Skip to main content

हाच आपला ढंगु आहे...

लेखक घाटावरचे भट यांनी गुरुवार, 08/07/2010 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
टायम मोठा झकास आला आवळा नाड्या सावरा चड्डी दारू कोंबडी हिरवा गांधी सुरू नव्याने रोज कबड्डी धोंडे फेकू गोळ्या झाडू स्वत: स्वत:चे कपडे फाडू 'कैसी जनता भूखी नंगी' म्हणत आपणच गळेही काढू लाठ्या काठ्या अश्रूधूर अन् कधि एखादी गोळी आहे थांबायाला वेळ कुणा पण भाजायाची पोळी आहे पिचले रडले कुणी भरडले कैवाराला आपण आहे फोटो बाईटा काळे झेंडे चुलीत अपुल्या सरपण आहे शरम बेशरम नीती अनीती जुन्या बुकातील फंदा आहे राजकीय रंडीबाजीचा खुल्लमखुल्ला धंदा आहे कुबड्यांचेही शॉर्टेज झाले जो तो साला पंगु आहे 'अपनेकू क्या करना यारों?' हाच आपुला ढंगु आहे...

वाचने 3427
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

भटोबा लै भारी! अजुन येउ दे. (ढोंगु) सहज

कुबड्यांचेही शॉर्टेज झाले जो तो साला पंगु आहे 'अपनेकू क्या करना यारों?' हाच आपुला ढंगु आहे...
--- क्या बात है! झकास भटोबा, अजूनही येऊद्या.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


In reply to by Nile

:-( मि.भ. प्रकटन आवडले. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

+३

च्यायला भटा !! लै भारी यार :)

कुबड्यांचेही शॉर्टेज झाले जो तो साला पंगु आहे 'अपनेकू क्या करना यारों?' हाच आपुला ढंगु आहे. खरच ! लय भारी राव ! !

भटोबा कविता आवडली. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

सांगा कधी बसताय??? :) >>टायम मोठा झकास आला >>आवळा नाड्या सावरा चड्डी >>दारू कोंबडी हिरवा गांधी >>सुरू नव्याने रोज कबड्डी :)

किती मोठ्या काळानंतर ह्या भल्या माणसाचं लेखन वाचायची संधी मिळाली! का रे बाबा, तुला असंच लिहितं राहण्यासाठी काय सारखे बंद/दंगली वगैरे व्हायला हवे काय? लिहीत जा रे बाबा...लिहीत जा.... फार अप्रतिम लिहितोस तू. मला अजुनही तुझी आणि मिभोची काव्य जुगलबंदी आठवतेय.

लिहित रहा...

मस्त!! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते

खुप आवडली..चपखल शब्द रचना

विदारक वास्तव आहे तसं उतरवलं आहे, बहोत खूब! {फालतू 'संदेश' फॉरवर्ड करण्यापेक्षा लोकांनी असल्या "डोळे-उघडू" कविता फॉरवर्ड कराव्यात असं वाटलं, मी तर नक्की करेन. 'उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' असं म्हणायची वेळ कधीची आलेली आहे, थोडीशी जागृती झाली तर हवीच आहे.}

----- सौरभ :)

सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे मनःपूर्वक आभार. :) - भटोबा