हातात वर्तमानपत्र
घेवुन आम्ही पहायचो
ती कर्क राशीचं भविष्य अन
मी तूळ राशीचं भविष्य पहायचो
राहूकाल सांभाळत
शुभ मूहूर्त शोधताना
असंच आयुष्यही मंगल बनवायचं
एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो
कालपुरुषाच्या मुखामधून
कधीतरी तिचा ग्रास ग्रहण झाला
मी मात्र बघतो आहे
दोन्ही राशी... कर्क आणि तूळ डोळ्यात पाणी आणून.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2567
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
नका हो
हे पण लै
१४
तूळ रास
खरंच
विडंबनात