मिपाच्या नवीन रूपाची सवय होते आहे. आवडलंय तर नक्कीच.
काही सदस्य सातत्याने लेख टाकून त्याला अपेक्षित प्रतिसाद आले नाहीत तर लेख काढून टाकताना दिसले आहेत. त्यासाठी स्वसंपादनाची सोय काढणे आवश्यक होते.
आता वर म्हटल्याप्रमाणे स्वसंपादनाची सुविधा काढली असल्यास ती परत चालू करावी ही आग्रहाची विनंती.
माझा आग्रह किरकोळ मुद्रित शोधनापलिकडे (नंदन, शब्द बरोबर आहे ना? ;-) ) आहे. - स्वसंपादनाची सुविधा नसणे हा लेखकाच्या मुलभूत ह्क्काची कोंडी करणारी बाब आहे.
कुठल्याही लेखाचे हक्क ते मिपावर प्रसिद्ध झाले असले तरी लेखकाच्याच स्वाधीन असतात. तेव्हा लेखन काढायचे किंवा प्रसिद्ध करायचे हे लेखकावर सोडणे उत्तम. केवळ संपादकांना वाटते म्हणून (लेखकाच्या इच्छेविरूद्ध) तो लेख मिपावर रहावे हे पटत नाही(लक्षात घ्या माझा मुद्दा लेखन प्रकाशित करण्याबद्दल आहे - ते "अप्रकाशित" करण्याबद्दल नव्हे. अप्रकाशनाचे हक्क आणि नियम मिपाच्या आधिकारिक धोरणात मांडलेले आहेत ते - मिपाच्या स्वास्थ्याचा विचार करता - मान्यच आहेत.). राहता राहिली बाब "काही सदस्यांची". मिसळपावच्या १०,०००वर सदस्य संख्या असलेल्या स्थळावर असे सद्स्य किती? त्यांचे लेखन मिपावर अढळ राहवे ही "काळजी" संपादकांना कशाला?
कृपया विचार व्हावा..
+१.
स्वसंपादनाची सोय असावी. अनेक चुका दुरुस्त करता येतात.
(संपादकांना त्रास होतो याची कल्पना आहे, त्याकरता सदस्याने उडवलेले लेखन संपादकांना काही काळ दिसेल अशी सोय केली तर उत्तम!)
स्वसंपादनाची सोय हवी.
-कितीतरी वेळा लेखमाला लिहिताना सर्व लेखांत मालिकेतल्या सर्व पुष्पांचे दुवे देणं सोयीचं ठरतं. हे दरवेळी संपादकांना सांगत राहावं काय? संपादक आपल्या जबाबदाऱ्या संभाळून संपादन सांभाळतात, तेव्हा त्यांच्यावरचा बोजा का वाढवावा?
-काही क्षुल्लक चुका होतात व त्यांवरून चर्चा भरकटण्याची शक्यता असते. अशा चुका वेळीच दुरुस्त करता आल्या तर बरं नाही का?
-काही मोठ्या चुका होतात, व त्या सुधारण्यासाठी लेख पुन: लिहिण्याशिवाय जवळपास पर्याय नसतो. इतर संस्थळांवरची गेल्या महिन्यातली किमान दोन उदाहरणं मला माहीत आहेत. अशा वेळी 'प्रिय संपादक, कृपया या परिच्छेदातल्या या ओळींऐवजी या ओळी घाला, व इकडे हा शब्द बदला' असं लिहिण्यापेक्षा संपादून टाकणं सोयीचं पडतं.
-काही वेळा आपला हा विशिष्ट लेख/कविता वाचकांना/संपादकांना आवडणार नाही किंवा तो चांगल्या अभिरुचीचा नाही अशी खात्री वाटते. काही प्रतिक्रियांनंतर तो अंदाज येतो.
-काही कवितांत वृत्ताच्या दृष्टीने वगैरे सुधारणा सुचवल्या जातात. त्या केल्या तर पुढच्या वाचकांचा अनुभव अधिक चांगला होतो.
हे इतके फायदे असताना, संभाव्य तोट्यांचा व्यर्थ बागुलबोवा होऊ नये असं वाटतं. अशा तोट्यांची ठोस उदाहरणं असतील तर गोष्ट वेगळी. त्यावरही उपाय म्हणून जर व्यवस्थापनाने आपल्या धोरणात स्वयंसंपादनाविषयी काही मार्गदर्शक तत्त्वं सांगितली तर तोटे कमी व्हायला मदतही होऊ शकेल. मार्गदर्शक तत्त्वांचा विषय निघालाच म्हणून - एकंदरीतच लेखनाविषयी, प्रतिसाद लेखनाविषयी मार्गदर्शक तत्त्वं आली तर बरं.
राजेश
इतर संस्थळांवरची गेल्या महिन्यातली किमान दोन उदाहरणं मला माहीत आहेत.
त्या संकेतस्थळापेक्षा कमीतकमी दहापट अधिक लेखन मिपावर होत असते. यावरून संपादकांवर पडणारा ताण ध्यानी यावा.
स्वसंपादनाची सुविधा असायलाच हवी मात्र लेखकास धागा उडवण्याचे स्वातंत्र्य असू नये. लेखकाला लेखन नको असल्यास मजकूर काढून टाकता यायला हवा मात्र धाग्यावर आलेल्या प्रतिसादांना उडवता येऊ नये.
सध्या (म्हणजे मिपाच्या पूर्वरूपातील सर्व सुविधा आत्ताहे आहेत असे गृहीत धरून) लेखकाला दोन सुविधा आहेत. मजकुर संपादीत करता येणे, धागा पूर्णपणे काढून टाकता येणे.
मजकुर काढून टाकल्यास प्रतिसाद तसेच राहतील, मूळ लेख मात्र दिसणार नाही. यामुळे प्रतिसादकांचे त्यांच्या लेखनाबाबतचे स्वातंत्र्य तसेच राहते.
धागा काढून टाकल्यास प्रतिसादही अप्राअशित होतात. काही प्रतिसाद अभ्यासपूर्ण, वाचनीय असतात तेही काढून टाकले जातात. प्रतिसाद अभ्यासपूर्ण नसले तरीही प्रतिसादकांचे त्यांच्या लेखनावरचे स्वातंत्र्य हरवायला नको.
अवांतर: झोपायला जाण्यापुर्वी हा प्रतिसाद देण्यासाठी पुन्हा प्रवेश करावा लागला. उद्या सरपंचांनी हा धागा उडवला तर माझी मेहनत वाया जाईल ना.
आधी स्वाक्षरीतला मजकूरही पूर्वदृष्यात दिसत असे. आता तसा दिसत नाही. स्वाक्षरीतला मजकूर काही गंभीर धाग्यांवर अयोग्य व अनुचित वाटल्यास आधी काढून टाकता येत असे. तसे करणे आता जमत नाही.
१) मिसळीचा फोटो नाहीये :(
२)ओव्हरॉल लूक बदललाय. पूर्वी एका वेबसाइटवर आहोत असे वाटायचे तर आता एखाद्याच्या ब्लॉगवर आल्यासारख वाटतय..भलतच अरुंद :(
३) नवे लेखन मुखप्रुष्ठावर नाहीये.
४) प्रसिद्ध करा / publlish या ऐवजी save button का आहे ?
बाकी तांत्रिक गोष्टी अजून पाहिल्या नाहीत..
पुर्वीच रुप हे भारदस्त वाटत होत जिथे अप्पा जोगळेकर वगैरे लोक मांड्या घालुन एकदा चर्चेला बसले कि नुसत पहात रहाव्...ग्यानबा तुकाराम ही आपण जिथुन वाचायला सुरु करतो तिथे ..डाव्या बाजुला असायचे..म्हणजे आरम्भी त्यांच दर्शन्. हे नव रुप उभट वाटते , पॉश आहे, पण भारदस्त पणा गेल्या सारखा वाटला. उण्या अधिक शब्दांसाठी क्षमस्व.
नीलकांत आणि सर्व नवनिर्माण कार्यकर्त्यांचे अभिनंदन! :)
आवडलेल्या गोष्टी -
१ - 'मिसळपाव' हा हेडिंगचा फाँट्साईज एकदम योग्य वाटतोय.
२ - फाँट सुरेख आहे एकदम नेटका आणि प्रोफेशनल वाटतो आहे.
३ - बाऊंस टु टॉप एकदम आवडेश! ;)
४ - ५० पेक्षा जास्त प्रतिसाद एकाच पानावर हुश्श! संपादकांची मोठी सोय बघितल्याबद्दल धन्यवाद कांता! ;)
आता काही सूचना -
१ - मिसळीचा फोटू वरती हवा म्हणजे हव्वाच. ती आपली आयडेंटिटी आहे राव, नसून कसे चालेल?
२ - वरती अनेकांनी म्हटल्याप्रमाणे कंटेंट्च्या पानाची रुंदी वाढवावी.
३ - उजवीकडच्या कॉलममधल्या क्रमवारीबद्दल थोडे - सर्वात वरती ज्ञानोबा आणि तुकारामाची तसबीर आणि स्वागत, त्याखाली मिपाचे धोरण,त्याखाली भाषा बदला, त्याखाली समृद्ध व्हावे असे काही असा क्रम अस्सला तर अधिक आवडेल.
४ - लिखाणाच्या खिडकीखाली Input format हे 'इनपुट फॉर्मॅट' असं आवडेल (तसेच इतरही ठिकाणच्या मेन्यू बाबत जिथे जिथे सुघट पर्यायी शब्द अस्तित्त्वात असतील तिथे मराठीच वापरा जिथे नसतील तिथे देवनागरीतूनच लिहा.
५ - लिखाण Save करा च्या ऐवजी प्रकाशित करा हा शब्द छान वाटतो. तसा बदल व्हावा.
गायब झालेले काही -
१ - माझे लेखन हा टॅब मला दिसत नाहीये! :( असे सगळ्यांनाच दिसते आहे की काही जणांनाच दिसते आहे?
२ - हजर सभासद वर टिचकले तर फॅटल एरर येते आहे :(
सध्या एवढेच. आणखीन वापरेन तसे कळवीनच.
'लेखन करा' वर टिचकी मारल्यावर प्रत्येक विभागावर दोन-तीन खुसखुशीत वाक्यांत त्या विभागाची (उदा. चर्चा, पाककृती) ओळख आहे. पण 'कौल' या विभागाची ओळख खालीलप्रमाणे इंग्रजी आहे. या विभागाचे वर्णन मराठीत करावे.
A poll is a question with a set of possible responses. A poll, once created, automatically provides a simple running count of the number of votes received for each response.
उदा. देवासमोर कौल लाऊन निर्णय घेण्याची परंपरा महाराष्ट्रात असल्याचे मराठी चित्रपट पाहतांना लक्षात येते. आजकालच्या समाजात मात्र लोकांचा कल पाहण्यासाठी जनताजनार्दनासमोर कौल लावला जातो. संकेतस्थळ हे तात्कालीन समाजाचे प्रतिबिंबच असल्याने सदस्य येथे कौल लाऊ शकतात. कौलात शक्य उत्तरांचे पर्याय दिलेले असतात. कौल लावल्यानंतर प्रत्येक पर्यायाला पडलेली मते आपोआपच मोजली जातात व पाहता येतात.
एकूण स्वरूप जास्त सोबर झाले आहे.
अजिबात न आवडलेली गोष्ट म्हणजे फॉण्ट.
आधीचा फॉण्ट सुबक दिसे. आता तो वाईट दिसतो आहे. (फा फॉ आणि क्रोमवर आधीही वाईट दिसायचा पण आय ई वर सुबक दिसायचा. तो आता आय ई वरही तसाच दिसतो. वाचनीयता कमी झाली.
मागच्या वेळी नवीन सर्वर वर मायग्रेट केले होते तेव्हाही एक दोन दिवस असा फॉण्ट दिसत होता. पण नंतर चांगला झाला होता.
नितिन थते
पुर्वीच्या मोड्युलमध्ये सही उपडेट केली तरी पुर्वी दिलेल्या प्रतिसादात सही बदलत नसे. नविन मोड्युलमध्ये बहुदा नविन सही सर्व जुन्या प्रतिसादांना लागु झाली आहे, व मागील सही ही प्रतिसादाचाच भाग असे राहिल्याने दोन दोन सह्या झाल्या आहेत असे वाटते.
-अंदाजपंचे
बहुदा जुने मॉड्युल सही प्रतिसादाच्या मजकुराला कॉकॅट करायचे, म्हणुन जुन्या सह्या मजकुरात अॅड झालेल्या आहेत. त्यामुळेच आधी सही बदलली तर जुन्या प्रतिसादात ती तशीच रहायची. आता एकदा सही बदलली की ती सगळीकडे रिफ्लेक्ट होईल असे वाटते.
नमस्कार,
या प्रयत्नाला आलेली भरभरून दाद उत्साह वाढवणारीच आहे.
१) मिसळीचा फोटो तर पाहीजेच. मात्र आधी सहज यांनी दिलेला फोटो आताच्या थीम मध्ये बसला नाहीये. आता मिसळपाववर सुंदरसा मिसळीचा फोटो कुणाला सूचवायचा असल्यास स्वागतच आहे.
२) फॉन्ट हा लवकरच पहिल्यासारखा करण्यात येईल. नाही केला तर तात्या सोडणार नाहीत नीलकांतला :)
३) डावीकडचा समास उजवी कडे आणण्याचे कारण म्हणजे सर्च इंजीनला मिसळपावचे साहित्य लवकर नोंदल्या जावेत हे होय. याला सर्च इंजीन ऑप्टीमायजेशन असे म्हणतात.
४) मुख्य साहित्याच्या आकारात वाढ आणि उजवा समास थोडा छोटा असा बदल करण्यात येईल.
५) खोदकाम नक्कीच करता येईल. आता हळूहळू हव्या तश्या साहित्याच्या याद्या करता येतील.
६) हजर सभासदचे पान परत तयार करण्यात येईल.
७) दूव्याचा रंग वेगळा करण्याचा सुध्दा विचार आहे.
८) नवीन बांधणीत अनेक जागी इंग्रजीचे मराठीकरण करायचे राहून गेले आहे. ते तातडीने करण्यात येईल. कुणाला यात म्हणजे मराठीकरणात सहभागी व्हायचे असल्यास इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सरपंचांना व्य.नि. केले तर स्वागतच आहे.
९)व्य.नि. व खरडवहीत सघन संपादक लावल्यावर दूवा देणे शक्य होईल.
१०) स्माईलीज सध्या स्थगीत ठेवल्या आहेत. लवकरच त्या परत लावण्यात येतील.
११)कौलच्या मजकूराबद्दल सूचनेचे स्वागत, योग्य तो बदल केला जाईल.
अन्य काही सूचना असल्यास कळवा. मिसळपावच्या नवनिर्माणात सहभागी व्हा.
- सरपंच
१) मिसळीचा फोटो तर पाहीजेच. मात्र आधी सहज यांनी दिलेला फोटो आताच्या थीम मध्ये बसला नाहीये. आता मिसळपाववर सुंदरसा मिसळीचा फोटो कुणाला सूचवायचा असल्यास स्वागतच आहे.
- काम प्रगतीपथावर आहे.
२) फॉन्ट हा लवकरच पहिल्यासारखा करण्यात येईल. नाही केला तर तात्या सोडणार नाहीत नीलकांतला Smile
- फॉन्ट लावला आहे.
३) डावीकडचा समास उजवी कडे आणण्याचे कारण म्हणजे सर्च इंजीनला मिसळपावचे साहित्य लवकर नोंदल्या जावेत हे होय. याला सर्च इंजीन ऑप्टीमायजेशन असे म्हणतात.
-- यावर अद्याप विचार चालला आहे.
४) मुख्य साहित्याच्या आकारात वाढ आणि उजवा समास थोडा छोटा असा बदल करण्यात येईल.
- बदल झालाय.
५) खोदकाम नक्कीच करता येईल. आता हळूहळू हव्या तश्या साहित्याच्या याद्या करता येतील.
- काम प्रगतीपथावर आहे.
६) हजर सभासदचे पान परत तयार करण्यात येईल.
- काम झालंय.
७) दूव्याचा रंग वेगळा करण्याचा सुध्दा विचार आहे.
- काम प्रगतीपथावर आहे.
८) नवीन बांधणीत अनेक जागी इंग्रजीचे मराठीकरण करायचे राहून गेले आहे. ते तातडीने करण्यात येईल. कुणाला यात म्हणजे मराठीकरणात सहभागी व्हायचे असल्यास इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सरपंचांना व्य.नि. केले तर स्वागतच आहे.
काम प्रगतीपथावर आहे.
९)व्य.नि. व खरडवहीत सघन संपादक लावल्यावर दूवा देणे शक्य होईल.
- काम झाले आहे.
१०) स्माईलीज सध्या स्थगीत ठेवल्या आहेत. लवकरच त्या परत लावण्यात येतील.
- परत लावल्या आहेत. :)
११)कौलच्या मजकूराबद्दल सूचनेचे स्वागत, योग्य तो बदल केला जाईल.
- बदल केला आहे.
४) मुख्य साहित्याच्या आकारात वाढ आणि उजवा समास थोडा छोटा असा बदल करण्यात येईल.
- बदल झालाय.
हा बदल अजूनही पुरेसा वाटत नाहीये. आधीच्या मिपाचे पान कसे रुंद होते तसे हवे. काही तांत्रिक अडचणी नसतील तर ते शक्य व्हावे असे वाटते त्याने मिपाचा हा "ब्लॉग"सदृश फील जायला मदत होईल!
नविन रुप छान आहे
पण
१. कुठल्याही लेखा खाली वाचनखुण साठवा
२. स्वतःच्या खात्यात साठवलेल्या वाचनखुणा
हे दोन्ही दिसत नाही. अनेक चांगले लेख आणी पाकृ. वाचनखुणात साठवल्या होत्या
एकंदर स्वरुप आवडले . अभिनंदन !!
मात्र मिसळपावचा पुर्वीचा फोटो मस्ट
अमोल केळकर
----------------------------------------------------------------------
'भविष्याच्या अंतरंगात'भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा
अजून एक, खरडवही भरपूर स्क्रोल करावी लागतेय... ;(
प्रत्येक खरडीमधे खरडकाचा फोटो उजव्या किंव्या डाव्या कोपर्यात देण्याची सोय करता आली बघा हो सरपंच....
आधी फोटो आणी त्याखाली खरडीने स्पेस वाया जातेय.. :)
एकूणच मिपाचे हे नवे रूप आवडले....
सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन...
नवे लेखन सदरात 'सगळे नवे लेखन' आणि 'माझे लेखन' या दोन टॅब दिसतात.
पण 'माझे लेखन' उघडायला गेलं की 'पान सापडले नाही' असा मेसेज येतो आणि Error चा Stack Trace येतो.
warning: array_key_exists() [function.array-key-exists]: The first argument should be either a string or an integer in /home/misavcom/public_html/sites/all/modules/views/includes/view.inc on line 1296.
warning: mysql_real_escape_string() expects parameter 1 to be string, object given in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 321.
warning: Illegal offset type
.
.
.
वगैरे वगैरे
महिन्याभराच्या सुट्टीनंतर आलो अन आता झटकन मिसळपावचे हे "देखणे" रुपडेच समोर झळकले. फार फार आनंद झाला हा बदल पाहून. आजचा दिवस हा बदल पाहण्यातच जाईल यात शंका नाही.
श्री.नीलकांत आणि या प्रक्रीयेत सामील असलेल्या अ पासून ज्ञ घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन. अनेकविध सूचनांना वर स्थान दिलेले वाचलेच आणि त्यानुसार स्वीकारण्यायोग्य बाबींचा संपादकीय पातळीवर विचार होणारच यात संदेह नाही, तरीही एक छोटीशी सूचना करण्याचा मोह होत आहे. ती अशी :
"स्माईलीज" आवश्यक आहेत हा विचार वर कित्येकांनी दिला आहे. त्यानुसार कार्यवाही होईलच, पण तसे करत असताना स्माईलींचा "अतिरेक" टाळता येईल अशी काही आज्ञावली करता येत असेल तर करावे. म्हणजे "हसून हसून लोळागोळा झालोय" ही भावना व्यक्त करण्यासाठी २५-५० तशा स्माईली टाकायच्या हे कितपत योग्य आहे? मिसळपाव असो वा अन्य संस्थळे, या सेवा सदस्यांना मोफत मिळत असतात, पण म्हणून बेसुमार बँडविड्थ वापरावी, असे करू नये असे वाटते. त्यापेक्षा कोणत्याही कारणासाठी एकच स्माईली प्रकाशीत होईल असा प्रोग्राम केल्यास ती बाब स्वागतार्ह वाटेल.
इन्द्र
एक दोन सूचना / विनंती -
background color हा पूर्वी लख्ख पांढरा होता. आता थोडा फिकट आहे. तो तसाच ठेवला तर छान वाटेल. थोडा उदास वाटतो असा dull रंग.
इतरांनी म्हटल्याप्रमाणे मिसळीचा फोटो हवाच. पण वरची / खालची रंगाची पट्टी ही gradient करून गडद रंगाकडे छटा वाढत जाते. त्याच्या उलट केल्यास उल्हसित वाटेल. तपकिरी कडे झुकणारा लाल आहे त्यापेक्षा जुना bright रंग जास्त चांगला वाटेल आणि जुन्या मिपाशी तो एक दुवा राहील.
सर्व branding मध्ये एक विशिष्ट रंगछटा वापरली जाते. त्याच्या सलगतेतून त्या नावाशी, उत्पादनाशी, संस्थेशी संबंध जोडता येतो. तसा वापर त्या रंगाच्या पट्टीचा मिपाने करावा अशी विनंती.
साधारण आत्ताचा रंग carmine / crimson कडे जाणारा आहे त्याऐवजी bright red / scarlet चा वापर छान वाटेल.
रंगरुप हे प्रसन्न वाटावं अशी इच्छा.
तसेच - मिसळपाव हा शब्द त्या चंदेरी gradient मध्ये विनाकारण प्रोफेशनल वाटतो. नेहमीची हक्काची सलगी जाणवत नाही. त्याचीही रंगछटा थोडी ब्राईट करून इतर फॉन्ट प्रमाणे फॉन्ट वापरल्यास चांगले वाटेल. सध्या मराठीतला Times New Roman / Tahoma किंवा तत्सम formal font वाटतो आहे.
बॅक टू टॉप जबरदस्त सोय! पण जुन्याप्रमाणे सर्व प्रकारचे लेखन एकत्र सुरुवातीला दिसण्याची सोय असेल तर उपयोग होईल. प्रत्येक लेखन प्रकारात जाऊन शोधण्यापेक्षा ते फार बरे पडते.
नवनिर्माण मंडळाच्या कष्टांचे, प्रयत्नांचे कौतुक करावे तेवढे थोडे!
नवीन रुपडे उतम आहेच. नीलकांत आणि तांत्रिक टीम (म्हणजे चेटुक वगैरे करणारे नव्हेत) चे हार्दिक अभिनंदन.
बाकी,
- मिसळीचा फोटो हवाच
- स्मायलीज हवेच
- उजव्या बाजूच्या टॅब्सचा क्रम ग्यानबा-तुकाराम, नॅव्हिगेशन, मिपाचे धोरण, समृद्ध व्हावे असे काही आणि शेवटी हजर सभासद असे असल्यास उत्तम.
इतर ठिकाणी जिथे इंग्रजी आहे तिथे मराठी करावे ही विनंती.
- भट
सध्याचा background color मला पूर्वीच्या लख्ख रंगापेक्षा जास्त आवडला. सौम्य असल्याने डोळ्यांना सुखद वाटतोय.
जुना भडक लाल रंगाचा हपिसात बसून मिपा मिपा खेळणार्यांना त्रासदायक होतो. तशा लाल रंगामुळे सर्वांचे लक्ष उगाचच वेधले जाते. नवीन रंग छान आहे.
त्यामुळे समस्त हपिसकरीण जनतेतर्फे सरकारचे आभार !
मिसळीचे चित्र जुन्या मिपाशी दुवा म्हणून राहिल. त्या सूचनेवरही विचार व्हावा.
५०+ प्रतिसाद एकाच पानावर येताहेत, स्पीडही वाढल्यासारखा वाटत आहे ... Back to Top चा पर्याय ही छान आहे.
उजव्या बाजूला असलेला समास जुन्या लोकांना काही काळ गैरसोईचा वाटू शकतो पण हा सवयीचा प्रश्न आहे. थोडे दिवसांनी नवीन रूपड्याची सवय होऊ द्यावी असे वाटते.
हे सर्व करण्यामागे खूप कष्ट असणार आहेत हे जाणवते; तांत्रिकला टिमला आमचा सलाम !
अभिरत
वा ! चांगले झाले आहे नवे रुप.
जुनी रंगसंगती भडक असल्याने आमच्यासारखे लोक भडक लिहित होते ते आता नव्या रंगसंगतीत गप्प बसतील असे वाटते.
व्यनी अजुन चालु नसावा. अडत नाही...सहजरावांना अडचण होईल असो
प्रतिक्रिया
-१
+१. स्वसंपादनाची सोय असावी.
+१ +१ +१....
+१
काय
फरक
धाग्याचे स्वरूप, स्वाक्षरी आणि पूर्वदृष्य
१) मिसळीचा फोटो नाहीये
सहमत
आवडले
वा, मिसळ नवीन डिझाईनच्या डिशमध्ये दिलेली आवडली!
माझे लेखन
माझे लेखन
नवीन मिपा आवडले. तूर्तास
कौल
स्वागत
फॉण्ट पण ठीक झाला
सह्यांच्या गोंधळ झाला आहे
नाही
नाय हो मास्तर! आमच्या सगळ्या
हो बॉ
अंदाज
बहुदा
सूचनांचे स्वागत...
सरपंच, दुसरा कुठला नको फोटो.
केलेली कामे...
धन्यवाद व अभिनंदन
धन्यवाद रे निलकांता, ही '=))'
४) मुख्य साहित्याच्या आकारात
वा.
स्मायली
छान
छान आहे
नवीन रुप जुन्या रुपाच्या
एकंदर स्वरुप आवडले . अभिनंदन
मिसळीचे चित्र हवे होते....
अजून एक, खरडवही भरपूर स्क्रोल
+ १
मस्तच
एकूणच मिपाचे हे नवे रूप
आताची रंगसंगती डोळ्याला भावत
मस्त
नवे रुपडे..
मोहक (आणि स्माईलीबाबत एक सूचना)
छान बदल.
नवीन रुपडे उतम आहेच. नीलकांत
अतिशय सुंदर ..
छान दिसतयं मिसळ्पाव. पण
व्वा...क्या बात है....
वा ! चांगले झाले आहे नवे