<अनावर>
जालावर येउन अनावर आपण सगळेच होत असतो की. डोन्ट डिनाय इट! सांगा बरे तुम्हालाही असे काहीसे वाटते का? तुम्हा सगळ्या अनावरांना समर्पित! :-)
एखाद्या धुंद सायंकाळी पूर्व-पश्चिमेची दिग्गज मंडळी जमली असताना,
सदाबहार माणसांच्या काव्य हास्य मैफिलीने सभा पूर्ण बहरलेली असताना,
तुझा प्रतिसाद मनात साठवत तो धागा,
फुलताना, दौडताना पहायचाय.
एखाद्या प्रसन्न, सुगंधी पहाटे,
एका कवितेतील शुभ्र पाकळी न पाकळी उघडून,
रसग्रहण करुन देत असलेला तो क्षण कविसमवेत टिपायचाय.
जमलं तर कधी एखाद्या कट्ट्यावर,
रात्री लक्ष लक्ष गजाल्या करत जागरण करायचय.
अफाट जालविश्वात हरवून जायचय तुम्हा सर्वांच्या सोबत.
खरं सांगायचं तर काहीच पुरेसं वाटत नाही.
एवढ्याशा कुडीत सगळ्यांबद्दलचं प्रेम, घृणा कुठलीच भावना मावतच नाही.
दिसावी माणसं सगुण, साकार.
पण मनातल्या आयड्या निराकार, अथांग, अमर्याद.
अन माझी स्थिती नेहमी "किती घेशील किंवा ठोकशील दोन कराने?"
इल्लो
हम्म
आता
सहजकाका,
छान रे..
अन माझी
खुपच मस्त
हेच
सुंदर
छान