माझी जन्माची शिदोरी
लेखनविषय:
तुझ्या श्वासांचा विळखा
तुझ्या नजरेची मिठी
तुला पाहता लाजून
झुके पावलांशी दिठी
तुझे मौनही बोलके,
गूज डोळ्यांनी सांगते
भाव जाणून त्यातले
गीत मनात रंगते
दुराव्यात जवळीक
जपणारी तुझी प्रीत
तिचा अनाहत नाद,
तिचे स्वर्गीय संगीत
तिची अवीट माधुरी
स्वप्न जागवी बिलोरी
तुझी क्षणांची संगत
माझी जन्माची शिदोरी
वाचने
3435
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
वा
आवडली.
झकास.
फारच छान ..
तुझी क्षणांची संगत माझी
दिलखेच !
खूप आवडली रचना!
सुरेख.
फारच छान
कमी शब्दात खूप काही सांगून जाणारी क्रांतीतैंची खासियत
चांगली रचना
मस्त आहे
अ प्र ति म ! तुझे मौनही
सुरेख
सुंदर कविता...