Skip to main content

अंतरंग

लेखक jaypal यांनी बुधवार, 07/07/2010 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरंग पावसाच गाणं मातीच न्हाणं माझ समुद्र होण अंतरंगी ओला पक्षी हिरवी नक्षी मी एक साक्षी अंतरंगी चींब सर ओली थरथर अधिर हे अधर अंतरंगी उठे उधाण नुरे देहभान मन हे तुफान अंतरंगी झाकल्या खुणा उघड्या पुन्हा घडे काय गुन्हा? अंतरंगी जयपाल ७/७/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2920
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

काय हो? बरे आहात ना? कविता आवडली.

पावसाच गाणं मातीच न्हाणं माझ समुद्र होण अंतरंगी
पहिल्या चार ओळींतच चिंब होऊन गेलो! :) बढिया दाद्या! आता काव्यप्रांतात मुसंडी मारलीस की.

ओ हो ! जेवण झालं का ? कवीता आवडली - घावण कडक

सर्वच कडवी आवडलीत! मस्त जमलीये कविता! पावसाची सर बघून मन जुन्या आठवणींत रमतं अन् काही खास जखमा त्रास देऊ लागतात.. छानच मांडलीये! झाकल्या खुणा उघड्या पुन्हा घडे काय गुन्हा? अंतरंगी क्लास क्लास!! बाकी, जयपाल शेठ, तुमच्या कडच्या फोटू आणि आयकॉन्स च्या संग्रहानं वेड लावलंय! कुठून मिळतात देव जाणे.. :) (ओलाचिंब) राघव

पावसाच्या पाण्याने आग लावली की तुमच्या अंतरंगी! अगदी रवीनातैं व तुमचे विचार जुळाले की! :-)

जयपा शिर्षक वाचून घाईघाईने कविता उघडली पण निराशा झाली. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

पराभाऊ चालायच हो सगळ्यांना एकाच वेळी कस खुश ठेवता येइल? नाना कळा प-याचा चाळा अंगी हा उमाळा अतरंगी *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by परिकथेतील राजकुमार

पराभाऊ चालायच हो सगळ्यांना एकाच वेळी कस खुश ठेवता येइल? नाना कळा प-याचा चाळा अंगी हा उमाळा अतरंगी *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

धमुच्या म्हणण्याप्रमाणे पहिल्या चार ओळींनीच गुंतवून टाकलं! खूप खूप आवडली कविता. :) क्रान्ति अग्निसखा

प्रतिसाद कर्त्यांचे आणि वाचकांचे आभार *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/