मिपावरील थोर विडंबनकार, संपादक व आता बल्लवाचार्य केशवसुमार यांना समर्पित. त्यांच्याच दोन विडंबकविता व एक पाककृती यांच्या मिश्रणातून खालील रचनेला प्रेरणा मिळालेली आहे.
हळूहळू हा तापच झाला स्वैपाक अन्
भोजनमात्र रहावे आता कन्क्लूजन
येती अश्रु - न दु:खाचे ना आनंदाचे
वेगाने कांद्यांचे त्या होते कर्तन.
जीव घेऊ मी का त्या दुर्बळ प्राण्यांचा
मसुरी देऊन तडका करतो ते उलथन
हेडफोन लावुन कानी, मी शांतपणे-
फोडणी-चुरचुरी कडे करतो दुर्लक्षन.
उगाच पडले काळे कणकेचे गोळे
पोळपाटि जणू झाले त्यांचे मउ तिंबन
पाट्या वरवंट्यावर चटणी उडली कशी
आणि कुणाच्या हाती लागे ही झणझण
फुड प्रोसेसर काय मला हे अधी सांगा
नंतर सांगा कसले हे चाले मंथन...
कधीच ना हा सुधारेल "केश्या" मेला
सुरूच राहिल जाली हे ना ते लेखन
काव्यरस
वाचने
2250
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
:-)
का का का
खरा ताप दुसराच आहे का?
हा हा हा ...
अफलातुन
:)
काय कविता