Skip to main content

कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्या, ग्रामस्थ आणि तारतम्य ...

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 02/08/2010 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सदस्य आणि वाचकांपैकी अनेकजण कुठल्या कुठल्या कंपन्यात काम करत असतील, कोण कॉलेजात शिकत असेल, इतर कोणी कुठल्या सामाजिक संस्थांमध्ये काम करत असेल. मला मग एक सांगा की हे 'कॉर्पोरेट / कॉलेज पार्ट्या ' हे प्रकरण तुम्हाला नविन आहे का हो ? जरा खालच्या लिंकवरची बातमी वाचा ... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6246549.cms त्याचा थोडक्यात गोषवारा असा की ...
फ्रेण्डशीप डे ' च्या निमित्ताने थेऊर येथील एका बंगल्यात आयोजिण्यात आलेल्या विनापरवाना दारू पार्टीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी अचानक धाड टाकून सुमारे ३५० ते ४०० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. हे विद्यार्थी दारूच्या नशेत बेधुंद होऊन धिंगाणा घालत होते. परंतु पोलिसांनी त्यांची नशा उतरवली. पार्टीत सहभागी असलेले विद्यार्थी खडकी येथील सिंबॉयसिस मॅनेजमेंट ऑफ स्टडीज या एमबीए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत. ' फ्रेण्डशीप डे ' च्या निमित्ताने सिनिअर्सनी ज्युनिअर्सना दिलेल्या या पार्टीमध्ये परप्रांतीय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये तरूण विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याही दारूच्या नशेत झिंगत असल्याचे पोलिसांना आढळले. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात दारूचा साठाही आढळला. परंतु ड्रग्ज वा अन्य अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे आढळले नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
गंमत वाटली बातमी वाचुन. १. आजकाल शहरातील गजबटापासुन जरा लांब व शांत म्हणुन कंपन्या किंवा कॉलेजेस मुद्दामुन अशा लांबच्या खेडेगावातील ठिकाणाची निवड करतात. पण आजकाल त्या 'सिंहगडाखाली पकडलेल्या रेव्ह पार्टी' नंतर अनेक गावातील अनेक ग्रामस्थांना उगाच स्वतःच पोलिसगिरी करायची सवय वाढत आहे. २. अशा पार्ट्या म्हणजे दारु वगैरे आलीच. अर्थात कोण ह्यात टुल्ल होऊन झिंगत असेल असे वाटत नाही, बरोबर कलिग्स असतात, कॉलेजचे मित्र आणि प्राध्यापक असतात, कॉपोरेट असेल तर वरिष्ठ अधिकारी असतात मग असे 'झिंगेल' कोण ? ३. मुळात अशा पार्ट्या ठेवणे हाच गुन्हा आहे का ? तसे असेल तर सर्व गावकरी मिळुन आपल्या गावातील जागा न देण्याचा ठराव का करत नाहीत ? ४. अशातल्या बहुतेक तक्रारी ह्या एक तर राजकिय / सामाजिक / आर्थिक स्वार्थामधुन होतात किंवा जळजळीमधुन होतात असे आम्हाला ठामपणे वाटते. इनफॅक्ट मी तर असे म्हणतो की कित्येकवेळा अशा पार्टीसाठी आलेल्या निमंत्रितांना ह्या गावातल्यातल्याच 'टवाळ' टोळक्याकडुन त्रास होतो पण उगाच बोभाटा नको म्हणुन शक्यतो हे आलेले आमंत्रित असा त्रास सहन करत असतात. ५. ह्या पार्टीत आलेल्यांनी झिंगुन रात्री आख्खे गाव तर डोक्यावर घेतले नाही ना ? का चौकात जमुन उगाच उतमात घातला ? इथे मला पार्टीचे १००% समर्थन करायचे नाही पण उगाच उठसुठ तक्रारी करुन दुसर्‍याच्या सेलेब्रेशनमध्ये धोंडा फेकण्यार्‍या प्रवृत्तीचा निषेध करायचा आहे. ह्या लोकांनी पार्ट्या करुच नये का ? जर एखाद्या गावाला तसे नको असेल तर त्यांनी तसा नियम बनवावा, पण शक्यतो अशा बंगल्याचे मालक हे बिगशॉट किंवा राजकिय वरदहस्त असणारे असल्याने व त्यांच्याविरुद्ध हे गावकरी बोलु शकत नसल्याने त्यांच्या 'सुडचक्रा'चा त्रास निष्कारण ह्या पार्टीवाल्यांना होगावा लागत आहे असे आम्हाला स्पष्ट शब्दात सांगु वाटते. आता पोलिस तक्रारी झाल्या, पुढे काय निकाल लागु तो लागु पण तोवर ह्या पार्टीतल्या निमंत्रितांना जी नामुष्की भोगावी लागेल व आयोजकांच्या पुढच्या कारकिर्दीवर ह्याचा काय परिणाम होईल ह्याचा विचार कोण करणार आहे की नाही ? जाता जाता : मुद्दामुन 'परप्रातिंय' आणि 'मोठ्ठ्या संख्येने मुली' असा उल्लेख करणे प्रसारमाध्यमांना शोभत नाही. ह्या पार्ट्या जर कॉर्पोरेट किंवा कॉलेजेसच्या असतील तर त्यात 'प्रांतिक' मतभेद कधीच नसतो, आतल्या आत जे काही प्रांतिय राजकारण चालत असेल तो भाग वेगळा पण हे असे उल्लेख हे तद्दन मसालेदार धंदेवाईक वृत्ती आहे असे आम्हाला वाटते.

वाचने 24100
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

"वसतीगृहातली (गावठी) मुले स्थानिक पणजीकर (शहरी+उच्चभ्रू+परप्रांतीय) मुलांपेक्षा अधिक "रात्री धिंगाणा" घालत" .... याचाच अर्थ की, अशा प्रकारचे हॉस्टेल लाईफ (आजकाल) सर्वच ठिकाणी कमीजास्त प्रमाणात अस्तित्वात आहेच आहे आणि हीच मुलेमुली ज्यावेळी काही निमित्ताने पार्टीसाठी जातात त्यावेळी अधिकचा मुक्तपणा घेतात. पण म्हणून यात सामिल झालेल्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंध:कारमय झाले, होईल, असे कुणी मानते का? ....या वर्षातील सर्वाधिक गल्ला जमविलेल्या "३ ईडियट्स" मध्ये जे हॉस्टेल लाईफ दाखविले आहे ते आठवा. देशातील सर्वोत्तम समजल्या गेलेल्या त्या इंजिनिअरिंग कॉलेज हॉस्टेलच्या टेरेसवर नायक आमीर खान आपला मित्र माधवन याच्या बरोबर नशापाणी करत "अ‍ॅड्रेसच्या वेळी काय गंमत केली" याचे वर्णन करतो तर त्याच वेळी कॉलेजमधील स्कॉलर समजला जाणारा "बकरा" बनलेला संतापी ओम तितकीच नशा करून त्यांच्या अंगावर चाल करून येतो, असे दाखविले आहे. सेन्सॉर बोर्डाच्या हे काय लक्षात आले नसेल का की एका स्टुडंट हॉस्टेलमध्ये दारू पीत बसलेले विद्यार्थी दाखविणारा हा सीन आहे तर तो ठेवावा की कापावा? पण ज्याअर्थी त्याला धक्का लावलेला नाही त्यावरून शासनानेदेखील हॉस्टेलमधील अशा गोष्टी "कॉमन" म्हणून स्वीकारल्या आहेत.

In reply to by इन्द्र्राज पवार

"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?" "मग दारू पीत चला" हे सांगितले नाहीत चंद्रकिरणांना ?

In reply to by मिसळभोक्ता

वेल... अजून तरी त्यांना सोमरसाची गरज भासलेली नाही, शिवाय मी त्यातला नसल्याने असला आगाऊ सल्ला देवून त्यांच्या आनंदावर विरजण घालणे हे देखील माझ्या स्वभावात नाही. असो.

In reply to by शिल्पा ब

"इतकं त्रोटक? तुमच्याकडून हि अपेक्षा नव्हती..." शिल्पाताई, असू दे. खूप विस्ताराने लिहायला हा काही वैचारिक विषय नक्कीच नाही, आणि ही बाब श्री.मिभोदेखील मान्य करतील. सहज कॅन्टीनमध्ये फावल्या वेळेत गंभीर न होता चर्चेला घ्यावा असा हा विषय. (शक्य झाल्यास श्री.मुक्तसुनीत यांनी आताच प्रस्तुत केलेला "मुलांच्या शिक्षणाचा" धागा पहा, तो खरा विस्ताराने लिहायचा विषय.) इन्द्र

In reply to by इन्द्र्राज पवार

सेन्सॉर बोर्डाच्या हे काय लक्षात आले नसेल का की एका स्टुडंट हॉस्टेलमध्ये दारू पीत बसलेले विद्यार्थी दाखविणारा हा सीन आहे तर तो ठेवावा की कापावा? पण ज्याअर्थी त्याला धक्का लावलेला नाही त्यावरून शासनानेदेखील हॉस्टेलमधील अशा गोष्टी "कॉमन" म्हणून स्वीकारल्या आहेत. सेन्सॉर बोर्ड /शासनानेदेखील .. फारच गुळमुळीत लोकं आहे हो ही..त्याना सगळं चालतं..मर्डर मधील उत्तान सिन पेक्षा दारु पितांना दाखविणे म्हणजे फारच साधी घटना.

आम्ही पण कालेजात असताना वर्गातील मुलामुलींबरोबर एका वर्गमित्राच्या एका ग्रामीण भागातील फार्म हाऊस वर गेलो होतो...पार्टीसाठी आणि रहाण्यासाठी. लई गोंधळ घातला. नाचणे, (पिणे माफक प्रमाणात होते कारण पिण्यावर पैसे घालवायला तेव्हा नोकर्‍या नव्हत्या लागलेल्या कोणाला) पण न पिता पण गोंधळ मात्र तेवढाच. बार्बेक्यू केला, गाणी , गप्पा झाल्या मुले मुली गाण्याच्या तालावर बेफाम नाचली. पण कोणाची तक्रार वगैरे आली नाही. कारण आमचा ग्रूप छोटाच होता. (२० एक जण असतील) आणि आजूबाजूची घरे लांब लांब अंतरावर होती. (तरी आम्हाला तो एवढा मोठा बंगला माणसांनी भरुन गेल्यासारखा वाटत होता. ) आता इथे ३००-४०० मुले म्हणजे त्या सर्वाचा केवढा आवाज असेल. सेलिब्रेशन करायला आक्षेप नाही पण मुलांनीही थोडे तारतम्य बाळगायला हवे. एवढा मोठा ग्रूप एका बंगल्यात जमा झाल्यास जागा तर अपुरी पडली असेलच आणि आवाजाची पातळी ही किती वाढली असेल. शिवाय आजूबाजूच्या लोकांना गाड्यांच्या पार्किंगचा ही त्रास झाला असेल. बंगला म्हणजे रेसिडेन्शियल भाग असणार्..तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात पार्किंग उपलब्ध नसणारच. ' हे विद्यार्थी दारूच्या नशेत बेधुंद होऊन धिंगाणा घालत होते....विशेष म्हणजे त्यामध्ये तरूण विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. त्याही दारूच्या नशेत झिंगत असल्याचे पोलिसांना आढळले.' ही लेखातील वाक्ये मात्र अतिरंजीत वाटतात.

In reply to by पक्या

पक्या ह्यांच्याशी सहमत आहे. त्या निमित्ताने पोलिसांच्या आणि ग्रामस्थांच्या बाजूने समर्थन करणार्‍या पुनेरी वगैरे सदस्यांनी थोडे आत्मपरिक्षण करावे. थोडीफार शिस्त मोडून सगळ्यांनीच कधी ना कधी दंगा केला आहे. हा दंगा दुसर्‍याला त्रास होण्याइतपत असल्यास नक्कीच विरोध आहे पण विरोध हा फक्त त्या त्रासाला आहे. आणि हा त्रास कशानेही होऊ शकतो. उगाच मुली, दारू, परप्रांतिय वगैरे गोष्टी बातमीला मसाला लावण्यासाठी घातलेल्या आहेत. असल्या सवंग पत्रकारांचे समर्थन अजिबात करू नये. परप्रांतिय मुलिंनी एकत्र येऊन दुसर्‍याला त्रास न देता दारू पिण्यास तुमची आडकाठी आहे का? एखाद्याने गणपतीची गाणी वाजवून डोके उठवले तर त्यात गणपतीचा काय दोष?

In reply to by आमोद शिंदे

एखाद्याने गणपतीची गाणी वाजवून डोके उठवले तर त्यात गणपतीचा काय दोष? + बिनतोड दाखला, त्यामुळे श्री.पक्या आणि श्री.शिंदे यांच्या भूमिकेशी सहमत. अशा पार्ट्यांनी जणू काही महाराष्ट्र राज्याचे मानसिक स्वास्थ्य, महान उज्ज्वल परंपरा रसातळाला गेली अशी जी ओरड काही महानुभव करीत आहेत त्यापेक्षा नवरात्रीच्या निमित्ताने होत असलेल्या कल्लोळाबद्दल विचार करावा. विद्यार्थी विश्व काय, कार्पोरेट जगत काय....असले पार्टी प्रकार राज्यात सर्वत्र कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चालू असतातच. फक्त एका ठिकाणी अतिरेक झाला म्हणून तो सर्वत्रच होतो असे समजण्याचे काही कारण नाही.

In reply to by इन्द्र्राज पवार

अशा पार्ट्यांनी जणू काही महाराष्ट्र राज्याचे मानसिक स्वास्थ्य, महान उज्ज्वल परंपरा रसातळाला गेली अशी जी ओरड काही महानुभव करीत आहेत त्यापेक्षा नवरात्रीच्या निमित्ताने होत असलेल्या कल्लोळाबद्दल विचार करावा. कुठलीही गोष्ट एकाएकी घडत असते. वर जे घडले आहे ती सुरुवात मानली तर "महाराष्ट्र राज्याचे मानसिक स्वास्थ्य, महान उज्ज्वल परंपरा रसातळाला गेली" हि गोष्ट घडायला वेळ लागणार नाही हे ही लक्षात घ्यावं . जरी एकच प्याला असला तरी ती अजून वाईट परिस्थिती येण्याची सुरुवात असू शकते. विद्यार्थी विश्व काय, कार्पोरेट जगत काय....असले पार्टी प्रकार राज्यात सर्वत्र कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चालू असतातच. फक्त एका ठिकाणी अतिरेक झाला म्हणून तो सर्वत्रच होतो असे समजण्याचे काही कारण नाही. माझ्यामते सर्वत्र असे घडत आहे असे कोणी म्हटल्याचे मला तरी दिसत नाहीये, जरी तसे घडत असले तरी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मान्य !.... नीट आणि योग्य प्रमाणभूत प्रतिसाद कसे द्यावेत हे श्री.पुण्याचे पेशवे यांच्याकडून शिकावे. धन्यवाद. "त्या" संदर्भात तुमच्या आणि माझ्या विचारसरणीत कसलाही मतभेद असण्याचे कारण नाही, नव्हे होऊच शकत नाही. समाजात आणि समाजाने ज्या चालिरिती निषिद्ध मानल्या आहेत त्यामागील भूमिका ही समाजस्वास्थ्याचीच असते. पण प्रत्येक वेळेला आकाश गडगडले म्हणजे प्रलय झाला, पृथ्वी आता बुडणार अशी गृहितके धरून चाललो तर जीवन अस्थिरच होऊन जाईल. निव्वळ दाढीमिशा आहेत म्हणून प्रत्येकाला आपण स्वामी रामदेव बाबा मानत नाही, तद्वतच ताणतणाव हलका करण्यासाठी (असे होते असे समजले जाते) एखाद्याने एखादे दिवशी एकदोन पेग घेतले म्हणून त्याला सुधाकराच्या चेम्बरमध्ये बसवावे असेही नाही. ज्या काही टोकाच्या भूमिका असतील तर ती करणार्‍या गटाविरूद्ध पाऊल उचलले पाहिजेच असे मी मानतो. ही बाब केवळ द्राक्षाच्या रसायनापासून येणार्‍या 'नशे' शी लागू नसून अन्यत्रही लावावी. मनसेने "उत्तर भारतीय" कामगाराविरूद्ध घेतलेला पवित्रा आणि त्यावर झालेले कंदन हाही नशेचाच भाग ना? [मनसेच्या या भूमिकेविरुद्ध मी व माझ्या समविचारी मित्रांनी शहरात मोर्चा काढला होता (पत्रक नव्हे) आणि त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी कार्यालयाबाहेर येऊन निवेदन स्वीकारले होते. असो; हे अवांतर आहे,] इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

प्रथमतः मला कुठलीही गोष्ट एकाएकी घडत नसते असं म्हणायचं होतं. माझ्या वरच्या प्रतिसादात नजरचुकीमुळे ते एकाएकी घडत असतं असं लिहीलं आहे. पण प्रत्येक वेळेला आकाश गडगडले म्हणजे प्रलय झाला, पृथ्वी आता बुडणार अशी गृहितके धरून चाललो तर जीवन अस्थिरच होऊन जाईल. मग प्रिव्हेंटीव्ह मेजर्स किंवा संरक्षणात्मक कारवाई याला काहीच अर्थ उरत नाही. प्रत्येक वेळेला आकाश गडगडू शकतं तेव्हा आपल्या इमारतीवर वीज पडू शकते म्हणूनच लोक आपल्या इमारतीवर लोखंडी शिग लाऊन ती ग्राऊंड करतात ना! तद्वतच ताणतणाव हलका करण्यासाठी (असे होते असे समजले जाते) एखाद्याने एखादे दिवशी एकदोन पेग घेतले म्हणून त्याला सुधाकराच्या चेम्बरमध्ये बसवावे असेही नाही. १-२ पेग बारमधे बसून घ्यायला किंवा स्ततःच्या घरी घ्यायला कोणीही (म्हणजे मी किंवा ते गावकरी) विरोध केला असे मला वाटत नाही. ज्या काही टोकाच्या भूमिका असतील तर ती करणार्‍या गटाविरूद्ध पाऊल उचलले पाहिजेच असे मी मानतो. ही बाब केवळ द्राक्षाच्या रसायनापासून येणार्‍या 'नशे' शी लागू नसून अन्यत्रही लावावी. मनसेने "उत्तर भारतीय" कामगाराविरूद्ध घेतलेला पवित्रा आणि त्यावर झालेले कंदन हाही नशेचाच भाग ना? आपण किती निष्पक्षपाती विचार करतो, आपण किती उदारमतवादी आहोत हे दाखवणे ही देखील एक मोठी नशाच आहे. मग तिथेही कायद्यांचा विसर पडून केवळ उदारमतवादावर भर सुरु होतो. आणि ते आंदोलन कुठल्या भागात रुजले वाढले याचाही विचार होत नाही. ना तिथल्या परिस्थितीची माहीती घेतली जाते. [मी आणि माझ्या समविचारी मित्रांनी मनसेच्या आंदोलनाविरुद्ध आमच्या ऑफिसमधे बोलणारी मराठी , अमराठी तोंडे सडेतोड प्रतिवादाने बंद केली होती. आंदोलनामागची भूमिका समजावून दिली होती. पुढे जाऊन तुम्ही कोणीही अमराठी मराठीत बोलत नाही , मराठी समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही आणि २ मराठी माणसे मराठीत बोलायला लागली तर हिंदीत बोला आम्हाला समजत नाही असे उर्मटपणाने म्हणता आणि ते लोक ऐकतात याचा अनेक मराठी लोकांना राग येतो हेही सांगितले. हे अती झाले तर जे बाहेर झाले ते आतही होऊ शकते त्यामुळे त्यांना 'असो. बदला' असेही म्हटले होते. ]

In reply to by llपुण्याचे पेशवेll

"आपण किती निष्पक्षपाती विचार करतो, आपण किती उदारमतवादी आहोत हे दाखवणे ही देखील एक मोठी नशाच आहे. मग तिथेही कायद्यांचा विसर पडून केवळ उदारमतवादावर भर सुरु होतो." नाही.... या नशेचा मी बळी झालेलो नाही कारण माझी "स्टुडंट युनियन"शी जवळीक ही कुठल्या आंदोलनाशी वा राजकारणाशी संबंधीत अशी नव्हती. कॉ.गोविंद पानसरे, भा.क.प. व लाल निशाण, यांनी "मनसे" च्या घटनाबाह्य आंदोलनाला घटना तरतूदीनुसार उत्तर देणे गरजेचे आहे असे सर्वव्यापी आवाहन केल्यानंतर ज्या ९ स्थानिक संघटनांनी ती ("घटनेने दिलेले हक्क") भूमिका पटली म्हणून मोर्चात सहभागी व्हायचे ठरविले त्यात आमच्या युनि.संघटनेचा सहभाग होता. आणि एक महत्वाची बाब म्हणजे "मराठी" बाबत श्री.राज ठाकरे यांचा ठामपणा तितक्याच तत्परतेने आम्ही मान्य केला होता त्याला कारण आपल्या भाषेबद्दलची अस्मिता. मुंबई-ठाणे-पुणे पट्ट्यात 'मराठी कि हिंदी' हा वाद जितक्या तीव्रतेने सामोरा आला आहे तशी स्थिती कोल्हापुरात नाही. इथे जे आंतरराज्य कामगार आहेत ते कामचलाऊ मराठी शिकलेले असेच आहेत आणि स्थानिक लोकांशी अगदी सहजरित्या मिळूनमिसळून वागतात (यात बिहारी मुसलमानदेखील आहेत.) जाता जाता हेही आपणास सांगतो की मी दिल्ली इथे असतो म्हणून श्री.राज ठाकरे यांच्या "महाराष्ट्र हा मराठी लोकांसाठी" या भूमिकेला विरोध करतोय असे कृपया समजू नका. माझी ती भूमिका अजून कोल्हापुरात होतो त्यावेळेपासूनची आहे. "बिहार" बद्दल मला जास्त माहिती नाही पण दिल्ली, हरियाणा, पंजाब या भागात खरोखरी एकमेकाशी भ्रातृभावाने वागण्याची रित आहे. सुरुवातीला माझे हिंदी ऐकणार्‍याच्या अंगावर काटा आणत असे, पण मला कुणी हसले नाही. इंग्लिश फक्त ट्रेनिंग सेंटर वा कामाच्या ठिकाणी ठीक असते पण राजधानीत हिंदी, उर्दु, पंजाबीचाच दबदबा आहे. मी महाराष्ट्रातील तसेच माझे दोन मित्र केरळातील म्हणून या लोकांबरोबर वावरताना ते आम्हाला आपल्यातीलच मानतात (गुरुदासपूर, पंजाबमध्ये तर तेथील मित्राच्या घरी माझे "ओये आओ मेरे मराठा लाईट इन्फ्न्ट्री के सरदार" असे आरोळीयुक्त स्वागत झाले होते). काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत "अखंड हिंदुस्थान" ही संकल्पना मानणारे खूप भेटतात, दुर्दैवाने मूठभर राजकारण्यांच्या लबाड हितासाठी "प्रांतवाद, भाषावाद" ही शस्त्रे वेळोवेळी उगारली जातात. इतकेच ! इन्द्रा

In reply to by पक्या

सेंसॉर्ड वर्णन आहे. जो प्रकार झाला तो किळसवाणा तर होताच पण बेकायदा पण होता. विद्यार्थिनींचा समावेश, महिलांचे मद्यप्राशन याबाबत काल काही लोकांशी चर्चा झाली. अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस च्या एका काउंसेलरचे म्हणणे होते की दारु स्त्री-पुरुष यापैकी कुणीच पिऊ नये अन व्यसन तर अजुनच घातक. जर अश्या सामाजिक बंधनांमुळे समाजाचा पन्नास टक्के हिस्सा मद्यप्राशनापासुन लांब रहात असेल तर ते स्वागतार्हच आहे. गेली जवळपास तीन वर्षे स्त्रीमुक्तीवादी चळवळीचे नेतृत्व करणारी एक विदुषी म्हणाली अंमली किंवा मादक पदार्थांचे सेवन म्हणजे स्त्रीमुक्ती असे समजले जाणार असेल तर आम्ही जे केले ते चुकीचेच होते असे वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

किंवा लक्ष जाणे सोईस्कर नसेल म्हणुन दिले नसेल. शेवटी काय ते व्यक्तिस्वातंत्र्य का काय असते ना... तेच खरे. नाही का ? असो.

व्हिडीओ पाहून घ्या उडून जायच्या आधी. http://www.youtube.com/watch?v=TkYlvUsl4dA अन हा फटू दै. सकाळमधला. स्विमींग टँक च्या बाजूचा दिसतूया. daily sakal photo आमा गाववाल्यांना काय बी कळत नाय पगा. आता ह्ये समदे ऐमबीए वाले इद्यार्थी हायती म्हंजे लय मोटे सायब व्हतील तवा त्यांच्यावालं बराबर आसंल. गाववाल्यांनी गावागावात असली एखांदी जागा पार्टीसाठी कराया हवी. मस्त भाडं भेटलं आन सगळ्या सोई पुरवन्यामुळं पैशाची दळणवळन बी वाढल. बंद भिंताडाच्या मधी आसली पार्टी नको. समदं कसं उघड्याव झालं म्हंजी आमची गावातली प्वारं बी सामील व्हतील त्यात. आमच्या पोरीबाळी बाया यांना बी मजा पाह्यला भेटलं. त्येच त्ये टिव्हीवरच्या शिरीयल पाहूनशान त्वांड आंबून ग्येलं हाय पगा.

In reply to by पाषाणभेद

व्हिडीओ दाखवल्याबद्दल धन्यवाद. यात कुठेही ते लोक धिंगाणा करताना, हुल्लड किंवा ओरडताना दिसत नाहीत. दारू पिणे वाईट आहे तर मग इथे मिपावरच कित्येक जण त्याचे उदातीकरण, गौरवीकरण करताना दिसतात, निरनिराळ्या पाककृती (cocktails) सादर होतात त्याचे काय ? हल्ली वाईट गोष्टींना समाजमान्यता मिळालेली आहे आणि लोकशाही असल्याने काहीच करता येत नाही. स्त्रियांच्या सहभागाबद्दल आक्षेप घेण्यालाच स्त्रीवाद्यांचा आक्षेप आहे. गुन्हेगारी आणि व्यसनांमधला स्त्रियांचा सहभाग पुरुषांपेक्षा पूर्वीही कमी होता आणि आताही परिस्थिती फार बदललेली नाहीये. उदा. उभी बाटली- आडवी बाटली: गावांमधे व्यसनाधीन पुरुष आणि त्यामुळे कुटुंबाची होणारी वाताहत टाळण्याकरता दारूबंदी करण्यात स्त्रियांचा पुढाकार असतो. एक तरी अशी घटना आहे का जिथे पुरुषांनी स्त्रियांविरुद्ध ही मोहीम आखली ? ही वस्तुस्थिती पाहता एखाद्या समाजगटाकडून (स्त्रिया) चांगल्या अपेक्षा ठेवणे वाईट/बुरसटलेले कसे काय :O त्यामुळेच कोणत्याहे गुन्ह्यात वा अप्रिय गोष्टींमधे जेव्हा स्त्रियांचा सहभाग असतो तेव्हा तो बहुसंख्य लोकांना आश्चर्यचकित करतो.

In reply to by Pain

"दारू पिणे वाईट आहे तर मग इथे मिपावरच कित्येक जण त्याचे उदातीकरण, गौरवीकरण करताना दिसतात," श्री. पेन ~ प्लीज, प्रतिसादांतील वाक्यावरून मी कुठे तुम्हाला दारु पिण्याचे 'उदातीकरण, गौरवीकरण' करत असल्याचे दिसले हे मी आता विचारत नाही कारण माझी तशी भूमिका नक्कीच नाही, अन्य कुणाचीही असेल असे वाटत नाही. दारू पिणे ही समाजाला घातक आहे हे आधुनिक काळात अगदी गडकर्‍यांच्या सुधाकरापासून सांगण्यात आले आहे, अन ते चुकीचेही नाही; कारण काळाच्या ओघात त्यापुढे कित्येक घाणेकर, दुभाषी, निकते त्याच रस्त्याने अस्तंगत झाले. "दारू पिणे" ही संज्ञा "सातत्याने" घेणार्‍याला लावल्यास तिचा योग्य उपयोग होतो. कार्पोरेट जगात, पोस्ट-ग्रॅज्युएशन शि़क्षण जगतात पार्टीच्या वेळी अशा पद्धतीची एखादी संध्याकाळ संबंधितांनी व्यतीत केली म्हणजे ते समाजविघातक कृत्य ठरू नये. आता "थेऊर" ची रात्र तिथेच संपुष्टात आली; पण उद्या त्यातील काही विद्यार्थी भर वर्गात नशा करून आली तर त्यांना चाबकाने फोडलेच पाहिजे.

In reply to by इन्द्र्राज पवार

तुमचा गैरसमज होतोय. माझा प्रतिसाद तुम्हाला नाही. तुमच्या कुठल्याच प्रतिसादावरून मी हा निष्कर्ष काढलेला नाही. किंवा या धाग्याचाही संदर्भ धरलेला नाही. मी जेव्हापासून सभासद झालोय तेव्हापासून अनेक वेगवेगळ्या प्रसंगी इथले काही लोक ते करताना आढळले आहेत. ते सर्व अट्टल दारुडे नसले आणि नियंत्रणात पीत असले ( दोन्हीही त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्यात येते) तरिही दारू म्हणजे सेलिब्रेशन, पार्टीची शान, चैनीची परमावधी असा संदेश जातो, लोकमानसात रूढ होतो. आनंदाच्या तसेच दु:खाच्या उदा. चित्रपट, मालि़कांमधे प्रेमभंग झाला--> घे दारू, धंदा बुडाला--> घे दारू, टेन्शन आले--> ओढ सिगरेट असे न चुकता चालू असते. या संकल्पनेला माझा विरोध आहे.

In reply to by Pain

तुमच्या संकल्पनेला विरोध कुणाचाच असणे शक्य नाही. अखेरीस आपण सर्वजण समाजप्रियच नागरिक आहोत आणि त्या अनुषंगाने विचारधारणादेखील राखतो. माझा मुद्दा "असल्या सनसनाटी बातमीतून/धाडीतून काहीही निष्पन्न होत नाही" हा होता. ज्या पत्रकारांने ती भडक बातमी लिहिली "४००-५०० मुलेमुली दारू पिऊन धिंगाणा घालत होती....परप्रांतीय होते...." इ. इ. त्यामुळे खरे तर हा धागा निर्माण झाला. आपण इकडे तीव्र भावना व्यक्त करणारे विचार मांडून बी.पी. वाढवून घेत होतो, तर तिकडे पोलिसांनी सायंकाळी मेडिकल रिपोर्ट प्रसिद्ध केला.....४५० पैकी फक्त ८१ मुले मद्यप्राशन केलेली सापडली. म्हणजेच सुमारे ७५% सहभागी केवळ "फ्रेंडशिप डे" ची पार्टी म्हणून तीत सामील झाले होते असेच ना? काही स्थानिक तरूण मंडळाला तीत सामील करून घेतले असते तर पार्टीबाबतची एक मुंगीदेखील पुण्यापर्यंत आली नसती. म.टा.सारखे पत्र बातमी देताना मजकूर संपादनाला महत्व देत नाही यामुळेच ही राळ उडते. असो. विसरून जाऊ या हा धागा. इन्द्र

In reply to by इन्द्र्राज पवार

हाहाहा! तुम्ही होतात वाटते तिथे, प्रत्यक्ष परिस्थिती पहायला! ४५० पैकी फक्त ८१ मुले मद्यप्राशन केलेली सापडली. म्हणजेच सुमारे ७५% सहभागी केवळ "फ्रेंडशिप डे" ची पार्टी म्हणून तीत सामील झाले होते असेच ना? नाही सगळेच अथर्वशीर्ष म्हणुन गणपतीला महाअभिषेक करत होते! त्या ग्रामस्थांनी गणपतीला अभिषेक करतात काय लेकाचे म्हणुन अन पोलिसांनी दोन पैसे मिळतील या आशेने बिच्चार्‍या `निर्दोष, निष्पाप, निरपराध, गुणी' बाळांना खोट्या प्रकरणात अडकवले.

In reply to by Pain

यात कुठेही ते लोक धिंगाणा करताना, हुल्लड किंवा ओरडताना दिसत नाहीत. व्हिडीओ पार्टीचा नाही तर वैद्यकीय तपासण्या सुरु असतानाचे आहेत. पार्टीतली दृष्ये इथे किंवा कुठेच दाखवणे कदाचित सभ्यतेला धरुन होणार नाही.

In reply to by आमोद शिंदे

आमी कुठं व्हिडीयो दिला? आमी तर तेथील पाण्यात पवनार्‍या मुलींना थंडी बिंडी वाजती का म्हून कांबळं घोंगडी घ्येवूनशान उभं व्हतो. पुरावा पायजे आसलं तर गाववाले संगती व्हते आमच्या. आमी तर केवळ सकाळच्या व्हिडीओची लिंक दिली. काये, येथील वाचक त्या दिसाच्या सकाळपर्यंत कशे काय पोचू शकतील? त्येंला लिंक गावल का नंतर म्हूनशान आमी सोयपानी करून दिली. आमी गाववाल्यांनी ठराव करायचं ठरवलं हाये. आमी जकात फाडायसारकी पावती फाडनार हाय आसल्या काय पार्टीसाठी. त्येंनी मातूर आमच्यावालं डीजे, केटरर्स, लायटींग बारची सोयपानी घ्येतलं पायजे. आमच्या गावातल्या पोरांनाबी नाचासाठी बलवलं पायजे. बाजूला आमी सर्कसमदी लावत्यात तशी गॅलरी लावू म्हंजे त्याच्याव आमच्या गावातल्या पोरीबाळी बायाबाप्ये, म्हातारं बसत्याल. लय भारी करमनूक व्हयील. सरकारचा करमनूक कर बी आमी भरू. समद कसं येळवारी आन कायद्यानं व्हया पाह्यजे का नगो? आता सर्कार एवढं दारू ची सोय करूं र्‍हायलंय त्याचा खप व्हाया नगो का? सर्कार एवढं ऐम्बीए कॉलेज काढूंशान एवढे सायेब लोकं तयार करूं र्‍हायलेय त्येंची करमनूक नगो का? सर्कार एवढ्या कालेजांना परवानंगी देवू र्‍हायलेय त्या कालेजांची सोयपानी पहाया नगं? कुठूं कुठूं पोरं पोरी येत्यात शिकाया म्हाईत हाये का तुमाला त्या शिंबायशीस कालेजात! आवो उत्तरप्रदेस, बिहार, हरीयाना झालंच तर झारखंड, वोरीसा अरूनाचल प्रदेस. आवं दक्षीन आफरीका, आमेरीगा आसल्या देशातनं बी पोरं पोरी येत्यात तिथं. त्यांच्यावाली सोय पाह्यनं म्हंजे पाव्हन्यांचा मान राकन्यासार्क हाये. तवा त्येंला जे जे लागलं त्ये त्ये आमी देवू. त्यातच आमचं आन आमच्या बांधवांचं हित हाये. जय हिंद. जय म्हाराष्ट्र.

इंद्रराज पवार आणि पार्टी समर्थक यांचे सगळे प्रतिसाद ++. पुणे शहरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. काहीतरी करत आहोत असे वाटावे म्हणून पोलिसांनी हा धिंगाणा चालवला असावा असा अंदाज आहे. आपुण बी ह्या वीकांताला मित्राच्या खाजगी फार्म हाउस वर पिणे पार्टी करणार है. तसल्या (म्हणजे माडीवाल्या टाईप) गोष्टी करण्याची खूप इच्छा आहे. पण काही ज्येष्ठ मंडळी हजर राहणार असल्याने आखडता घेतला आहे. तरी कोणाची परवानगी काढावी लागेल ?

In reply to by अप्पा जोगळेकर

पुणे शहरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. काहीतरी करत आहोत असे वाटावे म्हणून पोलिसांनी हा धिंगाणा चालवला असावा असा अंदाज आहे. संपुर्ण चुकीची माहिती. कारवाई पुणे शहरातही झालेली नाही किंवा पुणे शहर पोलिसांनीही केलेली नाही. थेऊर पुण्यापासुन तीस किमी दुर आहे. ते पुणे शहर पोलिसांच्या हद्दीत नाही. कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांनी केली. मध्यंतरी आरोप झाले होते ते शहर पोलिसांबद्दल, ग्रामीण पोलिसांबद्दल नाही. त्यामुळे ग्रामीण पोलिसांवर असा दबाव असणे संभवत नाही.

पुणे शहरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. काहीतरी करत आहोत असे वाटावे म्हणून पोलिसांनी हा धिंगाणा चालवला असावा असा अंदाज आहे.
सहमत आहे. अशा गोष्टींना प्रसिद्धी पटकन मिळते आणि स्थानिकांना पण 'पैसेवाल्यांना लाईनीवर' आणल्याचे समाधान मिळते.स्थानिक लोकांना खरोखरच त्रास झाला असेल तर कारवाई योग्य आहे पण बातम्यांचा रोख स्थानिक लोक सोवळे आणि परप्रांतिय मग्र्रुर असा आहे तो चुकिचा आहे. एवढीच सोवळेपणाची आवड आहे तर अनेक बेकायदेशीर धंदे(वेश्याव्यवसाय वगैरे) बिनदिक्कत चालु असतात त्यावर बंदी घाला की. ---

दारु पिण्याबद्दल इतका आकस का? हल्लीचे एक जग्प्रसिद्ध वाक्य आहे, " वाईन हा एक पोषक आहार आहे!" .......................विद्यार्थ्याना पोष्टिक आहार द्यावा!