सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना
भिऊ नको मराठी जना, काय तूझा गुन्हा
राहीला सीमाभागी
वेळ काढ जराशी जरा, येशील महाराष्ट्री पुन्हा
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||धृ||
दिलेत भरपूर लढे, रक्ताचे पडले सडे
विचार नको करू, नको मनामधे झुरू
समजू नको अभागी
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||१||
आम्ही जोर जुलूम तोडू, कन्नडीगांची कंबर मोडू
अन्यायाला वाचा फोडू, सीमाभाग महाराष्ट्रा जोडू
जरी लाठ्या डोक्यास लागी
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||२||
जय महाराष्ट्र बोलू बोल, मराठीचे उपकार अनमोल
झालो मोठे त्याच धरतीवर, पांग फेडू झेलू गोळ्या छातीवर
चाल पुढे मागे नको फिरू
पाऊल टाक वेगी
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१३/०७/२०१०
काव्यरस
वाचने
1956
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
(भिऊ नको मराठी मना)
>>>>भिऊ नको
In reply to (भिऊ नको मराठी मना) by पंगा
सौम्य आक्षेप
In reply to >>>>भिऊ नको by पाषाणभेद
हा हा हा
In reply to सौम्य आक्षेप by पंगा
माहितीबद्दल आभारी आहे, पण...
In reply to हा हा हा by पाषाणभेद