✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बालकविता - मोठ्यांचे ऐका

श — शुचि, Fri, 06/25/2010 - 00:21
एक होती मासोळी, सुळसुळ पोहतसे जळी चमचम मऊ पोट करी,वर्ख मिरवे सोनेरी ||१|| आई तिची सांगे तिला,जपून नेहमी रहायाला जळात असे गळ टाकूनी,दुष्ट माणूस किनार्‍यावरी ||२|| मासोळी होती उचापती,भारी होती करामती तमा आईच्या बोलांची,नसे करीतसे कधीच ती ||३|| शिंपल्यातल्या मोत्यांशी, इतर सुंदर माशांशी लव्हाळांशी बेडकांशी, मस्ती करावी मनमुरादशी ||४|| सुळसुळत पळत सुटावे,आईचे कोणी ऐकावे आईने धपाटले तर्,मुळ्ळी फुगा करुन बसावे ||५|| मग एका काळ्या दिवशी, जाळ्यात सापडे मासोळी कोळी तिला पकडून न्याहाळी, त्यालाही मग दया येई ||६|| इतकी सुंदर जलराणीसम, मासोळी ही सोनेरी जर दिला नजराणा मी राजाला,मिळेल भरपूर द्रव्य मजला ||७|| राजा ठेवतसे संग्रही, चमचमणारी बाळ मासोळी मासोळी मात्र लागे झुरणी,आईबाबा मित्र आठवुनी ||८|| मासोळी बाळास उशीराने गोष्ट कळे, आईचे नेहेमी ऐकावे आई सांगे कळकळीने, बाळासाठी तिचे हृदय तळमळे ||९|| मोठे सांगती गोष्ट हीताची, ऐकावे त्यांचे ही रीत जगाची म्हणून मुलांनो आईबाबांचे ऐका,धोक्यापासून लांब रहा ||१०||

प्रतिक्रिया द्या
2120 वाचन

💬 प्रतिसाद (6)

हा हा

टारझन
Fri, 06/25/2010 - 00:25 नवीन
हा हा जबर्‍या नादमय कविता गं !! बोधपुर्ण आहे एकदम ;) -(क्रुर कोळी) टारझन टोळी
  • Log in or register to post comments

कविता आवडली

संदीप चित्रे
Fri, 06/25/2010 - 01:17 नवीन
'फाईंडिंग निमो' ह्या नितांत सुरेख सिनेमाची आठवण आली.
  • Log in or register to post comments

अशीच आठवण

धनंजय
Fri, 06/25/2010 - 01:39 नवीन
फाइंडिंग नीमोची आठवण झाली +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

+२

सहज
Fri, 06/25/2010 - 06:13 नवीन
फाइंडिंग नीमोची आठवण झाली. शिवाय भा.पो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

छान!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 06/25/2010 - 01:31 नवीन
छान!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

खुप छान जमलि कविता ! ! !

निरन्जन वहालेकर
Fri, 06/25/2010 - 09:27 नवीन
खुप छान जमलि कविता ! ! !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा