कव्वाली: एक उत्कट गायनप्रकार भाग २
पहिल्या भागात कव्वाली या संगीतप्रकाराविषयी मला ज्ञात असलेली थोडीशी माहिती दिली होती, यात कव्वालीचा इतिहास, ती गाण्याची पद्दत आणि चित्रपटांमध्ये कव्वालीचा शिरकाव यांविषयी माहिती होती. आज दुसर्या भागात सार्वजनिक मैफिलींमधील धार्मिक कव्वालींची काही उदाहरणं पाहूयात.
(चित्रपटांमधील कव्वाल्या येतील तिसर्या भागात, लवकरच).
तुमच्या प्रतिसादांत आणखी उदाहरणं येउ द्यात, चला घेउ यात 'लुत्फ-ए- कव्वाली'!
पहिली धार्मिक कव्वाली आहे दमा दम मस्त कलंदर. हझरत लाल शाहबाझ कलंदर या सूफी संताचं हे स्मृतीगान. शाहबाज कलंदर या फकीराचं मूळचं नाव होतं सय्यद मोहम्मद उस्मान. त्याचा जन्म ईराण-अज़रबैजान सीमेवरील मरवंद गावातला. (१११७) या गाण्याच्या मागची पार्श्वभूमी ही की शाहबाज कलंदर याने हिंदू-मुस्लीम सलोख्यासाठी प्रयत्न केले, आणि सिंध प्रांतातले हिंदू (आणि आजच्या भारतातले सिंधीही) त्याला कृष्णाचा अवतार (झुलेलाल) म्हणून ओळखतात.
'दम' म्हणजे श्वास, 'दमादम' (दम-आदम) म्हणजे श्वासोच्छ्वास; श्वासोच्छ्वासावर (प्राणावर) ज्याचं पूर्ण नियंत्रण आहे आणि जो सदा-सर्वकाळ मनस्वी आनंदी आहे, असा शाहबाझ कलंदर - त्याची ही प्रार्थना.
पूर्ण भजन खाली देतो आहे, अर्थासहः (चूक-भूल द्यावी घ्यावी)
ओ लाल मेरी पत रखियो बला झूले लालण
सिंदडी दा सेवण दा सखी शाहबाज़ कलंदर
दमा-दम मस्त कलंदर, अली दम दम दे अन्दर
दमा-दम मस्त कलंदर, [अली दा पहला नंबर - हे शब्द मूळ गाण्यात नसावेत}
[हे सिंधच्या झुलेलाल देवा, शेवान प्रांताच्या राजा,
लाल वस्त्रांतल्या मस्त कलंदरा, माझं कायम रक्षण कर (मेरी पत रखियो)]
चार चराग तेरे बरण हमेशा
पंजवा मैं बारण आई बला झूले लालण
सिंदडी दा सेवण दा सखी शाहबाज़ कलंदर
[तुझ्या मंदिरात चार दिवे कायम असतात
मी तुझ्या आदरार्थ (माझ्या प्राणांचा) हा पाचवा दिवा घेऊन आलो आहे]
हिंद सिंद पीरा तेरी नौबत बाजे
नाल बाजे घड़ियाल बला झूले लालण
सिंदडी दा सेवण दा सखी शाहबाज़ कलंदर
[तुझ्या शौर्याचं गान हिंद आणि सिंध भर गाजू देत
दर प्रहराच्या नादाबरोबर तुझा घोष होवो (घडियाल= प्रहरी; symbolism of night )]
हर दम पीरा तेरी खैर होवे
नाम-ए-अली बेडा पार लगा झूले लालण
सिंदडी दा सेवण दा सखी शाहबाज़ कलंदर
[हे देवा, तू कायमच माझं रक्षण कर
आणि माझी नौका पार करून दे]
बर्याच कव्वालांनी ही कव्वाली गायलीय, सर्वांत प्रसिद्ध असलेले कव्वाल म्हणजे नुसरत फतेह अली खान, साब्री ब्रदर्स आणि बांगला देशची रूना लैला.
(नुसरत प्रसिद्ध होते त्यांच्या आवाजाच्या पहाडी तानांबद्दल. Superb control आणि improvisation यांसाठीही प्रसिद्ध असणार्या या गायकाची माझी पहिली 'कान-ओळख' नव्वदीच्या दशकाच्या सुरूवातीला. तेंव्हाच तो 'आडमाप' देह पाहून "हा कसा इतक्या टीपेने गातो बाबा" असं वाटलं तेंव्हाच 'याच्या heart चं काही खरं नाही, हा cardiac arrest ने जाणार' असं मी मित्रांत म्हंटलं होतं, १९९७ साली माझी बत्तिशी खरी ठरली तेंव्हा खूप वाईट वाटलं!)
नुसरत यांच्या या प्रत्यक्ष कव्वालीचा व्हिडीओ इथे embed करू शकत नाही ते तुम्ही खाली दिलेल्या दुव्यावर पाहू शकाल.
दुवा १: नुसरत फतेह अली खान - या व्हिडिओत मैफिलीतल्या कव्वालीतले बरेच पैलू पहायला मिळतील, प्रेक्षकांचा बेधुंद सहभाग, जीव तोडून वाजवलेला तबला-ढोलक, नुसरतचे आलाप, सरगम...
या खाली दिलेला नुसरत चा मूळ व्हिडिओ नाही, पण त्याचं voice-over आहे, यू ट्यूब वर मिळणार्या आधी दिलेल्या मैफलीतल्या वरच्या गाण्यापेक्षा इथल्या गाणं हे फ्यूजन कव्वालीच्या प्रकारातलं. घरी (किंवा ऑफिसात हेडफोन लावून!) जमणार असेल तर हा व्हिडिओ चांगल्या स्टिरीओ स्पीकर्स वर ऐका, अफलातून साऊंड इफेक्ट्स आहेत!

Book traversal links for कव्वाली: एक उत्कट गायनप्रकार भाग २
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्तच झालाय हा भागही.
ही घ्या "मौला मौला मेरे मौला"
चुकीची दुरुस्ती
अरे वाह!!! ही मेजवानी नजरेस
"अरे रूक जा रे बंदे" हे का?
मस्तच
खूप छान
दोन्ही लेख अतिशय आवडले.
अतिशय अभ्यासपूर्ण आणि सुरेख लेख! आवडला!!
खूप खूप आवडला
उत्तम भाग
घाटपांडे साहेब, बिका, आणि इतर प्रतिसादक मित्रहो..
प्रणाम!!!
वावा..
छान लेख
प्रदीपजी,
ते गीत
खात्री नाही..
अहाहा! बहुगुणीजी, मस्तच!
धन्यवाद! 'सानु इक पल चैन ना आवे'
सुंदर !
मस्त मस्त मस्त
कव्वालींची मेजवानी
कोणीही सलग २.३० तास तरी संगणकासमोरून हलले नाही
मन लागो यार..
कच्चे धागे : सैफ अली खान /
स्नीक प्रिव्ह्यू!