by शिल्पा ब
सेन्सॉर बोर्डाच्या हे काय
In reply to ३ ईडियट्स आणि सेन्सॉर by इन्द्र्राज पवार
आम्ही पण कालेजात असताना
पक्या ह्यांच्याशी सहमत आहे.
In reply to आम्ही पण कालेजात असताना by पक्या
सहमत
In reply to पक्या ह्यांच्याशी सहमत आहे. by आमोद शिंदे
अशा पार्ट्यांनी जणू काही
In reply to सहमत by इन्द्र्राज पवार
गृहितके
In reply to अशा पार्ट्यांनी जणू काही by llपुण्याचे पेशवेll
प्रथमतः मला कुठलीही गोष्ट
In reply to गृहितके by इन्द्र्राज पवार
उदारमतवादाचा मुद्दा
In reply to प्रथमतः मला कुठलीही गोष्ट by llपुण्याचे पेशवेll
अतिरंजित तर नाहीच....
In reply to आम्ही पण कालेजात असताना by पक्या
+१०००००००
In reply to अतिरंजित तर नाहीच.... by प्रसन्न केसकर
किंवा लक्ष जाणे सोईस्कर नसेल
In reply to +१००००००० by llपुण्याचे पेशवेll
व्हिडीओ पाहून घ्या उडून
पाषाणभेद आणि इतर
In reply to व्हिडीओ पाहून घ्या उडून by पाषाणभेद
भूमिका
In reply to पाषाणभेद आणि इतर by Pain
इन्द्र्राज पवार
In reply to भूमिका by इन्द्र्राज पवार
विरोध नाहीच.
In reply to इन्द्र्राज पवार by Pain
भडक बातमी.....
In reply to विरोध नाहीच. by इन्द्र्राज पवार
- १
In reply to पाषाणभेद आणि इतर by Pain
बरोबर आहे. पाषाणभेद ह्यांनी
In reply to - १ by प्रसन्न केसकर
आमी कुठं व्हिडीयो दिला? आमी
In reply to बरोबर आहे. पाषाणभेद ह्यांनी by आमोद शिंदे
पुनेरी
In reply to - १ by प्रसन्न केसकर
इंद्रराज पवार आणि पार्टी
- १
In reply to इंद्रराज पवार आणि पार्टी by अप्पा जोगळेकर
बरोबर
दारु??
विद्यार्थ्याना पोष्टिक आहार
In reply to दारु?? by कवितानागेश