Skip to main content

(तूळ)

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 25/06/2010 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
हातात वर्तमानपत्र घेवुन आम्ही पहायचो ती कर्क राशीचं भविष्य अन मी तूळ राशीचं भविष्य पहायचो राहूकाल सांभाळत शुभ मूहूर्त शोधताना असंच आयुष्यही मंगल बनवायचं एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो कालपुरुषाच्या मुखामधून कधीतरी तिचा ग्रास ग्रहण झाला मी मात्र बघतो आहे दोन्ही राशी... कर्क आणि तूळ डोळ्यात पाणी आणून.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2572
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

नका हो उगाच रडवु आजच्या दिवशी! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

हे पण लै भारी..!

छान ! --अवलिया

तूळ रास निवडून तुम्ही ही कविता आमची केलीत हो. छान आहे.

खरंच डोळ्यात पाणी आलं..... मी ॠचा र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

विडंबनात हे पण का? ... चांगली आहे कविता