Skip to main content

माझी जन्माची शिदोरी

माझी जन्माची शिदोरी

Published on बुधवार, 28/07/2010 प्रकाशित
तुझ्या श्वासांचा विळखा तुझ्या नजरेची मिठी तुला पाहता लाजून झुके पावलांशी दिठी तुझे मौनही बोलके, गूज डोळ्यांनी सांगते भाव जाणून त्यातले गीत मनात रंगते दुराव्यात जवळीक जपणारी तुझी प्रीत तिचा अनाहत नाद, तिचे स्वर्गीय संगीत तिची अवीट माधुरी स्वप्न जागवी बिलोरी तुझी क्षणांची संगत माझी जन्माची शिदोरी
लेखनविषय:

याद्या 3436
प्रतिक्रिया 15
काव्यरस

वा. आवडली. परत वाचली. 'नाही पुण्याची मोजणी' हेच डोक्यात घोळत राहिलंय... विडंबकांना मात्र फुलटॉस. आणारे पॉपकॉर्न...

रचना / अर्थ छान. पहीले कडवे तुलनेने कमअस्सल . अजून रचना येवू द्या ....

कविता आवडली. दिठी' हा शब्द बहुतांशी अभंगात, भक्तिगीतात आढळतो. त्यामुळे वाचताना थोडा रसभंग झाला. 'तुझे मौनही बोलके, गूज डोळ्यांनी सांगते भाव जाणून त्यातले गीत मनात रंगते - फार सुंदर.

खूप दिवसांनी क्रान्ति यांची सुरेख कविता वाचायला मिळाली. धन्यवाद.

कविता खुप आवडली रणजित चितळे

अ प्र ति म ! तुझे मौनही बोलके, गूज डोळ्यांनी सांगते भाव जाणून त्यातले गीत मनात रंगते हे खासच.