या पूर्वीचे भाग http://misalpav.com/node/1545
http://misalpav.com/node/1624
http://www.misalpav.com/node/1635
पासुन पुढे
धमुचे लग्न ( उत्तरार्ध)
काळ ९ भविष्यातला कुठला तरी साधाराण धमाल मुलाच्या लग्नानंतर दीड/दोन वर्षानन्तरचा
वेळ : तुम्हाला हवी ती.
स्थळ : जेथे चहापोहे नाहीत ते /तसले.
घड्याळाने पाच ठोके दिले. धमु जागाच होता. हल्ली तो गजर व्हायच्या तासभर
अगोदरपासुनच जागा असायचा. हम्म..आता उथलच पाहीजे. पाणी येईल भरलं पाहीजे.
रिकामी बादली कॊरपोरेशनच्या फ़ुरफ़्रुरणा-या नळाखाली लावत तो स्वत:शीच विचार करु लागला.
पूर्वी हे असे असले काही नव्हते. आता रोज अंघोळ करायला लागते. दाढी करायला लागते.सुट्टीच्या
दिवशीही अंघोळ म्हणजे कै च्या कैच ना. हल्ली धुम्रशलाका वगैरेवरही बन्दी आली होती. तो शारुखखान
सोडु शकतो मग तू का नाही सोडु शकत नाहीस हे वर ऐकावे लागत होते. हे बरे आहे अग मी कुठे
तो शारुख कुठे? त्याची माझी बरोबरी होते का? त्याला सिगरेट सोडली हे सांगायला सुद्धा पैसे मिळत असतील.
अन त्याची माझी बरोबरी होईल का? पण हे त्याला सगळे मनातल्या मनातच बोलावे लागत होते.
पूर्वी असे बरे असायचे ना? शनिवार दुपार पर्यन्त लोळत पडायचे मग संध्याकाळी जंगली महाराज
किंवा मग फ़र्ग्युसन रोड वरच्या फ़ुटपाथ वर आन्द्या / इनोबा भेटायचे मग टवाळक्या कुटाळक्या करत
चन्द्र मावळेपर्यन्त वेळ मस्तच जायचा. हल्ली सगळा शनिवार हिची सहकार नगरमधली आत्या कोथरुडचे
काका किंवा मग सदाशिव पेठेतली मैत्रीण यांच्यातच जायचा. त्यांच्याकडचे साखर टाकलेले कांदे पोहे खावे लागायचे.
काटाकिर्र सुद्धा बरेच दिवसात झाले नव्हतेच. शांग्रीला वगैरे तर फ़ारच दूरची गोष्ट होती जवळजवळ अप्राप्य म्हणाना.
धमाल मुलगा विचारा मग्न झाला.
..........................................................................................................................
" हॆलो अरे इनोबाच ना ? एक काम होते? ते तूच करशील बघ ? सन्जोपसर मोबाईलवरुन बोलत होते.
" मला न उमगलेले जी ए" या विषयावर जरा मार्गदर्शन हवे होते. मला सखाराम गटणेजी ना त्या संदर्भात एकदा
भेटायचय" त्याची अपॊइंटमेंट मिळतेय का बघ ना?" मी त्याना एक व्यनी टाकला होता." रक्त गाभुळलल्या
बनातली करवदलेली हाक.या हेडिंगखाली. शेवाळ्लेल्या मनातले फ़िकुटलेले विचार एकदम पारदर्शी करुन घ्यायचे आहेत.
तुझे ऐकतील गटणेजी सांगुन बघ ना जरा"हो मी माझ्या परीने प्रयत्न करुन बघतो. तो कसा रीस्पोन्स देतो त्यावर अवलंबुन आहे.
बाकी तुम्ही काय करता सध्या? हेच की ते बघ सध्या कधितरी एखाद्या नव्या संस्थळावर लिहितो. ते सर्किट्पाव नावाचे संस्थळ
निघालय ना तेथे रजनीकातच्या चित्रपटांची परि़क्षणे लिहितोय. तसे नवे काही नाही. "शेंबुड आणि रीकामा खिसा"
हा नवा लेख कुठेतरी प्रसिद्ध करायचा आहे त्याच्या शोधात आहे. त्या नव्या संस्थळावर प्रत्येक सदस्याला सर्कीट या
शब्दापासुनच सुरु होणारे नाव घ्यायला लागते म्हणे .तेथे प्रत्येकाची नावे सर्कीट हसमनीस , खरा सर्कीट , छोटासर्कीट ,
सर्कीट्ली , सर्कुटल्या ,सर्कीट मुलगा ,सर्कीट बाळ, सर्कुभाऊ , सृष्टीसर्कीट, सर्कीट्लावण्या अशीच असावी लागतात.
म्हणे. छोटा डॊन ने तर शॊर्ट सर्कीट हेच नाव घेतलय. मी सर्कीट्सन्जोप हे नाव घेऊ म्हणालो. तर ते नाव अगोदरच
कोणितरी ब्लॊक करुन ठेवले आहे. संपादक मंडळाला विचारले तर त्यानी तांत्रीक दिले. म्हणाले नावाचे हे कॊम्बिनेशन इतके
स्फ़ोटक आहे की ज्या ज्या राउटर मधुन या आयडीचे कोड जातात ते ते राउटर बिथरतात. " आपल्याला ते तंत्रीक काही कळत
नाही बॊ" इनोबा म्हणाला." नावात काय आहे.". असे तुकोबानी म्हंटलयच की. तुला तसे वाटते रे. पण तुकोबानी म्हंटलय
"नामातची सर्व असणे नामा म्हणे"
..............................................................................................................................
"बघा हो पंत हे काय असते ते जरा सांगता. भृगु संहीता काय म्हणते याच्यावर." वेदश्री पंताना कसलातरी कागद दाखवत म्हणाली.यात
लिहिलय की पाण्याची भूजल पातळी ही दिवसेंदिवस खाली खाली जात आहे. जाऊ दे ग वेदु बाळ भूजल पातळी ही केवळ पृथ्वीच्या वरच
अवलंबुन असते.पंत पुस्तकातुन डोके वर न काढताच बोलले. पंत हे तुम्ही म्हणताहात. वेदश्रीला आश्चर्यच वाटले भृगुसंहीता सोड .
अग मी सध्या यमी संहीते नुसार "शनी आणि अशनी" यांचा अभ्यास करतोय. त्यानुसार पितृपंध्रवडा लागायच्या अगोदर तो गौप्यस्फ़ोट होणार आहे.
नाना तुमचे मत काय आहे. पंतानी नाना चेंगटाला संभाषणात ओढले. मी काय म्हणतो पंत तुम्ही म्हणाना नेहमीप्रमाणे म्हणता तसे.
की अगोदर अधिश्ठान हवे त्यानन्तर एकाग्रता मगच प्रश्न विचारा म्हणुन, नेहमी तसेच म्हणताना.नाना नी पंताना मार्ग सांगतला.
पंताना स्वत:चाच हुकमी एक्का असलेले उत्तर नाना चेंगटाला सुचावे याचेच आश्चर्य वाटले.
.................................................................................................................................
"स्वाती पाव" या संस्थळाला सुरु होऊन नुकतेच कुठे सहा महिने झाले होते. काय विजुभाऊ आपण या संशळावर अजुन किती दिवस
स्वाती डाम्बीस आणि स्वातीभाऊ नावाने सीकेपी आणि गुज्जु रेशीप्या ल्ह्यायचे? पिवळा डाम्बीस विजुभाऊंकडे तक्रार करत होते.
तुमचे बरे आहे हो तुम्ही आंबे चहा फ़णस कशावरही लिहिता मला माझ्या मिसेस च्या वह्या चोरुन बघाव्या लागतात नव्या रेशीप्या शोधायला?
कुठले हो बरे तो केसु संपादक मंडळात गेल्यापासुन आमच्या क्रमश:स्वांत्र्यावर गदा आली आहे. आम्हाला स्वप्नेसुद्धा क्रमश: पडतात.हल्ली
मला स्वप्नात क्रमश: हा बोर्ड दिसला की खडबडुन जाग येते. त्यातुन तो गटण्या. त्याला तर कोणताही नवा आयडी दिसला की तो विजुभाऊ
असेल अशीच खात्रीशीर शंका येत असते" विजुभाऊ त्यांच्या परीने उत्तर देत म्हणाले
.................................................................................................................................................
"मुक्त्सुनीत भौ या नव्या धंद्याचे काही खरे नाही." बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ ग्लासात ओतला आणि डोळ्यांजवळ नेत म्हणाला.
"हो ना" मुक्तसुनीत त्याला अनुमोदन देत म्हणाला. "लोक ट्रॆव्हल एजन्सी म्हणजे कुरीयर कंपनी यातला फ़रकच समजुन घेत नाहीत.
माझे हे सामान न्या त्या भाच्याला न्या. ठाण्याच्या काकांकडुन चंची नेउन पुण्याच्या काकाना द्या ही असलीच कामे सांगतात.माझ्या मागच्या
दोन ट्रीपा तर बनी , जनी , मनी ,बोका , अशा मंडळीना नेणे आणणे पोहोच करणे यातच गेला. शिवाय ही मंडळी प्रवासात काय काय वाट्टेल
तो उतमात घालत असतात तो वेगळाच. आपण ट्रेव्हलिंग एजन्सी चालवतो पाळणाघर नाही म्हणावे." "अरेरे तुम्ही पाळणाघराला इतके का घाबरता.
म्हंटले आहे की जीचे हाते पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. " एक महिला सदस्या म्हणा ली. तुम्हाला काय जातय म्हणायला.? आमचा जीव जातो
त्या दोरी पायी. ट्रॆव्हल एजन्सी चा प्रवास काही ढगातुन होत नाही. शिवाय ते सुभाषीत आहे जिचे हाती असे आहे ज्याचे हाती असे नाही.
मुक्तसुनीत हळवा होत म्हणाला.
.............................................................................................................................................................
"तीन अधीक दोन पाच अधीक सतरा बावीस अधीक......." प्रा डॊ दिलीप बिरुटे या एका वर्षात कायकाय केले हा हिषेब करत होते.
मराठी संस्कृतीक अपशब्दकोषाचे काम अजून अर्धेच राहीले होते. तद माताय, भगिनीभोगे, मातृगमनी , या शब्दानन्तर तेव्ह्ढा जोरदार
शब्द अजून सापडला नव्हता. नाही म्हणायला "च्यायला" या शब्दाचे १०१ उपयोग ( सप्रयोग) " हे एकमात्र पुस्तक प्रकाषीत झाले.
त्यातल्या "च्यायला" हे दोन वाक्ये जोडणारे उभयान्वयी अव्यय म्हणुन वापरता येते या शोधाबद्दल पेटंट घ्यावे की कसे याबद्दल एकमत होत नव्हते.
त्यानी " केस कापायला गेलो होतो" . "न्हाव्याचे दुकान बंद होते". ही दोन वाक्ये "च्यायला" शब्दाने ही दोन वाक्ये जोडुन वेगळा अर्थ
असणारे वाक्य बनते. उदा : "केस कापायला गेलो होतो च्यायला न्हाव्याचे दुकान बंद होते " या वाक्यातुन बोलणारा केस न कापताच
तसाच परत फ़िरला या मूळ दोन्ही वाक्यात नसणा-या अर्थाचे वाक्य तयार करुन सप्रयोग उदाहरण दिले होते. स्वत:च्या शोधाचा ते
पुन्हा पुन्हा विचार करत असताना पेठकर काका हातात डबा घेउन आले.
घे रे दिलीप......बघ तर इजिप्शीयन पुरणपोळी ...अरे लक्ष कुठे आहे तुझे दिलीप....पेठकर काका अक्षरश धरुन हलवत बिरुटेसराना म्हणाले
अरे हो हल्ली की नाही लोक मला "डीलीट बिरुटे" या नावानेच ओळखतात. त्यामुळे मला कोणी "दिलीप" म्हणुन हाक मारली की लवकर कळतच
नाही" दिलीप बिरुटेनी स्पष्टीकरण दिले.
............................................................................................................................................................................
मनस्वी ने आज बीटाची चटणी ,अल्फ़ा फ़्राईड राईस , आणि थीटा शिकरण च्चे फ़ोटो मुखपृष्ठावर लावले होते. लोकांची तक्रार होती की त्यात
खवलेल्या गाजराच्या कापांमुळे जीलेब्यांचा भास होत होता. वरदा प्राजु शीतल यशोधरा यानी "जावे कट्टेचिया देशा" हे पुस्तक नुकतेच लिहुन
त्याचे बे एरीयात होण-या जालीयविष्व साहित्य सम्मेलनात प्रकाशन करायचे ठरवले होते. टा-याने भारतात दंत विमा नावाची कॊन्सेप्ट सुरु करुन
त्याच्या फ़्रॆन्चायझी युगांडा केनीया आणि टाझानिया इथे ओपन केली होती. मृगनयनी ने झटपट कविता हे पुस्तक जालावर झळकवले.
गटणेच्या पिक्चरचा हीरो मदनबाण अजूनही पिक्चर पूर्ण झाले नसल्याने फ़ोटोग्राफ़ी या जुन्या व्ययसाया कडे वळला होता. टारझन ने त्याला बोर्डावर
"फ़ोटोत टोपीचा फ़ेटा करुन देऊ मिटलेले डोळे उघ्डुन देउ" लग्नाचे, डोहाळे जेवणाचे, बारशाचे मुंजीचे , एक्सष्ठी , सहस्त्रचंद्रदर्शन , मयताचे ,
तेराव्याचे फ़ोटो काढुन देउ असे लिहायला सांगितले होते त्यामुळे त्याचा धंदा खूपच जोरात चालला होता. आता त्याला मक्याच्या कणसाचे आणि
काळ्या गुळाच्या भट्टीचे फ़ोटो काढायला वेळच मिळायचा नाही. छोटा डॊन भडकमकर सरांच्या "पळुन जाउन लग्न कसे करावे" या कोर्सची सिनीयर
परिक्षा नुकताच पास झाला होता.आणि भडकमकर कोचिंग ऎकेडॆमीत फ़ॆकल्टी म्हणुन जॊइन व्हायची त्याला ऒफ़र आली होती. छॊटा डॊन बरोबर
पळुन पळुन कंटाळलेल्या शार्प शूटर आम्बोळी ने नौपाड्यात कन्दील भाड्याने द्यायचा व्यवसाय सुरु केला होता. ऎडीशनल सर्व्हीसेस म्हणुन त्याने
"येथे पाय चेपुन मिळतील "असाही बोर्ड लावला होता. संत तात्याबा आश्रमात नव्या शिश्याना दीक्षा देताना फ़ेकुन मारलेल्या उसाचे कांडके कसे
चुकवावे याचे मार्गदर्शन सुरु केले होते. आन्दुयात्री ने आंतर्जालीय राजकारणात शिकलेल्या धड्यांवरुन्बोध घेत "आन्द्या ली" हे नवे नाव धारण केले होते.
चोच्या / कोम्बडीच्या वगैरे बहुउपयोगी शब्द नुकतेच आत्मसात करुन त्याचे गद्यातले ३०३ उपयोग यावर तो हल्ली लोकाना मार्गदर्शन करत होता.
छोटी टिन्गी दुसरी ब मधुन एकदम दहावी ची परोक्षा देत होता. परिक्षेत त्याला "हे हे हे तुम्ही माझी मैत्रीण व्हाल? काळजी घ्या" संदर्भासहीत स्पष्टीकरण
द्या या प्रश्नाचे उत्तर देता आले म्हणुन त्याल एकदम वरच्या वर्गात ढकलला होता.
..............................................................................................................................................................
वर्षभरात केवढ्या तरी घटना घडुन गेल्या होत्या. इतके सगळे घडले...आपल्याला तर विजुभाऊ नी लग्नात शोधलेली पाटी अजुन अगदी कालच
पाहिली असल्यासारखे वाटत होते. त्याला एकदम आठवले त्याने लग्ना आधीचे ते दिवस.......आहाहा काय मस्त होते नाही.
तेंव्हा काय मस्त श्लोक सुचायचे
"घर असावे घरासाठी
तू असावीस घरपणासाठी
तुझ्यामुळे घराला घरपण येते
मलाही थोडे शहाणपण येते"
या ओळी गुणगुणत चतु:श्रुंगीपर्यन्त रस्त्यावरुन जायचो. रस्त्या वरचे खड्डेसुद्धा किती मोहक, चिंटुकले आणि गोड वाटायचे.
आता मात्र दळण आणणे, तुळशीबागेत अवजड वाहनांच्या गर्दीत फ़िरणे, लग्ने अटेंड करणे , बारशी अटेंड करणे यातच सगळा वेळ जातो
आपण हे सगळे न कुरकुरता करुच कसे शकतो याचेच धमाल मुलाला आश्चर्य वाटत होते.
"अरे धमु जरा एवढे करतोस का? "आतुन साद ऐकु आली .
धमाल मुलगा नॊस्टेल्जीया मधुन जागा झाला.
त्याने दोरीवर वाळत घातलेले दुपटे काढले आणि तो आतल्या खोलीत गेला
बाहेर कोणीतरी रेडीओवर गात होते
"खरे म्हणजे आपण सगळे सुखात जगत असतो
एका दुर्लभ क्षणी एक चेहेरा आपल्याला भेटतो
अक्कल गहाण पडते
भेजा कामातुन जातो
लख्ख उघड्या डोळ्यानी आपण चक्क लग्न करतो
आपण चक्क लग्न करतो आपण चक्क लग्न करतो आपण चक्क लग्न करतो
त्या चेहेयाचे असली रूप मग आपल्याला कळते
बायको नावाचे वेगळेच प्रकरण आपल्यापुढे येते........"
....................................................................................................................................................
स्क्लेमर : या लेखातले प्रसंग काल्पनीक आहेत. लेखातली पात्रे कधी भेटली आणि तशीच वागली तर तो
लेखकाच्या द्र्ष्टेपणाचा जय आहे असे समजु नये. योगायोगामुळेच हे असे घडले आहे असे ठाम समजुन चालावे. लेखक हा भविष्यवेत्ता वगैरे नसून त्याला
ज्यूल्स व्हर्न प्रमाणेच दिवसाउजेडी स्वप्नप्रवास करण्याची सवय आहे असे मानावे...........
वाचने
17811
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाण तिच्या आयला....
+१
In reply to हाण तिच्या आयला.... by विद्याधर३१
चियर्स विजाभौ
धमाल
ह्म्म
अ फ ला तू न....
गोळीबार !!
काय विजुभौ
मॅरिड-लाईफ! (ये जीना भी कोई जीना है, लल्लू!!)
सहिये!
धमु चे लग्न ( उत्तरार्ध)
हा हा
धम्याच्या
झभर्डस्ट...
धमाल मुलगा
In reply to झभर्डस्ट... by मृगनयनी
मस्त
छान
In reply to मस्त by आनंदयात्री
खरं
असेच म्हणतो
In reply to खरं by विसोबा खेचर
ह्म्म्म्..खरं आहे तात्या!
In reply to खरं by विसोबा खेचर
:)
ठिक ठीक
त्यातुन
:)
धन्यवाद
+१ सहमत् सख
In reply to धन्यवाद by विजुभाऊ
काय
In reply to धन्यवाद by विजुभाऊ
ठिक आहे...
नेहमी प्रमाणे छान कल्पना आहे...
धम्याच्या
धमुला आठवण
जुने
आयशपत
भारी