कार्यकर्ते साहेब,
निकालाचे महत्व तसे म्हटले तर काहिच नाही. शेवटी मालक ठरवतील काय योग्य आहे ते. मी हा कौल घेतला तो लोकांचे मत जाणून घ्यायला. जबाबदारीचे म्हणाल तर The owner or We will have to define it and then follow it.
कुलकर्णी साहेब, सहमत आहे. माझे प्रतिसाद केवळ तुम्हालाच उद्देशून लिहिले नव्हते. असे बरेच प्रकार घडले आहेत. आणि संपादक म्हणून ते मला (आणि माझ्या सहकार्यांना) जाणवतं... म्हणून हा आटापिटा. असो. विषय मोठा आहे आणि बरेच पैलू आहेत. म्हणून म्हणलं की जर का काळजी घेतली तर सहसा स्वसंपादनाची वेळ येत नाही. बाकी वैयक्तिक काही नाही हे समजून घ्यावे ही विनंती.
नमस्कार.
आपल्या मताचा मान आहेच.
पण मुद्दा आपण केलेल्या चुका आपणच दुरुस्त करायच्या का नाही? हा आहे.
कदाचीत असे असावे की ज्यांना खोडसाळपणाचा त्रास झालेला आहे त्यांचा या सुविधेला विरोध आहे. पण असे प्रसंग किती ? आणि जे काही चालेलेले असतं ते within their circle चाललेले असते. ते चालू देत. विशेषतः विडंबीत लेखन वा कविता इ.इ. या मधून.
लेखन प्रसिद्धीस देताना जबाबदारीने द्यावे आणि लेखनही जबाबदारीने करावे ही किमान अपेक्षा लेखकाने स्वतःबद्दल ठेवणे आणि वाचकांनी लेखकाबद्दल ठेवणे रास्त वाटते. हे भान मिपावरील अनेक लेखकांना नाही आणि त्यातील एक नाव जयंत कुलकर्णी यांचेच आहे.
असो. याखेरीज स्वसंपादनाने खालील तोटे होतात असे वाट्ते आणि पाहिले आहे.
१. आधी काहीतरी लिहून लोकांनी आक्षेप दाखवल्यावर "मी तो नाहीच" असा स्टँड किंवा मूळ लेखात बदल करून इतरांनाच वेड्यात काढणे.
२. आपल्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाले नाहीत तर लेख काढून टाकणे. (हे करणारे लेखक असे फारसे होताना दिसत नाही असे म्हणतात हे दुर्दैव.)
३. संपादनाला "सेन्सिटिव" विषयावरील लेख दाखवून ते प्रशासनाच्या संमतीने टाकून मग टाकताना त्यात बदल करून टाकण्यात आले.
४. लोकांना थोडी शिस्त हवी. घाईत काहीतरी लिहिण्यापेक्षा विचारपूर्वक लिहावे. नसल्यास संपादक मोठ्या चुका सुधारतात आणि लहान चुका प्रतिसादातून किंवा पुढील लेखातून सुधारता येतील. आम्हाला स्वसंपादनाची सुविधा हवी पण आम्ही विचार करून, १० दा वाचून लेख प्रकाशित करणार नाही हा आव येथे दिसतो.
५. गैरसमज - मध्यंतरी लेख/ चर्चा गायब का झाल्या असा प्रश्न लोकांना पडला. संपादकांकडे, मिपाकडे अशी कोणतीही सुविधा नाही की हे नेमके का झाले ते पाहायची. असे छडे लावण्यात संपादकांचा वेळ वाया जातो.
//लेखन प्रसिद्धीस देताना जबाबदारीने द्यावे आणि लेखनही जबाबदारीने करावे ही किमान अपेक्षा लेखकाने स्वतःबद्दल ठेवणे आणि वाचकांनी लेखकाबद्दल ठेवणे रास्त वाटते. हे भान मिपावरील अनेक लेखकांना नाही आणि त्यातील एक नाव जयंत कुलकर्णी यांचेच आहे.//
बरोबर आहे आणि पटले देखील. माझे सर्व लेख आपण बाचुनच हे मत बनवले असेल हे मी गृहीत धरतो.
धन्यवाद !
आपण आपला लेख उडवलात आणि त्याबरोबर आलेले प्रतिसाद उडवलेत हे खोटे का? त्याची विचारणा करता आपल्या शब्दांत खंत दिसली नाही. उलट धोरणे प्रकाशित झाल्यावर आता मी यापुढे लिहिणार नाही असा पावित्रा आपण घेता. त्यानंतर हा कौल टाकता आणि लोकमत जमवता.
येथे लिहिताना आपण फक्त शुद्धलेखनाच्या चुका सुधारण्यासाठी असा सूर काढताना दिसता, कोठेही आपण मीही लेख उडवले आहेत असे लिहित नाही (खाली सदस्यांनी छेडल्यावर आपण आता माफी मागता). जर मिसळपावावर व्याकरण आणि शुद्धलेखनाला फारसे महत्त्व नाही पण तरीही आपला लेख परिपूर्ण असावा अशी कळकळ तुम्हाला आहे तर प्रथम पाऊल आपण न उचलता संपादन आणि संपादकांवर, धोरणांवर शरसंधान कशासाठी?
जबाबदारीने १० वेळा वाचून लेख का टाकत नाही हा प्रश्न आहेच. माझ्यामते हे वागणे बेजबाबदार आहे.
बाकी चालू द्या.
आपण हा सर्व धागा निट वाचलात का ? माझे उदा. जेव्हा देण्यात आले तेव्हा मी माझेच उदा. देऊन उत्तर दिले आहे. याचा अर्थ आपाल्याला कळला की नाही ? माझे मत लेखकाला धागा उडवण्याचा हक्क असावा असे आहे हे मी स्पष्टपणे मांडलेले आहे. याच धाग्यात. माफी बद्दल म्हणाल तर संबंधीत सदस्याने जे म्हटले त्यावर मी काय आनंद व्यक्त करायला पाहिजे होता असे तुमचे म्हणणे आहे का ? तुम्हाला कुठलीही गोष्ट सरळ दिसत नाही असे दिसते. मला तर त्या सदस्याने छेडले असे काहीच वाटले नाही. त्याचे ऊत्तर पण मी दिले आहे.
आपली प्रतिसादाची भाषा अत्यंत उध्दटपणाची असल्यामुळे आपण यावर जो परत उध्दट्पणे प्रतिसाद द्याल त्याला मी उत्तर देणार नाही हे ओघाने आलेच.
खरे बोल आपल्याला उद्धटपणाचे का वाटावे?
मी दोन महिन्यांपूर्वीच्या माफीबद्दल बोलत होते. त्यावेळेस मी विचारणा केली होती पण आपल्या शब्दांत खंत दिसली नाही. तो धागा आपण उडवलात आणि सोबत लोकांचे प्रतिसादही. हे वागणे बेजबाबदार नाही काय? असो.
बाकी, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे नसली की माणूस गुद्द्यावर येतो हा जुना अनुभव. आपल्याला आपल्या वागण्यातील उद्धटपणा दिसत नाही हे देखील आहेच.
माझ्यामते धाग प्रकाशित झाल्यावर काहि ठराविक वेळ अथवा कहि ठराविक प्रतिक्रीया येईपर्यंत (जे तांत्रिक दृष्ट्या शक्य आहे) तोपयंत हा अधिकार द्यावा. त्या अवधीत ज्या दुरुस्त्या आवश्यक आहेत त्या लेखकाने कराव्यात. नंतर प्रतिसादात शुद्धीपत्रे द्यावीत.
बाकी या धाग्याच्या खाली प्रतिसादाला सोय नसल्याने प्रदीप यांच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद.. मात्र तो फक्त त्यांना नाहि
मला एक मूलभूत प्रश्न पडला आहे:
एखादा लेख अथवा प्रतिसाद अप्रकाशित करण्याचा हक्क (आणि तशी क्षमता) संपादकांकडे आहे. एखाद्या लेखकानं खोडसाळपणापोटी किंवा पुरेशा सबळ कारणाअभावी आपलं लेखन अप्रकाशित केलं आहे असं वाटलं, तर ते लेखन पुनःप्रकाशित करण्याचा हक्क (आणि तशी क्षमता) संपादकांकडे नाही का? त्यामुळे खोडसाळपणालाही धरबंद बसेल आणि ज्यांना रास्त कारणांसाठी लेखनाचं पुनर्संपादन करायचं आहे त्यांना आता वाटत असणारी अन्यायाची भावनाही नाहीशी होईल.
सारांशः लेखकानं काहीतरी आक्षेपार्ह लिहिलं तर संपादक ते अप्रकाशित करू शकतात. तसंच लेखकानं काहीतरी अप्रकाशित केलं आणि ते वर्तन आक्षेपार्ह वाटलं तर संपादक ते प्रकाशित करू शकतील. यामुळे अगदी शंभर टक्के नाही, पण आताहून अधिक लोक आनंदी होतील. आताहून अधिक आनंदी होणारे लोक हे खोडसाळ नसतील कारण त्यांना जे स्वसंपादन करायचं आहे (आणि जे आज त्यांना करता येत नाही आहे या कारणापोटी ते आनंदी नाहीत), ते खोडसाळपणाचं नाही . म्हणजे एक सुवर्णमध्य गाठता येईल. नाही का?
"अप्रकाशित करणे" आणि "काढून टाकणे" यात फरक आहे , जो सर्वसामान्य सभासदांकरता पारदर्शक आहे. संपादक जेव्हा अप्रकाशित करतात तेव्हा तो नोड अस्तित्त्वात असतो, फक्त तो अप्रकाशित असतो. लेखक जेव्हा आपले लेखन "उडवतो/ते" तेव्हा ते "डिलिट" करतात.
संपादक जेव्हा अप्रकाशित करतात तेव्हा तो नोड अस्तित्त्वात असतो, फक्त तो अप्रकाशित असतो. लेखक जेव्हा आपले लेखन "उडवतो/ते" तेव्हा ते "डिलिट" करतात.
पण मग तांत्रिक बदल करून असं करता येईल का - लेखक आपलं लेखन उडवेल तेव्हाही ते अप्रकाशितच होईल. लेखकानं लेख उडवण्याचं कारण देणं अपेक्षित असेल. त्यानंतर संपादक मंडळ ते रास्त होतं अथवा नाही आणि नसलं तर काय करायचं याचा निर्णय घेईल. म्हणजे स्वसंपादनाचा पर्यायही राहील आणि मनमानीही चालणार नाही.
बिकाशी सहमत.
ज्या प्रॉब्लेममुळे हा निर्णय घेण्यात आला आहे त्याचा विदा मिळाला तर बरे.
नाहीतर हा धागा वाचनमात्र करावा. उगाच चर्चा करण्यात वेळ आणि उर्जा फुकत का दवडायची?
अहो एखाद्या लेखकाला वाटले की स्वतःचे पूर्ण लिखाण उडवावे तर तो उडवेल पण प्रतिसाद तसेच राहतील. अनेकांचा आक्षेप आम्ही वेळ घालवून जे प्रतिसाद लिहितो ते ही धाग्याबरोबर उडतात याला असेल तर त्याच्यावर हे उत्तर आहे. अर्थात लेख नसताना प्रतिसादांना शेंडा-बुडखा नसणार हे ओघाने आलेच, त्यामुळे असे धागे कुणी वाचणार नाहीतच.
मला वाटते मुळात ही सुविधा असताना भारंभार लेख उडवले जात होते का याविषयी कुठेच स्पष्टता नाही. एकंदर जितके लेख लिहिले गेले आहेत त्याच्या प्रमाणात लेखकांनी स्वतःहून उडवलेले लेख किती असतील? १% तरी असतील का? असे असताना नजरचुकीमुळे राहून गेलेल्या चुकांची दुरुस्ती किंवा वाचकांनी अधिक चांगला पर्याय सुचवल्यामुळे कराव्याशा वाटणार्या दुरुस्त्या या करता संपादकांवर अवलंबून राहायला सांगणे कितपत बरोबर आहे? इथे शुद्धलेखनाचा बाऊ केला जात नाही हे म्हणणे बरोबर आहे. पण चूक ही चूकच असते. ती कुणी जाणूनबुजुन करत नाही. मला जर माझी चूक कळली तर ती सुधारण्यासाठी मला दुसर्यांवर (पक्षी: संपादकांवर) अवलंबून राहावे लागणे कितपत योग्य आहे?
छापील लेखांमध्ये असे संपादन करता येत नाही म्हणून इथेही करू देऊ नये हा प्रतिवादही चुकीचा आहे. छापील माध्यमात तसे करता येत नाही हे त्या माध्यमाचे लिमिटेशन आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे इथे ते शक्य असेल तर का अडवता?
असावे ला मत दिले आहे. पण कौलात संपादनाचा हेतु स्पष्ट होत नाही. काही किरकोळ दुरुस्त्या,शुद्धलेखन किंवा काही भर अशा हेतु साठीच स्वसंपादन असावे हे मतात अभिप्रेत आहे.
मूळ कौलाचा लेख जिथे संपतो आणि वाचनांची संख्या दिसते तिथे प्रतिक्रिया लिहा अशी लिंक आहे त्यावर क्लिक केल्यावर प्रतिसाद देण्याची खिडकी उघडते.
फक्त कौलाच्या बाबतीत असे असावे.
@नितिन थत्ते - मात्र प्रतिसादाला उत्तर देता येतं...
स्वयंसंपादनाचे फायदे:
१. छोट्या छोट्या चुका दरुस्त करणे - कितीही तपासून बघितलं तरी काही चुका राहून जातातच. व्यावसायिक संपादन असताना देखील आपल्याला पुस्तकांमध्ये देखील चुका दिसतात.
- कवितेतल्या वृत्तातल्या चुका - माझ्या किमान तीन कवितांमध्ये मला बदल सुचवले गेले व मी ते केले.
- तपशीलातल्या चुका - व्यास की परीघ चं उदाहरण ताजं आहे, अनेक लेखांनंतर वाचक त्या चुका दाखवतात. त्यावर चर्चा करण्याने उगाच चर्चा भरकटते.
- शुद्धलेखनाच्या चुका - लेखकालाच त्या सापडल्या तर व त्याने दुरुस्त केल्या तर उत्तम.
- चित्रांचा आकार - बदलणे, कधी चित्रं दिसत नाहीत ती लिंक दुरुस्त करणे.
२. मोठ्या, घोडचुका दुरुस्त करणे - मिपा व्यवस्थापन लेखनाची जबाबदारी घेत नाही. चुकीचं लेखन असेल तर शेवटी लेखक गोत्यात येणार. मग संपादकांवर अवलंबून का राहावं? जबाबदारीबरोबर अधिकार नको का?
- एखादी विडंबन कविता किंवा टीकात्मक लेख लिहिताना मजा वाटते, पण नंतर ती दुखावणारी आहे असं वाटतं - विशेषतः पहिल्या काही प्रतिक्रिया आल्यावर
- एखादा लेख हीन अभिरुचीचा आहे असं लक्षात येतं, पहिल्या काही प्रतिसादांनंतरच. असे लेख उडले आणि काही क्षण गोंधळ झाला तर हरकत नाही.
३. लेखनावर कंट्रोल - स्वयंसंपादनाने लेखकाला अधिकार वाटतो. व स्वतःचं लेखन विशिष्ट पातळीवर ठेवण्याची जबाबदारीदेखील येते.
तोटे
१. काही लोक खोडसाळपणा करतील अशी भीती आहे. पण याविषयी नक्की विदा नाही. वरीलपैकी कारणांसाठी बदल केले तर त्याला खोडसाळपणा म्हणावं का? सगळेच सदस्य खोडसाळपणा करतील असं गृहित धरावं का?
२. तो नक्की कोणी उडवला हे कळत नाही, विशेषतः संपादकांना. ते एकमेकांना विचारतात, तू उडवलास का रे/गं? मला वाटतं जर 'मी लेख उडवला' हे जाहीर करण्याची प्रोसेस स्पष्ट झाली तर हा प्रश्न नाहीसा होईल.
(आत्ता कौल ~८०% असावा - ~२०% नसावा. त्या २० पैकी सुमारे १२ संपादक सदस्यांकडून असा माझा अंदाज आहे)
२. तो नक्की कोणी उडवला हे कळत नाही, विशेषतः संपादकांना. ते एकमेकांना विचारतात, तू उडवलास का रे/गं? मला वाटतं जर 'मी लेख उडवला' हे जाहीर करण्याची प्रोसेस स्पष्ट झाली तर हा प्रश्न नाहीसा होईल.
असं एकमेकांना विचारण्याचे प्रसंग गेल्या एखाद महिन्यात घडले असतील तर नजरेस आणून द्यावेत. शिवाय, लेख किंवा प्रतिसाद उडवल्यानंतर 'संपादक मंडळ' संबंधित सदस्याला कळवतेच आणि शंकांचे निराकरणही करते. वेळ लागत असेल, पण प्रतिसाद दिला जातो बहुतेक वेळा.
बाकी तुमचा अंदाज चुकीचा असावा असा माझा अंदाज आहे. :ड
श्री. शिंदे, आपल्या परखडपणाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
पण आपल्या या निरीक्षणाशी सुसंगत असा काही विदा आपण संकलित करून त्याचे विश्लेषण करून हे निरीक्षण नोंदवत आहात की मग असेच वाटले म्हणून? :)
मला, हा विदा (असला तर) बघायचा आहे. धन्यवाद.
मला वाटतं शिंदे यांचं विधान मिपावरील एका वाचकाच्या पर्सेप्शन्सचं निरीक्षण म्हणून संपादकांनीच हा एक डेटा पॉइंट म्हणून नोंद करून ठेवणं इष्ट. या संस्थळावर सगळीच विधानं विदा व आलेख घेऊन येत नाहीत. उदाहरणार्थ 'सदस्य खोडसाळपणा करतात' या अर्थाची विधानं संपादकांकडून आलेली आहेत. त्यातली किती विदा दाखवत आली? गेल्या तीन महिन्यातल्या सुमारे १२०० लेखांमध्ये किती वेळा खोडसाळपणा झाला याचा विदा देऊन जर स्वयंसंपादनाची सुविधा काढली असती तर?
जर 'मी लेख उडवला' हे जाहीर करण्याची प्रोसेस स्पष्ट झाली तर हा प्रश्न नाहीसा होईल.
१००% मान्य.
असं एकमेकांना विचारण्याचे प्रसंग गेल्या एखाद महिन्यात घडले असतील तर नजरेस आणून द्यावेत.
खवमधील लेखन उद्धृत करण्याचे प्रोटोकॉल माहीत नाहीत. पण इच्छुकांनी बरोब्बर महिन्याभरापूर्वीच्या संपादकांच्या खव तपासून बघाव्यात. त्या संपादकांनी आपले संवाद उडवू नयेत ही विनंती.
त्याचबरोबर किमान एका संपादक मंडळ सदस्याने व्यक्तिगत पातळीवर सांगितलं आहे. यापेक्षा अधिक लिहिता येत नाही. असा गोंधळ जर उडत नसेल असं सर्वसाधारण संपादक मंडळाचं मत असेल तर प्रश्नच मिटला, एक विरुद्धचा मुद्दा कमी झाला.
बाकी तुमचा अंदाज चुकीचा असावा असा माझा अंदाज आहे
नाही. त्यावेळी २०% म्हणजे सात मतं होती. त्यात मी किमान चार संपादक मोजले - नसावा असं मत जाहीर केलेले. म्हणजे २० पैकी सुमारे १२% चा हिशोब लागतो. चुभू अर्थातच द्या घ्या. किंवा संपादित करा ;)
त्याचबरोबर किमान एका संपादक मंडळ सदस्याने व्यक्तिगत पातळीवर सांगितलं आहे. यापेक्षा अधिक लिहिता येत नाही.
संपादक म्हणून जे निर्णय घ्यावे लागतात, ते व्यक्तिगत मैत्री असली तरीही बिगर संपादकांना न सांगण्याचा नियम संपादकांनी पाळावा असे मनापासून वाटते. ह्याने बर्याच प्रमाणात अधिक सूसूत्रपणे काम करता येईल (थोडक्यात व स्पष्ट शब्दांत - मिपावरल्या आगी एकूणच कमी प्रमाणात लागण्यास मदत होईल.) घासकडवी ह्यांच्याकडे मुळीच निर्देश नाही, गैरसमज नसावा, पण जे मिपाकर संपादक नाहीत, त्यांना संपादन विषयक निर्णय सांगायची आवश्यकता आहे का? असल्यास, एक धागा काढून वेळोवेळी सगळ्याच मिपाकरांना माहिती द्यावी. असा भेदभाव का बरं? :)
लेखकाला स्वयंसंपादनाचा अधिकार असावा पण पूर्ण धागाच्या धागा उडविण्याचा ह्क्क नसावा.
काही लेखकांकडून लेख उडविले जाण्याच्या किंवा तत्सम घटनांची शिक्षा सगळ्यांच लेखकांना नको. स्वयंसंपादनाचा अधिकार सगळ्यांनाच नाकारणं म्हणजे ना रहेगा बास ना बजेगी बासुंरी सारख वाटतं. अपवादाला नियमात बसवल्यासारखं आहे.
प्रतिक्रिया
अण्णा हजारे... आपलं नितीन
In reply to तसं नसतं. शासनातली माणसं by नितिन थत्ते
कार्यकर्ते साहेब, निकालाचे
In reply to निकाल ठीक आहे हो. पण by बिपिन कार्यकर्ते
कुलकर्णी साहेब, सहमत आहे.
In reply to कार्यकर्ते साहेब, निकालाचे by जयंत कुलकर्णी
निकालाचे महत्व तसे म्हटले तर
In reply to कार्यकर्ते साहेब, निकालाचे by जयंत कुलकर्णी
सहमत
In reply to निकालाचे महत्व तसे म्हटले तर by परिकथेतील राजकुमार
नमस्कार !
In reply to मिपावरचे संपादक हे या by llपुण्याचे पेशवेll
नमस्कार. आपल्या मताचा मान
In reply to माझे मत by प्रदीप
प्रदीप यांच्याशी पूर्ण सहमत. शिवाय
In reply to माझे मत by प्रदीप
बरोबर आहे आणि पटले देखील.
In reply to प्रदीप यांच्याशी पूर्ण सहमत. शिवाय by प्रियाली
आपणही लेख काढलात हे खोटे का?
In reply to बरोबर आहे आणि पटले देखील. by जयंत कुलकर्णी
नमस्कार !
In reply to आपणही लेख काढलात हे खोटे का? by प्रियाली
खरे बोल
In reply to नमस्कार ! by जयंत कुलकर्णी
प्रकाशित केल्यावर थोडा वेळ
In reply to माझे मत by प्रदीप
+१०
In reply to प्रकाशित केल्यावर थोडा वेळ by ऋषिकेश
लेखकाला स्वतःचा लेख स्वसंपादन करायचा अधिकार
In reply to माझे मत by प्रदीप
पर्याय
In reply to माझे मत हा अधिकार असावा या by बिपिन कार्यकर्ते
एक मूलभूत प्रश्न
In reply to माझे मत हा अधिकार असावा या by बिपिन कार्यकर्ते
एक चांगली कल्पना.
In reply to एक मूलभूत प्रश्न by चिंतातुर जंतू
काही तांत्रिक मुद्दे
In reply to एक मूलभूत प्रश्न by चिंतातुर जंतू
फक्त अप्रकाशित केला तर?
In reply to काही तांत्रिक मुद्दे by मुक्तसुनीत
हेच म्हणतो. हाच उपाय खालीही
In reply to फक्त अप्रकाशित केला तर? by चिंतातुर जंतू
लेखाचे शीर्षक स्वसंपादनाचा
In reply to माझे मत हा अधिकार असावा या by बिपिन कार्यकर्ते
मास्तर एक सांगा. स्वसंपादनाचा
In reply to लेखाचे शीर्षक स्वसंपादनाचा by चिन्मना
+/-
In reply to मास्तर एक सांगा. स्वसंपादनाचा by बिपिन कार्यकर्ते
कौलमात्र !
In reply to +/- by नितिन थत्ते
अहो एखाद्या लेखकाला वाटले की
In reply to मास्तर एक सांगा. स्वसंपादनाचा by बिपिन कार्यकर्ते
मत
In reply to माझे मत हा अधिकार असावा या by बिपिन कार्यकर्ते
हे पहा
असावा
In reply to हे पहा by नितिन थत्ते
२. तो नक्की कोणी उडवला हे कळत
In reply to असावा by राजेश घासकडवी
-१
In reply to २. तो नक्की कोणी उडवला हे कळत by बिपिन कार्यकर्ते
असहमतीशी सहमत
In reply to -१ by नितिन थत्ते
श्री. शिंदे, आपल्या परखडपणाचे
In reply to असहमतीशी सहमत by आमोद शिंदे
स्वानुभव
In reply to श्री. शिंदे, आपल्या परखडपणाचे by बिपिन कार्यकर्ते
विदा...
In reply to श्री. शिंदे, आपल्या परखडपणाचे by बिपिन कार्यकर्ते
जर 'मी लेख उडवला' हे जाहीर
In reply to २. तो नक्की कोणी उडवला हे कळत by बिपिन कार्यकर्ते
त्याचबरोबर किमान एका संपादक
In reply to जर 'मी लेख उडवला' हे जाहीर by राजेश घासकडवी
चांगली चर्चा चालु आहे
लेखकाला स्वयंसंपादनाचा अधिकार
वर्जन कंट्रोल
In reply to लेखकाला स्वयंसंपादनाचा अधिकार by पुष्करिणी
लेखकाला स्वयंसंपादनाचा अधिकार
अधिकार
In reply to लेखकाला स्वयंसंपादनाचा अधिकार by इंटरनेटस्नेही
४२ विरुद्ध १०
५१ वि १४
६२ वि १४...
६५ वि १४
In reply to ६२ वि १४... by राजेश घासकडवी
६३ वि १४
६४ वि १४
In reply to ६३ वि १४ by क्रेमर
वाचनमात्र
६८ वि १४