नाव खरं तर तितकंसं योग्य नाही कारण खालच्या रचनेत रूळ कुठेच येत नाहीत. पण प्रेरणा रूळ या कवितेवरून घेतली आहे ना (इतर वीसेक लोकांप्रमाणे!), म्हणून कंसात त्याच कवितेचं नाव दिलंय. काय म्हणता, मूळ रचनेचा दुवा कुठे आहे? बस्स काय, इतक्या विडंबनांत तुम्हाला सापडत नाही का? सालं सगळंच आयतं हवं आजकाल...
डोक्याला डोकं
लावून आम्ही बसायचो
ती माझ्या उवा घ्यायची
मी तिच्या उवांनी केस भरायचो
डोकं खाजवत
गप्पा मारत असताना
कधी विचारही करायचो
एकमेकांचं डोकं खाजवून द्यायचो
लायसॉल लावून
कधीतरी तिची केस सुधरून गेली
मी मात्र बनलो आहे एकदम अभिजात
विचारजंत...डोकं खाजवून खाजवून
वाचने
3498
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
डोक्याला
अरेरेरे
In reply to डोक्याला by मस्त कलंदर
राका
In reply to अरेरेरे by राजेश घासकडवी
हेहेहेहे...
तेच
In reply to हेहेहेहे... by भडकमकर मास्तर
डोकं
वा ! झकास ! ! !
६