जीवन-मृत्यू!
ही कल्पना बरीच आधी सुचली होती.. पण शब्द सापडत नव्हतेत.. यशोधरातैंचा ये परतीचा वारा... हा लेख वाचून शब्द आपोआप स्फुरायला लागलेत.. म्हणून ही कविता त्यांचीच! :)
जीवन म्हणजे सागर असतो
शांत गंभीर भासणारा..
वादळांस प्रसवणारा..
नवा प्रलय दाखवणारा..
जीवन म्हणजे वादळ असतं
खंबीर झाडांना उचकटून टाकणारं..
रूळलेल्या वाटांमधून घोंघावणारं..
पुढ्यांत येईल ते उध्वस्त करणारं..
जीवन म्हणजे असतो किनारा
वादळाला उरावर घेणारा..
उध्वस्ततेतून सावरणारा..
नवलाईची बीजं रोवणारा..
मृत्यू म्हणजे अनाहूत चाहूल
खंबीर झाडांना उचकटून टाकणारी!
पुढ्यांत येईल ते उध्वस्त करणारी!
नवलाईची बीजं रोवणारी!
नवा प्रलय दाखवणारी!!
शुभम्
छान कल्पना !
छान!
जीवन
धन्यवाद!