Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अब्दुल खान - २

प
पिवळा डांबिस यांनी
Tue, 04/29/2008 - 04:14  ·  लेख
लेख

Book traversal links for अब्दुल खान - २

  • ‹ अब्दुल खान - १
  • Up
  • अब्दुल खान - ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18517 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

प
पिवळा डांबिस Tue, 04/29/2008 - 04:23 नवीन
पहिल्या भागाची लींक वर शेवटी द्यायचा प्रयत्न केला होता पण मला अजून ते येत नाहीये असं दिसतंय!!:) http://www.misalpav.com/node/1582 संपादकांनी प्लीज मदत केली तर चांगलं होईल!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/29/2008 - 04:36 नवीन
छान झालाय हाही भाग पण जरा रंगत येते आहे की नाही तोवर संपला;( अंमळ घसघशीत लिखाण येऊद्यात की राव, भरभरुन येऊद्या!:) वाटल्यास थोडा वेळ घ्या पण असा चटका लावू नका! चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/29/2008 - 04:40 नवीन
चलो कुछ इंडियन मूव्ही देखते है!! उस एरियामें तुम इंडियनोंका जवाब नही!! क्या एक-एक हिरॉईन है तुम्हारी, वल्ला!!" हाताची चारी बोटे ओठांना लावून हवेतल्या हवेत मुका घेत म्हणाला. >> मी पण हेच म्हणतो..... वल्ला क्या एक-एक हिरॉईन है सब माल दिखती !!!!! पण हे काय काका पुन्हा (क्रमशः) म्हणजे तुम भाग ३ लिखती तब तक हम को राह देखनी पडती..... :) (वल्ला बहुत मजा आती ) असे म्हणणारा..... मदनबाण
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 04/29/2008 - 04:41 नवीन
धर्म, राजकारण, भारताची प्रगती आले. क्रिकेट, युद्ध, अणूबॉम्ब, जिहाद, अफगणिस्तान बहुदा पुढच्या भागात. पुढचा भाग लवकर येऊ द्या.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 04/29/2008 - 19:59 नवीन
कित्ती, कित्ती हुशाऽऽर आहांत हो तुम्ही, सहजराव!! नाही म्हणजे खुद्द लेखकाच्या मनात कथानक तयार होण्यापूर्वीच ते काय असावं ते तुम्ही ओळखता!!:)) कसं काय जमतं बुवा हे तुम्हाला?:)) हॉकी, वाघा बॉर्डर, मेहंदी हसन विसरलांत काय? जरा धीर धरा, धीर धरा... घाई कशाला?:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सहज Wed, 04/30/2008 - 01:16 नवीन
पुढच्या प्रतिक्रियेत :)) थांबा थांबा तीही प्रतिक्रिया मिळेल नक्की ;-) हे वेगळे अनुभवकथन वाचायला आवडते आहे हे मात्र नक्की हा! राग नसावा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
म
मनस्वी Tue, 04/29/2008 - 06:31 नवीन
एकदा काय झालं....
क्रमशः लिहायच्या आधीच्या वाक्याची स्टाईल पण आवडली बरंका डांबिसकाका. हा पण भाग खूपच छान.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 07:14 नवीन
>>एकदा अशीच गंमत झाली....) >>एकदा काय झालं.... ही तुमची खास डिफ्रन्ट श्टाईल, आजोबाने नातवाला गोष्ट सांगतांना सुरुवात करावी तशी. दर्जेदार लेखन काका, पुढच्या भागाची वाट पहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
न
नंदन Tue, 04/29/2008 - 09:04 नवीन
म्हणतो :). हा भागही आवडला. पुढच्या भागाची वाट पाहतोय.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ध
धनंजय Tue, 04/29/2008 - 22:21 नवीन
तुमच्या अनोख्या शैलीचा परिचय होतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
अ
अनामिका Tue, 04/29/2008 - 08:12 नवीन
डांबिसकाका! उत्तम आहे हा भाग देखिल्.मात्र ते क्रमशः बघितल की थोडा हिरमोड होतो. इतकच. पण सुंदर जमली आहे या भागाची भट्टी. तुम्ही फारच उत्कंठा वाढवता बुवा!!!!!!!!!!!!!!!!! :) एका दमात वाचुन काढला नविन भाग ,पण पटकन संपला.आता दिवसभर अब्दुलखान मनात घर करुन राहिल. पुढचा भाग जरा जास्त मोठा आणि लवकर लिहाल या प्रतिक्षेत .............. "अनामिका" ;;)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 04/29/2008 - 08:23 नवीन
खान साबचे अंतरंग हळूहळू उलगडते आहे,हा भागही तितकाच छान! स्टिरिओटाईप मते आपली त्यांच्याबद्दल आणि वायसीवर्सा! हं.. हे खरंच आहे मात्र! 'एकदा काय झालं.. ' ते वाचायला उत्सुक,सुलेशबाबू फार वाट पहायला लावू नका :) अवांतर-आमच्या इथे एक पाकिस्तानी ढाबा आहे, आहे लहानसाच आणि चकचकाट नाही,डेकोरेशन नाही काही नाही,पण तिथली बिर्याणी.. आणि मोगलाई पदार्थ..अम्म्म.. क्लासच! तिथे जायला आम्हीही आधी खूप बिचकायचो,सावधपणे बोलायचो, हाय हॅलो च्या वर संभाषण न्यायचो नाही,पण मग कालांतराने व्यावहारिक पातळीवरून मैत्रीच्या रेषेवर कधी आणि कसे आलो ते कळले नाही. स्वाती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 08:29 नवीन
त्या बिर्याणीच्या तुलनेत त्याच्या पेशावर मध्ये रेल्वे स्टेशनवर मिळणारी बिर्याणीसुद्धा किती चांगली असते ते सांगत होता!! क्या बात है... पाकिस्तानातील निरनिराळ्या प्रांतात मिळणार्‍या बिर्याण्यांची खासियत वर्णन करत होता. वा वा वा! डांबिसा, सुंदर लेखन रे! औरभी आने दो... आपला, (गोश्तबिर्याणी प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
व
विवेक काजरेकर Tue, 04/29/2008 - 08:40 नवीन
हा भागदेखील पहिल्या भागाप्रमाणेच रंजक झाला आहे. इंडस बासमती वरच्या अब्दुल खानच्या (आणि तुमच्या) मताशी सहमत
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 04/29/2008 - 09:24 नवीन
मी मस्कत मध्ये, इंडस व्हॅली राईस, हाच भात खायचो. बिर्याणी-पुलावसाठी बेष्ट... पण हा तांदूळ भारतातून हिन्दूस्थान लिव्हर एक्स्पोर्ट करीत असे. तो डेहराडून इथे पिकायचा अशी माझी माहिती आहे. सप्लायर दिल्लीचा होता. पुण्या - मुंबईत मिळत नाही. कदाचीत अफगाणी बियाणे असावे. पाकिस्तान बासमती तांदूळ स्वस्त आणि बेचव आहे.
  • Log in or register to post comments
भ
भोचक Tue, 04/29/2008 - 10:04 नवीन
'डांबिस' आहेस झालं. किती छान लिहिलंयस.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 04/29/2008 - 11:01 नवीन
मजा आ गया... .अवांतर : .... तात्यानेसुद्धा अन्तिम भाग म्हणून कलम १८५ चा लेख ( क्रमशः न करता) लगेच संपवला....आणि तुम्ही आपले "एकदा काय झालं...., अशी गम्मत झाली" वगैरे करत क्रमशः वर जात आहात...पुढचा अन्तिम करा प्लीज.......
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 04/29/2008 - 13:30 नवीन
डांबिसकाका! मस्त जमलाय हा भाग पण पहील्या भागा सारखा. अब्दुल खाना बद्दलची उत्सुकता वाढतच चालली आहे. तात्यांसारख हव तर ४८ तास घ्या पण एकत्र (अंतीमभाग) येउदे पुढचा भाग. -गणपा
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Tue, 04/29/2008 - 17:09 नवीन
डांबीस काका, काय मस्त लिहीलंय राव. च्यामारी आजपर्यंत खान म्हटले की एकतर अफजल्या नाही तर जंजीर मधला शेरखान आठवायचा आता तर हा अब्दूल खानच आठवायला लागलाय. एकदा काय झालं....(क्रमशः) ~X( कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Wed, 04/30/2008 - 04:56 नवीन
....असेच म्हणतो !
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 04/30/2008 - 07:31 नवीन
डांबीसकाका.... मस्त जमली आहे भट्टी! अब्दुल खान आम्हीही अनुभवतो आहे...
त्याच्या चेहर्‍यावर समाधान पसरलं..... मित्राची काळजी घेतल्याचं समाधान!!
च्यायला, ही पठाणं असतात खरी येडपटच....एखाद्यावर जीव लावला की पार त्याला गुदमरुन टाकतात... बाकी तुमचा अब्दुल्ला आमच्या गुलाम अलीसाहेबांचा, अबिदा परवेझचा दिवाना होता की नाही? आणि हो मेहंदी हसन राहिलंच....नक्की ठेवणीतल्या खास खास गज़ला ऐकवल्या असतील ना खानसाब ने? अवांतरः च्यामारी, हे जो उठतो तो पाकिस्तानी ढाब्यांचं भरभरुन कौतूक करत असतो....एकदा बघायलाच पाहिजे काय लफडं आहे.... साला तिथं दगडाच्या खापरांवर भाजलेलं 'पहाडी गोश्त' खिलवतात का? - मुर्तज़ा अर्जाई धमालखान
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 04/30/2008 - 12:31 नवीन
हा भाग सुद्धा फार मस्त ! खरेतर क्रमशः वाचून मला बरे वाटले..चांगले लिखाण अजून वाचत रहायला मिळणार म्हणून. भाग संपवण्याची पद्धत फार आवडली :) पुढच्या भागाची वाट पाहत आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 04/30/2008 - 21:43 नवीन
हा भाग सुद्धा फार मस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
स
संजय अभ्यंकर Wed, 04/30/2008 - 16:09 नवीन
गोष्त, बिर्याणी वगैरे चर्चा जरा बेताने! च्यायला, मला नागपाडा आठवायला लागतो, हैदराबाद आठवायला लागते. भाजलेल्या सिख कबाबचा वास नाकात दरवळायला लागला. हैदराबादची पॅराडाईजच्या बिर्याणीची आठवण अस्वस्थ करते. बा़की तुमची लेखन शैली ओघवती आहे! लगे रहो! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 04/30/2008 - 19:12 नवीन
बिर्याणीच॑ वर्णन.. त्वाड्डा ज्वाब नहि॑ सरदारा..खुष रहो बाषा मधुबालासुद्धा जातीने पठाणच होती ना?नॉर्थची लोक॑च देखणी तिच्यायला..चेहर्‍यावर एक वेगळाच नूर असतो (आणि कधी कधी अ॑गात माजही..:) (हरयाणवी-प॑जाबी लोका॑त आठ वर्षे राहिलेला) प्रसाद
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 04/30/2008 - 20:05 नवीन
(हरयाणवी-प॑जाबी लोका॑त आठ वर्षे राहिलेला) प्रसाद अरे बाप रे ...छान मला उगीचच वाटलं मी ओळखतो की काय आपल्याला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
प
पिवळा डांबिस Wed, 04/30/2008 - 22:54 नवीन
आणि कधी कधी अ॑गात माजही.. (हरयाणवी-प॑जाबी लोका॑त आठ वर्षे राहिलेला) प्रसाद हरयाणवी-पंजाबी लोकांचा पठाणांशी काय संबंध आहे? उगाच वडाची साल पिंपळाला...:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
व
वरदा Wed, 04/30/2008 - 23:05 नवीन
आरामात्....खूप मस्त लिहीलाय्.... नुकतच घडलय समोर असं वाट्टंय्...पुढच्या भागाची वाट पहातेय...
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Wed, 04/30/2008 - 23:23 नवीन
डांबिसकाका, लेख फार आवडला.(दोन्हि भाग) फारच छान आणि ओघवत्या शैलीत लिहिलाय. अभिनंदन. बाकि,अजुनहि गोष्त वगैरे खाणे चालु आहे का? जरा जपुन हो ,नाहितर इथल्यासारखे तिकडचे ओरडायला लागतिल "-" लोकांनि खायला लागल्यापासून गोष्तचे भाव वाढले हो...... :) ह.घ्या. अबब.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 08:37 नवीन
"-" लोकांनि खायला लागल्यापासून गोष्तचे भाव वाढले हो......
अबबशेठ, त्यावर आम्ही उत्तर देतो, "आमचा तुम्हाला आग्रह नाही की हेच खाल्लं पाहिजे, परवडत नसेल तर गटाराकडेची डुकरं पकडून खा! " समोरचा माणूस शहाण्या झालेल्या पोराला, बापानं चारचौघात थोतरीत दिल्यावर त्याचा जसा चेहरा होइल तसा चेहरा करुन ठार निपचीत पडतो !!! एकदा करुन बघाच हा प्रयोग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
स
सन्जोप राव गुरुवार, 05/01/2008 - 03:08 नवीन
जिवंत आणि चित्रदर्शी लेखन. हिंदू आणि बीफ खाणे यावरुन 'आपल्या हिंदुत्वात काटछाट करणं आवश्यक आहे' म्हणून बीफ खाणारा पांडुरंग सांगवीकर (की चांगदेव पाटील?) आठवला. पाकिस्तानी तांदळाबद्दल माझे मत अब्दुल खानासारखेच - आणि मस्कतमध्ये राहूनही श्री. पेठकरांच्या बरोबर उलटे - पण तो तांत्रिक भाग झाला. हिमवादळात शराब पिणारा अब्दुल खान आणि बाहेर पंचेचाळीस अंश तापमान असताना माझ्या फ्रीजमधली बीअर पिणारा माझा मस्कतमधला ड्रायव्हर हामद हे बीफ खाणार्‍या हिंदुइतकेच 'आम आदमी' - 'इन्सान' नव्हे - आहेत हे पटते. 'आधा मुसलमान हूं - शराब पीता हूं, सुवर नही खाता ' म्हणणारा गालिब या बाबतीत आपला गुरु ठरावा. देशादेशांमधल्या सीमा या काल्पनिक आहेत हे परदेशी लोकांशी संपर्क आला की पटते. मस्कतमध्ये एका पाकिस्तानी माणसाने 'इंडियन - माय फ्रेंड! गेल्या युद्धात मी तुमच्याविरुद्ध जोरात लढलो ' असे म्हणून माझ्या पाठीवर थाप मारली आणि हातातले सिगारेटचे पाकीट पुढे केले! सन्जोप राव
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 05/01/2008 - 11:56 नवीन
देशादेशांमधल्या सीमा या काल्पनिक आहेत हे परदेशी लोकांशी संपर्क आला की पटते. मस्कतमध्ये एका पाकिस्तानी माणसाने 'इंडियन - माय फ्रेंड! गेल्या युद्धात मी तुमच्याविरुद्ध जोरात लढलो ' असे म्हणून माझ्या पाठीवर थाप मारली आणि हातातले सिगारेटचे पाकीट पुढे केले! सन्जोप राव, +१ =D> =D>
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा