Skip to main content

शॄंगार

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 04/07/2010 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
भिजलेले चिंबुन केस चुंबून सखे मोहरतो ओलेती झालिस तू, अन् न्हाऊन मनी मी निघतो डोळ्यातिल काजळ रेखा काळजात मी गिरवीतो शृंगार तुझा होतो अन् रंगून आत मी निघतो मलमली ओढणी मधला गंधार मनी घुमघुमतो नक्षीत बिलोरि तिच्या मी माझेच बिंब पाहातो काजळी रेशमी केस, हुंगून मनी पाझरतो ओढता कवेत तुला मी माझीच कवीता जगतो
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3332
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

क्या बात है! शृंगार तुझा होतो पण रंगून आत मी निघतो................... जाम भिडू मस्त रे ओढता कवेत तुला मी माझीच कवीता जगतो............ कवितेमागची प्रेरणा ही जबर असणार...........

"मोकळ्या केसांत माझ्या, तू जिवाला गुंतवावे..." अशा 'आदेशा'नंतरची ही स्थिती आहे.

>डोळ्यातिल काजळ रेखा काळजी (काळीज / कलेजा या अर्थी की चिंता / काळजी?? )पुन्हा तिथे जरा गोंधळ झाला बाकी मेंदीचा सुगंध दरवळला....

>>>>ओढता कवेत तुला मी माझीच कवीता जगतो>>>> व्वाह क्या बात कही!! पुर काव्य सुन्दर!! बहोत खुब!

" ओढता कवेत तुला मी माझीच कवीता जगतो " मान गये राजेश साहेब ! खुप खुप आवड्ली गझल.

काजळी रेशमी केस, हुंगून मनी पाझरतो ओढता कवेत तुला मी माझीच कवीता जगतो क्या बात है!!!! जबरदस्त..

अरे वा! छान शृंगारिक काव्य. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

वा! ("पण" ऐवजी दोन्ही वेळेला "आणि" [किंवा "अन्", किंवा नुसता स्वल्पविराम] अधिक आवडले असते.)

In reply to by धनंजय

("पण" ऐवजी दोन्ही वेळेला "आणि" [किंवा "अन्", किंवा नुसता स्वल्पविराम] अधिक आवडले असते.)
गुणगुणून पाह्यल्यावर अन् अधिक आवडलं. धन्यवाद.

चांगली आहे पण तुमची आहे असा विश्वास बसत नाही. कळायला खूपच सोपी आहे म्हणून असेल कदाचित. कुठलाही abstract संदर्भ नाही. असो. अधे मध्ये असेही होऊ द्या.

काजळी रेशमी केस, हुंगून मनी पाझरतो ओढता कवेत तुला मी माझीच कवीता मस्त कविता

"शॄंगार" आवडला :X 8> =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/