✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अंदाज अपना अपना

ट
टारझन यांनी
Wed, 06/30/2010 - 22:07  ·  लेख
लेख
णमस्कार्स लोक्स , शिर्षक वाचुन एकदम अमिर-सलमान-परेश रावल समोर उभे राहिले की नाही ? अगदी !! ज्याला "अंदाज अपना अपना" आवडला नाही असा एकंही जण मला भेटलेला नाही. आज पर्यंत ६० वेळा तरी हा पिक्चर पाहिला असेल. नंतर तर काऊंटिंग विसरलो.
मी लै लहाण असतांना माझ्या मावशीच्या घरी पहिल्यांदा हा पिक्चर पाहिला होता. तेंव्हा केबल म्हणजे "वा वा !! केबल आहे का घरी !! वावावा !! " असला प्रकार होता. रात्री घरात सगळे झोपले होते आणि मी मावसभावांबरोबर हा चित्रपट पाहात होतो. " आवाज करु नका रे , नाही तर टिव्ही बंद करा ... काकांना फर्स्टशिप आहे ! " अशी कडक तंबी मावशीने दिली होती. पण माझं हसु काही केल्या थांबतंच नव्हतं !! मावशीने साताठ वॉर्नींग दिल्या .. मावसभाऊ गप्प बघ म्हणुन वैतागले पण माझं हसणं काही आवरंतंच नव्हतं !! शेवटी टिव्ही बंद केला गेला. पण तरीही माझं हसणं थांबत नव्हतं .. मधेच मला खळखळुन हसु येत होतं ;) तर असा हा अफलातुन सिनेमा !! चित्रपटाच्या सुरुवाती पासुन ते "द एंड" येई पर्यंतंच नव्हे तर त्यानंतरही हा चित्रपट अगदी मनमुराद मणोरंजण करतो .. "राजकुमार संतोषी" ह्या अतिषय हुषार डिरेक्टरचे उपकार मानावे तेवढे थोडकेच! हे काही चित्रपट परिक्षण नव्हे. ह्या चित्रपटाणे माझ्या लाईफ मधला बराच काळ मला जो अफलातुन आणंद दिला त्याबद्दल काहीबाही खरडणं ह्याला परिक्षण म्हणता येणार नाही , नव्हे .. आम्ही ह्या चित्रपटाचं परिक्षण करण्याची लायकीच राखत नाही. .. कोदांच्या लेखाला प्रतिक्रीया देतांना जसं कोणत्या वाक्यावर लिहु कोणत्या वाक्याला सोडु असं व्हावं तसंच "अंदाज अपना अपना" चा कोणता सिन हायलाईट करु न कोणता नको असं होतं !! तेंव्हाचे सलमान-आमीर आजसारखे निगरगट्टं आणि कडकलेले दिसत नव्हते. एकदम "क्युट" वगैरे म्हणता येतील असे चेहरे आणि कैक क्युट एक्स्प्रेशन देऊन बनवलेला ह्युमर ह्याला आजही तोड नाही. ह्या चित्रपटा आधी आणि नंतरही बाप सिनेमे येऊन गेले असतील , पण माझ्यासाठी तरी "अंदाज अपना अपना" च्च ! आमिर खान, सलमान खाण ने धुम तर केलीच्चे , पण शक्ति कपुर चा "क्राईम मास्टर गोगो" , परेश रावलचा डब्बल धमाका "पत्ते बिछवणारा , गेम बजाने वाला तेजा" आणि "वेळेचा पक्का शब्द मोजुन मापुन बोलणारा रामगोपाल बजाज" , विजु खोटे चा "हाथ को आया मुह ना लगा वाला स्मार्ट बॉय रॉबर्ट" , ड्युप्लिकेट लॉयन अर्थात शेहजाद खान चा "प्लान के मुताबिक चालणारा भल्ला" हे एकसे बढकर एक बाँब आहेत ...... आणि हे कमी की काय म्हणुन मेहेमुद , अमर-प्रेम चे पप्पा लोक , आणि पोलिस ठेशणातला फेव्हरिट इणिस्पेक्टर पण उरली सुरली कसर काढुन टाकतात. मी पामर काय ष्टोरी सांगणार? ती तर सर्वांना माहितीच असेल (तोंडपाठही असेल) जुहीची स्वप्न पाहाणारा आमिर खान जेंव्हा "आयला ! जुही !!" म्हणतो तेंव्हा खुदकन हसु फुटतं !! :) ह्या डायलॉगचा उपयोग मी आमची म्याडम आमच्यावर रागवली की करतो , अतिशय प्रभावी उपाय... आमच्या सायटीवर मी आणि माझे दोन कलीग मिळुन पुर्ण "अंदाज अपना अपना" चा माहौल तयार करतो, सगळ्यांचेच डायलॉग्ज पाठ असल्याने त्यांची लिंक कधीही लागते आणि आमच्या क्युब मधलं वातावरन हास्यलाटांनी ओसांडुन वाहतं !! कधी कधी ब्यांकेची बोर लोकं आमच्याकडे भुवया वर करुन कपाळाला आठ्या पाडुन बघतात , बट हु केयर्स ? "ये तेजा तेजा क्या है ... ये तेजा तेजा " क्राईम मास्टर गोगो गोज फॉर अ टोज !! =)) "सुनो सुनो दुनिया के लोगो .. सब से बडा है मिस्टर गोगो " भोळ्या सलमान खाणचा शिघ्रकवी काय जागृत होतो ? "तेजा मै हुं मार्क इधर है " ह्या डायलॉग मधे तुम्ही म्हणाल विनोदी ते काय ? पण चित्रपट पहाताना लोटपोट व्हावं इतकं खतरणाक त्याचं टायमिंग आहे "लाख लाख के पचास चेक होयेंगे सर " ह्या स्मार्ट बॉय रॉबट च्या मेंदुंच कौतुक वाटतं.. "ये वास्को दा गामा की गन है " ह्यावरच्या "किस के मामा की गन है " ह्या तेजा च्या पंच वर मी केवळ मरायचा बाकी राहातो. पोलिस ठेषणातला पाच मिंटाचा सिनही काय कमी नाही ... रोडवर मारपिट करण्याच्या कारणावरुन तुरुंगाचं ओपनींग करायला आणलेल्या अमर-प्रेम इनिस्पेक्टरच्या डोक्यावर ज्या मिर्‍या वाटतात त्याला उपमा नाही =)) "सर आप शकल से गधे उल्लु के पठे लगते हो लेकीन आप हो नही " , " सर चाय मे शक्कर कम है " काय लिहु काय नको ? लॉजमालकाला "रामानंद सागर च्या रामायणातला राम-भरत मिलणाचा " सिन आठवतो तेंव्हा माझ्या गालांना वात आलेला असतो .. "क्राईम मास्टर गोगो .. आखे निकाल के गोटिया खेलुंगा ... आया हुं कुछ ना कुछ तो लुट के जाऊंगा .. खानदानी चोर हुं मै मोगँबो का भतीजा .. " इत्यादी गोगो के कारनामे म्हणजे अगदी कहर आहे कहर. मी इथे कितीही लिहीलं तरी त्यात पिक्चर पहाण्याची सर येणार नाही , तसा माझा आग्रह ही नाही ... पण मी कधी निराश वैगैरे असलो की हा चित्रपट जरुर पाहातो, मित्रांच्या घोळक्यात असलो की अंदाज अपना अपना चे संवाद आपोआप एका मागोमाग ओठांवर येतात. ह्या चित्रपट बहुतेक ९३-९४ मधे आला असावा... त्या वेळी जेंव्हा ह्यायले विनोद लिहीले गेले तेंव्हा तर ते एकदम फ्रेश असावेत , जे मला आजही तितकेच फ्रेश वाटतात .. निखळ मनोरंजण करतात ... तेंव्हा .. ज्यांनी "अंदाज अपना अपना" पाहिलाय त्यांना पुन्हा एकदा उजळणी झालीच असेल , ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरुर पहा .. आणि ज्यांनी हा पिक्चर पाहिला पण त्यांना हा पिक्चर अगदी कॉमन वाटला त्याणा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ;)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15256 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

हा हा हा

सुमीत भातखंडे
Wed, 06/30/2010 - 22:24 नवीन
काय लिवलय राव. एकदम मनातलं. हा ही एक असाच अफलातून सीन संपूर्ण पिक्चरच भारीये. कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

आनंदयात्री
गुरुवार, 07/01/2010 - 10:33 नवीन
हेच म्हणतो !! एकच नंबर लेख .. लै आवडला .. पुन्हा पुन्हा वाचला .. आमचा टारु छान लिहतोच यात वाद नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत भातखंडे

एकदम

गणपा
Wed, 06/30/2010 - 22:25 नवीन
एकदम भन्नाट चित्रपट आहे. साला ३ तास फुल टाईम पास. आम्ही पण याची गणती केव्हाच सोडली आहे असाच अजुन एक जुना चित्रपट म्हणजे 'जाने भी दो यारो'.
  • Log in or register to post comments

+१

उल्हास
गुरुवार, 07/01/2010 - 01:43 नवीन
एकदम भन्नाट चित्रपट आहे. साला ३ तास फुल टाईम पास. आम्ही पण याची गणती केव्हाच सोडली आहे असाच अजुन एक जुना चित्रपट म्हणजे 'जाने भी दो यारो'. असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१

छोटा डॉन
गुरुवार, 07/01/2010 - 12:34 नवीन
फुल्ल्टु लेख आणि फुल्ल्टु पिक्चर ... किती वेळा पाहिला ह्याचा खरोखर हिशोब नाही. खाली बर्‍याच जणांनी वेगवेगळे सीन्स लिहले आहेत. त्यात आमचेही २ पैसे.... जेव्हा सलमान रविनाला घेऊन जत्रेला का कुठे चालला असतो तेव्हा आमिर एक टांगेवाला बनुन तिथे हजर होतो. "अन्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न मुन्न्ना, अपनी बहेन को कहां लेके जा रहो हो मुन्न्ना, अन्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न्न " लै लै हसलो होतो आणि आजही हसतो. आणि त्यानंतरचे अप्रतिम गाणे ... "एल्लो एल्लो, एल्लो जी सनम हम आ गये, आज फिर दिल ले के ...." एकच नंबर, केवळ क्लास !!! मस्त लेख रे टार्‍या, मजा आली साला ! ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्हास

मस्त

शिल्पा ब
Wed, 06/30/2010 - 22:29 नवीन
मस्त पिच्चर है ... अमीर खान यकदम गोजिरवाणा दिसतो यात.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

नई सुराही ताजा पानी

रामदास
Wed, 06/30/2010 - 22:31 नवीन
तू पी ले जानी ..... हा या गाण्यातला निरोप आहे. त्या खेरीज "लाखो मुर्गीयोंके लाखो अंडे । मै ब्रेड भी बनाउंगा ....हमारा बजाज" या डायलागचा उल्लेख न केल्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ ए लो जी सनम हम आ गये आज फिर दिल लेके....हे गाणे म्हणावे.
  • Log in or register to post comments

सॉरी शक्तिमान !!

टारझन
Wed, 06/30/2010 - 22:43 नवीन
तेच तर म्हणतोय मालक. .. काय वेचु न काय सोडु अस्सं होतंय ... "मै पोल्ट्रि खोलुंगा .. लाखो मुर्गीया पालुंगा .. लाखो मुर्गीया करोडो अंडे देगी .. उनके कई करोड ऑम्लेट... वो खाने के लिये पांव भी मै ही दुंगा .. मै बेकरी भी खोलुंगा ..... ऑम्लेट का राज्जा ब्रेड का बादशा तेजा .. " प्रत्येक वाक्यापरत हसण्याचे ठसके वाढत वाढत जातात .... म्युजिक बद्दल काय बोलावं .. ह्या पिक्चर मधे ज्या प्रकारची गाणी आणि म्युजिक आहे ते आणखी कुठल्याच पिक्चर मधे ऐकलं नाही ... गाणी पण लै भारी हो ... "दो मसताने चले जिंदगी बनाने ... " पासुन "इल्लो इल्लो ... " "र्रिली" म्हणणारी क्युट क्युट करिश्मा आणि "लिजिये ऑरेंजेस खाईयेना " म्हणणारी गोडगोड रविना .. च्यायला नाव ठेवायला कुठे जागाच नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

+१

मोहन
Wed, 06/30/2010 - 22:49 नवीन
छान पिक्चरची आटवण दिल्या बद्दल धन्यवाद. आमीर खानचे विनोदी पिक्चर्स फारच आवडतात. मोहन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हॅहॅहॅ..लै

प्रभो
Wed, 06/30/2010 - 22:36 नवीन
हॅहॅहॅ..लै भारी पिक्चर.... हापिसवरून एक किस्सा आठवला...माझी जुनी TL ... लैच सोज्वळ.....तिला तिच्या नवर्‍याने एका दिवसात ३ वेळा 'मुसाफिर' दाखवला... :D आणी तिच्याकडून डायलॉक पाठ करून घेतले. तिने ह्याविषयी हपिसात आम्हाला सांगितल्यावर मी आणी तिच्या नवर्‍याने संगनमत करून तिला हापिसात पण मुसाफिरवरून पिडायला सुरुवात केली.... =)) =)) =))
  • Log in or register to post comments

झकास्स......

जेन
Wed, 06/30/2010 - 22:49 नवीन
खूपच छान मूवी आहे........ आप तो दानी हो ........घ्यानी हो.......अंतरयामी हो.....आप तो स्वामी हो......शक्तीमान हो........बुद्दीमान हो......बलकी आप तो पुरुष ही नही........... महापुरुष हो.........महापुरुष.........
  • Log in or register to post comments

हे कसं विसरलात?

जे.पी.मॉर्गन
गुरुवार, 07/01/2010 - 18:32 नवीन
गोगोजी आपका घागरा !??!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेन

बाबूलाल , नमकहराम

अडगळ
Wed, 06/30/2010 - 22:54 नवीन
मेरे दुकान के सामने अपनि दुकान लगा दी ? ये मेरी नही , आप ही कि दुकान हे मालिक.
  • Log in or register to post comments

"हॅपी बर्थ

मेघवेडा
Wed, 06/30/2010 - 22:57 नवीन
"हॅपी बर्थ डे रॉबर्ट!" "सर आपने बताया नही आज मेरा बर्थडे है!" =)) =)) =))
  • Log in or register to post comments

याद्दाष्त

टारझन
Wed, 06/30/2010 - 23:15 नवीन
=)) =)) =)) याद्दाष्त परत आल्याचा प्रुफ देण्यासाठी "मै ये गया .. यु यु यु ... यहा से यहा गया ये मारा .. ये ये ये .. औए ये गोल ... " =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

"कैसे नौकर

मेघवेडा
Wed, 06/30/2010 - 23:18 नवीन
"कैसे नौकर है इस घर मे.. पेहले ले नही रहे थे अब दे नही रहे हैं!" =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

"बदतमीज़

घाटावरचे भट
गुरुवार, 07/01/2010 - 00:18 नवीन
"बदतमीज़ लडकी, सोफे पे चढती है...." - ठाकूर अमर सिंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

मी नाही

शुचि
Wed, 06/30/2010 - 22:58 नवीन
मी नाही पाहीलाय :( सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

हायला..

उपास
Wed, 06/30/2010 - 23:15 नवीन
जीवन व्यर्थ आहे मग :) बघ्घायलाच हवा... उपास मार आणि उपासमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

इथे ऑनलाईन

मराठे
गुरुवार, 07/01/2010 - 07:47 नवीन
इथे ऑनलाईन बघता येइल. जरूर बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

+१

मी-सौरभ
गुरुवार, 07/01/2010 - 20:45 नवीन
----- सौरभ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

सहीच..

उपास
Wed, 06/30/2010 - 23:13 नवीन
संवादांचं टायमिंग एकदम म्हणजे एकदम हुच्च ह्या सिनेमातलं.. अजून एक आवडता विनोदी चित्रपट म्हणजे अंगूर.. पन अंदाज अपना अपना त्याहूनही काकणभर सरसच (कदाचित ह्या पिक्चरबरोबर लहानपणाची नाळ जुळलेय म्हणून असेल..) लगे रहो टारझनभाय.. उपास मार आणि उपासमार
  • Log in or register to post comments

ये फिरौती

Pain
Wed, 06/30/2010 - 23:21 नवीन
ये फिरौती कि रकम है या मय्यत का चंदा =)) =))
  • Log in or register to post comments

च्यामायला

टारझन
गुरुवार, 07/01/2010 - 00:11 नवीन
च्यामायला तु कोण ? - (गोविंदा) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

वाचनमात्र मी...

सविता
Wed, 06/30/2010 - 23:23 नवीन
नेहमी मिसळपाव वर वाचनमात्र असणारी मी... आज मात्र माझ्या सर्वात आवडत्या चित्रपटाबद्दल लिहिलंत.. की ही प्रतिक्रिया लिहिण्यासाठी मला लॉगिन करणे मस्ट झाले. असो... शब्द न शब्दा शी सहमत आहे... "सॉरी सर.. गलती से मिसटेक हो गया".... "ढॉकि टि की ढॉ... बंदूक मे सिर्फ एक ही गोली थी" वरचा शक्ती कपूर चा डान्स... महापुरूष..... वा वा वा...परत बघायलाच हवा आता.... सविता. ------------ आयुष्याचे हे चक्र चालते....साद घालते आशा....स्वप्नामागून सत्य धावते...ही दैवाची रेषा...... जन्मापासून कोण खेळवी...तुलाच नाही ठावे......हवे...हवे.....ची हाव सरेना...किती हिंडशी गावे.....
  • Log in or register to post comments

..तेजा मै हू

कानडाऊ योगेशु
Wed, 06/30/2010 - 23:32 नवीन
..तेजा मै हू क्युंकी ..मै ही तेजा हू! ..तेजा ये नही वो है क्योंकी मार्क उधर है.. ..क्राईम मास्टर गोगो आया हूं तो कुछ ना कुछ तो लेके ही जाऊंगा.. (मला सुनिल शेट्टी,परेश रावल चा १-२-३ पण फार आवडला होता. तुषार कपूर-इशा देवोल,तनिषा-उपेन पटेल चे सीन फास्ट फॉरवर्ड केले तर उरलेला चित्रपट चांगली करमणुक आहे.) --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

.तेजा ये

टारझन
Wed, 06/30/2010 - 23:38 नवीन
.तेजा ये नही वो है क्योंकी मार्क उधर है..
क्या राबट .. गलती शे मिष्टेक हो गया क्या ? ते " तेजा मै हु .. मार्क इधर है" असं बजाज सांगत असतो =)) बाकी १-२-३ पण अफलातुन आहे .. "पांपा..." नंतर प्रत्येक गोष्टीचं अनेकवचन लावनारा विलन पण लै भारी .. "बैन दा टकास.. " "डेरिंग्जबाज आदमी" "एक ऐसा बम बनाओ.. एक ऐसा बम बनाओ... जो फटे .. " =)) टू कुल ... बट णॉट अ‍ॅज कुल अ‍ॅज अंदाज अपना अपना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

१-२-३ पण

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 07/01/2010 - 12:20 नवीन
१-२-३ पण खल्लास. "केल्विन क्लीन क्लीन बोलके खुराना का माल देता था." "पापा फटां?" पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

पापा

वपाडाव
Mon, 02/14/2011 - 18:11 नवीन
बाकी १-२-३ पण अफलातुन आहे .. "पांपा..."
पापा, बम झारखण्ड में रिमोट केरला में, कैसे फटेगा पापा??? लास्टच्या सीनमध्ये, सुनील शेट्टी : "मेरा लेफ्ट या आपका लेफ्ट?" पिन्तोस : "अब तो तू ये भी नाहि पूछ सकता क्यू की हम सब एक डीरक्षण में बैठे है !!!" आणखी लै आहेत, तुर्तास एवढ्यातच समाधाण माणा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अन्दाज

प्रशान्त पुरकर
गुरुवार, 07/01/2010 - 17:21 नवीन
अन्दाज अपना अपना सहिच आहे.... कुणि The Angrez बघितला आहे का ? हाहि असाच एक भन्नाट चित्रपट आहे... एथे बघता येइन... http://www.youtube.com/watch?v=Tgq8qLe-RsI&feature=related
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

हा हा हा.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 07/01/2010 - 17:47 नवीन
हा हा हा. मस्तं आठवण करून दिलीत. :) "ए सलीम तू दरवाजा मार". "माँ की किरकीरी" "डांलरां डांलरां" पुण्याचे पेशवे हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशान्त पुरकर

चारमीनार

Dipankar
गुरुवार, 07/01/2010 - 17:57 नवीन
चारमीनार के गली गली से घुमके आयेला है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मागे चुकुन

गणपा
Fri, 07/02/2010 - 16:43 नवीन
मागे चुकुन आख्खा चित्रपटांचा फोल्डरच डिलीट झाला. त्यात हा आणि इअतर बरेच गेले. कहींची नावच आठवत नव्हती. हा आता परत उतरवुन घ्यायला हवाच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dipankar

हाहा!

मेघवेडा
गुरुवार, 07/01/2010 - 00:06 नवीन
आणि माझा सर्वात आवडता ड्वायलॉक (त्यातल्या त्यात..) आनंद अकेला उर्फ धमरूचा : "जी ये है, नवाब नूरअली निजामुद्दिन बरकतअली ऊर्फ बडेमियाँ, और ये है अमिरअली अस्लीलअली असली ऊर्फ छोटेमियाँ, और मै हूं ढमरू ढैमूरलंग तुर्र्र्र्र्र्रुप!" =)) =)) =)) तो 'तुर्र्र्र्र्र्रुप'चा उच्चार लिहिणं केवळ अशक्य आहे! =)) इथे बघा १:४० पासून! आणि हे सगळं चालू असताना रॉबर्ट बोटं मोजत असतो! आणि शेवट म्हणतो.. "इतने सारे नाम? बाकी लोक किधर है?" =)) =))
  • Log in or register to post comments

+१

नंदन
गुरुवार, 07/01/2010 - 00:10 नवीन
>>> इतने सारे नाम? बाकी लोक किधर है?" --- एक नंबर! हाच ड्वायलाक स्किझोफ्रेनिक लोकांसाठी पण वापरता येईल असं काल एका चर्चेत वाटून गेलं होतं ;)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

+२

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 07/01/2010 - 10:12 नवीन
मलाही असंच वाटलं होतं, कालच्या एका चर्चेत! गेल्या दशकातचा पाहिला तरीही 'अंदाज अपना अपना' मी बराच उशीरा पाहिला. बर्‍याच लोकांनी म्हटल्याप्रमाणे चिक्कार वेळा पाहिला आहे. माझा त्यातला आवडता सीन म्हणजे आमिर आणि सलमान बसमधे पहिल्यांदा भेटतात आणि एकमेकांना टेपा टाकत असतात तो! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

" मै तेजा हु

नि३
गुरुवार, 07/01/2010 - 00:03 नवीन
" मै तेजा हु क्युकी मेरा नाम तेजा है" ---नि३.
  • Log in or register to post comments

भन्नाट

नंदन
गुरुवार, 07/01/2010 - 00:12 नवीन
पिच्चर आहे, राव. दुर्दैवाने थेटरात लागलं होतं तेव्हा म्हणावा तसा गल्ला जमवता आला नाही. वर बहुतेक डायलॉग्ज आले आहेतच - पण अजून दोन म्हणजे - "सर, चाय में शक्कर डालनेका टाईम हो गया?" "गोगोजी, आपका घागरा"

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

प्रासंगिक

घाटावरचे भट
गुरुवार, 07/01/2010 - 00:21 नवीन
प्रासंगिक विनोदही भरपूर आहेत. उदा. "राबर्ट, मॅडम को आराम करना है और हमें बहुत सारा काम. कमॉन, फॉलो मी" असे भल्लाने म्हटल्यावर रॉबर्ट त्याच्या आधी तिथून निघून जातो हा सीन झकासच... बाकी ड्वायलॉक तर आहेतच - "ये वास्को डि गामा की गन है" "किसके मामा की गन है???"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

खल्लास!

सहज
गुरुवार, 07/01/2010 - 06:26 नवीन
कैसी बात कर रहा है, दो दोस्त एकही प्याली चाय... बाल काटे भी है और पता भी नही चलता... सिनेमा भन्नाट होताच पण आमच्या (तेव्हाच्या गर्लफ्रेंड व) हिच्याबरोबर पाहीलेला पहीला वहीला सिनेमा, कधीच नाही विसरणार! :X
  • Log in or register to post comments

सिनेमा

टारझन
गुरुवार, 07/01/2010 - 07:23 नवीन
सिनेमा भन्नाट होताच पण आमच्या (तेव्हाच्या गर्लफ्रेंड व) हिच्याबरोबर पाहीलेला पहीला वहीला सिनेमा, कधीच नाही विसरणार!
घ्या !!! स्स्साला ! काय एकेकाचं णशिब आहे ... कोणाचा "असा" पहिला चित्रपट "अंदाज अपना अपना" ठरतो .. आमचा "तारे जमीन पर" होता =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

कोणाचा "असा" पहिला चित्रपट

वपाडाव
Mon, 02/14/2011 - 18:16 नवीन
कोणाचा "असा" पहिला चित्रपट
आमचा रीलीज होतो की नै "असा" सिनेमा ते कळत/समजत/उमजत नाहीये.... किती व्हालेन्तैन आले नि गेले... आम्ही की असा सिनेमा पाहू नै शकलो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

ए लो जी सनम

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 07/01/2010 - 07:28 नवीन
ए लो जी सनम हम आ गये आज फिर दिल लेके.....गाण्याने ओ.पी नय्यर ची याद ताजी केली....
  • Log in or register to post comments

पहायला हवा

चित्रा
गुरुवार, 07/01/2010 - 08:12 नवीन
सिनेमा पहायला हवा. आवडले रसग्रहण..
  • Log in or register to post comments

भन्नाट !

दिपक
गुरुवार, 07/01/2010 - 09:37 नवीन
भन्नाट हाच शब्द.. कितीवेळा पाहिला ह्याची गणतीच नाही. कधी बोर झालो तर मोबाईलनेट युट्युबवर त्याचे एकेक सीन पाहत असतो. तेजा:गोगो! हिरे इन लोगो के पास है! अमर: अंकल अंकल! अमरप्रेम:नमस्ते अंकल नमस्ते! तेजा: ऎ मे अंकल नही हु मे तेजा हु तेजा! अमर: तेजा?? लेकीन तेजा के गाल पर तो मार्क है??आ क्यु रॉ्बर्ट? रॉबर्ट:हा हा, मार्क होना चाहिये! तेजा:कौनसा मार्क रे कहा का मार्क यार! अंकल:मे तेजा हु क्योंकी मेरा नाम तेजा है! तेजा: तेजा मे हु सफेद रामु, मै! मे हु तेजा यार! अंकल:रामु सुधर जा.. तेजा मे हु! तेजा:अबे तेजा मे हुं! अंकल:तेजा मे हुं मार्क इधर हैi! तेजा:भाड मे गया मार्क, मे इधर हुं ना यार! अंकल:मे तेज हुं मार्क इधर हैii!!! गोगो: खामोश !!!! अंकल:मे हुं तेजा! गोगो:ये तेजा तेजा क्या है... ये तेजा तेजा?? तसाच अमोल पालेकरचा गोलमाल, गोंवीदाचा दिवाना मस्ताना, दुल्हेराजा, हेराफेरी.. वगैरे....
  • Log in or register to post comments

आणखी एक

मी_ओंकार
गुरुवार, 07/01/2010 - 10:36 नवीन
अब और एक कन्फ्युजन..... 'अंकल' कौन है?
  • Log in or register to post comments

ज ह ब र्‍या

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/01/2010 - 11:25 नवीन
=)) =)) ज ह ब र्‍या रे टार्‍या ! मस्तच लिहिले आहेस, अगदी झ का स ... ऑर्कूट जॉईन केल्या केल्या पहिली कम्युनिटी कुठली जॉईन केली असेल तर ती 'अंदाज अपना अपना' आणि त्यानंतर 'अशी हि बनवा बनवी'. आजही ह्या अंदाज अपना अपना कम्युनिटीची सभासदसंख्या ३६०००+ आहे, ह्यातच सगळे आले. बाकी तुझ्या लेखात " सर चाय मे शक्कर कम है " ह्या डायलॉगच्या जागी "सर चाय मे शक्कर डालने का टाईम हो गया ?" असे हवे आहे का? का मी काहितरी विसरतोय ?? :? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

बाकी

टारझन
गुरुवार, 07/01/2010 - 12:59 नवीन
बाकी तुझ्या लेखात " सर चाय मे शक्कर कम है " ह्या डायलॉगच्या जागी "सर चाय मे शक्कर डालने का टाईम हो गया ?" असे हवे आहे का? का मी काहितरी विसरतोय ??
हा सिन पोलिस ठेशणातला आहे बे :) अमरप्रेम मिळुन इनिस्पेक्टरचं बौद्धिक घेत असतात. च्यावाला चहा घेउन येतो तेंव्हा अमिर खान आधिच तो कप उचलुन घेतो :) आणि म्हणतो .. "ए क्या चाय लाया रे ? ... सर इसमे शक्कर कम है .." आठवलं का ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

येस येस

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/01/2010 - 13:01 नवीन
येस येस धन्यु धन्यु :) आत्ता पुर्ण संवाद लिहिलास तेंव्हा ट्यूब पेटली बघ :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मस्त मस्त मस्त...

स्वाती दिनेश
गुरुवार, 07/01/2010 - 11:41 नवीन
किती वेळा पाहिला हा सिनेमा त्याचा काऊंट ठेवणं सोडलं होतं.. मूड फ्रेश करायची गरज असेल तेव्हा कुठूनही पहायला सुरू केला हा सिनेमा तरी काम होऊन जातं,:) टारु, आता परत एकदा उगाचच पहायलाच हवा.. छान लिहिलं आहेस. स्वाती
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा