फडकवा आपला लाडका तिरंगा....पण सुलटा!
फडकवा आपला लाडका तिरंगा....पण सुलटा!
आपण सगळेच आपल्या "तिरंगी" ध्वजाचे अभिमानी आहोत. जेंव्हां मी आपला ध्वज उलटा लावलेला पहातो तेंव्हां माझं तर रक्तच उसळतं!
एक अनुभव माझा स्वतःचा!
साधारणतः सर्व आंतरराष्ट्रीय परिषदांत परिषद संपल्यावर एक 'ओली' मेजवानी देण्यात येते व त्यात परिषदेत ज्या ज्या सभासदांनी भाग घेतलेला असतो त्या त्या देशांचे ध्वज एका विशाल फलकावर लावले जातात. एकदा जर्मनीतील अशाच एका परिषदेत माझ्यासारखे इतरही भारतीय प्रतिनिधी असल्याने आपला तिरंगी ध्वज लावला होता, पण (बहुदा) अज्ञानामुळे उलटा लावलेला होता (हिरवी पट्टी वर ठेऊन). माझ्या शेजारी एक ओळखीचा जर्मन प्रतिनिधी उभा होता. ही चूक मी त्याच्या निदर्शनास आणून दिली. त्याने ज्या चापल्याने तिथल्या स्टाफला बोलावून तो सरळ करवला त्यावरून तोही या घटनेला किती महत्व देत होता हे सहज लक्षात येत होते.
तो ठीक केल्यावर त्याने व नंतर त्या परिषदेच्या व्यवस्थापक वर्गातील एका वरिष्ठानेही येऊन माझ्याकडे चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करून माफीही मागितली!
ती चूक नक्कीच अनवधानाने झाली होती.
पण माझे परमप्रिय (!) पाकिस्तानी नेते मुशर्रफ आग्र्याच्या शिखर परिषदेला PIAच्या खास विमानाने आले त्यावेळीही आपला ध्वज उलटा लागलेला बर्याच जणांनी पाहिला असेल! ते विमान भारतीय भूमीवर उतरल्यावर (मला वाटते अमृतसर येथे) ती चूक लक्षात आली व ती त्यांच्या शिष्टमंडळाच्या लक्षात आणून दिल्यावर आपला तिरंगा सुलटा करण्यात आला, मगच ते विमान पुढे गेले.
ही चूक अनवधानाने झाली नसणार! सरकारी पातळीवर अशा चुका होत नाहींत. कारण 'प्रोटोकॉल' विभागाचे लोक असल्या गोष्टी दहा वेळा तपासतात. आपल्या सरकारबरोबर वाटाघाटी करण्यासाठी येणारा सरकारी पाहुणा अशी चूक करणे शक्य नाहीं. पण 'झाली असेल एक वेळ' असे जरी मानले तर आपले परराष्ट्रमंत्री नुकतेच इस्लामाबादला गेले असता त्यांच्या उपस्थितीतही हीच मग्रूरी पुन्हा दिसली. मला तर वाटते कीं ही मुजोरी पाकिस्तानी सरकार मुद्दाम करते.
हे दुवे पहा:
http://www.youtube.com/watch?v=MDn9KJP0fsI (यात ध्वजाची चूक चिदंबरमसाहेबांच्या लक्षात आलेली दिसत नाहीं!)
http://www.youtube.com/watch?v=BKwxX7dwO9Y&feature=related
http://www.youtube.com/watch?v=yCTMmhXLGe4&feature=related
मग माझ्या मनात आलं कीं आपण आपल्या तिरंगी ध्वजाला नवे रूप कां देऊ नये जेणेकरून आपला ध्वज आडव्या आसावरही सारखा (symmetrical) असेल! तसे केल्यास आपण पाकिस्तानला नाकावर अंगठा ठेवून "टुक टुक माकडा" (Thumb your nose) करू शकू! अशाने आपल्याला सहजासहजी त्रस्त करण्यातला एक भाग काढून टाकला जाईल!
म्हणून पायाभूत रंगसंगतीत कांहींही बदल न करता व अशोक चक्रासारखे चिन्हही मध्यावरच ठेऊन मी एक नव्या रूपात आपला तिरंगी ध्वज योजला.
यात सध्याच्या निरंगी ध्वजाचा अवमान करण्याचा अर्थातच हेतू नाहींय्. उलट त्याला एक नवे आणि सरस रूप द्यायचा प्रयत्न मी केला आहे.
खालचा दुवा उघडल्यास आपल्याला हे नवे रूप पहाता येईल. ते पाहून आपले मत मला कळवावे ही विनंती.
http://lh6.ggpht.com/_O27mefLixak/TE4-qkaVLMI/AAAAAAAACCA/mB5MNELOlqM/Modified%20Indian%20National%20Flag.JPG
धन्यवाद व प्रणाम.
सुधीर काळे
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त....!
ध्वज बघितला..
भारतीय++
त्या XXXXना झेंडा निट लावता
आपण निवडून दिलेले आपले राज्यकर्ते कसे आहेत ते पहा ना!
जरा बच के
काका हिरवा रंग कमी झाला आणि
सहमत रे गणपा. या भगव्या
+१
लेख छान आहे. आपला ध्वज उलटा
नवीन ध्वज हा पलायनवाद आहे.
आपल्या ध्वजातला भगवा रंग =
एक तर आपल्या राज्यकर्त्यांकडे
नाही मी काय म्हणते - जर
पण मी काय म्हणतो ते तर ऐका...
जेव्हा भारताचा झेंडा वारंवार
पंगा जी..
जर्मनीतल्या परिषदेचे उदाहरण कुणीच लक्षात घेतलेले नाहीं!
'पंगां'चा प्रतिसाद त्यातल्या 'पर्स्पेक्टिव्ह'वरून आवडला!
कसचे कसचे
सुरेख !
असंच म्हणतो
कशाला भांडताय.. पुढच्यावेळी
पाकिस्तानचा बालिशपणा..
सारे जहाँ से अच्छा हिन्दोसितां हमारा !
ध्वजाचे चित्र
हो का ? 'जशी दृष्टी, तशी च सृष्टी' काय करणार ??
आस्पेक्ट रेशो मधे घोटाळा
पण समजा पाकड्यांनी आपल्या
पंगाचा विस्तृत प्रतिसाद
जाउदे हो ! आपण हिरव्या
तुझा प्रतिसाद आवडला