..मैत्र...
............ ते कोण आहेत माझे ?............ काय नातं आहे त्यांच्यात आणि माझ्यात?.......रक्ताचं तर नाहीच नाही....पण बाकी?..... काका ....मामा .... खरं सांगू? मला तर आज हे लिहिताना सुद्धा समजत नाहीये कि त्यांना काय नाव देऊ !.....
"दीपक भा"..... त्याना ओळखणारे सगळेजण त्यांना याच नावाने ओळखत ....मीही तेच म्हणते....
..... कधी कधी टिपूर चांदण पडतं ..... रात्रीच्या जेवणा नंतर सहज चांदण्यात थोडसं फिरून यावसं वाटत..... बाहेर पडते .... कोपऱ्यापर्यंत जाता जाता सवयीप्रमाणे आकाशाकडे नजर जाते..... चंद्रकोर अतिशय मोहक दिसत असते... मधेच एखादा हलकासा ढग तिच्यावरून हळूच सरकत सरकत निघून जातो... हलकीशी पुसट होता होता ढग बाजूला झाल्यावर ती आणखीनच ताजीतवानी होते... हे मनभर साठवून घेताना एकदम एक आवाज आठवतो..." जाई,......चंद्र पाहिलास आज?....... पटकन बाहेर जा आणि पहा!" दीपक भांचा तो अवेळी आलेला फोन...त्यांचा आवाज...तसाच्या तसा आठवतो मला..!
......... शरदातल चांदण असो ..पौर्णिमेचा शुभ्र चंद्र असो...गेट वरच्या जाईचा फुलताना येणारा सुगंध असो....... किंवा दुरून वाऱ्याच्या झुळूके बरोबर दरवळत येणारी रातराणी असो.... दीपक भा माझ्याबरोबर असतातच... हे सार अनुभवण्याच सुख त्यांनीच तर बहाल केलंय मला....
..... मी साधारण ७ वी - ८ वीत असेन तेंव्हापासून मी त्यांना ओळखते ..... पुस्तकं....गाणी ......कविता...आयुष्य सुंदर बनवणाऱ्या या साऱ्या गोष्टींची ओळख त्यांनीच करून दिली... आयुष्यातले शक्य तितके क्षण .... समरसून जगण्याची समज हे ही असंच त्यांच्या कडून मिळालेलं देण आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी असते कि जिथे वय,नातं ,लहानमोठेपणा,संकोच ,भीड या गोष्टीची तमा बाळगायची गरज नसते..आपण कोणत्याही विषयावर ... कधीही काहीही बोलू शकतो...आपल्याला हवे तसे 'व्यक्त' होऊ शकतो... ! आपण आहोत तसे.......गुण दोषांसकट ... कोणताही स्वार्थ, किंतु परंतु मध्ये न "स्वीकारले" जाऊ ही खात्री असते...कोणताही आडपडदा न ठेवता आपण बोलू शकतो....मन रिकाम करू शकतो.....एखाद्या पोरकट जोकवर पोट दुखेपर्यंत हसू शकतो.......कधी कधी मनातले भाव निश:ब्द करत त्याच्यासमोर शांत बसून राहू शकतो....आणि कधी कधी दाटून येणाऱ्या हुंदक्यांना मुक्तपणे वाट करून देऊ शकतो. ती व्यक्ती.....ते नातं म्हणजे "मैत्र"...
'मैत्र' शोधावा लागत नाही.....बनवावा लागत नाही ....तो घडतो....it just happens to you..!
माझ्यासाठी हे अतिशय सुंदर.....गाढ....निखळ....जिवंत नातं म्हणजे दीपक भा ..माझा मित्र...
..... माझा हा पन्नाशीच्या घरातला मित्र दोन वर्षापूर्वी जग सोडून निघून गेला...अतिशय अनपेक्षित ह्रदयविकाराच्या झटक्याने आम्हा सर्वाना तो दुरावला ..
...... पण माझ्यासाठी....माझ्यासाठी ते कधीच 'गेले' नाहीयेत....ते आहेत....आसपास... त्यांनी लिहिलेल्या पत्रांमध्ये....त्या हस्ताक्षरामध्ये ..... त्यांनीच दिलेल्या पुस्तकांमध्ये.
...इतकंच सांगायचं आहे..
दीपक भा,
......... तुमच्याशी मारलेल्या उशिरापर्यंत च्या गप्पा...... strong कॉफी......सोबत पारायण केलेला "इजाजत".....तुमच्याकडून ऐकलेले गुलजार आणि साहीर.... कतरा कतरा आणि मेरा कुछ सामान.....असंख्य आठवणींमध्ये तुम्ही सतत भेटत राहता. अजूनही बऱ्याचदा तुमचा नंबर हि डायल करते...असंच गम्मत म्हणून...! माझ्यासाठी तुम्ही काय आहात हे सांगण्यासाठी मला एका खास दिवसाची वगैरे गरज नाहीये...तरीही आज सांगते " you are the greatest and closest friend ever happened to me....happy friendship!......एक मैत्र.......आयुष्यभरासाठी!
प्रतिक्रिया
'दीपक भा' आमच्यापर्यंत पोहोचले!
मुक्तक आवडले
....अगदी .....
+१
भावना पोहोचल्या. 'मैत्र' या
फार फार
केवळ सुंदर...
सुरेख लेखन !!
छान लेखन... उत्कट नात्याचे
माझ्याही डोक्यात हाच विचार आला होता
+ १
+१
.....प्रयत्न करु...
पटले नाही. पण हा वरचा लेख
हम्म्म्म
सुरेख
"दीपक भा".....
दिपक भा...........................
जाईतै, सुरेख! माझेही एक