Skip to main content

नवनिर्माण सूचना.

लेखक सरपंच यांनी रविवार, 25/07/2010 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाव नवीन स्वरूपात सादर करतांना आनंद होतो आहे. मुख्य तांत्रीक बदलानंतर आज मिपा नव्या दमाने पुढे जायला तयार आहे. आता सर्व सदस्यांना विनंती आहे की मिसळपावच्या ह्या नवीन रूपातील काही दोष आढळल्यास ते येथे या धाग्यावर लिहावेत. मिसळपावच्या स्वरूपाबद्दल केवळ येथेच चर्चा व्हावी ही विनंती. जे आवडलं त्याचे कौतुक आणि जे राहून गेलंय त्याची आठवण आणि ते पुर्ण होई पर्यंत त्याचा पाठपुरावा. हे सर्व येथे व्हावं. आता मुख्य काम झाल्यामुळे अधिकाधीक नवीन सोई देण्याकडे कल असेल. तुमच्या सूचनांचे स्वागतच आहे. - सरपंच

वाचने 25012
प्रतिक्रिया 136

प्रतिक्रिया

In reply to by क्रेमर

पुर्वीच्या मोड्युलमध्ये सही उपडेट केली तरी पुर्वी दिलेल्या प्रतिसादात सही बदलत नसे. नविन मोड्युलमध्ये बहुदा नविन सही सर्व जुन्या प्रतिसादांना लागु झाली आहे, व मागील सही ही प्रतिसादाचाच भाग असे राहिल्याने दोन दोन सह्या झाल्या आहेत असे वाटते. -अंदाजपंचे

In reply to by Nile

बहुदा जुने मॉड्युल सही प्रतिसादाच्या मजकुराला कॉकॅट करायचे, म्हणुन जुन्या सह्या मजकुरात अ‍ॅड झालेल्या आहेत. त्यामुळेच आधी सही बदलली तर जुन्या प्रतिसादात ती तशीच रहायची. आता एकदा सही बदलली की ती सगळीकडे रिफ्लेक्ट होईल असे वाटते.

नमस्कार, या प्रयत्नाला आलेली भरभरून दाद उत्साह वाढवणारीच आहे. १) मिसळीचा फोटो तर पाहीजेच. मात्र आधी सहज यांनी दिलेला फोटो आताच्या थीम मध्ये बसला नाहीये. आता मिसळपाववर सुंदरसा मिसळीचा फोटो कुणाला सूचवायचा असल्यास स्वागतच आहे. २) फॉन्ट हा लवकरच पहिल्यासारखा करण्यात येईल. नाही केला तर तात्या सोडणार नाहीत नीलकांतला :) ३) डावीकडचा समास उजवी कडे आणण्याचे कारण म्हणजे सर्च इंजीनला मिसळपावचे साहित्य लवकर नोंदल्या जावेत हे होय. याला सर्च इंजीन ऑप्टीमायजेशन असे म्हणतात. ४) मुख्य साहित्याच्या आकारात वाढ आणि उजवा समास थोडा छोटा असा बदल करण्यात येईल. ५) खोदकाम नक्कीच करता येईल. आता हळूहळू हव्या तश्या साहित्याच्या याद्या करता येतील. ६) हजर सभासदचे पान परत तयार करण्यात येईल. ७) दूव्याचा रंग वेगळा करण्याचा सुध्दा विचार आहे. ८) नवीन बांधणीत अनेक जागी इंग्रजीचे मराठीकरण करायचे राहून गेले आहे. ते तातडीने करण्यात येईल. कुणाला यात म्हणजे मराठीकरणात सहभागी व्हायचे असल्यास इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सरपंचांना व्य.नि. केले तर स्वागतच आहे. ९)व्य.नि. व खरडवहीत सघन संपादक लावल्यावर दूवा देणे शक्य होईल. १०) स्माईलीज सध्या स्थगीत ठेवल्या आहेत. लवकरच त्या परत लावण्यात येतील. ११)कौलच्या मजकूराबद्दल सूचनेचे स्वागत, योग्य तो बदल केला जाईल. अन्य काही सूचना असल्यास कळवा. मिसळपावच्या नवनिर्माणात सहभागी व्हा. - सरपंच

In reply to by सरपंच

सरपंच, दुसरा कुठला नको फोटो. जो आधि मिसळ्पावाचा फोटो होता तोच लावा. स्वत:च घर सोडुन दुसर्‍यच्या घरात गेलो आहे रहायला अस वाटतय.

In reply to by सरपंच

१) मिसळीचा फोटो तर पाहीजेच. मात्र आधी सहज यांनी दिलेला फोटो आताच्या थीम मध्ये बसला नाहीये. आता मिसळपाववर सुंदरसा मिसळीचा फोटो कुणाला सूचवायचा असल्यास स्वागतच आहे. - काम प्रगतीपथावर आहे. २) फॉन्ट हा लवकरच पहिल्यासारखा करण्यात येईल. नाही केला तर तात्या सोडणार नाहीत नीलकांतला Smile - फॉन्ट लावला आहे. ३) डावीकडचा समास उजवी कडे आणण्याचे कारण म्हणजे सर्च इंजीनला मिसळपावचे साहित्य लवकर नोंदल्या जावेत हे होय. याला सर्च इंजीन ऑप्टीमायजेशन असे म्हणतात. -- यावर अद्याप विचार चालला आहे. ४) मुख्य साहित्याच्या आकारात वाढ आणि उजवा समास थोडा छोटा असा बदल करण्यात येईल. - बदल झालाय. ५) खोदकाम नक्कीच करता येईल. आता हळूहळू हव्या तश्या साहित्याच्या याद्या करता येतील. - काम प्रगतीपथावर आहे. ६) हजर सभासदचे पान परत तयार करण्यात येईल. - काम झालंय. ७) दूव्याचा रंग वेगळा करण्याचा सुध्दा विचार आहे. - काम प्रगतीपथावर आहे. ८) नवीन बांधणीत अनेक जागी इंग्रजीचे मराठीकरण करायचे राहून गेले आहे. ते तातडीने करण्यात येईल. कुणाला यात म्हणजे मराठीकरणात सहभागी व्हायचे असल्यास इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सरपंचांना व्य.नि. केले तर स्वागतच आहे. काम प्रगतीपथावर आहे. ९)व्य.नि. व खरडवहीत सघन संपादक लावल्यावर दूवा देणे शक्य होईल. - काम झाले आहे. १०) स्माईलीज सध्या स्थगीत ठेवल्या आहेत. लवकरच त्या परत लावण्यात येतील. - परत लावल्या आहेत. :) ११)कौलच्या मजकूराबद्दल सूचनेचे स्वागत, योग्य तो बदल केला जाईल. - बदल केला आहे.

In reply to by नीलकांत

धन्यवाद व अभिनंदन. मिपाची सिग्नेचर स्मायली =)) मात्र चालत नाहीये बहुतेक. :( आणि स्मायलींचा मेनू नाही.

In reply to by नीलकांत

४) मुख्य साहित्याच्या आकारात वाढ आणि उजवा समास थोडा छोटा असा बदल करण्यात येईल. - बदल झालाय. हा बदल अजूनही पुरेसा वाटत नाहीये. आधीच्या मिपाचे पान कसे रुंद होते तसे हवे. काही तांत्रिक अडचणी नसतील तर ते शक्य व्हावे असे वाटते त्याने मिपाचा हा "ब्लॉग"सदृश फील जायला मदत होईल!

५०च्या पुढचे प्रतिसादही एकाच पानावर..... पार्टीईईईईईईईईईईईईईई

स्मायलींचा प्रॉब्लेम झालेला दिसतो. इकडे मास्तर लोळतायत पण लोळताना दिसत नाहियेत. हायपरलिंकचा रंगही डिस्टिंक्ट दिसत नाही.

नविन रुप आवडले निलकांत.. मस्तच.. :) पण जुन्यालाही मिस करतोय.

नविन रुप छान आहे पण १. कुठल्याही लेखा खाली वाचनखुण साठवा २. स्वतःच्या खात्यात साठवलेल्या वाचनखुणा हे दोन्ही दिसत नाही. अनेक चांगले लेख आणी पाकृ. वाचनखुणात साठवल्या होत्या

नवीन रुप जुन्या रुपाच्या तोडीचे नाही. जुन एकदम युनिक होत. स्मायलीज पण नाहीत. ड्रुपल ६ व आणून तेच जुन रुप आणता आल तर बघा. मिपाच वेगळपण त्या रुपातच होत.

एकंदर स्वरुप आवडले . अभिनंदन !! मात्र मिसळपावचा पुर्वीचा फोटो मस्ट अमोल केळकर ---------------------------------------------------------------------- 'भविष्याच्या अंतरंगात'भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा

अजून एक, खरडवही भरपूर स्क्रोल करावी लागतेय... ;( प्रत्येक खरडीमधे खरडकाचा फोटो उजव्या किंव्या डाव्या कोपर्‍यात देण्याची सोय करता आली बघा हो सरपंच.... आधी फोटो आणी त्याखाली खरडीने स्पेस वाया जातेय.. :)

नविन रुपडे पहिल्या फटक्यात आवडले.... सर्व टिमचे अभिनंदन....

एकूणच मिपाचे हे नवे रूप आवडले.... सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन... नवे लेखन सदरात 'सगळे नवे लेखन' आणि 'माझे लेखन' या दोन टॅब दिसतात. पण 'माझे लेखन' उघडायला गेलं की 'पान सापडले नाही' असा मेसेज येतो आणि Error चा Stack Trace येतो. warning: array_key_exists() [function.array-key-exists]: The first argument should be either a string or an integer in /home/misavcom/public_html/sites/all/modules/views/includes/view.inc on line 1296. warning: mysql_real_escape_string() expects parameter 1 to be string, object given in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 321. warning: Illegal offset type . . . वगैरे वगैरे

आताची रंगसंगती डोळ्याला भावत नाही. पूर्वीची रंगसंगती दिलखेचक होती. असो! तरीही नविन रुपडे आवड्ले हे निश्चित. :)

एकडम बेश्ट...

नवे रुप वेगळे वाटले, आता जसेजसे वापरात येईल तसतसे फायदेतोटे समजत जातील.. अभिनंदन! स्वाती

महिन्याभराच्या सुट्टीनंतर आलो अन आता झटकन मिसळपावचे हे "देखणे" रुपडेच समोर झळकले. फार फार आनंद झाला हा बदल पाहून. आजचा दिवस हा बदल पाहण्यातच जाईल यात शंका नाही. श्री.नीलकांत आणि या प्रक्रीयेत सामील असलेल्या अ पासून ज्ञ घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन. अनेकविध सूचनांना वर स्थान दिलेले वाचलेच आणि त्यानुसार स्वीकारण्यायोग्य बाबींचा संपादकीय पातळीवर विचार होणारच यात संदेह नाही, तरीही एक छोटीशी सूचना करण्याचा मोह होत आहे. ती अशी : "स्माईलीज" आवश्यक आहेत हा विचार वर कित्येकांनी दिला आहे. त्यानुसार कार्यवाही होईलच, पण तसे करत असताना स्माईलींचा "अतिरेक" टाळता येईल अशी काही आज्ञावली करता येत असेल तर करावे. म्हणजे "हसून हसून लोळागोळा झालोय" ही भावना व्यक्त करण्यासाठी २५-५० तशा स्माईली टाकायच्या हे कितपत योग्य आहे? मिसळपाव असो वा अन्य संस्थळे, या सेवा सदस्यांना मोफत मिळत असतात, पण म्हणून बेसुमार बँडविड्थ वापरावी, असे करू नये असे वाटते. त्यापेक्षा कोणत्याही कारणासाठी एकच स्माईली प्रकाशीत होईल असा प्रोग्राम केल्यास ती बाब स्वागतार्ह वाटेल. इन्द्र

एक दोन सूचना / विनंती - background color हा पूर्वी लख्ख पांढरा होता. आता थोडा फिकट आहे. तो तसाच ठेवला तर छान वाटेल. थोडा उदास वाटतो असा dull रंग. इतरांनी म्हटल्याप्रमाणे मिसळीचा फोटो हवाच. पण वरची / खालची रंगाची पट्टी ही gradient करून गडद रंगाकडे छटा वाढत जाते. त्याच्या उलट केल्यास उल्हसित वाटेल. तपकिरी कडे झुकणारा लाल आहे त्यापेक्षा जुना bright रंग जास्त चांगला वाटेल आणि जुन्या मिपाशी तो एक दुवा राहील. सर्व branding मध्ये एक विशिष्ट रंगछटा वापरली जाते. त्याच्या सलगतेतून त्या नावाशी, उत्पादनाशी, संस्थेशी संबंध जोडता येतो. तसा वापर त्या रंगाच्या पट्टीचा मिपाने करावा अशी विनंती. साधारण आत्ताचा रंग carmine / crimson कडे जाणारा आहे त्याऐवजी bright red / scarlet चा वापर छान वाटेल. रंगरुप हे प्रसन्न वाटावं अशी इच्छा. तसेच - मिसळपाव हा शब्द त्या चंदेरी gradient मध्ये विनाकारण प्रोफेशनल वाटतो. नेहमीची हक्काची सलगी जाणवत नाही. त्याचीही रंगछटा थोडी ब्राईट करून इतर फॉन्ट प्रमाणे फॉन्ट वापरल्यास चांगले वाटेल. सध्या मराठीतला Times New Roman / Tahoma किंवा तत्सम formal font वाटतो आहे. बॅक टू टॉप जबरदस्त सोय! पण जुन्याप्रमाणे सर्व प्रकारचे लेखन एकत्र सुरुवातीला दिसण्याची सोय असेल तर उपयोग होईल. प्रत्येक लेखन प्रकारात जाऊन शोधण्यापेक्षा ते फार बरे पडते. नवनिर्माण मंडळाच्या कष्टांचे, प्रयत्नांचे कौतुक करावे तेवढे थोडे!

नवीन रुपडे उतम आहेच. नीलकांत आणि तांत्रिक टीम (म्हणजे चेटुक वगैरे करणारे नव्हेत) चे हार्दिक अभिनंदन. बाकी, - मिसळीचा फोटो हवाच - स्मायलीज हवेच - उजव्या बाजूच्या टॅब्सचा क्रम ग्यानबा-तुकाराम, नॅव्हिगेशन, मिपाचे धोरण, समृद्ध व्हावे असे काही आणि शेवटी हजर सभासद असे असल्यास उत्तम. इतर ठिकाणी जिथे इंग्रजी आहे तिथे मराठी करावे ही विनंती. - भट

सध्याचा background color मला पूर्वीच्या लख्ख रंगापेक्षा जास्त आवडला. सौम्य असल्याने डोळ्यांना सुखद वाटतोय. जुना भडक लाल रंगाचा हपिसात बसून मिपा मिपा खेळणार्‍यांना त्रासदायक होतो. तशा लाल रंगामुळे सर्वांचे लक्ष उगाचच वेधले जाते. नवीन रंग छान आहे. त्यामुळे समस्त हपिसकरीण जनतेतर्फे सरकारचे आभार ! मिसळीचे चित्र जुन्या मिपाशी दुवा म्हणून राहिल. त्या सूचनेवरही विचार व्हावा. ५०+ प्रतिसाद एकाच पानावर येताहेत, स्पीडही वाढल्यासारखा वाटत आहे ... Back to Top चा पर्याय ही छान आहे. उजव्या बाजूला असलेला समास जुन्या लोकांना काही काळ गैरसोईचा वाटू शकतो पण हा सवयीचा प्रश्न आहे. थोडे दिवसांनी नवीन रूपड्याची सवय होऊ द्यावी असे वाटते. हे सर्व करण्यामागे खूप कष्ट असणार आहेत हे जाणवते; तांत्रिकला टिमला आमचा सलाम ! अभिरत

छान दिसतयं मिसळ्पाव. पण पानावर लेखाला फक्त ५०% च (आडवी)जागा आहे...विस्तारीत करावे ही विनंती. शुभेच्छा!

वा ! चांगले झाले आहे नवे रुप. जुनी रंगसंगती भडक असल्याने आमच्यासारखे लोक भडक लिहित होते ते आता नव्या रंगसंगतीत गप्प बसतील असे वाटते. व्यनी अजुन चालु नसावा. अडत नाही...सहजरावांना अडचण होईल असो

In reply to by प्रभो

येस्स.... नावं बदललीत.. जागा बदलली.. आमच्यासारख्या म्हाता-यांना येवढे बदल एकदम झेपत नाही रे... वेळ लागेल जरा रुळायला...

हापिसातल्या कम्प्युटरवर अचानक प्रतिसादातील सदस्यनाम न दिसता त्याजागी चौकोन दिसत आहेत. बाकी प्रतिसाद व्यवस्थित दिसतो. 'हजर सभासद' वगैरे जागांवरही चौकोनच दिसत आहेत. काय गौडबंगाल आहे कळेना. तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे.

In reply to by क्रेमर

आता सदस्यांची नावे दिसत आहेत. इतरत्र दिसणारे चौकोन जाऊन अक्षरे दिसत आहेत. फक्त तुकाराम,ज्ञानेश्वराचा फोटो दिसत नाही. आश्विनी व्हावे दिसती आहे.

In reply to by क्रेमर

व्हावे नाही. (खुद के साथ बातां : रंगा, आता अश्विनीने ह्यांचे 'व्हावे असे ह्यांना वाटत असेल तर कोण काय करणार? ;) )

वा! रूप देखणे आहे.

मलापण सभासदांच्या नावांच्या जागी चौकोन दिसताहेत. उजवीकडे बरोबर दिसतंय. पण प्रतिसादात नावांच्य ठिकाणी चौकोन. :( आणि मिसळीचा फोटो हवा ब्वॉ.

व्यक्तिगत निरोप सुविधा नको असल्यास / स्वतःपुरती बंद करायची असल्यास / व्यक्तिगत निरोप स्वीकारायचे नसल्यास पूर्वी एक पर्याय उपलब्ध होता. (असाच एक पर्याय खरडवहीसाठीसुद्धा उपलब्ध होता.) आता हा पर्याय दिसत नाही. (खरडवहीसाठीचा पर्याय अजूनही उपलब्ध आहे.)

नीलकांतच्या श्रमाचे कौतुक आहे. पण खर सांगायचं तर मिपाचे हे रुप नाही आवडले. सदस्यत्व घेण्यापूर्वी बघताक्षणी मिपा आवडले होते कारण मिपाचा आकर्षक आणि युजर फ्रेंडली इंटरफेस. आतामात्र ह्या संस्थळाचे बाह्यरुप हे एखाद्या ब्लॉग सारखे दिसत आहे. कंटाळवाणे वाटत आहे. पूर्वी फटाफट नवीन काय लेखन आले आहे ते दिसत होते आता मात्र स्क्रोल करून पहावे लागत आहे. डावी बाजू बदलून उजवीकडे टाकलेल्या गोष्टी डावीकडेच हव्यात असे वाटत आहे. मिसळीचे चित्र हवेच हवे. स्वसंपादनाची सोय हवी.

नविन प्रतिसाद दिलेले धागे आधी वरच्या नंबरला यायचे...आता शोधावे लागतेय कोणत्या धाग्यावर नवीन प्रतिसाद आलाय ते....नवीन प्रतिसाद आल्याची नोंद करणारं बटन परत लावा म्हणजे सोपं जाईल...आणि मला व्यनी सुविधा काही दिसत नाही...

नमस्कार, मिसळपावावरील अक्षरे अक्षरे अत्यंत लहान झाली आहेत. विशेषतः माझ्यासारख्या ऐनकावलंबी मनुष्यास वाचावयास अत्यंत त्रास होतो आहे. कृपया अक्षरे मोठी करावीत. हैयो हैयैयो!

कोणकोण हजर आहे हे कसे पहायचे?

सुंदर आणि सोबर दिसत आहे मिपा. मला ही थीम आवडली. इनोबाचे विशेष अभिनंदन! नीलकांतचे आभार. १. प्रत्येकाच्या संगणकाच्या स्क्रीन रेझोल्यूशनसाठी अ‍ॅडजस्ट होणारी लिक्वीड थिम वापरता येईल का? वाईड स्क्रीन संगणकावर उजव्या डाव्या बाजूला फारच जागा मोकळी दिसत आहे. २. 'बॅक टू टॉप'मधे बाऊन्स दिसणं फारसं आवडलं नाही. मिपाच्या नवीन रूपाला शोभत नाही असं वाटलं. ३. मिपाचं मुखपृष्ठ मात्र पूर्वीसारखं, ज्यात नवीनतम प्रतिसाद आलेले लेख दिसायचे ते आवडायचं. ४. खव/व्यनीसाठी फार स्क्रोल करावं लागत आहे. ग्यानबा-तुकाराम मुख्य पानाच्या डाव्या बाजूला असले तर त्यांना अग्रक्रमही मिळेल शिवाय खवसाठी जास्त स्क्रोल करावं लागणार नाही. ४. भाषा बदलाचा पर्याय सतत वापरावा लागत नाही, तो डाव्या कॉलमच्या तळाशी ढकलला तरी चालावा, त्यामुळेही खव/व्यनीचा खोका वर येईल. माझ्या संगणकावर (लिनक्स+ फाफॉ) फॉण्ट पूर्वीसारखाच सुंदर दिसत आहे. विण्डोजच्या फाफॉवर फॉण्ट पूर्वीसारखाच (खराब) दिसतो आहे. ५० प्रतिसादांनंतर पान उलटावं लागत नाही हे मस्तच.

नीलकांत आणि टीमचे अभिनंदन. छान रुपडे आहे. अक्षरे मोठी केल्यास वाचायला सोपे पडेल.

खरडवहीत नवी नोंद झालेली असल्यास वा नवा व्य.नि. असल्यास पानाच्या अगदी वर तसा संदेश पूर्वी येत असे. आता मात्र प्रत्यक्ष ख.व. नि व्य.नि.च्या दुव्यांपर्यंत पोहोचल्यावरच ते कळते. सर्वात वर दिसणार्‍या 'नमस्कार सदस्यनाम>; गमन' येथे 'ख.व. (१५ नवीन)', 'व्य.नि. (२ नवीन)' असे काही दिसल्यास सोयीचे जाईल.

सर्व प्रतिसाद/सूचनांकरिता धन्यवाद! डिझाईनसंदर्भात आगामी काळात केल्या जाणार्‍या काही बदलांविषयी:
  1. काही सदस्यांना ऑफीसमधून ब्राऊजींग करताना भडक रंग त्रासदायक वाटतात. त्यासाठी सद्ध्याच्याच डिफॉल्ट थीमबरोबर वेगवेगळ्या रंगसंगतीच्या थीम्स लवकरच दिल्या जातील.
  2. बहूतेक सर्वच सदस्यांची मागणी आहे की, हिडरमध्ये मिसळीचे चित्र हवे. ते चित्र लवकरच तिथे लावण्यात येईल. (मिसळपावचेच सदस्य सहज हे मिसळीचे चित्र पुरवणार आहेत.)
  3. डाव्या/उजव्या साईडबारबाबत विचार चालू असून लवकरच त्यासंदर्भात आपल्याला माहिती देण्यात येईल.
याशिवाय इतर काही सूचनांबाबत विचार केला जाईल. -विनायक अनिवसे सदस्य (नवनिर्माण समिती)

१ - हजर सभासद हा टॅग अ‍ॅक्टिव नाहीये का? फक्त पहिल्या पानावरचेच सभासद दिसतात. कृपया तो अ‍ॅक्टिव करावा. २ - नवे लेखन ह्या टॅबखाली 'प्रतिसाद' ह्या स्तंभातले सगळे आकडे इंग्रजी आहेत ते मराठी करता येऊ शकावेत. 1 new पेक्षा १ नवीन (किंवा जो काही आकडा असेल तो) हे जास्त चांगले वाटते. ३ - Last Post ह्या स्तंभाऐवजी 'शेवटची पोच' हे कसे वाटते? (तिथेही आकडे इंग्रजीतून मराठीत करावेत.) ४ - लेखात/प्रतिक्रियेत दुवा देताना त्या दुव्याचा शब्द हा आपोआप वेगळ्या रंगाचा होईल असे पहावे अन्यथा लेखात दुवा दिलेला आहे हे समजून येत नाही. ५ - सर्व लेखनाचे पृष्ठ क्रमांक इंग्रजीत दिसतात 1 2 3 पुढील > अंतिम>> असं दिसतंय त्याऐवजी मराठी आकडे चांगले. (तसेच लेखाच्या खालचे प्रतिसाद बघताना.) ६ - पूर्वी 'माझे लेखन' असा एक टॅब असे त्यावर टिचकले की आपण लिहिलेले सगळे लेखन (प्रतिक्रिया नव्हेत) दिसत असे. तो टॅब आता गायब झालाय. अतिश्य उपयुक्त होता. कृपया परत आणावा. ७ - स्वगृह वरती पानाच्या मध्यभागी दिसणारे सगळे विभागांचे टॅब्ज हे अ‍ॅक्टिव करावेत म्हणजे 'काथ्याकूट' ह्यावर टिचकले की सगळे त्या विभागातले लेखन दिसेल इ.इ. (पानाच्या मथळ्यापाशीचे टॅब्ज अ‍ॅक्टिव आहेतच.)

व्य नि आल्याची सूचना फक्त ई मेलनेच मिळते. ती पूर्वीसारखी पानाच्या वर देण्याची सोय करावी.

शोध सुविधा बदलली आहे का? म्हणजे पुर्वी काव्य सदरात फक्त विडंबने शोधता येत होती. आता मला तसे करता येत नाहीये (- त्यामुळे केशवसुमारांच्या जुन्या विडंबनालाही मुकतो आहे , उदास वाटल्यावर मी बरेचदा ती शोधून वाचत असतो.) की शोध घेण्यासाठी अजून काही आयड्याची कल्पना आहे?

मिसळपावचे नविन स्वरुप सुरेख आहे ... सर्वांचे अभिनंदन आणि धन्यवाद ! * साठवलेल्या वाचनखूणा कशा बघायच्या? * प्रवेश केल्या नंतर खात्याची सर्व माहिती असलेले पेज उघडते आहे , त्या ऐवजी मुख्य पान उघडले तर ...?

मिपा वरची पुस्तकविश्व ची लिंक आणि माहिती दिसत नाही, बहुतेक नवीन घडणीत थोडा वेळ लागेल पहिल्या सर्व गोष्टी स्थिरस्थावर व्हायला, पण जमेल तेंव्हा परत येउ द्यात ती उपयुक्त माहिती मुख्य पृष्ठावर, धन्यवाद.

माझे खाते या पानावर जेथे स्वाक्षरी तयार करतो त्याखाली इनपुट फॉर्मॅटचा पर्याय आहे. तेथे Full HTML सिलेक्ट केल्यास माझे प्रतिसाद बाय डिफॉल्ट फुल HTML मध्ये येतील. ही चांगली सोय आहे. ही सोय पूर्वी होती की नाही हे माहिती नाही.

बदलाच्या डोळ्यात भरेल अश्या सुरूवातीबद्दल अभिनंदन आणि आभार. आता अर्थातच सूचना.. १. रंगसंगती आणि रूपडे हे जेनेरिक स्वरूपाचा फॉर्मॅट आणि स्क्रीनवर दोन्ही बाजूला सुटलेली मोकळी जागा यामुळे संकेतस्थळापेक्षा ब्लॉग असल्यासारखे दिसतेय. कस्टम मेड ले आउट आणि डिझाइन असावे. पूर्ण स्क्रीनभर असावे. २. नवे लेखन हा विभाग पूर्वी बाहेर होता तसा असावा ३. मुख्यपृष्टावरची सर्व विभागांची शीर्षके(जनातलं मनातलं, काथ्याकूट, जे न देखे रवी इत्यादी) त्यावर टिचकल्यावर त्या त्या विभागाच्या लिस्टीत नेणारी असावीत. बाकी उजवे/ डावे, खाली/ वर हा केवळ सवयीचा भाग. तेव्हा डिझाइन मधे जे योग्य वाटेल ते करावे.

सरपंच आणि मंडळी, सर्वात प्रथम बदलाचे स्वागत!! बदल आवडला :) वेगही वाढल्यासारखा वाटतोय १. मिसळपावाचे चित्र हवेच हवे. ती तर मिपाची ओळख आहे. नाही का? २. गुगल क्रोमवर संपादन करता येत नाही ३. स्मायलीज हव्यात - संताजी धनाजी

सहीचा मोठाच लोचा आहे. सही प्रतिसादाच्या मजकूरात मर्ज न होता प्रतिसादाला अ‍ॅपेण्ड होत आहे. माझ्या १ वर्षापूर्वी दिलेल्या प्रतिसादांवर माझी आजची सही दिसते. त्यामुळे सही 'बनवून ठेवणे' या प्रकाराला आता काही अर्थ उरला नाही. काळानुरूप सही ठेवण्याची सोय उरली नाही.

कौल या लेखनप्रकारात १. प्रतिसादाची खिडकी नसते. ती मुद्दाम उघडून घ्यावी लागते. २. नव्याने दिलेला प्रतिसाद सर्वात खाली न येता सर्वात वर येतो.

सरपंच साहेब, कलादालन विभाग हा त्यावरील नविन पाच लेखांसह मुख्य पानावर आणावा. तसेच त्या व इतरही विभागांच्या मथळ्यांना(उदा. जनातलं- मनातलं, कौल इ.) लिंका द्याव्या म्हणजे परत वरती स्क्रोल करत बसावे लागणार नाही व तिथूनच आत प्रवेश करता येइल. ही सूचना व विनंती. म्हणजे आमच्यासारख्या कलाप्रेमींनाही त्याचा सहजतेने आस्वाद घेता येइल.

असे लक्षात आले की बरेच नवे आयडी कार्यान्वित झाले आहेत आणि त्यांची कॉमन अडचण म्हणजे देवनागरी टंकलेखन... पूर्वी म्हणजे हे अपग्रेडेशन होण्यापूर्वी नव्हे तर अगदी सुरूवातीला वरती डाव्या कोपर्‍यात टंकलेखन सहाय्य होते,त्यात एक तक्ता होता. तो ह्या नव्या लोकांना बराच उपयुक्त ठरु शकेल असे वाटते. म्हणजे मग अनुस्वार कसा द्यायचा? किवा ट,ठ,ण, थ, ष ,ऑ,अ‍ॅ... इ. टाइप करणे त्यांना सोपे होईल. ते परत तिथे आणता येईल का? धन्यवाद, स्वाती