Skip to main content

दिवेलागण.

लेखक अशोक गोडबोले यांनी बुधवार, 30/04/2008 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरणाच्या काठावर झाली मंद दिवेलागण हळुहळू उजळे आतले तुळशीचे अंगण अज्ञाताच्या क्षितिजावरूनी येती उडुनी विहंग आळवीत सुस्वरे सुकोमल स्वप्नरागसुमरंग रुणझुणली पैंजणे अचानक फुलताना मोगरा पडले पाऊल तालावरती लयविव्हळ सुंदरा मोहरलेल्या झाडापाशी उतरे बालपण धावा करूनी थकलेले मग विसावले मीपण! आकाराचा हट्ट धरुनी मेघ निराकार चातकचोचीमधे पडावी आता जलधार. --अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2997
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

ओळ अन ओळ सुरेख! रुणझुणली पैंजणे अचानक फुलताना मोगरा पडले पाऊल तालावरती लयविव्हळ सुंदरा मोहरलेल्या झाडापाशी उतरे बालपण धावा करूनी थकलेले मग विसावले मीपण! हे तर एकदम मनाच्या आत कुठेतरी पोचले!:) सुमधुर, गेय आणि अर्थगर्भ रचनेसाठी अभिनंदन! चतुरंग

मोहरलेल्या झाडापाशी उतरे बालपण धावा करूनी थकलेले मग विसावले मीपण! किती सुंदर शब्द.....खूप आवडली.. =D>

बहुतेक आपण गोडबोले सरच असणार. 'स्वप्नरागसुमरंग' , 'लयविव्हळ सुन्दरा' हे शब्द आपलीच आठवण करुन देतात. खुप खुप दिवसांनी भेटल्यामुळे ' स्मरणाच्या काठावर......' सर्व उचंबळून आले. फार सुन्दर कवीता. या की एकदा किहीमला. चान्दोरकर [ सर ]

आकाराचा हट्ट धरुनी मेघ निराकार चातकचोचीमधे पडावी आता जलधार. छानच !!!!! (चातक प्रेमी) मदनबाण

रुणझुणली पैंजणे अचानक फुलताना मोगरा पडले पाऊल तालावरती लयविव्हळ सुंदरा -- फारच सुरेख ............. सुंदर कविता

आकाराचा हट्ट धरुनी मेघ निराकार चातकचोचीमधे पडावी आता जलधार. अतिशय सुंदर चेतन