Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सहज on गुरुवार, 07/01/2010 - 07:42
जालावर येउन अनावर आपण सगळेच होत असतो की. डोन्ट डिनाय इट! सांगा बरे तुम्हालाही असे काहीसे वाटते का? तुम्हा सगळ्या अनावरांना समर्पित! :-) एखाद्या धुंद सायंकाळी पूर्व-पश्चिमेची दिग्गज मंडळी जमली असताना, सदाबहार माणसांच्या काव्य हास्य मैफिलीने सभा पूर्ण बहरलेली असताना, तुझा प्रतिसाद मनात साठवत तो धागा, फुलताना, दौडताना पहायचाय. एखाद्या प्रसन्न, सुगंधी पहाटे, एका कवितेतील शुभ्र पाकळी न पाकळी उघडून, रसग्रहण करुन देत असलेला तो क्षण कविसमवेत टिपायचाय. जमलं तर कधी एखाद्या कट्ट्यावर, रात्री लक्ष लक्ष गजाल्या करत जागरण करायचय. अफाट जालविश्वात हरवून जायचय तुम्हा सर्वांच्या सोबत. खरं सांगायचं तर काहीच पुरेसं वाटत नाही. एवढ्याशा कुडीत सगळ्यांबद्दलचं प्रेम, घृणा कुठलीच भावना मावतच नाही. दिसावी माणसं सगुण, साकार. पण मनातल्या आयड्या निराकार, अथांग, अमर्याद. अन माझी स्थिती नेहमी "किती घेशील किंवा ठोकशील दोन कराने?"

Submitted by टारझन on गुरुवार, 07/01/2010 - 07:49

Permalink

इल्लो

इल्लो इल्लो ... इल्लोजी सहज तुम आ गये ... आज फिर कविता लेके =)) =)) =)) =)) हे विडंबण कसलं आहो ... सगळा कोथळा बाहेर काढलाय
दिसावी माणसं सगुण, साकार. पण मनातल्या आयड्या निराकार, अथांग, अमर्याद. अन माझी स्थिती नेहमी "किती घेशील किंवा ठोकशील दोन कराने?"
टाळ्या !!! -(आंधारात टपल्या मारुन जाणार्‍यामुळे हल्ली त्रस्त) टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on गुरुवार, 07/01/2010 - 09:04

Permalink

हम्म

आहेत खरे कधी न संपणारे प्रश्न.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 07/01/2010 - 09:40

Permalink

आता

आता कवितांचा पूर (आवर) म्हणायची वेळ आली म्हणायची! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 07/01/2010 - 10:05

Permalink

सहजकाका,

सहजकाका, बोळा कुठे अडकलाय तुमचा???? ;) किती ट्युशन घ्याल आता लोकांची??
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 07/01/2010 - 11:08

Permalink

छान रे..

छान रे.. :) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on गुरुवार, 07/01/2010 - 11:29

Permalink

अन माझी

अन माझी स्थिती नेहमी "किती घेशील किंवा ठोकशील दोन कराने?
'ठोकशील' हा शब्द काळजाला भिडला ;) बाकी 'जनावर' असे एक विडंबन सुचले होते. असो... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on गुरुवार, 07/01/2010 - 12:51

Permalink

खुपच मस्त

खुपच मस्त जमलय हे विडंबन, इतक की स्वतंत्र कवितेचा मान मिळावा असं. काका लै फार्मात आहेत सध्या ;)
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on गुरुवार, 07/01/2010 - 15:57

In reply to खुपच मस्त by गणपा

Permalink

हेच

हेच मन्तो..मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by sur_nair on गुरुवार, 07/01/2010 - 19:12

Permalink

सुंदर

सुंदर
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 07/02/2010 - 11:17

Permalink

छान

छान ! --अवलिया
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 1966 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com