Bumper Sticker spotted in Erie, Colorado. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
वरील छायाचित्रातील "Just ask the Indian" मधील इंडीयन म्हणजे भारतात ज्यांना रेड इंडीयन म्हणतात (हा शब्द प्रयोग येथे चांगला समजला जात नाही म्हणून मग "इंडीयन" अथवा "नेटीव्ह अमेरिकन्स" असे म्हणतात).
मला त्या बंपर स्टीकर्सचे कारण समजले नाही मात्र कदाचीत त्यात असे म्हणायचे असेल की इथल्या नेटिव्हांनी युरोपातून आलेल्या लोकांवर विश्वास ठेवला, त्यांच्या सरकारवर पण विश्वास ठेवला आणि नंतर काय झाले ते माहीत आहेच...
असेच अमेरिकेवरील अजून एक मजेशीर अमेरिकेतीलच बंपरस्टिकर:
बुशचे राष्ट्राध्यक्षपद ज्या दिवशी संपणार होते त्यावरून पण बंपर स्टिकर्स आणि संगणकासाठी काउंट डाऊन सुरू होते:
१८व्या आणि १९व्या शतकात अमेरिकेच्या केंद्र सरकारने नेटिव्ह अमेरिकनांच्या जमातींशी एक-एक करार करून ते मोडले, त्याचा संदर्भ असेल. (अगदी शेवटी आजचे जे ओक्लहोमा राज्य होते, ते "इंडियन टेरिटरी" म्हणून स्वतंत्र ठेवण्याचा करार केला होता - तोही गेलाच.)
कोलोराडो मधल्या स्टिकरचे ताज्या बातम्यांपैकी असेही कारण असू शकेल - अमेरिकेच्या केंद्र सरकारकडे नेटिव्ह राष्ट्रांची काही अमानती संपत्ती (इंडियन ट्रस्ट - अमेरिकेच्या केंद्रीय गृहखात्याचे संकेतस्थळ) होती. ती कुठे कधी कशी नाहिशी झाली, त्याबद्दल कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. याविषयी कोर्ट-खटले चालू आहेत.
नेटिव्ह अमेरिकनांना साधारणपणे "गोर्या" सरकारबद्दल फार अविश्वास असतो.
"बुरी नजर देखनेवाले तेरा मूह काला"हा बर्याच वेळा दिसतो.
"देखो मगर प्यार से"
"१३ मेरा ७" रिक्षाच्या मागे.
८० च्या दशकात "हम दो हमारे दो",९०% रिक्षांच्या मागे लिहिलेले असायचे.
आणि एस्.टी च्या मागे "तांबी वापरा" असे लाल अक्षरात.
"आपकी जिंदगी बिस्कूटपे ड्रायव्हर की जिंदगी ब्रेकपे"
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
वा !! छाण धागा आहे !! मस्त रे पाषाणभेदा !!
अवांतर :
नविन नियम लागू झाल्याने मनमोकळा प्रतिसाद लिहू शकत नाही मित्रा !
ह्या विभागात एक लय भारी प्रतिदास टाकणार होतो !!
पण असो .. तुझे दुर्दैव .. लेट काढलास धागा !!
(नमोगती मिपाकर) टारझन
सद्ध्या सुतकी चेहरे करून बसलो आहोत !!
टारुभाऊ, ब्रेक मारा ब्रेक ...!!!
मजेशीर प्रतिसाद. असो.
आम्ही एक ट्रक पाहिला होता काही काळापुर्वी, त्यावर लिहले होते "चपला घाला आणि चालु लागा" , आम्हाला त्याचा अर्थ काही केल्या समजला नाही पण तुम्हाला म्हणुन सांगतो आहे ...
बाकी असे अजुन बरेच आहे पण ....
------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
आम्ही एक ट्रक पाहिला होता काही काळापुर्वी, त्यावर लिहले होते "चपला घाला आणि चालु लागा" , आम्हाला त्याचा अर्थ काही केल्या समजला नाही पण तुम्हाला म्हणुन सांगतो आहे ...
=)) =)) =)) =))
आपणांस आमचे मन कळते , हे कळोन आणंद झाला ! ह्यातलंच काही तरी लिहीणार होतो , पण हल्ली भक्तिमान लोकं फार झालेत , ते म्हणतात समर्थन करणारेच काड्या सारतात :) असो "सॉरी भक्तिमान" म्हण पाहू !!
आणि हो , तुला भक्तिमान माहित नसला तर त्याच्या नावाने रोज खरडींतून बोंबा ठोक !! अरे कुत्र पण विचारत नाही रे पलिकडच्या गल्लीत .. मग चर्चेत घ्यायला काही करायला नको ?
टिप : भक्तिमान हे माझ्या भक्तिचे प्रतिक आहे, त्याचा कोणी आपल्याशी संबंध लावल्यास आणि त्याची लाल झाल्यास आम्ही जबाबदार नाही .
टिप रिकामी झाली .
डाण्या खरं तर तुला खरड करणार होतो , पण खरडींचे नियम अजुन स्ट्रिक्ट आहेत .. म्हणूनंच इथं खरडलं ..
- (चाटूंचा महामेरू) भक्तिमान
सांग लीला अ ३० का ? ( ट्रकवाला सांगलीचा असावा)
पुरंदरची रानी. ---आणखी येक टरकवाला.
कविता, सोनम, मीलन, रानी, बच्चू --खडीचा डंपर
थांब लक्समी कुक्कु लावते-- पाण्याचा ट्यांकर.
बुरी नजरवाले तेरा मुह काला
ए रिक्षावाला नाही ओ रिक्षावाले म्हना-- कुठे लिहिलेले असेल ते वोळखा?
दादांचा आशिर्वाद.
तात्यांची कृपा.--- हे कुठे लिहिलेले आहे ते ही वोळखा.
हल्लीच पाहिलेलं एकः
गाडीच्या मागे शिवरायांचं चित्र आणी खाली लिहिलेलं "बघतो काय? मुजरा कर!"
----------------------------------------------------------------------------------------
एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी ||
रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी ||
ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!
१.स्पिड किल्स सो किल स्पिड.
२.१३ मेरा दिल १
३.अयोध्येचा राजा ( प्रभू रामचन्द्रांच्या चित्रासहित, लालबाग च्या राजाच्या चाली वर )
४.सित्त ? ( अर्थ सांगा ?)
५. ए३० का ऊ ७ ?( ऊसामध्ये येणार का?)
६. विदर्यांथ्यांची रिक्शा , नका पाहू परिक्षा ( य म का सहित )
४.सित्त ? ( अर्थ सांगा ?)
धुळ्याकडं भांग खाऊन टु्ण्ण होणे याला सित्त म्हणतात. मुळात तो सित्ताराम या शब्दावरून आला आहे. हा शब्द भांगखोरांमधला अभिवादनाचा शब्द असल्याचे ऐकलेले आहे. त्यातून पुढे 'सित्त' झाले. एखाद्याने दुसऱ्याला 'सित्त?' असे विचारले की, त्याचा अर्थ, "टुण्ण?" असा असतो. :)
आता तुम्ही कुठं काय पाहिलंत हे मात्र माहिती नाही. त्यामुळं अर्थाची छटा वेगळी असावी.
एका ट्रकच्या मागे लिहीले होते,
"असं काय बघतोस रागानं
ओव्हरटेक केली आहे वाघानं"
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
या ट्रकच्या 'पार्श्वभाग' वर काय लिहले असेल याचा विचार करतोय्,जमल्यास चित्र झूम करुन पहावे!!!
http://2.bp.blogspot.com/_uAkB9CS_dXE/SfRqgr-lh2I/AAAAAAAADrE/4VuDoc79NHA/s400/india_truck.jpg
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
बहुतेक
"पाउल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे"
असे काहीसे लिहिले असावे! ;)
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखारूह की शायरी
लहानपणी आईच्या नोकरीमुळे बर्याच शाळा बदलल्या.. त्या निमित्ताने दर दोन आठवड्याला प्रवास व्हायचा.. मी लहान म्हणून आपली गाडी लागली की नाही हे पाहायचे नि बसमध्ये शिरून आई नि तिच्या कडेवरच्या भावासाठी जागा पकडणे हे माझे काम असायचे...
तेव्हा प्रत्येक बसवर "सुरक्षित अंतर ठेवा" म्हणजे बसमधल्या प्रवाशांनी बसताना सुरक्षित अंतरावर बसावं यासाठी लिहिलेलं असावं असं मला सारखं वाटायचं (म्हणजे काय.. भांडणं होणार नाहीत ना!!!).... नि असं असतानाही ही माणसं एवढी गर्दी का करतात हे मला तेव्हा न सुटणारं कोडं होतं...
पुढे तिसरी चौथीत गेल्यावर कधीतरी याचा खरा अर्थ कळाला!!! :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
खूप वर्षांपूर्वी एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून) खालील ओळी लिहिलेल्या वाचल्या:
तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं
माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं
याचा विचार करून गाडी चालवा
(नाही तर दोघांना खड्ड्यात घालवा!)
लहानपणी एस. टी. ने प्रवास करताना जवळपास प्रत्येक एस. टी. मध्ये स्व च्छ ता रा खा असे लिहिलेले (छापलेले) असायचे. मी ते स्वच्छ तारा खा असेच वाचायचो. थोडे मोठे झाल्यावर लक्षात आले कि ते स्वच्छता राखा असे आहे.
"मजेशीर धागा "
वा ! हे आवडले .. कोणत्या ट्रक मागे लिहीलंय हे ?
कोल्हापुरात काही नादखुळे ट्रक फिरताना पाहिले .. त्यांच्या मागे "सजेशीर धागा " असे लिहीले होते
- टार्या नादखुळे
ट्रक - "मेरी चली तो तेरी क्युं जली"
रिक्षा - "देवा तू सगळ्यांचं भलं कर, पण सुरूवात माझ्यापासून कर"
रिक्षा - "वन्डे च की ओ" (माझा यावर अजुन विचार चालू आहे)
कोल्हापूरातील रिक्षा - तेंडुलकरचा फोटो आणि खाली "याचा नाद खुळा"
रिक्षा - "हाय हे असं हाय बग"
HORN OK PLEASE हा अॅनिमेशन पट कुणी बघीतला नाही काय?
माझ्या तर टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाचा शेवटला चेहरा लक्षात राहीला.
हा अॅनिमेशन पट "क्ले" अॅनिमेशन पट या कॅटेगरीतला आहे.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
मी सातार्यात एक ट्रॅक्स पाहीली होती, तिच्या मागच्या काचेवर "सासरेबुवांची कृपा " असे लिहीले होते.
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
सांगली परिसरात एका ४०७ च्या मागे-
"आबा कावत्यात!"
आणि एक दर्दी ट्रकवाला-
"सोना दिया सुनारको, पायल बना दिया..
दिल दिया दिलदार को, घायल बना दिया" :))
"Great Power Comes With Great Responsibilities"
प्रतिक्रिया
नविन
ह इंडीयन वेगळे
बंपर स्टिकरचे कारण
नेहमीचा
आणिबाणीच्या काळात
वा !! छाण
हा हा हा ...
आम्ही एक
हुच्च...
...
रिक्शा
एक रिक्शा
१२ के फूल
आणखी काही ...
चिटके तो
धक्का लागी बुक्का
सांग लीला
हा हा हा...
१.स्पिड
खान्देश
धन्यवाद ,
एक जुनेच वाक्य
'वाहनाच्या
या
इथे
सुरक्षित अंतर...
एस. टी. च्या मागे
पुण्यात
एका रिक्शाच्या मागे
स्व च्छ ता रा खा
काय एक एक डोकी चालतात...
आणखी एका ट्र्कचे मागे
कालच वाचले - एका ट्र्क मागे
मजेशीर
"मजेशीर
ट्रक - "मेरी
.
अजून एक
अरे पण
मी
;-)
(विषय दिलेला नाही)
अजून एक
दिल जलो का
भीऊ नकोस
ट्रकच्या पाठीमागे
ह्यो वाचलय का? शिकलेलि आई
पुण्यात एका रिक्षाच्या मागे
एका ट्रकच्या मागे ०१. "मालक
मी डेक्कनला एका टु-व्हीलरच्या