Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Wed, 06/30/2010 - 16:04
तो अविष्कार आता माझा नव्हे तो पुरस्कार आता माझा नव्हे.. मी मस्त मजेत गायलो, भिजलो तो पाऊस आता माझा नव्हे.. घेतली होती रम्य, हळुवार चुंबने तो किनारा आता माझा नव्हे.. मोप मिळविल्या टाळ्या अन् शिट्ट्या तो रंगमंच आता माझा नव्हे.. मी स्त्रीलंपट काहीसा, सभ्य बुरख्यातला! तो स्वभाव आता माझा नव्हे.. घुसविली मी काळजात कट्यार तो तेजिनिधी आता माझा नव्हे.. उपाध्या, पद्व्या करतो अता अर्पण तो सन्मान आता माझा नव्हे.. -- तात्या अभ्यंकर.

Submitted by अवलिया on Wed, 06/30/2010 - 16:06

Permalink

या वेगाने

या वेगाने तात्या कविता करत राहिला तर दिवाळीच्या आत त्याचा कविता संग्रह नक्की निघेल. लगे रहो.. :) --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 06/30/2010 - 16:07

In reply to या वेगाने by अवलिया

Permalink

(विषय दिलेला नाही)

=)) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Wed, 06/30/2010 - 16:09

In reply to या वेगाने by अवलिया

Permalink

या वेगाने

या वेगाने तात्या कविता करत राहिला तर दिवाळीच्या आत त्याचा कविता संग्रह नक्की निघेल. गणपतीच्या आतच निघेल अस वाटतय... आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by आंबोळी on Wed, 06/30/2010 - 16:07

Permalink

मस्त!

काहीतरी कुठेतरी खुप खोल आत मधे पिळवटल गेलय खर.... फारच छान! आंबोळी
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 06/30/2010 - 16:11

Permalink

काय

काय, झालंय काय?
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 06/30/2010 - 18:10

In reply to काय by श्रावण मोडक

Permalink

करुन भागले

करुन भागले वगैरे ... पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 06/30/2010 - 16:12

Permalink

दिले हिणकस

दिले हिणकस प्रतिसाद झोंबलेल्या मिर्‍या... उडवती संपादक , तो प्रतिसाद माझा नव्हे.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 06/30/2010 - 16:30

Permalink

वा वा!

चांगली वाटली. चांगली जमलीये कविता की गज़ल :) अवांतरः तात्या, पावसाळा आहे, जरा पाणी उकळुन वगैरे घ्या. कालपरवापासुन तुम्हाला इतक्या कविता का होताहेत? :D
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 06/30/2010 - 16:34

In reply to वा वा! by धमाल मुलगा

Permalink

अवांतरः

अवांतरः तात्या, पावसाळा आहे, जरा पाणी उकळुन वगैरे घ्या. कालपरवापासुन तुम्हाला इतक्या कविता का होताहेत?
आरारारारा ... बाजार उठला =)) =)) =)) कसलं हालकट आहे हे बेनं !!
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Wed, 06/30/2010 - 16:39

In reply to वा वा! by धमाल मुलगा

Permalink

चांगली

चांगली जमलीये कविता की गज़ल
अरे म्हणून मी लेखनविषय निवडताना 'गझल' हा प्रकार निवडलाच नाही.. आपल्याला साला गझलचे नियमच माहीत नायत.. त्या पेक्षा कविता किंवा मुक्तक बरं.. कडक नियमांचं बंधन नाय.. अर्थात, केसूकडे गझल लिवायला पण मी शिकणारे आस्ते आस्ते.. गुरुशिवाय विद्या नाय!
कालपरवापासुन तुम्हाला इतक्या कविता का होताहेत?
सध्या गाठीशी पैशे नाहीत, धंदा बसला होता तो आस्ते आस्ते सुधारतो आहे त्यामुळे दाढी वगैरे वाढवून 'नव-कवी' झालो आहे. आणि त्यामुळेच मराठी सारस्वताच्या भिंतीवरी सध्या कवितेच्या रेघा मारतो आहे..! :) (हिमालयाची उशी घेऊन झोपणारा) तात्या सरंजामे! :) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 06/30/2010 - 17:40

In reply to चांगली by विसोबा खेचर

Permalink

हा हा हा! लय

हा हा हा! लय भारी. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on गुरुवार, 07/01/2010 - 02:56

In reply to वा वा! by धमाल मुलगा

Permalink

हे

हे उदाहरणार्थ एकदम मस्तच. बाकी लगे रहो तात्याभाय. Image removed. मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही
  • Log in or register to post comments

Submitted by II विकास II on Wed, 06/30/2010 - 16:33

Permalink

परीस्थिती

परीस्थितीने गांजल्याशिवाय खरे काव्य बाहेर पडत नाही ते खरच आहे म्हणा.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 06/30/2010 - 18:14

In reply to परीस्थिती by II विकास II

Permalink

आरशात

आरशात पाहीलेले ते चेहरे माझेच का? का प्राक्तनास भुलणारे आरसे फितूर होते पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे Phoenix
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Wed, 06/30/2010 - 16:37

Permalink

पितामह

पितामह तात्यांचे दक्षिणायन भारी आहे ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 06/30/2010 - 18:16

Permalink

आवडली!!

आवडली!!
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Wed, 06/30/2010 - 19:51

Permalink

छान !

खालील ओळी कोणाच्या आहेत ते आठवत नाहीत पण तुमची कविता वाचताना आठविल्या वेदना कळीकाळाच्या,अतीव दुःख पचवण्यास, पहिल्या धारेची पावशेर देशी पिऊन पाहिली ! शोधीले मग मीच माझे तेज आत्मकिरण, सुर्याकडे मी जरा आज पाठ करुन पाहीली ! ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on गुरुवार, 07/01/2010 - 12:07

In reply to छान ! by वाहीदा

Permalink

वाहिदाजी

जबरदस्त ओळी आहेत या "शोधीले मग मीच माझे तेज आत्मकिरण, सुर्याकडे मी जरा आज पाठ करुन पाहीली !" =D> *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Wed, 06/30/2010 - 19:55

Permalink

छान कविता प्रसवताहेत.

वाचायला सोप्या आणि कळायला देखिल सोप्या आहेत. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 06/30/2010 - 19:58

Permalink

सुरेख.

सुरेख.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on गुरुवार, 07/01/2010 - 07:42

Permalink

मोप

मोप मिळविल्या टाळ्या अन् शिट्ट्या तो रंगमंच आता माझा नव्हे मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on गुरुवार, 07/01/2010 - 09:47

Permalink

तात्या

तात्या सरंजामेंना कविता चांगली जमली आहे ;) कविता होऊ द्यात अजून ऋषिकेश ------------------ माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: अक्षरधूळ, लेखकः चंद्रशेखर
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on गुरुवार, 07/01/2010 - 11:23

Permalink

प्रतिसादक

प्रतिसादकर्त्या सार्‍या रसिकवरांचे आभार.. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by II विकास II on गुरुवार, 07/01/2010 - 11:25

In reply to प्रतिसादक by विसोबा खेचर

Permalink

>>प्रतिसादक

>>प्रतिसादकर्त्या सार्‍या रसिकवरांचे आभार.. धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on गुरुवार, 07/01/2010 - 11:34

Permalink

कविता

कविता फार्फार आवडली. 'चाललो, गेलो, आता फिरुनि न येणे, इथे आता काहीच लिहिणार नाही' वगैरे पार्श्वभूमीवर खुलून दिसणारी कविता. पुलेशु. सन्जोप राव ठोकर ना लगाना हम खुद है गिरती हुई दीवारों की तरह
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 6519 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com