मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वाक्षरीतील असा () कंस आपणास अश्लिल वाटतात काय?

प्रकाश घाटपांडे · · कौल

वाचने 2832 वाचनखूण प्रतिक्रिया 34

In reply to by आजानुकर्ण

तुमचा मुख्य मुद्दा चर्चा प्रस्तावाशी पुरेसा आहे. संपादकांना तशीच विनंती आहे. मला चर्चेवरुन हा मुद्दा सुचला इतकेच. हा कौल भरकटु नये ही अपेक्षा आहे. सदर कौल हा अश्लिलतेच्या संकल्पना या मूळ हेतुवर आधारित आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नितिन थत्ते 02/08/2010 - 10:17
>>सदर कौल हा अश्लिलतेच्या संकल्पना या मूळ हेतुवर आधारित आहे. आपले काही विश्लेषण दिले तर बरे होईल. अन्यथा मला प्रकाश घाटपांडे आणि नितिन थत्ते ही नावे पण अश्लील वाटू शकतात. जगात अश्लील नसलेले एकमेव पुस्तक म्हणजे टेलिफोन डिरेक्टरी असे कोणीतरी म्हटले आहे. मत देण्याची पात्रता माझ्यात नाही.

In reply to by नितिन थत्ते

कौलाचा हेतु व पार्श्वभुमी देण्याची इथे सोय नाही. उपरोक्त दुव्यावर शी संबंधीत असलेला मूळ अनुभव मासिकातील निरंजन घाट्यांचा अश्लीलतेचे पुर्वसुर हा लेख देखील आता त्या दुव्यावर अस्तित्वात नाही हे माझ्या लक्षात आले आहे.
मत देण्याची पात्रता माझ्यात नाही.
असहमत. फार तर मत देण्याची इच्छा नाही असे म्हणु शकता.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नितिन थत्ते 02/08/2010 - 10:29
दुव्याचा रंग बदलण्याची सोय करा बुवा लवकर. घाटपांडे काकांनी दुवा दिला आहे हेच कळले नाही :(

In reply to by नितिन थत्ते

तो दुवा आहे हे अधोरेखित करण्यासाठी दुव्याभोवती कंस () टाकण्याची प्रथा चालू केली तर? सगळ्यांना कळल्याशी कारण.

In reply to by परिकथेतील राजकुमार

भारी समर्थ 03/08/2010 - 21:08
आणि तो कंस दुष्ट असल्याचे वाचले आहे, पण अश्लिल होता की नाही हे फक्त इतिहासालाच माहित... उगाच गेलेल्यांविषयी कशाला बोला.. भारी समर्थ

In reply to by प्रकाश घाटपांडे

वात्रट 12/08/2010 - 01:14
हे म्हणजे नुसता "चड्डी" म्हणण्या सारखं आहे राव... संदर्भानुसार अर्थ बदलणारच.. सांगता येत नाही ला मत दिले आहे..

In reply to by आजानुकर्ण

शुचि 02/08/2010 - 21:47
अजानुकर्ण यांनी काढलेला कंस मला अश्लील , असभ्य, चावट वाटला. कृपया सप्पादकांनी त्वरीत लक्ष द्यावे ही विनंती.

चिरोटा 02/08/2010 - 10:51
सांगता येत नाही ला मत दिले आहे. स्वाक्षरीत महिरपी कंस अश्लिल वाटेल का? {भेन्डि} -----

गणपा 02/08/2010 - 14:18
एकोळी धाग्यांची ही पुढची पायरी का हो पका काका? नुसता विषय देउन मत द्या म्हणताय. काही शेंडा बुडखा द्या की? हे कौल फोडण्या मागचा उद्देश/प्रयोजन ? मिळवलेल्या विद्याचा (ती नव्हे तो) काय उपयोग होणार आहे? की असच वेळ काढण्यासाठी. मला तरी कंस अश्लिल वाटत नाही जो पर्यंत तो रिकामा आहे आणि त्याच्या जोडीला दुसरा रिकामा कंस नाही.

In reply to by गणपा

कौलात फक्त १५० कॅरेक्टर्स बसतात. त्यामुळे आगापिछा देता येत नाही. पुर्वी ही सोय होती. असो. मिळालेला विद्याचा कल समजण्यापुरता उपयोग.

In reply to by गणपा

Pain 02/08/2010 - 15:12
पंगा यांनी लेखकाच्या प्रतिसादातील कंसांना आक्षेप घेतला होता. तो उगाच काहीच्या काही आहे असे त्यांचे मत असू शकेल आणि लोक काय म्हणतात हे पाहण्यासाठी त्यांनी हा कौल घेतला असावा.

In reply to by शिल्पा ब

भीडस्त 26/08/2010 - 16:56
नाहीतर अशा प्रकारचा धागा म्हणजे आमच्यासाठी सॉल्लिड विचारप्रवर्तक "हत्यार "आहे. आम्हाला मूडानूरुप काहीही अश्लील वाटत असतं " " दादा कोंडके प्रसन्न ''"

श्री. पी.घाटपांडे साहेब, हा कौल वाचून मी १५ मिनिटे नुसता हसत होतो... आजूबाजूंच्या लोकांना वाटले याला काय झाले म्हणून, तर त्यांना तुमचा कौल दाखवला आणि ते देखील पोट धरून हसू लागले. जबरदस्त! आजचा माझा दिवस करणी लागला! मत अर्थातच नाही ला दिले आहे!

क्रेमर 03/08/2010 - 01:13
सांगता येत नाही या पर्यायाला मत दिले आहे.
स्वाक्षरीतील असा () कंस आपणास अश्लिल वाटतात काय?
'वाटतात'च्या जागी 'वाटतो' असायला हवे होते. (()),>,{},[] हे कंसही अश्लील वाटतील काय?

In reply to by आत्मशून्य

आमोद शिंदे 10/08/2010 - 22:41
काढणारा कसा काय अश्लिल बुवा? मी तर डोळे दाखवण्यासाठी तसे काढले होते. आता बघणारा मात्र अश्लिल असल्यास वेगळेच काही दिसू शकते. थोडक्यात कंस अश्लिल नसला तरी पाहणारा असू शकतो.

In reply to by आमोद शिंदे

आत्मशून्य 11/08/2010 - 14:46
म्हणू तर असे डोळे काढनारा अश्लिल वाटू शकतो . ते डोळे आहेत हे सांगावे लागते ह्यातच त्या कलाकाराचे अपयश आहे. आणि असे अपयश स्विकारायला मोठे मनही लागते.बाकी अश्लिलता आणि DOUBLE MEANING यावर एक ग्रंथ पण लिहीता येइल. पण शेवटी आम्ही त्या अर्थाने लिहलेच नव्हते असे सांगून प्रत्येकाला हाथ झटकता येतातच होय ना ? म्हणून ते डोळे अश्लिल वाटले का चे उत्तर मी हो असेच देइन. : ) बघा बूवा smiley मधे आमचे मिस्कील डोळे ओळखता आले का ? की तूमची नजर आणखी काहि पाहते....