फसवणूक-प्रकरण १८: आपल्याला त्यांनी कुत्र्यांच्या तोंडी घातलंय्!

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
16 Jul 2010 - 4:54 pm

फसवणूक-प्रकरण १८: आपल्याला त्यांनी कुत्र्यांच्या तोंडी घातलंय्!
© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)

(या प्रकरणात मुशर्रफनी स्वतःची चामडी वाचवण्यासाठी "नीशाँ-ए-इम्तियाझ" हा "भारतरत्न"च्या तोडीचा पाकिस्तानचा सर्वोच्च मुलकी सन्मान दोनदा दोन वेगवेगळ्या सरकारांकडून मिळविलेल्या खानसाहेबांना कसा बळीचा बकरा बनवला याची हकीकत आहे.)

१ डिसेंबर २००१ला इंग्लंड-अमेरिकेचा चमू परत त्रिपोलीला आला. यावेळी त्यांच्याकडे पाकिस्तानने (व त्याला माल पुरविणार्‍या युरोपियन देशांनी) लिबियाचा प्रकल्प उभा करण्यात कसा हातभार लावला होता याबद्दलचा ताहीर यांनी केलेल्या आरोपाचा तपशीलही होता. त्यांनी ताहीरने दिलेल्या माहितीनुसार इस्तंबूलमध्ये खानसाहेबांबरोबर चर्चेस बसलेल्या Triple Mबरोबर बैठक मागितली. लिबियन्सनी ते उपलब्ध नसल्याचे सांगितले पण मुसकुसांनी त्यांना पूर्वी न दाखविलेल्या अशा डझनाहून जास्त क्षेत्रांचे अन्वेषण करू दिले त्यात 'अल हशन' व 'अल फाला'येथील सेंट्रीफ्यूज संशोधन केंद्रें, 'अल खाल्ला'चे जुने टाकाऊ युरेनियम रूपांतर केंद्र व सालाउद्दीन येथील एक नवे केंद्र, 'यलोकेक' साठवून ठेवण्यासाठी मध्यवर्ती वाळवंटातील 'साभा' गांवात बांधलेली गोदामेंआणि भावी 'यंत्रशाळा २००१' प्रकल्पासाठी बनविलेली फाउंडेशन्स वगैरे होते. शिवाय बर्‍याच सुविधा वारंवार हलविलेल्या दिसत होत्या.

यावेळी लिबियाचे लोक जास्त जागाच दाखवत होते असे नाहीं तर जास्त मनमोकळेपणाने बोलत होते व त्यांनी १९९५सालच्या अण्वस्त्रप्रकल्पाला चालना देण्याच्या धोरणानुसार लिबियाने पाकिस्तानकडे युरेनियम अतिशुद्धीकरणाच्या प्रकल्पात मदत मागितल्याचेही सांगितले. त्याचा तपशील राजकीयदृष्ट्या चांगलाच प्रक्षोभक होता.

पकिस्तान सरकारने खानसाहेबांना याबाबत हिरवा झेंडा दाखवून एका पाकिस्तानी लष्करातील 'सूत्रधार' असलेल्या अधिकार्‍याबरोबर काम सुरू करायला सांगितले[१]. CIA व MI6 यांनी लिबियाला मदत केलेला जर्मन माणूस नक्कीच गोठार्ड लर्च असल्याचा आडाखा बांधला होता. तरीही परदेशी तंत्रज्ञांची नावे घ्यायला लिबियन्स तयार नव्हते. आतापर्यंत अमेरिकन सरकार 'पाकिस्तानी लष्कर धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असून कहूताच्या व इतर ठिकाणच्या भ्रष्ट शास्त्रज्ञांनीच पाकिस्तानशी गद्दारी केली होती' अशा तर्‍हेच्या खोट्यानाट्या कंड्या पिकवून सार्‍या जगाची दिशाभूल करत होते त्या खोट्या प्रचारातल्या बर्‍याच गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. जो कुणी या अण्वस्त्रप्रसाराच्या कारवायांचा सूत्रधार होता त्याला उपलब्ध पुरावा हवा तसा वाकवून मुशर्रफ व त्यांच्या पित्त्यांना या गुंत्यापासून दूर ठेवण्याचे कौशल्य असायला हवे होते आणि ते सोपे नव्हते.

लिबियन्सनी ठामपणे सांगितले होते कीं पाकिस्तानबरोबरचा करार १९९७ साली इस्तंबूलमध्ये झाला होता व २० 'चालवायला तयार' अवस्थेतील P-1 सेंट्रीफ्यूजेस आणि २०० सेंट्रीफ्यूजेससाठी लागणारे घटकभाग यांची ऑर्डर पाकिस्तानला दिली गेली. पण फक्त एकच सेंट्रीफ्यूज अल हशन येथील R&D सुविधेत चालविण्यात आली होती आणि त्यातून कुठलेच अतिशुद्धीकृत युरेनियम बनले नव्हते. जेंव्हां लिबियाच्या शास्त्रज्ञांनी पाकिस्तानने निर्यात केलेल्या मालाबद्दल तक्रार केली तेंव्हां सप्टेंबर २०००मध्ये त्रिपोलीला ती कशी छान चालतात हे दाखविण्यासाठी दोन P-2 सेंट्रीफ्यूजेस पाठविण्यात आली. ती साध्या पाकिस्तान इंटरनॅशनल एअरवेज(PIA) च्या मुलकी विमानांतून इस्लामाबादहून दुबईला व तिथून पुढे ताहीरने केलेल्या व्यवस्थेनुसार लिबियाला पाठविण्यात आली. इथेही ब्रिटिश चमूला पाकिस्तानने या व्यवहारात कशा तर्‍हेचे पर्यवेक्षण केले होते त्याचे पुरावे मिळाले! P-2 सेंट्रीफ्यूजेसच्या पुरवठ्यातील गुप्तता राखण्यासाठी एक कट[२] रचण्यात आला. त्याची सुरुवात झाली होती मे २०००च्या मुशर्रफ यांच्या त्रिपोली भेटीपासून. त्या भेटीदरम्यान मुशर्रफ यांनी एक पारंपारिक शस्त्रास्त्रांच्या पुरवठ्याबाबतच्या कराराची घोषणा केली होती. त्यामुळे हा 'माल' लष्करी सहीशिक्क्यांसह चार महिन्यांनंतर जेंव्हां त्रिपोलीला पाठविला गेला तेंव्हां कुणालाच आश्चर्य वाटले नाहीं. पण त्या खोक्यांच्या आत होती P-2 सेंट्रीफ्यूजेस!

लिबियाचे तंत्रज्ञ 'अल हशन' येथील मोठ्या दालनात सेंट्रीफ्यूजेसची एक मालिका बनविण्यासाठी आणखी P-1 सेंट्रीफ्यूजेस उभारू लागले. पण कितीही प्रयत्न केला तरी त्यांना फक्त नऊ सेंट्रीफ्यूजेस चालविण्यात यश आले. पण तेवढ्यात वरिष्ठांनी त्या सर्व सुविधा 'अल फाला' येथील इमारतीत हलविण्याचा निर्णय घेतला. ताहीरच्या साक्षीनुसार व त्याला लिबियाच्या तंत्रज्ञांनी दिलेल्या पुष्टीनुसार २००२च्या डिसेंबरच्या शेवटी-शेवटी सेंट्रीफ्यूजेसच्या जोडणावळीत लागणारे लाखों घटकभाग सेंट्रीफ्यूजेस जोडण्याच्या शृंखलेसाठी[३] जानझूरला येऊन पडू लागले. त्यांचा समन्वय अनेक 'टपरी'वजा कंपन्यांद्वारा होत होता व या कंपन्यांना दुबईचा प्रमुख व्यावसायिक हमरस्ता 'शेख जायेद रोड'वरील "पोस्ट ऑफीस बॉक्स नंबर"पेक्षा अधिक अस्तित्व नव्हते.

जरी बहुसंख्य घटकभाग ताहीर यांनी त्यांच्या जबानीत निर्देशिलेल्या कंपन्यांकडून आलेल्या असल्या तरी ब्रिटिशांना आणखी एक स्रोत सापडला! खानसाहेबांनी १९९८पासून सुरू केलेल्या आफ्रिकेच्या दौर्‍यांमागील मतितार्थ MI6ला पहिल्यांदाच समजला. पण आधी संशय आल्याप्रमाणे ते दौरे 'यलोकेक' उपलब्ध असलेल्या नायजर देशातील 'नियामी'ला नव्हते तर 'खार्टूम'ला होते! कारण खार्टूमचा उपयोग खानसाहेब उच्च तंत्रज्ञानासह बनविलेल्या साधनांसाठी/यंत्रांसाठी गुदाम म्हणून करणार होते. सुदामला होणारी आयात पहाता अन्वेषकांच्या लक्षात आले कीं १९९९ ते २००१ दरम्यान सुदानमध्ये ३२ कोटी पौंडांच्या मशीनटूल्स, मापनसाधने व उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रक्रियायंत्रें पश्चिम युरोपमधून आयात झाली होती. त्यातले बरेचसे भाग द्व्यर्थी होते व सुदानला लाघणारे नव्हते. म्हणून शंका येणे सहाजीक होते.

CIA-MI6 चमूने खणलेल्या माहितीत गोठार्ड लर्च हे या लिबियन प्रकल्पात होते असे स्पष्ट दिसत होते. 'मानहाईम'च्या सरकारी वकीलांनी लर्च यांच्या व्यवहारांचे अन्वेषण करायला घेतल्यावर हे आरोप आणखीच बळकट झाले. लेबॉल्ड-हेरायस या कंपनीचे मॅनेजर असलेले लर्च खानसाहेबांचे '७० च्या दशकापासून सौदे करणारे सहकारी होते. त्यांनी स्वित्झरलंड, जर्मनी व दक्षिण आफ्रिकेत त्यांचा जमीन-जुमला व व्यवसाय होते आणि मोनॅकोच्या बॅंकखात्यातून करोडो डॉलर्स फिरवले/'धुतले'[४] होते. त्रिपोलीला मिळालेल्या कागदपत्रांवरून असे दिसत होते कीं यातले कांहीं पैसे लिबियातील उक्त्या व अद्ययावत् सेंट्रीफ्यूजेसच्या कारखान्याच्या व्यवहारातून मिळाले होते. या प्रकल्पासाठी लर्च यांनी १९९९च्या जुलैत ताहीर यांच्याबरोबरच्या दुबईमधील भेटीत करार केला होता. ताहीर यांनी मलेशियन पोलीस अन्वेषकांना सांगितले होते की त्यांना एकट्याला लिबिया प्रकल्प झेपणार नाहीं असे लक्षात आल्यावर लर्च यांनी त्यातला अर्धा भाग स्वतःकडे घेऊन दक्षिण आफ्रिकेला आपले काम करवून घ्यायचे ठरविले होते. १९८०च्या दशकात लर्च यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गुपचुप अण्वस्त्रनिर्मितीप्रकल्पात तेथील अभियांत्रिकी कंपन्यांबरोबर घटकभागनिर्मितीचे काम केले होते. पुढे वर्णद्वेष्ट्या प्रणालीचे उच्चाटन झाल्यावर हा प्रकल्प रद्द झाला त्यामुळे या घटकभागनिर्मितीत गुंतलेल्या कंपन्यांकडचे काम नाहींसे झाले होते व त्या सर्व कंपन्या लर्च याच्या प्रकल्पात आनंदाने सामील झाल्या.

लर्चनी लेबॉल्ड-हेरायसचे दक्षिण आफ्रिकेतील प्रतिनिधी गेरहार्ड विस्सर यांचा परिचय ताहीर यांच्याबरोबर १९९९ मध्ये एका खान्याच्यावेळी दुबईत करून दिला होता. विस्सरनी सांगितले कीं ५८३२ सेंट्रीफ्यूजेस असलेल्या पांच-टप्प्याच्या मालिकांची UF6 वायू घालण्याच्या व बाहेर काढण्याच्या व्यवस्थेसह संपूर्ण निर्मिती ते करू शकतील. थोडक्यात आता पाकिस्तान आपल्या कहूताप्रकल्पाच्या प्रतिकृती दहशतवाद्यांना समर्थन व सक्रीय मदत देणार्‍या अस्थिर सरकारांना अण्वस्त्रनिर्मितीसाठी विकायला तयार झाला होता व गद्दाफी असे तंत्रज्ञान किंवा अतिशुद्धीकृत युरेनियम जो पैसे देऊ शकेल अशा कुठल्याही राष्ट्राला विकायला तयार झाला असता. याचा ब्रिटिश अन्वेषकांना धक्काच बसला.

हे काम विस्सर यांच्या मेयर नावाच्या मित्राची एक "ट्रेडफिन इंजिनियरिंग" (प्रकरण १७सुद्धा पहा) ही कंपनी करणार होती. ग्रिफिन यांनी स्पेनमधून Libyan National Oil Companyसाठी आयात केलेल्या दोन अजस्त्र लेथ्सपैकी एक लेथ याच कंपनीकडे ग्रिफिनना न सांगता पाठविण्यात आला होता. मेयर हे विस्सर यांच्याबरोबर २००१ एप्रिलमध्ये दुबईला या कराराची चर्चा करायला आले होते. दोघांनीही ही यंत्रे कुठे जाणार होती हे माहीत नसल्याचे सांगून त्यांच्या माहितीप्रमाणे ही यंत्रे एका यूएईमधील एका रिफायनरीत बसविण्यासाठी बनत होती. पण त्या कंपनीचे नाव न लिहिता ते या प्रकल्पाला "प्रकल्प X" म्हणत. यावरून या दोघांनाही ही यंत्रे कुठे बसविली जात होती याची चांगली कल्पना होती असे अन्वेषकांना वाटले होते.

जेंव्हां फांडरबिलपार्कमधील तीन मजली धातूच्या इमारतीत मालिकेच्या उभारणीचे काम सुरू झाले तेंव्हां क्रिश कंपनीच्या दक्षिण आफ्रिकेत १९६९पासून रहात असलेल्या डॅनियल गाइजेस नावाच्या एका स्विस इंजिनियरने त्या कामावर देखरेख केली होती. गाईजेसने असादावा केला होता त्याने पूर्वी युरेंकोला माल पुरविणार्‍या लर्चच्या लेबॉल्ड-हेरायस या जुन्या कंपनीतून मिळालेली जर्मन ड्रॉइंग्ज वापरून काम केले होते. लर्चवर यापूर्वी दोन वेळा ही गुपिते चोरल्याचा आरोप केला गेला होता. पण फांडरबिलपार्कमधील कारखान्यात उभारल्या जाणार्‍या कारखान्यातील चांचण्यांची आकडेवारी व हिशेब[५] तर पाकिस्तानहून आलेले होते. सर्व कागदपत्रांवरून या तिघांची नांवे या प्रकल्पात गुंतलेलीच होती. १४ जूनला पाठविलेल्या फॅक्समध्ये विस्सरनी गाईजेसना कळविले होते कीं जुलैमध्ये लर्च कारखान्याला भेट देणार होते. आणखी एका फॅक्समध्ये त्यांनी GL ३० ऑगस्टच्या ते १ सप्टेंबर २००१च्या सुमारास येणार असल्याबद्दलही कळविले होते.

या प्रकल्पाची ख्याती अशी सगळीकडे पोचली होती कीं खूप लोकांना तो पहायची इच्छा होतॊ. त्यात खुद्द ताहीर आणि डॉ. फरूख हाशमीही होते. स्वत:ची अब्दुल व अली अशी नावे असल्याचे सांगून दोन इथियोपियचे पाहुणेही येऊन गेले. ते कदाचित् लिबियाचेही असण्याची शक्यता होती पण कुणालच नक्की माहीत नव्हते.गाईजेस यांच्या लक्षात आले कीं हा कारखाना युरेनियमच्या अतिशुद्धीकरणासाठी उभारला जात होता. हा प्रकल्प मे २००३ला पूर्ण झाला, त्याची चांचणी घेण्यात आली, मग त्याला पुन्हा सुटा करून अकरा ४०-फुटी कंटेनर्समध्ये सारे भाग भरून ते जहाजावर चढविण्यासाठी तयारी झाली. मेयरनी स्वित्झरलंडच्या बँकेत एक खाते उघडून त्यात डमी कंपन्यातून पैसे पाठविले. पण पैशाच्या एका व्यवहारात निष्काळजीपणाने लिबियाच्या पत्त्यावरून थेट पैसे आले. त्याखेरीज मेयरनी काहीं सेन्सर्स व व्हॉल्व्ज जर्मनीहून डमी कंपनीद्वारा घेतले होते तिकडेही जर्मनीतील कार्ल्सरूहं येथील सरकारी वकीलांचे लक्ष वेधले गेले व त्यांनी लर्चला अटक केली आणि २ कोटी डॉलर्स लिबियाकडून घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यात त्यांना १ कोटी डॉलरचा निव्वळ फायदा झाला होता.

लिबियात अँग्लो-अमेरिकन अन्वेषण चमूने पाकिस्तानी सौद्याचा आणखी एक पैलू उजेडात आणला होता व त्यामुळे त्यांचे पायच लटपटले. लिबियन लोकांनी त्रिपोलीजवळील 'अल फाला'येथील गुदामात ठेवलेले पत्र्याचे अनेक डबे त्यांनी या अन्वेषण चमूला दाखविले. त्यांत १.७ टन UF6 वायू होता व तो पाकिस्तानने लिबियातील युरेनियम अतिशुद्धीकरणाचा प्रकल्प सुरळीत सुरू व्हावा म्हणून त्यांना भेट म्हणून दिला होता. अतिशुद्धीकृत युरेनियम पाठविल्याचा मात्र कुठे उल्लेख नव्हता. आणखीही चिंतेची गोष्ट ही होती कीं पाकिस्तानहून निर्यात केलेला कांहीं माल लिबियाला न पोचता दुबई-त्रिपोली दरम्यान गायब झाला होता. एकात सेंट्रीफ्यूजेसचे भाग व एक टन मजबूत अ‍ॅल्युमिनियम व दुसर्‍यात अचूक अवजारे व खास प्रतीच्या लेथना लागणारे सुटे भाग[६] भरलेले हे कंटेनर्स BBC China जहाज पकडायच्या आधी वाटेत तुर्कस्थान व मलेशियालाही गेले होते. MI6च्या अधिकार्‍यांना चुटपूट लागली कीं त्यांनी या धंद्याची पाळेमुळे सापडावीत म्हणून ते जहाज पकडायची कारवाई करण्यात जो मुद्दाम उशीर केला तो जास्तच तर नाहीं ना झाला?

लिबियन्स कांहीं माहिती अजूनही लपवत होते. पाकिस्तानबरोबर संपूर्ण प्रकल्प बांधायचा करार होता तर अणूबाँब बनवायच्या संरचनेची ड्रॉइंग्ज अँग्लो-अमेरिकन अन्वेषण चमूला पहायची होती. शेवटी १२ डिसेंबर २००३च्या पहाटे जेंव्हां हा चमू त्रिपोली विमानतळावरील आपल्या कसलाही लोगो वगैरे नसलेल्या खास विमानात बसून जायला निघाला तेंव्हां लिबियन अधिकारी लगबगीने त्यांच्याकडे आले व त्यांच्या हातात त्यांनी बदामी रंगाचे सहा-एक लखोटे दिले. एका लखोट्यात अणूबाँबची ड्रॉइंग्ज होती, दुसर्‍यात अणूबाँब कसा रचायचा याच्या सूचना होत्या. या सर्व सूचना इंग्लिश व चिनी भाषेत लिहिल्या होत्या. अशा तर्‍हेने या अन्वेषण चमूला शेवटी पाकिस्तान-लिबियामधील नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांच्या कराराच्या बुडाशी जाता आले.

त्यानंतर चार दिवसांनी 'व्हाईटहॉल'मधील सरकारी कार्यालयात झालेल्या दिवसभर चाललेल्या बैठकीत लिबियाच्या घूम-जावबद्दलची सर्व माहिती संकलित करण्यात आली. ब्रिटिश बाजूला दोन MI6मधील अधिकार्‍यांबरोबर परराष्ट्रखात्यातील एक संचालक विल्यम एरमन व अण्वस्त्रप्रसारविभागाचे प्रमुख डेव्हिड लँड्समन होते तर अमेरिकेच्या बाजूने राष्ट्रीय सुरक्षा समितीचे रॉबर्ट जोसेफ आणि स्टीफन कापसह दोन CIAचे अधिकारी होते.लिबियाच्या बाजूने मुसाकुसा होते आणि त्यांच्याबरोबर लिबियाचे रोमचे राजदूत अब्दुल अती अल-ओबेदी व लंडनचे राजदूत महंमद अझवाही होते. यांच्यातील वाटाघाटी "कांहींच मान्य नाहीं पण सगळं मान्य आहे" या पद्धतीच्या होत्या. समोर लिबियाचे गद्दाफी त्यांच्या नरसंहारक्षम शस्त्रास्त्रनिर्मितीचा कार्यक्रम रद्द करणार असल्याबद्दलच्या जाहीर निवेदनाचा मसूदा होता. प्रत्येक शब्दाचा कीस काढला जात होता आणि इतक्यापरी लिबियन प्रतिनिधींना शेवटी गद्दाफी अशी घोषणा करतील याची खात्रीही नव्हती. शेवटी एक तडजोड झाली व त्यानुसार जर गद्दाफींनी अशी घोषणा करण्यास नकार दिला तर गद्दाफी त्या घोषणेला जाहीर संमती देतील व लिबियाचे परराष्ट्रमंत्री ती घोषणा करतील असे ठरले.

१८ डिसेंबरला ब्लेअर व गद्दाफी प्रथमच एकमेकांशी टेलीफोनद्वारा बोलले आणि दुसर्‍या दिवशी रात्री ९ वाजता लिबियन टेलीव्हिजनवरून गद्दाफी ती घोषणा करतील असे ठरले. पण ९ वाजता तर चक्क एक फुटबॉलचा सामना दाखविला जात होता. अशा तर्‍हेने शेवटच्या क्षणी झालेला निर्णय रद्द झाला कीं काय या शंकेपोटी चिंतेत पडलेल्या परराष्ट्रमंत्रालयाकडून त्रिपोलीतील ब्रिटिश राजदूताकडे फोनद्वारा चौकशी करण्यात आली असता त्यांनी संयम दाखवायचा सल्ला दिला. आणि अचानक साडेनऊ वाजता गद्दाफींचे परराष्ट्रमंत्री टेलीव्हिजनच्या पडद्यावर आले आणि त्यांनी लिबिया नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांच्या कार्यक्रमाला तिलांजली देत आहे अशी घोषणा केली. त्यानंतर पाठोपाठ गद्दाफींनीसुद्धा त्यांचे निवेदन प्रसिद्ध केले. डरॅम परगण्यातील त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात असलेल्या ब्लेअर यांनीही संध्याकाळच्या बातम्यांच्या वेळेआधी पोचेल अशा तर्‍हेने तातडीने त्यांचे निवेदनही जाहीर केले. "आता आपण भौगोलिक आणि सांस्कृतिक दर्‍या ओलांडणारी आणि कडक आंतरराष्ट्रीय नियम आणि कारवायांचा पाठिंबा असलेली नवी भागीदारी सुरू करत आहोत. ९/११ च्या घटनेने सार्‍या जगाला दाखवून दिले आहे कीं हा नवा दहशतवाद निष्पापांच्या हत्येच्या कांहींही सीमा जाणत नाहीं." ते पुढे म्हणाले कीं "आजच्या घोषणेने हे दाखवून दिले आहे कीं आपण या नव्या धमक्यांना/धोक्यांना लष्करी पद्धतीखेरीज शांततेसारख्या इतर उपायांनीही तोंड देऊ शकतो, पण त्यासाठी दोन्ही राष्ट्रांत परस्पर विश्वास असला पाहिजे व आंतरराष्ट्रीय समुदायाबरोबर काम करून या शस्त्रांचा नाश करण्याची इच्छा असली पाहिजे. पाकिस्तानला आपल्या घरापासून दूर व कमी सुरक्षित अशा देशात एक नवे कहूता उभारण्यात खुषीच होती, त्यात ब्लेअरनीही पाकिस्तानचा कुठेही उल्लेख केला नाहीं.

दक्षिण आफ्रिकेत ट्रेडफिन कंपनी पुन्हा सुरू करून तिथे पाकिस्तानसाठी सेंट्रीफ्यूजमालिका बनविल्याबद्दल विस्सर यांच्यावर तिथले सरकारी वकील आरोपपत्र दाखल करण्याची तयारी करीत होते. ते कळल्यावर विस्सरनी (लिबियाचा थेट उल्लेख न करता) आपल्या कंपनीच्या संचालकांना (मेयरना) एक निरोप पाठविला, "आपल्याला त्यांनी कुत्र्यांच्या तोंडी घातलंय्[७]" त्यांनी बनविलेली संपूर्ण यंत्रसामुग्री अद्याप त्यांच्या कारखान्याच्या बाहेर कंटेनर्समध्ये भरलेल्या अवस्थेत ठेवलेली होती आणि त्रिपोलीने त्यांना नग्न करून टाकले होते! विस्सर पूर्णपणे हताश झाले होते. त्यांनी 'हे पाखरू पूर्णपणे-पंख वगैरेसह-नष्ट करायला हवे' असा आणखी एक निरोप पाठविला. पण मेयरना खात्रीहोती कीं हे वादळ शमून जाईल. त्यांना पैशाची व केलेल्या श्रमांचीच जास्त फिकीर पडली होती. महत्वाचे कागदपत्र त्यांनी एका वापरात नसलेल्या सोन्याच्या खाणीत लपविले.

पण विस्सर, मेयर, गाइजेस व लर्च यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले व त्यातल्या विस्सर व गाइजेसवर दक्षिण आफ्रिकेच्या नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांच्या प्रसाराविरोधी आणि परमाणू उर्जा कायद्यांखाली खानसाहेबांच्या जाळ्याबरोबर संबंध ठेऊन कारवाया केल्याबद्दल रीतसर आरोपपत्र दाखल केले. त्याच प्रमाणे फ्रेड टिनर व त्यांचे उर्स व मार्को हे दोन मुलगे यांनाही स्विस सरकारने त्यांच्या ट्राको व ताहीर यांच्या मलेशियातील कारखान्यांच्या लिबियाच्या प्रकल्पात केलेल्या योगदानाबद्दल चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनी आपण निर्दोष असल्याचे जाहीर केले असले तरी ते पोलिसांच्या कैदेत राहिले. हे पुस्तक लिहिले गेले तेंव्हां हा खटला न्यायालयात थबकला होता कारण तो उघडपणे चालवायचा कीं गुप्ततेत याचा निर्णय न्यायालयाने अद्याप घेतला नव्हता!

IAEAचे प्रमुख एलबारादेईंना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आले होते. IAEAच्या बोर्डाच्या अमेरिकन व ब्रिटिश सभासदांनी त्यांना फक्त "आता वार्षिक रजेवर जाऊ नका, कांहींतरी शिजतेय्" एवढाच इशारा दिला होता. त्रिपोली घोषणेच्या दुसर्‍या दिवशी त्यांना ब्रिटिश अधिकार्‍यांनी थोडक्यात माहिती दिली. अशी वागणुकी दिल्याने ते खूप संतापले. त्यांनी रागात सांगितले कीं बोल्टननी त्यांचा फोन टॅप केलेला असल्याने ते आपल्या पत्नीशी व मुलीशीही खासगीत बोलू शकत नव्हते. त्याला वॉशिंग्टनकडून "IAEAच्या इराणबरोबरच्या व्यवहारवर नियंत्रण ठेवण्यासाठीच फक्त असे केलेगेले होते" असे थातुर-मातुर समर्थन आले. जो कुणी इराकमधील नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांचा नाश करण्याच्या अमेरिका-इंग्लंडच्या योजनांच्या विरोधात बोलत त्यांना कमालीची द्वेषपूर्ण वागणूक दिली जाई. इराकच्या युद्धाला विरोध करणार्‍या संयुक्त राष्ट्र संघाच्या ज्येष्ठ मुत्सद्द्यांचे बोलणे चोरून ऐकले जाई तसेच इराकच्या युद्धाला विरोध असलेल्या कोफी अनान यांच्याविरुद्धही हेरगिरी केली गेली होती.

२० डिसेंबर २००३रोजी एलबारादेईंनी Triple M यांच्या नेतृत्वाखालील लिबियाच्या शिष्टमंडळाबरोबर योजलेल्या आगामी भेटीची घोषणा करून आपली प्रतिष्ठा शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. Triple M एलबारादेईंखेरीज इतर कुणाहीबरोबर बोलण्याच्या प्रतिकूल होते. पण बोल्टननी गुप्ततेत झालेल्या लिबियाबरोबरच्या कराराच्या एलबारादेईंच्या अज्ञानाचे उदाहरण करून त्यांच्याविरुद्धची मोहीम आणखी प्रखर केली.

अखेरीस लिबियाच्या कराराला पराभूत करण्यात 'व्हाईट हाऊस' यशस्वी झाले. IAEAच्या संस्थापनाच्या मूळ घटनेनुसार फक्त अण्वस्त्रधारी राष्ट्रांनाच अण्वस्त्रांच्या संरचना पहाता येतात आणि म्हणूनच अमेरिकेची या सर्व व्यवहारात छोटीशीच असली तरी अमेरिकेने हट्टी भूमिका घेऊन लिबियातून आणलेले सर्व सामान टेनेसीतील अणूबाँब बनविण्याची सुविधा असलेल्या ओक रिज राष्ट्रीय प्रयोगशाळेत मागविले व तिथे बुश-४३ यांचे त्या सामानाची पहाणी करत असतांनाचे फोटो १२ जुलै २००४ रोजी काढण्यात आले. तिथे गद्दाफींच्या प्रकल्पाचे निवारण म्हणजे जणूं बुश-४३ सरकारच्या अण्वस्त्रप्रसारबंदीच्या धोरणाचा विजयच होता अशा थाटात त्यांनी जाहीर केले कीं "नव्या धोक्यांकडे दुर्लक्ष न करता व नव्या शोकांकिका घडण्याची वाट न पहाता त्यांना आव्हान द्यायचा अमेरिकेचा निश्चय आहे." पण बुश-४३ यांनी लिबियाच्या युरेनियम अतिशुद्धीकरणाच्या प्रकल्पाच्या उगमाचा कांहींच उल्लेख केला नाहीं. तसेच "प्रकल्प A/B"सारख्या प्रकल्पाप्रमाणे अण्वस्त्रक्षम मूलद्रव्यांच्या विक्रीतून नफा कमावण्याच्या मुशर्रफ यांनी रचलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या विस्तृत कारस्थानाचाही त्यांनी उल्लेख केला नाहीं. तसेच मुशर्रफना धुतल्या तांदळासारखा दाखवण्यासाठी व खानसाहेबांचा बकरा बनविण्यासाठी जे कृष्णकृत्य पडद्यामागे रिचर्ड आर्मिटेज व ख्रिस्तीना रोका यांनी रचले त्याचाही उल्लेख नव्हता. तीस वर्षांच्या पाकिस्तानबद्दलच्या अयशस्वी अमेरिकन परराष्ट्रनीतीबद्दल किंवा पाकिस्तानने केलेल्या अण्वस्त्रप्रसाराबद्दलच्या परराष्ट्रमंत्रालयाकडून दडवल्या गेलेल्या आणि राष्ट्राध्यक्षांच्या मदतनीसांकडून विध्वंस केल्या गेलेल्या केंद्रीय अन्वेषकांनी जमविलेल्या गुप्त माहितीबद्दलची कुजबूजही नव्हती, पेंटॅगॉनच्या अधिकार्‍यांनी गुप्तहेरखात्याने दिलेली माहिती हेतुपूर्वकपणे बदलल्याचाही उल्लेख नव्हता (या हेराफेरीमुळेच पाकिस्तानशी अब्जावधी डॉलर्सचा शस्त्रास्त्रें पुरविण्याचा करार झाला होता व परिणामतः स्वतःची अण्वस्त्रें बनविणे आणि नंतर ती लिबियासारख्या राष्ट्रांना विकणे पाकिस्तानला शक्य झाले होते. वॉशिंग्टनच्या गाभार्‍यातून रचल्या गेलेल्या या 'नेत्रदीपक' व बर्‍याचदा गुन्हेगारी स्वरूपाच्या कारस्थानांमुळे निर्बळ IAEAने केलेले आरोप किरकोळ/क्षुल्लक आणि बुश-४३ यांच्या नव्या धोक्यांना आव्हान देण्याच्या वल्गना पोकळ वाटत.

मुशर्रफ यांनी केलेली सनातनी जनरल्सबरोबरची चलाखी आणि आतापर्यंत ज्यांच्यावर पाकिस्तान निर्भर होता अशा परमाणू शास्त्रज्ञांची त्यांनी कपटीपणाने केलेली मुस्कटदाबी यामुळे त्यांना आपल्या प्राणांना जवळ-जवळ मुकावे लागले. सुदैवाने त्यांची गाडी उडविण्यासाठी वापरलेला बाँब कांहीं सेकंद आधीच उडाला आणि ते वाचले. हा हल्ला 'जैश-ए-महम्मद' या दहशतवादी गटाबरोबर मित्रत्वाचे संबंध असलेल्या पाकिस्तानच्या हवाईदलातील अधिकार्‍यांकडून केल्या गेलेल्या कटाची परिणती होती. 'जैश-ए-महम्मद' या संघटनेची स्थापना मुशर्रफ यांचा एकेकाळ्चा पित्त्या व हर्कत-उल-अन्सार या संघटनेचा एके काळचा प्रमुख मौलाना मसूद अझर यांनी केली होती. अझर वा त्यांचे समर्थक मुशर्रफ यांच्यावर त्यांच्या दुटप्पीपणाच्या धोरणामुळे, त्यांच्या अमेरिकेशी बनविलेल्या जवळिकीतून दहशतवाद्यांविरुद्ध पुकारलेल्या युद्धामुळे आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पावर अमेरिकेला दिलेल्या सवलतींमुळे व खानसाहेबांना बदनाम केल्याबद्दल नाराज होते.

पण त्यांच्या जिवावरील हल्ल्यामुळे मुशर्रफ यांचा निग्रह आणखीच कणखर झाला. दुसर्‍या दिवशी (१५ डिसेंबरला) ISIने खानसाहेबांच्या घरावर छापा घातला. कुणालाही आत किंवा बाहेर जाऊ दिले जाऊ नये असा हुकूम होता. लगेच खानसाहेबांच्या घराभोवती वेढा पडल्याची बातमी इस्लामाबादमध्ये पसरली. 'पाकिस्तानी अणूबाँबच्या पिताश्रीं'च्या घराभोवती वार्ताहारांचा गराडा पडला. वार्ताहारांनी परराष्ट्रमंत्रालयालाही वेढून खानसाहेबांवर खासगी अणूबाँब बाजार थाटल्याचा मुशर्रफ यांचा आरोप आहे कां स्पष्टीकरण मागितले. सरकारला निवेदन द्यायला तब्बल ७ दिवस लागले व २२ डिसेंबरला परराष्ट्रमंत्रालयालाचे प्रवक्ते मसूद खान यांनी तरीही जे सगळ्याना दिसत होते ते कबूल करायला नकार दिला. खानसाहेबांना अटक झालेली नाही, त्यांना स्थानबद्धतेत ठेवलेले नाहीं, त्यांच्यावर कुठलाही प्रतिबंध नाहीं असा भास होत होता. "त्यांच्या debriefingच्या सत्राचा भाग म्हणून त्यांच्यासाठी कांहीं प्रश्न उपस्थित केले आहेत" असेही मसूद खाननी सुचविले. 'पाकिस्तानी अणूबाँबच्या पिताश्रीं'ना विचारल्या जाणार्‍या प्रश्नांचा आणि वॉशिंग्टनमधून प्रसारित होणार्‍या इराण व लिबियासंबंधींच्या निवेदनांचा कांहींही संबंध नाही असेही त्यांनी सांगितले. थोडक्यात खानसाहेबांचा बळी देण्यासाठी मुशर्रफ यांची थापेबाजी चालली होती. पण जनतेचा संताप जाणवत होता!

दरम्यान खानसाहेबांची कन्या खानसाहेबांनी आपली पत्नी हेनीसाठी लिहिलेला "प्रकल्प A/B"बद्दलचा तपशीलवार अहवाल घेऊन दीना पाकिस्तानाबाहेर निसटली होती. तिला सूचना होत्या कीं खानसाहेब अदृश्य झाल्यास अथवा मृत पावल्यास तो अहवाल तिने प्रसिद्ध करावा असे ISIला कळले होते. या अहवालावरून अणूबाँबच्या विक्रीचा गुप्त कार्यक्रम लष्कर, मुशर्रफ व ज्येष्ठ सरकारी अधिकारीच चालवत होते हे सिद्ध होत होते. खानसाहेबांनी काय लिहिले आहे हे जरी त्यांना माहीत नसले तरी हा अहवाल जाऊ देणे मुशर्रफना चालणार नव्हते! पण दीनाने एक चूक केली! तिने दुबईहून आपल्या मोबाईल फोनवरून इस्लामाबादला फोन केला व त्यावेळी ती त्या अहवालाबद्दल बडबडली व या संभाषणामुळे ती खान यांच्या सदनिकेत आहे हे त्यांना कळले. पण ISIचे अधिकारी तिथे पोचायच्या आत दीना खानसाहेबांनी बनवलेल्या बनविलेल्या अहवालासह लंडनच्या विमानात बसली होती. खानसाहेबांच्या सदनिकेचा मात्र विध्वंस केला गेला. दरम्यान मुशर्रफनी दीनाने राष्ट्रीय गुपिते चोरली असल्याचा आरोप करून MI5ला तिला अडवायला सांगितले. दीनाला त्यांच्याकडून प्रश्न विचारण्यात आले पण तिच्याकडे फक्त खानसाहेबांचे सविस्तर अ‍ॅफिडेव्हिट होते व ते आता गुप्तच रहाणार होते.

पण दीनाने कांहीं करण्याच्या आतच मुशर्रफनी खानसाहेबांना निरोप पाठविला. मुशर्रफ यांची माणसे त्यांच्या घरी आली व अतीशय कोरडेपणाने व धमकीवजा भाषेत खानसाहेब कोण आहेत याचा मुलाहिजा न ठेवता ताकीत दिली कीं त्यांना जर या समस्येतून धडपणे बाहेर यायचे असेल तर त्यांना आश्वासन द्यावे लागेल कीं त्यांची मुलगी ते कागदपत्र कधीही प्रसिद्ध करणार नाहीं! असे आश्वासन द्यायला खानसाहेबांनी नकार दिला, पण दीना मागे हटली व इंग्लंडमध्येच राहिली.

मुशर्रफ मग हानी-निवारणाच्या उद्योगाला लागले. त्यांच्या प्रवक्त्याने जाहीर केले कीं पाकिस्तान सरकारने कधीही संवेदनाशील अशा परमाणू तंत्रज्ञानाच्या प्रसाराला परवानगी दिलेली नाहीं अथवा अशा प्रसाराचा मुहूर्तही केलेली नाहीं. मसूद खाननीही त्याचीच री ओढत जाहीर केले कीं पाकिस्तान सरकारने कधीही अण्वस्त्रप्रसार केला नाहीं आणि करणारही नाहीं. हळूहळू सगळ्यांची नजर पाकिस्तानातील संस्थांपासून दूर होत कांहीं व्यक्तींकडे वळली. पाकिस्तान IAEAशी संपूर्ण सहकार्य करीत होते. मुशर्रफ यांनी ४०० टक्के ग्वाही दिली होती आणि व जबाबदारी घेतली होती कीं पाकिस्तानने दिलेल्या अभिवचनांचा कधीही आज्ञाभंग किंवा उल्लंघन होणार नाहीं. थोडक्यात खानसाहेब व त्यांचे कहूतातले सहकारी यांना पाकिस्तान व पाकिस्तानी संस्थांपासून वेगळे करण्याच्या 'प्रकल्पा'ने पूर्ण वेग घेतला होता. पाठोपाठ माहितीमंत्री शेख रशीद अहमद यांनीही "चौकशीनंतर हे लोक जर या कुकर्माबद्दल दोषी आढळले तर पाकिस्तान सरकार व त्याच्या सरकारी संस्था स्वतःला त्यांच्यापासून दूरच ठेवतील" असे निवेदन केले.

पण ही सारी तारेवरील कसरतच होती. मुशर्रफना एका बाजूला बदनाम झालेल्या खानसाहेबांपासून स्वतःला दूर ठेवायचे होते तर दुसर्‍या बाजूला अमेरिका कहूताच्या शास्त्रज्ञांच्याविरुद्धच्या कारवायांचे संचालन करत आहे अशा अर्थाच्या सतत पसरणार्‍या जोरदार अफवांनाही तोंड द्यायचे होते. ज्या शास्त्रज्ञांना स्थानबद्ध केले होते त्यांचे कुटुंबीय दावा करत होते कीं त्यांनी त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये साध्या वेषातील गोरे लोक बसलेले पाहिले होते. या सार्‍या चौकशा देशांतर्गत असून कुठलेही परदेशी लोका किंवा परदेशी संघटना या चौकशांत सहभागी नाहींत व पाकिस्तानचा कुठलाही नागरिक परदेशी सरकारच्या हवाली केला जाणार नाहीं अशीही घोषणा मुशर्रफ यांच्या प्रवक्त्याने केली. एक देखावा म्हणून डॉ. महम्मद फरूख हे कांहीं दिवसांनंतर घरीही परतले पण एका दिवसात पुन्हा त्यांना तुरुंगात नेण्यात आले. त्यांची परदेशी अनेक खाती असून त्यात लाखों डॉलर्स ठेवले आहेत अशी अफवाही सरकारधार्जिण्या वृत्तपत्रांकडून उठवण्यात आल्या.

नातळच्या दिवशी एका कारबाँबच्या हल्ल्यात १७ इतर मृत्यू पावले पण मुशर्रफ बचावले.

अण्वस्त्रप्रसारातील पाकिस्तानचा हात सगळीकडे दिसत होता. इराणकडून वाटाघाटी करणार्‍यांनी त्यांना १९९४ साली P-2 सेंट्रीफ्यूजेसची ड्रॉइंग्ज पाकिस्तानकडून मिळाल्याचे कबूल केले. या व्यवहारात ताहीर यांचा हात असल्याबद्दल अटकळी होत्या पण मलेशियन अधिकार्‍यांनी त्यांच्या हालचालींवर प्रतिबंध आणला होता व ते IAEAला मदत करणार नाहींत असे त्यांच्या वकीलांनी सांगितले. "आमच्याकडे व्यवसायिक मनुष्यबळाचा तुटवडा असल्याने आम्ही पाकिस्तानकडून मिळालेली P-2 सेंट्रीफ्यूजेसची ड्रॉइंग्ज वापरू शकलेलो नाहीं" असे सांगून इराणने गोंधळात आणखीनच भर घातली.

२००२मध्ये P-2 सेंट्रीफ्यूजेस प्रयोग करण्यासाठी AEOI[८]ने एका कंत्राटदाराची नेमणूक करून ती चालवण्याचा प्रयत्न व्यर्थ ठरला होता. पण बोल्टनसारख्या जहालवाद्याची खुमखुमी जिवंत असल्याने त्यांनी इराणच्या कबूलीवर विश्वास नसल्याचे सांगून इराणने दुसरा प्रकल्प एका गुप्त ठिकाणी उभारला असून तिथे P-2 सेंट्रीफ्यूजेसची मालिका व्यवस्थितपणे कार्यरत होती व त्यानुसार इराण लवकरच अण्वस्त्रधारी राष्ट्र बनेल असा प्रचार तावातावने करणे चालूच ठेवले. कांहींही सबळ पुरावा नसूनही बोल्टन यांच्यासारख्यांनी P-2 सेंट्रीफ्यूजेसचा मुद्दा पुनरुज्जीवित केला.

त्रिपोलीत लिबियाच्या परमाणूप्रकल्पामागे पाकिस्तानच होता याचा निर्विवाद पुरावा होता. लिबियाकडून विकत घेतलेल्या तंत्रज्ञानाचे अणूबाँब बनविण्याची ड्रॉइंग्ज, योजनेच्या रेषाकृती, वापरण्याच्या सूचना[९अ] यासारखे पुरावे Triple M यांनी जानेवारी २००४च्या एका बैठकीत आणले व ते डॉन माली व डेव्हिड लँड्समन[ब] यांना भेट म्हणून अर्पण केले.
इंग्लिश व चिनी भाषेत सूचना असलेल्या व ५०० किलो वजन असलेल्या या कागदपत्रांवरून ते अणूबाँबसंबंधीचे दिसत होते व जॅक बाऊट या IAEAच्या अधिकार्‍याने त्यांच्या अभ्यासाचा अभिभार/जबाबदारी घेतला. मायन्यात "मुनीर यांचा बाँब आकाराने मोठा असेल" असा KRL आणि PAEC यांच्यातील जुनी स्पर्धा दर्शविणारा शेरा होता. PAECचा बाँब मोठा असल्याने प्रक्षेपणास्त्रांवर बसविणे वा विमानातून टाकणे अवघड असल्याचे दर्शविण्याचा हा प्रयत्न होता. हे कागद घेऊन बाऊट वॉशिंग्टनला गेले व डलस विमानतळावरून हत्यारी गाड्यांच्या ताफ्यातून अमेरिकेच्या Department of Energyच्या अतिसुरक्षित तिजोरीत ते ठेवण्यात आले. KRLचा शिक्का असलेल्या पेटार्‍यात ठेवलेले सेंट्रीफ्यूजचे सुटे भाग लिबियाच्या गोदामात सापडले होते ते, प्योंग्यांगहून आलेले (व 'दुष्टचक्र' पूर्ण करणारे) प्रक्षेपणास्त्रांचे भाग व तशाच कांहीं महत्वाच्या इतर गोष्टीही तिथे ठेवण्यात आल्या[१०]. मुशर्रफनी आपल्या पुस्तकात पुढे लिहिले आहे कीं जगापुढे जगातील सर्वात जास्त विघातक राजवटींना परमाणू तंत्रज्ञान बेकायदेशीर पुरविणारे व्यापारी म्हणून आम्ही उभे होतो आणि हे चित्र हिडीस होते.

१७ जानेवारीला आणखी एका लाटेत ब्रि.सजवाल यांच्यासह आणखी पाच पाच कर्मचार्‍यांना 'उचलण्यात' आले. ISIच्या गाडीतून आलेल्या एका मेजरने ब्रि.सजवालना चौकशीसाठी ISIच्या कार्यालयात स्वतःबरोबर येण्यास सांगितले. डॉ.शफीकनी[११] लगेच खानसाहेबांना कळवले. पण खानसाहेबांचे बोलणे संदिग्ध होते व त्यांना इस्लामाबादमध्ये चाललेल्या KRL कर्मचार्‍यांच्या धरपकडीबद्दल माहिती नसावी असे दिसले.

डॉ.शफीकनी सर्व जवळच्या मित्रांना व KRL कर्मचार्‍यांच्या मुलांना फोन लावले. त्यांनी अशा बेरात्री बाहेर पडून ISIविरुद्ध विनंतीअर्ज दाखल करण्यास तयार असलेल्या वकीलांचा शोध सुरू केला. मध्यरात्रीच्या जरासे आधी खानसाहेबांचा फोन आला. मेजर इस्लाम या त्यांच्या प्रमुख मदतनीसालाही खानसाहेबांच्या बरोबर ते जेवत असतांना 'उचलले' होते. यावेळी ते क्षुब्ध वाटले. आता अशी भीती खानसाहेबांच्या दरवाज्यापर्यंत पोचली होती. मेजर इस्लाम यांचा त्यांच्या पत्नीशीही कांहींही संपर्क नव्हता. एकाएकी खानसाहेबांना शेवट आल्याचे जाणविले. स्वतःला वाचविण्यासाठी मुशर्रफ या सर्वांची धरपकड करत होते हे त्यांच्या लक्षात आले. KRL कर्मचार्‍यांची मुले एकत्र होऊ लागली. त्यांना मुशर्रफ यांचा डाव परतायचा होता. सरकारकडून त्यांना काय चाललेय यबद्दल कांहींच कळत नव्हते. प्रत्येक कुटुंबाला वेगळेच सांगितले जात होते. बर्‍याच KRL कर्मचार्‍यांचे डॉक्टर असल्यांने डॉ.शफीक हे प्रत्येक नाहींशा झालेल्या माणसाला भेटायची मागणी करू शकत होते व सगळ्या प्रतिसादांचा समन्वय करण्याचे काम त्यांनी आपणहून पत्करले. त्यांनी न्यायालयाकडे धाव घेतली व habeas corpusचे अर्ज केले. दोन दिवसांनंतर १९ जानेवारी २००४ला डॉ.शफीकना उत्तर मिळाले. सरकारी वकीलांनुसार त्यांच्या वडिलांना माहितीमंत्री शेख रशीद अहमद यांच्या विनंतीनुसार नेहमीच्या KRLबद्दलच्या चौकशीसाठी नेण्यात आले होते.

डॉ.शफीक बिचकलेच! हे विलक्षणच होते! कुणीच स्थानबद्ध नव्हते? जणू त्यांचा ISIच्या दरीत कडेलोटच करण्यात आला होता. ISIच्या सार्वजनिक संबंधविभागाचे (PRO) प्रमुख मे.ज.शौकत सुलतान यांनी कुणालाही स्थानबद्ध केलेले नसल्याचे आणि कुठल्याही अण्वस्त्रसज्ज राष्ट्रात अशा तर्‍हेचे गुप्तवार्तासंकलन[१२] नेहमीच केले जात असल्याबद्दल आग्रही प्रतिपादन केले. न्यायालयही गोंधळून गेले होते आणि त्यांनाही या स्थानबद्ध व्यक्तींना कुठे ठेवले आहे हे चौकशी करूनही समजले नव्हते.

डॉ.शफीकनी आणखी दबाव आणला व मुशर्रफ यांच्याबद्दलचा अप्रिय तपशील जाहीर करण्याची धमकी दिल्यानंतर सरकारी वकीलांकडून प्रतिसाद मिळाला कीं ब्रि.सजवाल यांच्यावर अण्वस्त्रप्रसार करणार्‍या किंवा अण्वस्त्रप्रसाराशी संबंधित कारवाया करणार्‍या, गुप्त संकेताक्षरे, परमाणू मूलद्रव्यें, पदार्थ, यंत्रसामुग्री, साधनसामुग्री, घटकभाग, माहिती, कागदपत्रें, रेखाकृती, ड्रॉइंग्ज, प्रतिकृती, लेख, टिपणे परदेशांना व परदेशी व्यक्तींना पुरविणार्‍या व्यक्तींशी नजीकचे साहचर्य, सहभाग व संबंध ठेवल्याचे आरोप ठेवले गेले होते. हे कळल्याचर मुशर्रफ यांचा डाव तरी उघड झाला. आधी आढेवेढे वगैरे घेऊन झाल्यावर शेवटी हे नक्की झाले कीं ब्रि.सजवाल व इतरांची परमाणू तंत्रज्ञानाच्या बेकायदा व्यवहारात गुंतल्याबद्दल चौकशी होत आहे.

स्वतःला वाचविण्यासाठी मुशर्रफनी अख्ख्या परमाणूसंस्थेला चिरून काढले याबद्दल मोठाच अविश्वास होता. कारण या सर्वांच्या कुटुंबियांचा समज होता कीं त्यांचे वडील/पती पाकिस्तानसाठी काम करत होते यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. KRL वगैरे कांहीं गावोगाव फिरून विक्री करणार्‍या फेरीवाल्यांचा उद्योग नव्हता. जो झाला होता तो दोन देशांतील व्यवहार, मग आता वैयक्तिक लोभ व देशद्रोह कां म्हटले जात होते हे त्यांना कळत नव्हते. हे सारे हताश कुटुंबीय विचारविमर्श करण्यासाठी डॉ.शफीक यांच्या घरी एकत्र जमले. सर्वात वर उपयोगी पडू शकेल अशा बॅरिस्टरचे नाव लिहिले व त्याखाली या अटकसत्रातल्या प्रमुख अधिकार्‍यांची नावे व त्या प्रत्येकाने काय म्हटले होते ते लिहिले. सुरुवातीला मुशर्रफनी याला खासगी बाब म्हटले होते, नंतर सर्व कुटुंबियांना ते अमेरिकेच्या खूप दबावाखाली काम करत असल्याचे कारण देऊन सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला होता, नंतर IAEA त्यांना लाथा घालत होते व उ.कोरियाशी व्यवहार केल्याबद्दल जपान रागावल्याचेही सांगितले. सारा दोष या शास्त्रज्ञांवर ढकलला जात होता. आधी शेख रशीद यांनी ९५ टक्के गुप्तवार्तासंकलन पूर्ण केल्याचे सांगितले, नंतर ९० टक्के. नंतर सांगितले कीं ते ११ फेब्रुवारी २००४च्या 'ईद'आधी संपेल! थोडक्यात सर्व नाटकच चालले होते.

सर्व टिपणे या कुटुंबियांचे दुःख सांगत होती. भावना दर्शविणारे शब्द वापरून त्यांना कसे बळी दिले जात आहे हे आपल्या आवडत्या पत्रकारांमार्फत सार्‍या पाकिस्तानी जनतेला सांगून मदतीची कळकळीची विनंती करत होते. habeas corpus अर्जाचा नेटाने पाठपुरावा केल्यावर डॉ.शफीकना सांगण्यात आले कीं त्यांची स्थानबद्धता १९५२च्या पाकिस्तानच्या संरक्षण कायद्याखाली केली गेली असून त्यानुसार ISIला तीन महिन्यासाठी त्यांना स्थानबद्धतेत ठेवता येते.

न्यायालयात केलेल्या अनेक कारवायांमुळे बाहेर आलेल्या माहितीवरून या सर्व घडामोडींमागे कोण होता व परदेशी या घटनांकडे कसे पाहिले जात होते याबद्दल कांहीं इशारे मिळत होते. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रालयातील एका अधिकार्‍याची डॉ.शफीक यांच्या वकीलाकडे देण्यात आलेल्या एका चिठ्ठीत या भानगडीला "सर्व दहशतवादांचा उगम" असे संबोधण्यात आलेले होते. खानसाहेबांचे आणि त्यांच्या निकटवर्तियांबद्दल "बिन लादेन व सद्दाम हुसेनपेक्षा जास्त धोकादायक" असे लिहिले जात होते. तरीही नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांवरून लढले जाणारे युद्ध पाकिस्तानमध्ये व्हायच्या ऐवजी इराकमध्ये कां होत होते याचे तर्कशुद्ध कारण गवसत नव्हते.

KRL कर्मचार्‍यांच्या मुलांनी मुशर्रफ यांचे मुद्दे खोडून काढायचा प्रयत्न केला. कहूता प्रकल्प लष्कराच्या अनेक वेगवेगळ्या दलांच्या फौजेच्या, विमानवेधी तोफांच्या, जेट विमानांच्या व सैनिकांच्या वेढ्यात होता, असे असतांना UF6चा किंवा अतिशुद्धीकृत युरेनियमचा एकादा डबा, ड्रॉइंग, अणूबाँबची संरचना, वगैरे तिथून बाहेर काढणे कसे शक्य होते? शिवाय सर्व माल C-130 ही लष्करी विमाने वापरून हलविला जात होता हे मुशर्रफ यांनीच मान्य केले होते. मग ही विमाने इतक्या मोठ्या संख्येने व इतक्या वेळा लष्कराच्या किंवा लष्करप्रमुखांच्या माहितीशिवाय कशी येत-जात होती?

KRL कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांनी पाकिस्तान सरकारला "अण्वस्त्रप्रसार वैयक्तिक लोभ-अभिलाषेपायी केल्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या आरोपांमुळे आमचा अपमान केला गेलेला आहे. आम्ही सर्व अतीशय साधेपणाचे व सरळ जीवन जगतो. आम्हाला परदेशवार्‍या वा तिथल्या सुट्या आणि पैसे नसल्यामुळे प्रथितयश पाकिस्तानी किंवा परदेशी संस्थांमध्ये शिक्षण घेणे परवडत नाहीं. तरीही असले आरोप होतात याचे दुःख होते" असे एक अनावृत्त पत्र लिहिले. पण लष्कराकडून उत्तर आले नाहीं.

एकाएकी पाकिस्तानच्या परमाणूसंबंधीच्या व सर्व पाकिस्तानी सरकारच्या वेबसाईट्स "site under construction" या निरोपांसह 'ऑफ-लाईन' गेल्या. पाठोपाठ पाकिस्तानी वृत्तपत्रांच्या वेबसाईट्स व त्यांच्या 'ऑन-लाईन लायब्रर्‍या'ही नाहींशा झाल्या. पुस्तकालयांवर धाडी पडल्या, अब्दुल सिद्दीकींची खानसाहेबांच्या बरोबर केलेल्या आफ्रिकेच्या प्रवासाची उर्दूतील प्रवासवर्णने, झहीद मलिक यांनी लिहिलेले खानसाहेबांचे चरित्र व स्टीव्ह वाइसमान व हर्बर्ट क्रॉस्नी यांचे पुनर्प्रकाशित The Islamic Bomb ही पुस्तकें जप्त झाली. काळ्या फेल्टपेनसज्ज माणसांनी इंग्लिश भाषेतील भाग पिंजून काढले व त्यातील मुशर्रफ, उ.कोरिया, ज.जहांगीर करामत, अल-कायदा, ज.मिर्झा अस्लम बेग, ज.हमीद गुल, ओसामा बिन लादेन आणि तालीबानबद्दलच्या सर्व उल्लेखांवर "पांढर्‍याचे काळे" केले. ज्यांना गुप्त जागी स्थानबद्ध करून ठेवले होते त्यांच्याकडे चांडाळप्रकृतीच्या अधम अधिकार्‍यांना पाठविण्यात आले व त्यांनी नम्रता गुंडाळून अतीशय अशिष्ट भाषेत या थोर शास्त्रज्ञांना धमक्या दिल्या. "तुम्हा सर्व SOB[१३] लोकांनी आम्हाला खाली खेचायचा चंग बांधलाय्!, तुम्ही वठणीवर आलात तर ठीक, नाहीं तर आम्ही तुम्हाला, तुमच्या मुलांना आणि त्यांच्या मित्रांना पिळून काढणार आहोत" वगैरे वगैरे. या लोकांच्या घरात हे अधिकारी बेकायदेशीरपणे घुसले, त्यांच्या गाड्यांवर हल्ले झाले, सगळीकडे त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. डॉ.शफीक यांच्या खिडकीबाहेर रोज रात्रीच्या अंधारात हँडफोनच्या पडद्यावरील अंधुक प्रकाश दिसायचा व डॉ.शफीक कळायचे की तिथे बिनचेहेर्‍याची माणसे त्यांच्या प्रत्येक हालचालींचा मागोवा घेण्यासाठी बसून आहेत.

मग ISIने झुबैर खान या KRLच्या शास्त्रज्ञाला लोकांसमोर आणले. याच्यावर खानसाहेबांनी लांच घेतल्याबद्दल कारवाई केली होती व त्याला काढून टाकले होते. त्याचा डूख तो धरून होता. त्याला KRLची इत्थंभूत माहिती होती व त्याने इतर स्थानबद्धांच्या चौकशीत भाग घ्यायचे कबूल केले. KRL कुटुंबियांनी मग KRL कॉलनीत बैठक घेतली. सगळ्यांना तो कांहींतरी उपद्व्याप करेल अशी भीती होती. सगळ्यांना वाटले होते कीं शांत राहिल्यास हे संकट हळूहळू नाहींसे होईल.

त्यांच्या लाल रंगाचा गालिचा अंथरलेल्या दिवाणखान्यात खानसाहेबांशी रोज प्रश्नोत्तरें चालू होती. त्यांनी कसेही करून एक चिठ्ठी डॉ.शफीकना पाठविण्यात यश मिळविले. त्यात त्यांनी लिहिले होते कीं ज्यांनी हे परमाणूप्रकल्पाचे सौदे मंजूर केले त्या सेवानिवृत्त आणि अद्याप नोकरीत असलेल्या ज.बेग ज्यांनी ते १९९०साली लष्करप्रमुख असताना इराणशी परमाणूबद्दलचा व्यवहार करायला उत्तेजन दिले किंवा ज्यांनी उ.कोरियाबरोबरचा प्रक्षेपणास्त्रांच्या बदल्यात युरेनियम अतिशुद्धीकरणप्रकल्पाचा सौदा पक्का केला ते मुशर्रफ यांचे वॉशिंग्टनमधील राजदूत ज.जहांगिर करामत अशा जनरल्सबद्दल कुणीच कां बोलत नाहींय्. जोपर्यंत मुशर्रफसह लष्करातील प्रत्येक जनरलना गुप्तवार्तासंकलनासाठी इथे आणून ते एकत्र केले जाणार नाहीं तोपर्यंत गुप्तवार्तासंकलन कधीच संपणार नाहीं असे त्यांनी ठासून सांगितले.

२३ जानेवारी रोजी डाव्होस येथील World Economic Forumच्या बैठकीसाठी स्वित्झरलंडला ते गेलेले असतांना त्यांनी CNNच्या ठळक प्रतिमा असलेल्या प्रमुख आंतरराष्ट्रीय वार्ताहार ख्रिस्तियान अमनपूर यांना मुलाखत द्यायचे कबूल केले. नेव्ही-ब्लू रंगाच्या सुटात असलेले व मधोमध कडक भांग पाडलेले मुशर्रफ एकाद्या अतीशय सुसूत्रपणे व संपूर्ण नियंत्रणाखाली चालणार्‍या देशाचे कार्यकारी संचालक शोभत होते. पण त्यांची भाषा मात्र झोंबणारी होती. कायदाभंग करणार्‍यांनी व देशाच्या शत्रूंनी अण्वस्त्राबद्दलचे तंत्रज्ञान आपल्या वैयक्तिक आर्थिक लाभासाठी परदेशांना विकले असल्याचा पाकिस्तानला पुरावा मिळाला असल्याचे त्यांनी जाहीर केले. देशाच्या व सरकारच्या कुठल्याही अधिकार्‍यांचा यात हात नसून फक्त या कांहीं व्यक्तीच आहेत....सरकारी किंवा लष्करी अधिकारी यात गुंतलेले असल्याचा अजीबात कोणताही पुरावा नाहीं असेही त्यांनी ठासून जाहीर केले. पण अमनपूरही कांहीं 'कालची पोर' नव्हती! तिने मुशर्रफनी पूर्वीच्याच आठवड्यात पाकिस्तानच्या संसदेत मारलेल्या बढाईची त्यांना आठवण करून दिली. पाकिस्तानात लष्कर हे सर्वव्यापी असून रायफलचा एक बोल्टही उच्चतम पातळीवरील अधिकार्‍याच्या माहितीशिवाय हरवत नाहीं अशी शेखी मिरवली असताना अण्वस्त्राबाबतच्या तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण या उच्चतम पातळीवरील अधिकार्‍याच्या माहितीशिवाय कशी काय झाली असा प्रतिप्रश्न तिने केला. हेच मुद्दे स्थानबद्धतेत असलेले शास्त्रज्ञही न्यायालयांत करत होते.

अजीबात न बिचकता मुशर्रफ उत्तरले कीं अण्वस्त्राबाबतचे तंत्रज्ञान संगणकांत, कागदोपत्री व लोकांच्या डोक्यात असल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे खूप कठीण असते. जोहान्सबर्गमधील कंटेनर्समध्ये चढवलेले व पाकिस्तानने लिबियासाठी ऑर्डर केलेले वॉशिंग मशीनच्या आकाराचे ६००० सेंट्रीफ्यूजेस किंवा इटलीतील तारांतो येथे पकडले गेलेले आणि लिबियाकडे चाललेले पाच कंटेनर्स किंवा लिबियातून सुटे करून टेनेसीच्या ओकरिज्ज येथे प्रदर्शनासारखे ठेवलेले नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांचे भाग किंवा अतिशुद्धीकृत युरेनियमचे आकाराने एकाद्या छोट्या गाडीयेवढे चाळीस मोठाले डबे त्यांना आठवले नाहींत. मुशर्रफना पापांत वाटेकरी हवे होते. म्हणून त्यांनी पुढे असेही सांगितले कीं यात युरोपियन राष्ट्रें व कांहीं व्यक्तीही गुंतलेल्या आहेत, फक्त पाकिस्तानीच त्यात आहेत असे कुणी समजू नये.

तीन दिवसांनंतर मुशर्रफ स्पष्ट बोलले. यात खानसाहेब दोषी असून त्यांना घरीच स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते. त्यांच्या घरासमोर पहारेकर्‍यांची चौकी बसविण्यात आली व घुटमळण्यास व फोटो काढण्यास बंदी करणार्‍या पाट्या उभारण्यात आल्या. पेटविलेल्या शेकोटीभोवती अनेक सैनिक आपले हात शेकत पहारा करताना दिसू लागले.

चोवीस तासांनंतर इस्लामाबादच्या सर्व वार्ताहारांना प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयात बोलावणे आले. डावपेच योजना विभागचे प्रमुख ले.ज.खलिद किडवाई स्लाईड प्रोजेक्टरसह वाटच पहात होते. थक्क झालेल्या श्रोत्यांना अपमानित झालेल्या कहूताप्रकल्पाच्या प्रमुखांनी १२-पानी कबूलीजबाबावर सही केल्याचे व त्यात इराण लिबिया व उ.कोरियाला तांत्रिक सहाय्य व घटकभाग पुरविल्याचेही कबूल केले होते. खानसाहेबच या तपशीलवार केल्या जाणार्‍या पण बेकायदेशीर तस्करी जालाचे सूत्रधार असून मालवाहू विमानांना चार्टर करणे, परदेशी चोरून बैठका योजणे आणि मलेशियात पाकिस्तानने टाकून दिलेल्या घटकभागांना पुन्हा नीट करण्यासाठी कारखानासैनिकी गणवेषात उभारणे आणि ते घटकभाग परदेशी विकणे तेच करत होते हे निवेदन ऐकायला किंवा आव्हान द्यायला कुणाही परदेशी वार्ताहाराला निमंत्रण नव्हते.

खानसाहेबांना मग मुशर्रफ यांच्याबरोबरच्या समोरासमोरच्या बैठकीसाठी नेण्यात आले. तिथे मुशर्रफ यांनी आपल्या आपल्या चरित्रात लिहिल्याप्रमाणे त्यांनी खानसाहेबांना तोंड देत त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दलचे पुरावे दाखविले. खानसाहेब पूर्णपणे खचून गेले व त्यांनी कबूल केले कीं त्यांना खूप अपराधी वाटत होते. त्यांनी मुशर्रफना अधिकृत माफी देण्याची विनंती केली असेही त्यांनी लिहिले आहे. मुशर्रफनी धूर्तपणे त्यांना सांगितले कीं त्यांना माफी हवी असेल तर ती त्यांनी थेट पाकिस्तानी जनतेकडून मागावी. मग दूरचित्रवाणीवरून माफीचे भाषण देण्याची कल्पना पुढे करण्यात आली. खानसाहेबांनी या बैठकीनंतर ज्या मित्रांना गुपचुपपणे टिपणे पाठविली ते एक वेगळीच कहाणी सांगतात कीं माफी मुशर्रफनीच मागितली. एक सौदाही केला कीं खानसाहेबांनी दूरचित्रवाणीवर माफी मागितल्यास सर्व कांहीं विसरले जाईल व खानसाहेब आपल्या पूर्वीचे जीवन जगू शकतील. मुशर्रफनी मानभावीपणाने खानसाहेबांना सांगितले कीं ते अद्यापही त्यांचे 'महापुरुष' होते. दुसरा कुठला मार्ग न दिसल्यामुळे खानसाहेबांनी मुशर्रफ यांच्या अटी मान्य केल्या.

४ फेब्रुवारीला खानसाहेबांच्या अधिकृत माफीचे शब्दांकन करण्यासाठी National Command Authorityची पुन्हा बैठक झाली व त्यानंतर खानसाहेबांना पुन्हा मुशर्रफ यांना भेटण्यासाठी आणण्यात आले. त्यवेळच्या डॉन या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रात जणू युद्धालाच तयार केलेले व तणावात असल्यासारखे दिसणारे मुशर्रफ आपल्या सैनिकी गणवेषात होते तर खानसाहेब रेशमी शर्ट, लोकरी ब्लेझर व नेव्ही स्लॅक्समधे सोफ्यावर टेकून बसलेले दिसत होते. दुपारी खानसाहेबांना पाकिस्तान दूरचित्रवाणीच्या मुख्यालयात नेण्यात आले व स्टूडियोत नेण्यात आले. वॉशिंग्टनच्या आग्रहास्तव हे माफीचे भाषण सार्‍या जगाला समजावे म्हणून इंग्रजीत करायला मुशर्रफनी त्यांना सांगितले होते, पण शेवटच्या क्षणी खानसाहेबांनी टेलीप्राँप्टर वापरायला नकार दिला व तयार केलेले निवेदन आपल्या टिपणावरून करणार असल्याचे सांगितले. जणू ते जगाला सांगत होते कीं ते दुसर्‍या कुणाचे शब्द वाचत होते.

जर खानसाहेबांनी ठरलेले शब्द न वापरता दुसरेच निवेदन सुरू केले तर आपत्ती येऊ नये म्हणून ते भाषण थोड्या वेळेचा उशीर वापरून प्रसारण करायला मुशर्रफनी परवानगी दिली. खानसाहेबांनी निवेदन केले: माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, मी तुमच्यापुढे माझा खेद प्रकट करायला व एका जबरदस्त मानसिक आघात सोसलेल्या राष्ट्रापुढे बिनशर्त माफी मागायला येणे पसंत केले आहे. राष्ट्रीय सुरक्षिततेला वाहिलेल्या माझ्या सेवेसाठी तुम्ही सर्वांनी मला अत्युच्च बहुमान, प्रेम व वात्सल्य दिले याची मला जाणीव आहे व मला बहाल केलेल्या सर्व बक्षिसांबद्दल व सन्मानांबद्दल मी कृतज्ञ आहे. पण माझ्या राष्ट्राला संपूर्ण सुरक्षा प्रदान करण्याचे मी जीवनभर केलेले यशस्वी प्रयत्न माझ्या कांहीं कारवायांमुळे एका मोठ्या संकटात अडकले असते याचा मला खेद होत आहे. या बेकायदेशीर अण्वस्त्रप्रसाराच्या कारवाया मी चांगल्या हेतूने केल्या होत्या पण कदाचित त्यात माझी पारख चुकीची झाली असेल. मी इथे अधिकृतरीत्या निवेदन करतो कीं माझ्या ज्या कनिष्ठ अधिकार्‍यांनी या बाबतीत मला सहकार्य केले तेही माझ्याप्रमाणेच चांगल्या हेतूने व माझ्या सूचनेबरहुकूम काम करत होते. मी हेही स्पष्ट करू इच्छितो कीं माझ्या या बेकायदेशीर कारवायांना कुठल्याही सरकारी अधिकार्‍याने कधीही मान्यता दिलेली नव्हती. माझ्या सर्व कारवायांची मी जबाबदारी घेतो व आपल्याकडून माफीची याचना करतो. प्रिय बंधू-भगिनींनो, अशा तर्‍हेच्या कारवाया यापुढे भविष्यकाळात पुन्हा कधीही होणार नाहींत याचीही मी खात्री देतो. मी सर्व पाकिस्तानी नागरिकांना पाकिस्तानच्या सर्वोच्च राष्ट्रीय हितासाठी या बाबतीत कुटल्याही तर्‍हेचे तर्क-कुतर्क करू नयेत व या अतीशय संवेदनशील मुद्द्यांना राजकीय रंग देऊ नये अशी मी कळकळीची विनंती करतो. अल्ला पाकिस्तानला सुरक्षित व सुखरूप ठेवो.

पाकिस्तान टेलिव्हिजनच्या अधिकार्‍यांनी नंतर उघड केले कीं खानसाहेबांनी आपले भाषण आयत्यावेळी बदलले व त्यांनी सार्‍या कारवाया "चांगल्या हेतूने" केल्या होत्या हे शब्द त्यात घातले होते. त्यांच्या समर्थकांचे म्हणणे होते कीं हे शब्द खानसाहेब नेहमीच सरकारसाठी काम करत होते आणि त्यांचे सर्व काम देशभक्तीनेच प्रेरित झालेले होते हे सांगण्यासाठी घातले होते.

खानसाहेबांच्या जाहीर माफीचा पाकिस्तानी जनतेवर विजेसारखा आघात झाला. इस्लामाबाद व कराची शहरात फलक व बॅनर्स दिसू लागले आणि त्यावर लिहिले होते, "आम्हाला कादीर खान राष्ट्राध्यक्ष म्हणून हवेत, कैदी म्हणून नव्हे!". जमात-ए-इस्लामीचे जहाल व प्रक्षोभक नेते काजी हुसेन अहमद सरळ अल जझीरा या अरब दूरचित्रवाणीच्या वाहिनीवर गेले व त्यांनी मागणी केली कीं मुशर्रफनी राजीनामा द्यायला हवा कारण खानसाहेबांनी जाहीर माफी मागितली ती त्यांचा छळ केला जाईल अशी धमकी दिल्यामुळेच. आपल्या वचनाला जागून मुशर्रफनी आर्मी हाऊस येथे बोलावण्यात आलेल्या भरगच्च पत्रकारपरिषदेत खानसाहेबांना बिनशर्त माफी दिली. "ते माझे 'महापुरुष' आहेत. पूर्वीही होते व आताही आहेत". एका पत्रकाराने मुशर्रफना विचारले कीं त्यांनी जरी खानसाहेबांना दिली असली तरी जग त्यांना माफ करेल कीं नाहीं. मुशर्रफ म्हणाले ते स्वतः खानसाहेबांच्या व जगाच्या मध्ये उभे होते व त्यांना कांहींही त्रास होणार नाहीं अशी त्यांनी खात्री दिली. पण आपल्या पुस्तकात २००६ साली मुशर्रफनी वेगळाच सूर लावला होता. पुस्तकात त्यांनी कडवटपणे म्हटले कीं सत्य हे होते कीं खानसाहेब हे फक्त एक धातुशास्त्रज्ञ (metallurgist) होते आणि अण्वस्त्रनिर्मितीच्या गुंतागुंतीच्या शृंखलेतील फक्त एक कडी होते. पण आल्बर्ट आईनस्टाईन व रॉबर्ट ऑपनहायमर या दोघांची थोरवी आपल्यात एकवटली आहे अशी स्वतःची प्रतिमा जनमानसात निर्माण करण्यात यश मिळविले होते. सत्य तर याहून जास्त गुंतागुंतीचे होते आणि दूरचित्रवाणीवरील माफी ही मुशर्रफ व खानसाहेबांच्या मधील कडवट युद्धाची सुरुवात होती आणि खानसाहेब शरण जाण्याऐवजी ताठ होऊन भांडायला तयार होते.

पण यातले कांहींही या क्षणी दिसत नव्हते, पण मुशर्रफनी आढ्यतेखोरपणे खानसाहेबांचे गुणगान गायल्यावर पाकिस्तानी वृत्तपत्रांनी कुणाचा मुलाहिजा न ठेवता चौकशीला सुरुवात केली. वार्ताहारांनी मुशर्रफना गराडा घालून विचारले कीं अण्वस्त्रप्रसाराबद्दलची माहिती त्यांना व त्यांच्या सरकारला आधीपासून होती अथवा नव्हती. अशा तर्‍हेने पकडले गेलेले मुशर्रफ मग संतापले कारण अशी बंडाळी होईल असे त्यांच्या ध्यानी-मनी नव्हते. त्यांनी पाकिस्तानच्या अंतिम हिताचा मुद्दा पुढे करून प्रश्नांना बगल दिली. पाकिस्तानला आधीच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या निर्बंधांना तोंड द्यावे लागणार होते. पण मीडिया मागे हटेना. एका विदेशी पत्रकाराने त्यांना सगळे कागदपत्र हवाली करून संपूर्ण व स्वतंत्र चौकशीची मागणी केली. मग मुशर्रफ यांचा मानसिक तोल जाऊ लागला. "चुप बसा!" असे ओरडून ते म्हणाले कीं पाकिस्तान एक सार्वभौम राष्ट्र आहे व ते आपला परमाणू प्रकल्प कधीही अमेरिकेच्या किंवा इतर कुणाच्याही ताब्यात देणार नाहीं. "मी मृत्यू सहा वेळा पाहिला आहे" असे सांगून ते म्हणाले होते ते भित्रे नसून पाकिस्तान कधीही आपला परमाणूप्रकल्प व प्रक्षेपणास्त्रप्रकल्प मागे घेणार नाहीं.

अमेरिकेच्या राईसबाईंनी "खानसाहेब एका दृष्टीने कायद्यापुढे खेचले गेलेच आहेत कारण त्यांना आता आपला आवडता उद्योग करतायेणार नाहीय्" असे निवेदन दिले. 'एका दृष्टीने' या शब्दांमुळे आर्मिटेज यांनी मुशर्रफ यांच्याबरोबर केलेल्या कराराला मूर्तरूप आले असेच म्हणायला हवे! परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रिचर्ड बाउचर यांनी सांगितले कीं पाकिस्तानच्या चौकशीबाबतचे गांभिर्य पाहून ते अतीशय दिपून गेले होते व पाकिस्तानी सरकार या अद्याप चालू असलेल्या चौकशीतून बाहेर पडणारी माहिती आंतरराश्ट्रीय समुदायालाही सांगेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली! आर्मिटेजनीही गेली कांहीं वर्षें अमेरिकेशी अण्वस्त्रप्रसाराबाबत स्पष्ट व खरे बोलल्याबद्दल पाकिस्तानचे कौतुक केले. कोलिन पॉवेल मुशर्रफ यांनी अण्वस्त्रप्रसाराच्या काळ्या बाजाराला उघड केल्याचे कृत्य हे एक मोठे यश असल्याचे सांगितले. "जगातल्या सगळ्यात मोठ्या अण्वस्त्रप्रसारकाच्या कारवाया बंद केल्यामुळे आता अमेरिकेला खानसाहेबांच्या जाळ्यातर्फे चालणार्‍या अण्वस्त्रप्रसाराची भीती बाळगायचे कारण नाहीं" आणि या अण्वस्त्रप्रसारात पाकिस्तानी सरकारचा हात असल्याचा कोणताही पुरावा नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली!

एका आठड्यानंतर बुश-४३ यांनी वॉशिंग्टनयथील राष्ट्रीय सुरक्षा विश्वविद्यालयात[१४] आपली प्रतिक्रिया दिली. मुशर्रफ यांचे त्यांच्या निर्णायक कारवाईबद्दल अभिनंदन करीत ते म्हणाले, "खानसाहेबांनी त्यांचे गुन्हे कबूल केले आहेत आणि त्यांचे उच्च सहकार्‍यांना आता काम उरले नाहींय्. पाकिस्तानी सरकार या जाळ्यातील प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी करत आहे व अतीशय महत्वाची माहिती गोळा करत आहे. या माहितीचा उपयोग अशी घटना पुन्हा कधीही होणार नाहीं यासाठी केला जाईल. मुशर्रफनी खान यांच्या जाळ्याबद्दल मिळणारी माहिती अमेरिकेलाही देण्याचे वचन दिले आहे आणि पाकिस्तान पुन्हा कधीही अण्वस्त्रप्रसारात भाग घेणार नाहीं याबद्दल खात्री दिलेली आहे." नजीकच्या भूतकाळातीला फक्त सोयीच्या भागाचा उल्लेख करून ते म्हणाले कीं "दहशतवादाला नेस्तनाबूत करण्यासाठी आणि नरसंहारक्षम शस्त्रास्त्रांच्या फैलावाला आळा घालण्यासाठी एक महत्वाचे संघटन एकत्र आले आहे व ते दहशतवादाविरुद्धच्या युद्धाशी वचनबद्धता अहे. अमेरिकेच्या गुप्तचरसंघटनांनी या जाळ्याच्या सभासदांवर जगात ते जातील तिथे बारीक नजर ठेवली होती, त्यांची संभाषणे ध्वनिमुद्रित केली होती आणि त्यांच्या कार्यवाहीत चंचुप्रवेश मिळविला होता व त्यांचि रहस्ये उघडी पाडली होती."

पण एक धोका अद्याप होता. खानसाहेबांचे सहकारी जगात सगळीकडे मोकळे होते. लोभ, धर्मांधता किंवा या दोन्हीमुळे प्रवृत्त झालेले हे विक्रेते जगातील उत्सुक बेकायदा सरकारांशी संधान बांधीन करोडो डॉलर्सचा धंदा करत होते. व ही धोकादायक शस्त्रें दहशतवादी गटांच्या हाती लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. एकेक अशी व्यक्ती टिपली जाईल आणि धंद्याबाहेर फेकली जाईल. आता इराकमधील कारवाई शेवटच्या टप्प्यावर आलेली असून पाकिस्तानची वागणूकही सकारात्मक झाल्यामुळे आता लक्ष्य इराण हेच असेल हेच जणूं बुश-४३ सुचवत होते.

पण ज्यांना आर्मिटेज-मुशर्रफ यांच्यातील गुप्त कराराची माहिती नव्हती ते या सर्वाकडे अविश्वासानेच बघत होते. नुकतेच बोल्टन यांच्याबरोबर झालेल्या वाग्युद्धात जखमा चाटणारे पण खानसाहेबांच्या अलीकडील कारवायांची बित्तंबातमी असलेले IAEAचे प्रमुख एलबारादेई यांनी खानसाहेब म्हणजे एका प्रचंड हिमनगाचे एक छोटासे टोक असून ते एकटे काम करत नव्हते .असे विधान केले. कोफी अनान यांनाही ती माफी वरवरचीच वाटली होती. कोफी अन्नान यांनीही दूरचित्रवाणीवरील माफी विचित्र वाटल्याचे सांगत "इराण, लिबिया व उ.कोरियाला अण्वस्त्र तंत्रज्ञान विकणार्‍या पाकिस्तानला कां माफ केले गेले?" असा परखड प्रश्न विचारला.

बुश-४३ यांची प्रतिक्रिया वाचून मुशर्रफ यांचे मदतनीस हसले. एकजण गमतीने म्हणाला कीं आता आम्ही आमच्या जुन्या परस्परसंबंधांकडे गेलो आहोत जिथे आम्ही आम्हाल जे वाटेल ते करतो व अमेरिका आम्हाला जे वाटेल ते करते! सत्याचे अनेक तुकडे होऊन ते हेरांना रहाण्यासाठीची 'सुरक्षित' घरे, ISI च्या ताब्यातील ओल आलेल्या कोठड्या अशा जागी विखुरले गेले होते. डॉ.शफीक हे एकटेच गृहस्थ होते ज्यांना खानसाहेबांना भेटायची अनुमती होती. त्यांच्या मते खानसाहेब उच्च रक्तदाब व त्याच्या सोबत येणार्‍या व्याधींनी ग्रस्त होते. त्यांना रक्तदाब उतरवण्याची, औदासिन्य घालविणारी व बद्धकोष्ठता दूर करणारी औषधें लागत असत व त्यामुळे त्यांची परिस्थिती कधीही स्फोट होणार्‍या टाईमबाँबसारखी होती. पण अशा भेटींखेरीज खानसाहेबांना करायला कांहींच नव्हते. फोनलाईन नव्हती, वृत्तपत्रे दिली जात नसत व दूरचित्रवाणी पहायचीही अनुज्ञा नव्हती. मग ते त्यांच्या आवडल्या आरामखुर्चीत बसून स्वतःशीच बोलत असत, कुराण वाचत असत व कधीकधी योगासने करत.

त्यांना भेटायला त्यांची लहान मुलगी आयेशा यायची व दीनाची मुलगी तान्या यायची. दीनाल वडिलांना भेटायची परवानगी नव्हती, पत्नी हेनी काळजीने खचली होती, खानसाहेबांना वेड लागायचेच बाकी होते. बुश-४३ यांनी पुकारलेले दहशतवादाविरुद्धचे युद्ध इस्लाम व ख्रिस्ती धर्मियांमधील युद्ध बनले होते. पण मग अचानक त्यांच्या अंगात बळ येई व ते उठून बसत. ISIबरोबर, लष्कराबरोबर व त्यांना दगा देणार्‍या कुणाहीबरोबर बोलणे अजीबात बंद करण्याचा ते निश्चयही करत. ते त्यांच्या सूड उगविण्याच्या योजनेत गढून जात.

मुशर्रफ यांचे नजदीकचे सहकारी आठवण काढतात.....या सुमाराला त्यांनी ठरविले कीं जे करायला हवे होते ते सर्व त्यांनी केले होते. आत आपण होऊन अण्वस्त्रांबद्दल कांहींही अमेरिकन्सना सांगायची गरज नव्हती. करार होवो अथवा न होवो, पाकिस्तानसाअठी सारे संपले होते. आणि आम्ही सारे या लोकप्रवादापासून सुटल्याचे सांगायला योग्य बेळेची वाट पहात होतो या संधीचीच वाट पहात होतो.
------------------------------------------------------
टिपा:
[१] तरीही माफी मागायला मात्र खानसाहेबांना एकट्याला 'बकरा' कसे बनविले?
[२] Diversionary tactic or a 'decoy'
http://www.timesonline.co.uk/tol/news/world/asia/article6839044.ece (Years earlier, Khan had been warned about the Pakistan army by Li Chew, the senior minister who ran China’s nuclear-weapons programme. Visiting Kahuta, Chew had said: “As long as they need the bomb, they will lick your balls. As soon as you have delivered the bomb, they will kick your balls.” In the letter to his wife, Khan rephrased things: “The bastards first used us and are now playing dirty games with us.”) याच विषयावर माझे जकार्ता पोस्टमधील हे पत्रही वाचा: http://www.thejakartapost.com/news/2009/10/10/letter-mystery-khan039s-le...
[३] Centrifuge Assembly Line
[४] 'Laundered'
[५] Test data and Calculations
[६] Precision tools and parts for two specialized lathes
[७] याच वाक्याच्या संदर्भाने या प्रकरणाचे नांव ठेवण्यात आले आहे.
[८] Atomic Energy Organization of Iran
[९अ] Nuclear warhead blueprints, Schematics and Manuals
[९ब] डॉन माली अमेरिकेचे राजदूत होते आणि डेव्हिड लँड्समन हे ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्रालयातील अण्वस्त्रप्रसारबंदी विभागाचे प्रमुख होते.
[१०] या सर्व गोष्टी व्हिएन्ना येथील IAEAच्या अतिसुरक्षित तिजोर्‍यात न ठेवता अमेरिकेत कां ठेवल्या गेल्या हे एक आश्चर्यच म्हटले पाहिजे!
[११] ब्रि.सजवाल यांचे सुपुत्र
[१२] debriefing
[१३] Sons of bitches
[१४] National Defense University

राजकारणमाहितीभाषांतर

प्रतिक्रिया

या अटराव्या प्रकरणानंतर अजून फक्त तीन प्रकरणे उरली आहेत. त्यातले शेवटचे प्रकरण आधीच प्रमोद देवसाहेबांच्या एका खास अंकात प्रकाशित झाले आहे. आता १९ व्या आणि २० व्या प्रकरणांचेच रूपांतर करायचे राहिले आहे कीं हा प्रकल्प पूर्ण झाला! मग सर्व 'मिपा'करांची या वाचनातून सुटका होणार व मलाही इतर लिखाण व 'मिपा'वरीलच इतर वाचन करायला सवड मिळणार!
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2cknfpb (प्रकरण दहावे, आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)

आनंदयात्री's picture

17 Jul 2010 - 7:10 am | आनंदयात्री

धन्यवाद. या प्रकल्पाबद्दल आपले मानावे तितके आभार थोडेच !!

सहज's picture

17 Jul 2010 - 5:09 pm | सहज

असेच म्हणतो.

काळेसाहेबांच्या चिकाटीची व प्रयत्नांची तारीफ करावी तितकी कमीच आहे!

लवकर ह्याचे पुस्तक निघो ही सदिच्छा!

आनंदयात्री-जी आणि सहज-जी,
पहिल्या तीन लेखांची सरासरीने १३५०हून जास्त वाचने झाली व तो आकडा आता अडीच-तीनशेच्या आसपास आलेला पाहिल्यावर या लेखमालेचे आकर्षण कमी-कमी होते गेलेले मलाही दिसते आहे! आणि ते सहाजीकही आहे कारण या विषयाबद्दल मनापासून आवड असेल तरच असा interest टिकून राहू शकतो.
पण तरीही ही मालिका सुरू केल्याचे व आता जवळ-जवळ संपवत आणल्याचे मनापासून समाधान मला आहे. 'ई-सकाळ'वरही या मलिकेला बर्‍यापैकी प्रतिसाद मिळाला. अनेकांनी ही मालिका Print Edition वर प्रकाशित करावी असे आग्रही प्रतिसादही दिलेले आहेत. त्यामुळे एक समाधान जरूर आहे.
हा प्रकल्प हातावेगळा झाल्यावर मला माझे इतर लेखन आणि मुख्य म्हणजे 'मिपा'वरील इतरांच्या लिखाणाचे वाचन करायला सवड मिळणार आहे!
बर्‍याच मित्रांनी ही मालिका इतरत्रही प्रकाशन करण्याची इच्छा प्रदर्शित केली व त्यानुसार 'मी मराठी'वर आजच एकाच वेळी १८ही प्रकरणे पोस्ट झाली. शिवाय मुंबईच्या श्री दासू भगत यांनी "विश्व लीडर" या नियतकालिकात एक प्रकरण छापायला परवानगी मागितली ती मी मूळ लेखकांच्या अनुमतीने दिलीही!
असो. एकूण ज्यासाठी हा अट्टाहास केला ते उद्दिष्ट बर्‍यापैकी साध्य झाले असे वाटते.
सर्व वाचकांच्या समर्थनाबद्दल मनापासून आभारी आहे! उरलेली तीन प्रकरणे हातून होवोत हीच ईशचरणी प्रार्थना.
------------------------
सुधीर काळे
माझे ९ सप्टेंबर रोजी 'जकार्ता पोस्ट'मध्ये प्रकाशित झालेले पत्र वाचा: http://tinyurl.com/2f93dnr

सुधीर काळे's picture

17 Jul 2010 - 7:51 am | सुधीर काळे

हे पुस्तक वाचल्यावर मी खूपच प्रभावित झालो. मनात आले कीं या पुस्तकातील मजकूर प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचावा. माझ्या मराठीबद्दल मला कांहींसा आत्मविश्वास होता, म्हणून मराठी रूपांतर करायला आधी घेतले. पण हिंदीतही करायला हवे आहे!
माझे हिंदी भाषेवरील प्रभुत्व अशा पुस्तकावर न्याय करण्यास पुरेसे नाहीं, पण कुणी collaborator मिळाला तर तो प्रकल्पही हाती घ्यावा असे मनात आहे.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/2cknfpb (प्रकरण दहावे, आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)

यशोधरा's picture

17 Jul 2010 - 6:13 pm | यशोधरा

सुधीरकाका, संपूर्ण लेखमाला वाचली आणि आवडली. तुम्ही भाषांतर करुन इथे मिपावर हे पुस्तक आम्हां सर्वांपर्यंत पोहोचवलेत त्याबद्दल तुमचे आभार.